जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • पनवेल: शहरातील एका मोबाईल शॉपीमधील सुमारे 20 लाखांचे मोबाईल चोरट्यांनी लांबविले. सूत्रांनुसार, येथील डॉ. आंबेडकर रोडवरील वेलनोसिटी मोबाइलच्या शोरूमचे मुख्य शटर उचकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. विविध कंपन्यांचे सव्वादोनशे मोबाइल फोन लंपास केले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नारायण पटेल यांनी तक्रार दाखल केली आहे. चोरीचे वृत्त कळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश घडवले व त्यांच्या पथकाने या शोरुमची तपासणी केली असून ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तपास सुरु आहे.
  July 9, 12:24 PM
 • मुंबई: पाऊस पडत नाही म्हणून वरुणराजाच्या नावानं मिरे वाटणा-या मुंबईकरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीची खेळखंडोबा झाला असून ठाणे जिल्ह्यातील काशिमीरा भागात भिंत कोसळून झालेल्या अपघाततात 10 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने ही भिंत कोसळली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई- अहमदाबाद महामार्गावर असलेल्या काशिमिरा पोलिस ठाण्याच्या मागे तन्वी बिल्डर्सच्या एका कॉम्प्लेक्सच बांधकाम सुरु आहे....
  July 8, 04:59 PM
 • ठाणे: विद्यार्थ्यांच्या दप्तर वाटपात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी तक्रार करत ठाणे महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी ठाणे महापालिका नगरसेवकांच्या एका शिष्टमंडळे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात केली. येथील गडकरी रंगायतन येथे जनता दरबार गुरुवार भरविण्यात आला होता. या दरबारात महापालिकेविरोधातच सर्वाधिक तक्रारी नोंदविण्यात आल्या. जनता दरबारात एकदा आलेल्या व्यक्तीवर पुन्हा येण्याची वेळ येणार नाही, याची दक्षता घेऊन तक्रारी तत्काळ निकाली काढण्यात...
  July 8, 12:15 PM
 • अलिबाग- खालापूर येथील रेव्ह पार्टी प्रकरणी हॉटेलचा मालक अपराजित मित्तल याच्यासह सहा आरोपींना आठ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश रायगड जिल्हा न्यायालयाने बुधवारी दिले. खालापूर येथील माऊंट व्ह्यू क्लब अँण्ड रिसॉर्ट परिसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून गांजा, कोकेन, एडीएम गोळय़ा, चरस व अन्य मादक पदार्थाचे सेवन करणार्या युवक-युवतींना ताब्यात घेतले होते. या प्रकरणी अटकेत असलेल्या स्नेहजित सेजलकर ऊर्फ बिल्टू (रा. देवनार), सुनील अशोक घुले, राहुल खन्ना, कुषन सुभाषकुमार,...
  July 7, 04:11 AM
 • ठाणे: ठाणे कारागृहात विभक्त कोठडीत शिक्षा भोगणाया एका कैद्याने कंटाळून आत्महत्या केल्याची घटना केली. कार्तिक राजेंद्र पिल्ले (वय-23) असे या कैद्याचे नाव आहे. त्याने शनिवारी रात्री कोठडीतील गजाला चादर बांधून गळफास घेतला. त्याने खून, घरफोड्या आणि शस्त्र बाळगणे या गुन्ह्यांत पोलिसांनी त्याला अटक केली होती. 2008 पासून तो येथील कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याला मानसिक त्रास होत असल्याने सव्वा वर्षांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे त्याला विभक्त कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याने...
  July 5, 02:03 PM
 • कल्याण: कल्याससह परिसरातील रिक्षा सीएनजी गॅसवर करण्यासाठी सीएनजी पुरविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेतर्फे रविवारी झालेल्या मेळाव्यात करण्यात आली. सर्व रिक्षा सीएनजीवर झाल्या तर रिक्षा भाड्यात 30 टक्के कपात करण्यात आमची ना नाही, असेही चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर वैजयंती गुजर-घोलप यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. आयुक्त रामनाथ सोनवणे, कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे,...
  July 4, 07:51 PM
 • डिझेल दरवाढ दर सहा महिन्यांनी किंवा नऊ महिन्यांनी झाल्यास प्रवाशांवर बोजा टाकणे योग्य नाही. त्याऐवजी टोल हटवा किंवा प्रवासी करात 10 टक्के सवलत दया. असे केल्यास एसटी महामंडळाला तिकीटवाढ करण्याची वेळच येणार नाही, असे महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशनच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. केवळ तिकिटात दरवाढ करून एसटीचा तोटा कमी करणे शक्य नाही. नुकतीच डिझेलमध्ये तीन रुपये आणि त्यानंतर सुमारे 50 पैसे दरवाढ करण्यात आली. अशा स्थितीत एसटीने दरवाढ केल्यास सर्वसामान्यांना त्याचा...
