जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • पनवेल । पनवेल तालुक्यातील शिराढोण गावच्या ग्रामपंचायत सदस्याने चोराला ठार मारले. परंतु या घटनेनंतर सुरू झालेल्या पोलिस तपासानंतर सदस्याने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या सदस्याचे नाव शंकर पवार आहे. पोलिसी तपासाचे शुक्लकाष्ठ मागे लागेल या धास्तीपोटी सदस्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पनवेल तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असल्याने गाकवरी रात्री गस्त घालत आहेत. गावात संशयित दिसताच गावकरी त्याला चांगलाच चोप देत आहेत. १९ जून रोजी पहाटे पाच वाजण्याच्या...
  June 22, 02:45 AM
 • कल्याणमध्ये एका तरूणीवर ब्लेडच्या धाकानं सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीत राहणारी ही तरूणी पुण्याला गेली होती. परत येतांना ती कल्याणला चेन्नई-दादार एक्‍स्‍प्रेसने पहाटे कल्‍याणला उतरली. एवढ्या रात्री डोंबिवलीला जाण्‍यासाठी लोकल नसल्‍यामुळे तिने पहिल्‍या लोकलने डोंबिवलीला जायचा निर्णय घेतला. तिच्‍या एका मित्रालाही तिने कल्‍याण स्‍थानकावर बोलावून घेतले. दोघेही प्‍लॅटफॉर्म क्रमांक 1 वर बसले होते. त्‍यावेळी तीन गुंड तिथे आले. त्‍यांनी तरुणाला मारहाण...
  June 21, 11:21 PM
 • ठाणे - ठाण्यातील वर्तकनगरमध्ये चोरांचा सुळसुळाट झाला आहे. वर्तकनगर परिसरात एकाच रात्री तब्बल तीन गाड्यांमधील कारटेप चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्तकनगर येथील अभिरुपी सोसायटी येथे राहणारे संतोष जोशी यांची इनोव्हा गाडी घराजवळ पार्क केली होती. रविवारी सकाळी जोशी यांना गाडीतील १५ हजार रुपयांचा कारटेप चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. तसेच याच परिसरात राहणारे गणेश गांगुली आणि पंडित यांच्या गाडीतूनही कारटेप चोरीला...
  June 21, 09:43 AM
 • ठाणे- ठाणे प्लॅटफॉर्मवर आलेल्या लोकलमध्ये पुरूषाचा मृतदेह आढळल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. कालच कळवा कारशेडमधील लोकलमध्ये तरूणीचा मृतदेह सापडला होता. ही लोकलही कळवा यार्डातूनच आली होती.ठाण्याहून सीएसटीला जाणारी लोकल प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर प्रवाशांना लोकलच्या डब्यात गळफास लावलेल्या अवस्थेत एका पुरूषाचा मृतदेह दिसला. प्रवाशांनी लगेचच पोलिसांना माहिती दिली.मृतदेहाची अजून ओळख पटली नसून, पोलिसांचा तपास सुरू आहे. दोन दिवसात दोन मृतदेह आणि दोन्ही लोकल कळवा यार्डातीलच आहेत.
  June 19, 08:55 PM
 • कल्याण डोंबिवली पालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकाऱ्यांनी ९ जून रोजी पालिका हद्दीतील अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे. ही यादी उशिरा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे तेथे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित करून या विद्यार्थ्यांचे प्रथम अन्य शाळांमध्ये पुनर्वसन करावे, अशी मागणी नगरसेवक नवीन सिंग यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती. या मागणीची दखल घेत अनधिकृत शाळेत प्रवेश घेतलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश...
  June 19, 04:42 PM
 • मुंबई - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील लाचखोर निलंबित नगररचनाकार सुनील जोशी याला पुन्हा कामामवर घेणार नाही असे शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे. सुनील जोशीला पुन्हा कामावर घेण्याचा प्रस्ताव शनिवारी घाईघाईने सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. मात्र शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव मागे घेणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी सुनील जोशी यांचे निलंबन रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला होता. याला मनसेच्या...
  June 19, 10:41 AM
 • मुंबई - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील लाचखोर निलंबित नगररचनाकार सुनील जोशी यांना पुन्हा कामावर घेण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी सुनील जोशी यांचे निलंबन रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला होता. याला मनसेच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता. मात्र, आज झालेल्या सर्वसाधारण सभेत बहुमताच्या जोरावर सुनील जोशी यांना पुन्हा कामावर घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सुनील जोशी यांना एक वर्षापूर्वी स्पोर्टस...
  June 18, 07:29 PM
 • ठाणे - कारशेडमध्ये उभ्या असलेल्या लोकलमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला आहे. शुक्रवारी उशीरारात्री कल्याणहून कळवा कारशेडमध्ये आलेल्या लोकलच्या चौथ्या डब्यात २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. कल्याणहून कळवा कारशेडमध्ये लोकल आल्यानंतर आरपीएफचे जवान गाडीची तपासणी करत असतांना त्यांना एका तरुणीचा मृतदेह सापडला. या मृतदेहाची अजून ओळख पटलेली नाही. तरुणीच्या मृतदेहावर धारदार शस्त्रांस्त्राचे वार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला असून पोलिस पुढील तपास...
  June 18, 11:22 AM
 • ठाणे: महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने गुरुवारपासून 1 रुपयाने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या खिशाला आणखी नवा भार सोसावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या झालेल्या भरमसाठ दरवाढीमुळे टीएमटीने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे एसी बसच्या भाड्यात मात्र कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही.नव्या दरवाढीनुसर आता किमान दर 4 वरुन 5 रुपयापर्यत होणार आहे.
  June 17, 03:54 AM
 • ठाणे - महिलांना गंडा घालणाऱ्या तिघा भोंदूबाबांना ठाणे नगर पोलिसांनी अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी पळून गेला आहे.राशिद ऊर्फ राजा सलीम मलीक (20, रा. कुर्ला), आलीम सलीम मलीक (18, रा. कुर्ला) आणि आल्तामस मोहंमद शेख (19) या तिघांना अटक करण्यात आली आहे. गरजू महिला अथवा इतरांना विविध प्रकारचे विधी करण्यासाठी सामान लागणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते; मात्र वारंवार पैसे दिल्यावरही सांगितलेल्या अडचणी दूर होत नसल्याचे लक्षात आल्यावर संबंधित महिलांनी कॉंग्रेसच्या पदाधिकारी के....
  June 16, 02:41 PM
 • ठाणे - येथील 'भाविका' विद्यालय ही मराठी माध्यमाची शाळा अनधिकृत असल्याचे जिल्हा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे; जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या वतीने 'भाविका' विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना पाठविण्यात आलेल्या पत्रात विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचे दाखले देण्याचे आदेश देण्यात आले आहेत; तसेच येथील विद्यार्थ्यांनी पर्यायी शाळांमध्ये प्रवेश घेण्याची सूचना करण्यात आली आहे; मात्र मुळात अनधिकृत शाळेवर एवढ्या उशिरा कारवाई झाल्याने पालकांनी याला आक्षेप घेतला आहे. या...
  June 16, 02:05 PM
 • ठाणे - परिवहन सेवेच्या बसभाड्यात आज मध्यरात्रीनंतर दरवाढ होणार आहे.पहिल्या टप्प्यातील चार रुपये भाडे कायम ठेवण्यात आले आहे; मात्र त्यापुढील 10 किलोमीटरसाठी एक ते दीड रुपया वाढ करण्यात आली आहे.रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने भाडेवाढीला मंजुरी मिळाली असल्याने 16 जूनपासून ही भाडेवाढ अमलात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील 2-4 कि.मी. दरम्यान पाच रुपयांऐवजी सहा रुपये, 4-6 कि.मी.दरम्यान सातऐवजी आठ रुपये, 6-8 कि.मी.दरम्यान साडेसातऐवजी नऊ रुपये, तर 10-12 कि.मी.दरम्यान साडेआठऐवजी यापुढे 11 रुपये मोजावे लागणार...
  June 16, 01:47 PM
 • ठाणे - तत्कालिन आयुक्त नंदकुमार जंत्रे यानी भ्रष्टाचाराबाबत दोषमुक्त केलेल्या महापालिकेतील पालिका अधिकोऱ्याच्या प्रकरणांची फेरचौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. शहर काँग्रेसचे सरचिटणीस विक्रांत चव्हाण यानी हा प्रकरणांचा पाठपुरावा केला होता. नंदकुमार जंत्रे यांच्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत शहरात साडेतीन हजार अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या तर, बक्षी यांच्या काळात पाईपलाईन घोटाळा उघड झाला. काही अधिकारी त्या चौकशीत दोषीही आढळले होते. मात्र जंत्रे यानी आयुक्तपदावरून...
  June 16, 01:38 PM
 • डोंबिवली - शासनाच्या आदेशाप्रमाणे अनेक शाळांनी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची केंद्रे शाळांमध्ये सुरू केली आहेत. यासाठी एक शिक्षक, अन्य कर्मचारी व एक संगणकाचे ज्ञान असलेला कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. परंतु, संबंधित शिक्षक कर्मचाऱ्याला कोणतेही संगणकाचे ज्ञान नाही. त्यामुळे ते कर्मचारी प्रवेश अर्ज भरताना हातावर घडी तोंडावर बोट ठेवून बसलेले असतात. संगणकाचे ज्ञान असलेला विद्यार्थी प्रशिक्षित असल्याने तोही अर्ज भरताना गोंधळून जातो. विद्यार्थ्यांना या सर्व अर्ज...
  June 14, 06:16 PM
 • बेकायदा बांधकामे, नैसर्गिक नाल्यांच्या मुख्य प्रवाहात केलेला बदल यामुळे ठाणे पालिका क्षेत्रातील शंभरहून अधिक वस्त्यांना पुराचा धोका संभवतो. याची यादीही जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. त्याउलट ठाणे पालिकेने केवळ 11 भागांतच पावसाचे पाणी तुंबणार असल्याचे म्हटले आहे. यावरून दोघांमध्ये माहितीच्या बाबतीत एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले असून, यंत्रणा राबवणा-या पथकांमध्येच संभ्रम निर्माण झाला आहे.शहरातील नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात बदल केल्याने तसेच विकसकाकडून होणारी नियमबाह्य...
  June 14, 05:05 PM
 • ठाणे - पुण्याहून मुंबईला जाणा-या पॅसंजरला उशिर झाल्याने बदलापूर रेल्वे स्टशेनमध्ये प्रवाशांनी उत्स्फुर्त रेल रोको आंदोलन केले आहे. यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. रेल्वेचे अधिकारी आंदोलन मागे घेण्याची विनंती आंदोलकांना करीत आहेत. आज अनेक गाड्या 15 ते 29 मिनिटे उशिराने धावत आहे. त्यातच पुण्याहून येणा-या पॅसेंजरला उशिर झाला आणि त्याची कोणतीही सुचना प्रवाशांना देण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे संतप्त प्रवाशांनी...
  June 13, 01:12 PM
 • ठाणे - बंगळूरच्या धर्तीवर मुंबई पोलिस दलात असलेल्या पूर्व, पश्चिम, मध्य, दक्षिण व उत्तर या पाच विभागीय पोलिस नियंत्रण कक्षांतून या सीसीटीव्हींवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. कॅमेऱ्यात पकडल्या जाणाऱ्या संशयितांच्या हालचाली अथवा वाहतूक स्थितीवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे. शहरात बसविल्या जाणाऱ्या प्रत्येक कॅमेऱ्याला इंटरनेट जोडणी देण्यात येणार आहे. याशिवाय व्हीडीओ मॅनेजमेंट सिस्टीमच्या साह्याने प्रत्येक क्षणाचे सुधारित व्हीडीओ फुटेज नियंत्रण कक्षाला मिळणार आहेत. दहशतवादी...
  June 12, 07:21 PM
 • ठाणे - हबिगंज एक्स्प्रेस, प्रतापगड जंक्शन उद्योगनगरी, छप्रा एक्स्प्रेस, गोदान एक्स्प्रेस, कोईम्बतूर एक्स्प्रेस, दरभंगा एक्स्प्रेस, मुझफ्फरपूर-बीएसबी सुपर एक्स्प्रेस आणि मदुराई एक्स्प्रेस या लांब पल्ल्यांच्या गाड्या 1 जुलैपासून ठाणे रेल्वेस्थानकात थांबणार असल्याची माहिती कल्याणचे शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांनी दिली.गेल्या अनेक दिवसांपासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या गाड्यांना ठाणे येथे थांबा मिळावा, यासाठी ठाण्यासह कळवा, मुंब्रा परिसरातील नागरिक आग्रही होते.
  June 12, 07:12 PM
 • नामांकित बँकांच्या कोटय़वधी रूपयांच्या बनावट फिक्स डिपॉझिट रिसीट ठाण्यातील एका व्यापाऱ्याला कमी किंमतीत विकण्याचे आमिष दाखवणाऱ्या सात जणांच्या टोळीला नौपाडा पोलिसांनी अटक केली.अण्णासाहेब वाघ (३७) हा या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असून चेतन पाखणी (३०), रितेंद्र माधुर (४४), दीपक साबळे (३०), दिलीप फिरोदीया (४३), राजेश तळेकर (३९), नितीन घोरपडे (३७) हे सहाजण त्याचे साथीदार आहेत. वाघ याच्या नावावर बँक ऑफ इंडियाची २५ कोटींची तर चेतन पोखमी याच्या नावे ५ कोटींच्या बँक ऑफ बडोदाच्या फिक्स डिपॉझीटच्या...
  June 12, 04:36 PM
 • शनिवार सकाळपासून सुरू झालेल्या पावसाच्या संततधारेने ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईसह सर्व जिल्हयाला चांगले झोडपून काढले. सोसाटय़ाच्या वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. वाडा येथे मुसळधार पावसाने एसटी बस रस्त्यावरून घसरून खड्डय़ात कलंडल्याने १२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. पावसाला सुरूवात झाल्याने किनारपट्टीवर जिल्हा प्रशासनाने धोक्याचा इशारा देणारा बावटा लावला आहे.पावसाच्या संततधारेने शेतकरी वर्ग सुखावला असला तरी, शहरात मात्र ठिकठिकाणी पाणी साचल्याचे कॉल...
  June 12, 04:19 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात