जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • कुत्र्याच्या टोळक्याने एका चार वर्षीय बालकावर हल्ला केल्याची घटना कळवा येथे घडल्याने ठाणेकरांनी भटक्या श्वानांचा धसका घेतला आहे. कुत्र्यांचा हा हैदोस थांबवण्यात ठाणे महापालिका प्रशासनही पूर्णपणे अपयशी ठरले असून, गेल्या पाच वर्षात शहरातील कुत्र्यांनी 33 हजार 882 जणांना चावा घेतल्याचे उघड झाल्याने भीक नको, कुत्रे आवरा असा संतप्त सूर आळवण्याची पाळी शहरवासीयांवर आली आहे. ठाण्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे. त्यामुळे रात्री उशिरा मोटारसायकलने घरी परतणा-यांची घाबरगुंडी उडत आहे.
  June 12, 04:14 PM
 • ठाणे महापालिकेतील स्थायी समितीचे माजी सभापती मिलिंद पाटणकर यांना सदनिका विक्री प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 420 व 406 नुसार कारवाई करण्यात आली आहे. चेंबूर येथे राहणारे विकास रामचंद्र पाथरकर यांनी ठाण्यातील नौपाडा परिसरातील "सुरुची' अपार्टमेंटमध्ये सदनिका विकत घेण्यासंबंधी "आदित्य असोसिएट' या कंपनीसह करार केला होता. यासाठी पाथरकर यांच्याकडून दहा लाख रुपये घेण्यात आले होते. पैसे घेऊनही नियोजित वेळेत फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने पाथरकर यांनी अखेर...
  June 12, 04:03 PM
 • ठाणे - भाजपचे नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती मिलिंद पाटणकर यांना फसवणूक प्रकरणात 420 कलमाखाली अटक करण्यात आली आहे. ठाणे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याला अटक झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिलिंद पाटणकर यांच्यावर एका सदनिका विक्री प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 420 व 406 नुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे. चेंबूर येथे राहणारे विकास पाथरकर यांनी नौपाडा परिसरात एक सदनिका विकत घेण्या संबंधी आदित्य असोसिएट या कंपनीसोबत करार केला होता....
  June 11, 03:22 PM
 • कल्याण: अंबरनाथ येथून सुटणारी अंबरनाथ-सीएसटी लोकलमध्ये शिवशक्ती- भीमशक्तीच्या महामेळाव्याला जाण-या शिव-भीमसैनिकांनी चांगलाच धिंगाणा घातला. त्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागला. दोनशेच्या जवळपास कार्यकर्ते मोर्चासाठी अंबरनाथ स्थानकावर थांबले होते. फलाट क्र. 2 वरुन सुटणारी सीएसटी लोकमध्ये ते सर्व कार्यकर्ते शिरले आणि लोकलच्या डब्यात आणि दरवाज्यात भगवे-निळे झेंडे लावले. एवढेच नव्हे तर काही कार्यकर्त्यांनी मोर्चाचे बॅनर आणि झेंडे मोटरमनच्या...
  June 10, 12:11 PM
 • ठाणे- बाजारात खरेदीसाठी गेलेल्या महिलांकडील पर्स, दागिने लहान मुलांच्या मदतीने हातोहात लंपास करणा-या महिलांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून महिलांच्या पर्स, ३८ मोबाइल, दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, त्यांच्यापैकी आणखी चार जणी अजूनही फरारी आहेत. अटक करण्यात आलेल्या चार महिला आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली. वंदना ऊर्फ दीपाली सुगनचंद डिंगा (३२, रा. भांडूप) आणि रजनी रामचंद्र महाडिक (४५, रा. दिवा) या दोघी बहिणींसह त्यांची वहिनी संगीता विजय काते (३६)...
  June 9, 01:56 AM
 • एखादा पाहुणा घरी येतो, मनसोक्त पाहुणचार घेतो आणि यजमानांचा खून करुन जातो हा खळबळजनक प्रकार ठाण्यातील नालासोपार भागात घडला आहे. चंद्रेश शक्ती सोसायटीत राहणा-या शालिनी तारानाथ शेट्टी यांच्याकडे त्यांचा नातेवाईक अशोक शेट्टी आला. त्यांनी त्याचा मनसोक्त पाहुणचार केला. दुस-या दिवशी अशोक निघून ही गेला. मात्र अशोकने जाण्याचे फक्त नाटक केले. त्याचा डाव काही वेगळाच होता.अशोकचा डोळा होता शालिनीच्या दागिण्यांवर. अशोक गेल्यानंतर शालिनीचा नवराही कामानिमीत्त घराबाहेर गेला. याच संधीचा फायदा घेत...
  June 8, 09:20 PM
 • कल्याण: सीएसटीकडे जाणार्या लोकलमधील महिलांच्या डब्यात बॉम्ब ठेवला असल्याच्या अफवेने कल्याण रेल्वे स्थानक मंगळवारी हादरले. लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्लॉटफार्म क्र. दोनवरुन सीएसटीकडे जाणा-या लोकलमधील महिलांच्या डब्यात बॉम्ब असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांना मिळाली. पोलीस आयुक्त पी. आय. सरदार यांचे मार्गदर्शनाखाली कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण जगताप, पाच अधिकारी आणि 50 पोलीस शिपाई, लोहमार्गदलाचे अधिकारी, डॉग स्क्वॉडने रेल्वे...
  June 8, 02:50 PM
 • मुंबई - ठाण्यातील चिरागनगर परिसरात राहणा-या शीतल या चौदा वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २८) सकाळी वसंत विहार सोसायटीत घडली. शीतल ही विक्रम जसरा यांच्या घरी कामासाठी आली असता ही घटना घडली. शीतलची आई वसंत विहार सोसायटीत मोलकरणीचे काम करते. शनिवारी काही कारणामुळे आईला कामावर जाणे शक्य नसल्याने शीतल घरकामासाठी जसरा यांच्या घरी गेली होती. जसरा यांची पत्नी गावी गेल्यामुळे जसरा हे एकटेच घरी होते. काही वेळानंतर इमारतीच्या पाय:यावर शीतल पडलेली लोकांना आढळली. नंतर...
  May 29, 02:03 AM
 • उल्हासनगर - १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगर-३ येथील शांतीनगर परिसरात राहणारी १५ वर्षीय मुलगी इंदजीत रॉय यांच्याकडे कामाला होती. ११ मे रोजी मुलगी तिच्या शेजारच्यांसह गजानन मार्केट येथे खरेदीला गेली होती. त्या वेळी पोलीस असल्याचे सांगत विजय शाहू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चौकशीच्या बहाण्याने मुलीला उल्हासनगर-४ येथील मौर्यानगर परिसरातील एका खोलीत डांबून ठेवले. यानंतर विजय शाहूने इंदजीत रॉयकडे ३० हजार रुपये देण्याची मागणी केली....
  May 28, 03:56 PM
 • ठाणे - बारावीच्या निकाल लागण्यापूर्वीच कळव्यातील अनुपमा मोरे या विद्यार्थीनीने गुरुवारी आत्महत्या केली . अनुपमा रिपीटर असून पुन्हा नापास होण्याच्या भीतीनेच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे , असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे . शुक्रवारी लागलेल्या निकालात तिला पुन्हा अपयश आल्याचेच स्पष्ट झाले आहे .
  May 28, 03:50 PM
 • वाशी परिसरातील ३२ शिधावाटप दुकानांत वितरित करण्यासाठी भिवंडी येथील गोदामातून उचलेल्या ८० क्विंटल अन्नधान्याचा अपहार करणाऱ्या आकाश ग्राहक सहकारी संस्थेवर कारवाई करावी, अशी मागणी करणारा अहवाल ठाण्यातील उपनियंत्रक शिधावाटप अधिकाऱ्यांनी मुंबईतील शिधावाटप नियंत्रक व संचालक नागरी पुरवठा विभागाला पाठविला आहे .माहितीच्या अधिकारातून हे उघड झाले आहे .
  May 28, 03:46 PM
 • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.26/11 च्या मुंबई हल्ल्यातील सहआरोपी डेव्हिड हेडली याने शिकागो न्यायालयात मातोश्री बंगल्याची पाहणी केल्याचे कबूल केले होते. त्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेचा मुद्दा स्पष्ट केला. हेडलीच्या कबुलीजबाबाची माहिती सरकारला मिळाली आहे. याबाबत आम्ही आता विस्तृत अहवालाची प्रतीक्षा करीत असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.आयटीबीपीने पाकिस्तानी दहशतवादी...
  May 27, 11:54 PM
 • ठाणे - महापालिकेच्या शहर विकास विभागाचे (टाऊन प्लॅनिंग) काम पारदर्शक केले जाणार असून, आता वास्तुविशारद व विकसकांना वेबसाईटवरून प्रस्ताव सादर करता येणार आहेत. विशेष म्हणजे वेबसाईटवर नागरिकांना महापालिकेने मंजूर केलेल्या इमारती व संकुलांची माहिती उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या महासभेत आयुक्त आर. ए. राजीव यांनी ही माहिती दिली. tmctp.com असे वेबसाईटचे नाव असून, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते महिनाभरात तिचे उद्घाटन केले जाणार आहे.
  May 24, 05:57 PM
 • ठाणे - ठाणे महापालिका (टीएमसी) व ठाणे महापालिका परिवहन सेवा (टीएमटी) यांच्यातील वाद पुन्हा उफाळला आहे. "टीएमटी'चा कारभार सुधारण्यासाठी स्थापन केलेल्या महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून मनमानी कारभाराचा निषेध करीत परिवहन समितीची सभा तहकूब करण्यात आली. विशेष म्हणजे सत्ताधारी शिवसेना-भाजपसह सर्व पक्षांचे सदस्य तहकुबीत सहभागी झाले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जितेंद्रकुमार इंदिसे होते. मागील सभेचे इतिवृत्त वाचन सुरू असताना टीएमटीच्या सल्लागाराच्या मुदतवाढीचा विषय...
  May 24, 05:55 PM
 • ठाण्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील जकात कमी करण्यासाठी ठाण्याच्या महापौरांनी प्रयत्न सुरू केले असताना ही जकात कपात झाल्यास त्याचे श्रेय विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचेच असेल , असा दावा कामगार नेते शरद राव यांच्या अध्यक्षतेखालील ठाणे ऑटोरिक्षा मेन्स युनियनने केला आहे . ही कपात झाल्यास डावखरे यांचा जाहीर सत्कार करण्याचा ठरावही युनियनच्या सोमवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला .
  May 24, 05:46 PM
 • अंबरनाथ - ठाणे जिल्हा विभाजन आणि अंबरनाथ पालिकेतील युतीच्या काळात झालेला भ्रष्टाचार या प्रश्नासंदर्भात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा कॉंग्रेस लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय दत्त यांनी जाहीर केले.ठाणे जिल्हा (ग्रामीण) कॉंग्रेस तसेच अंबरनाथ ब्लॉक कॉंग्रेस यांच्या वतीने सामाजिक समरसता वर्षानिमित्त संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन बुवापाडा येथे करण्यात आले होते. प्रदेश सरचिटणीस ऍड....
  May 24, 05:41 PM
 • मुंबई पेट्रोलची वाढलेली किंमत आणि त्यापाठोपाठ आलेले महागाईचे संकट यामुळे त्रासलेल्या ठाणेकरांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. मनपाचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केल्यास ठाणे मनपाच्या क्षेत्रात पेट्रोल स्वस्त होईल. मनपाने ठाण्यात पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थ यांच्यावर लागू होणार्या सध्याच्या जकात करामध्ये कपात सुचवणारा प्रस्ताव सादर केला आहे. नव्या प्रस्तावात पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थ यांच्यावर सरसकट फक्त अर्धा टक्का जकात लागू करण्याची सूचना आहे. या...
  May 22, 11:05 AM
 • ठाणे - ठाण्यातील सिद्धिविनायक रेसिडेन्सी भागात विवाहित पुरुषाशी असलेल्या प्रेमसंबधातून एका तरुणीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तरुणीच्या प्रियकराला कासरवडवली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका अशोक त्रिभुवन (वय २८) अशी हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. मोनिकाच्या वडिलांचे निधन झाले असून, ती आपल्या आईसोबत घोडबंदर रोडवरील सिद्धिविनायक सोसायटीत भाड्याच्या घरात राहते. मोनिकाने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली असून, ऋतु एन्क्लेवनजीकचे 'लेमन ऍण्ड...
  May 20, 06:09 PM
 • ठाणे - ठाणे जिल्ह्यातील सुमारे १३८ गावे तंटामुक्तीच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. या गावांनी केलेल्या स्वयंमूल्यांकनात तंटामुक्तीची घोषणा केली असून, आता जिल्हा मूल्यांकन समितीच्या अहवालानंतर तंटामुक्त गावांची अंतिम घोषणा