  July 3, 04:12 PM
 • ठाणे: अवघ्या सात महिन्यावर येऊन ठेपलेल्या ठाणे महापालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. ठाण्यातील संघटना मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आमदार बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, राम कदम आणि संपर्क प्रमुख मनोज चव्हाण यांच्यावर सोपविली आहे. मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांच्याकडे प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली असून आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिका-यांच्या दोन बैठकाही त्यांनी घेतल्या आहेत....
  June 29, 02:26 PM
 • ठाणे: केंद्र सरकारने गॅस सिंलेडर, डिझेल आणि केरासिनची दरवाढ केल्याने मुंबईकरांचा आवडता वडापाव तब्बल एक ते दोन रुपयांनी महागणार आहे. येत्या 1 जुलैपासून ही दरवाढ केली जाणार आहे. वडापावचे दर वाढणार असल्याचे फलक मुंबईत विक्रेत्यांकडून लावण्यात आले आहे. वडापावसोबत समोसा, कचोरी, भजी यांचेही दरवाढीचे संकेत विक्रेत्यांनी दिले आहे. केरोसिन ब्लॅकने विकत घ्यावे लागते तर तेलाचे भाव गगनाला भिडले आहे, बटाटे, मिरच्या, कोथिंबिर, बेसनही महागले आहे. त्यामुळे वडापावचे दर वाढविण्याशिवाय आमच्याकडे...
  June 28, 10:53 AM
 • घोडबंदर रस्त्यावर सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीने सारेजण हैराण झाले आहेत. संध्याकाळ झाली की, पोखरण एकवर गाडय़ांच्या लांबच लांब रांगा लागतात. अनेकदा त्या कोंडीतून बाहेर पडायला वाहनांना अर्धा ते एक तासदेखील जातो. हिरानंदानी मेडोज, लोकपुरम, वसंत विहार यांसारख्या मोठय़ा संकुलांबरोबर तुळशीधाम, टिकूजिनी वाडी या परिसरातदेखील वाढलेल्या गृहसंकुलांमध्ये जाणारी वाहने याच रस्त्यावरून ये-जा करत असतात. वाढलेल्या वाहनांमुळे कॅडबरी येथील सिग्नललादेखील...
  June 27, 02:43 PM
 • ठाणे - प्रताप व वंदना या दोन सिनेमागृहांकडून अनुक्रमे २००३ आणि २००१ पासून टॅक्सच वसूल केला जात नसल्याची माहिती मनसेच्या चंद्रहास तावडे यांनी उघडकीस आणल्यानंतर पालिकेने या चित्रपटगृहांना साडेचौदा लाख रुपये भरण्याची नोटीस बजावली .आयुक्तांकडेही त्याबाबतची तक्रार करण्यात आली होती. त्यापैकी वंदना चित्रपटगृहाच्या मालकाने टॅक्स भरण्याची तयारी दाखविली . मात्र प्रताप सिनेमागृहाने त्याबाबत कोणतीही हालचाल न केल्याने हे चित्रपटगृह पालिकेने सील केले आहे .
  June 27, 02:29 PM
 • कल्याण - कल्याण स्टेशनवर रात्री प्लॅटफॉर्मवर पथाऱ्या पसारणाऱ्यांची चौकशी करण्याचे तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस स्टेशनांना देण्यात आले आहेत.तसेच , प्लॅटफॉर्मवर ठाण मांडणाऱ्या प्रेमी युगुलांना हुसकावून लावण्याचा आदेशही देण्यात आला आहे . २१ जून रोजी पहाटे अडीचच्या सुमारास कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्र .एकवर अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार झाल्याने एकच खळबळ उडाली होती .या घटनेनंतर रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित झाली होती.
  June 27, 02:22 PM
 • ठाणे - महापालिकेच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय अखेर पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या नक्की किती व कोठे जागा आहेत, कोणते प्लॉट आहेत त्याचे सर्वेक्षण करण्याची मागणी महासभेत झाली. पालिकेकडे ६५० ज्ञात मालमत्ता व ५० अज्ञात मालमत्ता असल्याची माहिती महासभेत उघड झाली. या सर्वेक्षणाच्या खर्चाला महासभेने मंजुरी दिली असून त्यासाठी २१ लाख खर्चाची तरतूद करण्यात आली. सर्वेक्षणासाठी एक वर्ष लागणार आहे. तसेच एमआयडीसी, शासनाच्या जागेवर ज्या वास्तू आहेत त्यांचीदेखील मालकी पालिकेकडे...
  June 27, 02:11 PM
 • मुंबई - ठाणे येथील येऊर विभागात शनिवारी एका स्पीकरमध्ये सापडलेल्या अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दशरथ यादव नावाच्या तरुणास अटक केली आहे. या तरुणाने मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. हत्या करून यादव आझमगढ या आपल्या मूळ गावी पळून जात असताना वांद्रे टर्मिनसवर ठाणे पोलिसांनी त्याला अटक केली. शनिवारी वन विभागाने येऊरच्या डोंगरावर पडलेल्या एका स्पीकरमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी स्पीकरचा तपास केला असता...
  June 27, 03:38 AM
 • ठाणे - शनिवारी येऊर जंगलात स्पीकर बॉक्समध्ये सापडलेल्या अल्पवयीन मुलीच्या हत्येचे गुढ उकलले आहे. या मुलीच्या मारेक-याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.त्याने मुलीवर बलात्कार केल्याचे कबुल केले आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट मधील नऊ वर्षांची मुलगी पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह येऊर जंगलात एका स्पिकर बॉक्समध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला. येऊर परिसरातील लोकांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी वनाधिका-यांच्या कानावर ही बाब घातली. वनाधिका-यांनी पहाणी केल्यानंतर त्यांना एका...
  June 26, 12:54 PM
 • बदलापूर - शहरात एमएमआरडीएने उभारलेला स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी आहे की होर्डिग्जसाठी, असा सवाल उपस्थित करून शिवसेनेने सर्व होर्डिंग्ज फाडून टाकले आहेत. रेल्वे मार्गादरम्यान हा स्कायवॉक जोडण्यात आला नसल्याने रहिवाशांना त्याचा कोणताही उपयोग नाही. गेल्या दोन वर्षांत रेल्वेमार्ग ओलांडताना १८ जण दगावले आहेत. रेल्वे आणि एमएमआरडीएने रेल्वे मार्गादरम्यान पूल उभारून स्कायवॉक खऱ्या अर्थाने जनतेच्या उपयोगात आणावा, अशी शिवसेनेची भूमिका असून त्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती नगरसेवक...
  June 24, 01:07 PM
 • कल्याण- डोंबिवलीतील तरुणीच्या बलात्कारप्रकरणी मंगळवारी कल्याण पोलिसांनी जाकीर जमील खान (20) आणि अनिलकुमार पाठक (27) या दोघांना अटक केली. त्यांचा तिसरा साथीदार अद्याप पसार आहे. हे सर्वजण कल्याण स्थानकात फिरता व्यवसाय करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तरुणीवर मंगळवारी रेल्वे फलाटाशेजारी सामूहिक बलात्कार झाला होता.ठाण्यात आणि कळव्यात दोन दिवसांच्या अंतरानं ट्रेनमध्ये मृतदेह मिळण्याची घटना असो किंवा आता या तरूणीवर सामूहिक बलात्काराचं प्रकरण असो, रेल्वे पोलीस झोपले असतात का असा प्रश्न...
  June 24, 12:52 PM
 • ठाणे - कल्याण-डोंबीवली महापालिकेला जकातीतून मिळणाऱ्या उत्पन्नात यंदा तब्बल ३७ टक्क्यांनी वाढ होणार असून पालिकेला वर्षभरात या करातून १४४ कोटी ५१ लाख २१ हजार रुपये मिळतील.केडीएमसीला मागील वषीर् जकातीतून १०७ कोटी ७० लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. सरकारच्या नियमानुसार मागील वषीर्च्या उत्पन्नात दरवषीर् १० टक्के वाढ केली जाते. खासगीकरणातून जकातवसुली करताना पारदर्शकता राखली जाऊन तीव्र स्पर्धा व्हावी, यासाठी नियमात बदल करण्याचा राज्य सरकारचा पहिलाच प्रयत्न कमालीचा यशस्वी ठरला आहे.
  June 24, 12:43 PM
 • ठाणे - कल्याण स्टेशन बाहेर अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारामुळे पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने पोलिस स्टेशन समोर निदर्शने करण्यात आली. कल्याण हे महत्त्वपूर्ण जंक्शन असतांना देखील येथे पुरेश्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था नाही. स्टेशनच्या बाहेर भिकारी, गर्दुल्ले, आणि देहविक्रीय करणार-या स्त्रियांचा प्रवाशांना सतत त्रास होत असतो. पोलिसांसमोर यासगळ्या भनगडी होत असतांना पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेतांना दिसतात....
  June 23, 12:05 PM
 • ठाणे - ठाणे पोलिस दलात प्रशिक्षणार्थी महिला कॉन्स्टेबलवर तिथल्याच पोलिसाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ठाणे पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या उत्तरेश्वर मुंढे (२५) याला अटक करण्यात आली आहे. पिडित महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या म्हणण्या नूसार, भादवड येथील ट्रेंनिंग सेंटरमध्ये उत्तरेश्वर मुंढे आणि तिची भेट झाली. दोघेही उस्मानाबादचे असल्याने त्यांच्यात ओळख वाढली. दरम्यान तिला ठाणे पोलिस मुख्यालयात कामानिमीत्त यावे लागत असल्याने त्यांच्या...
  June 23, 11:37 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात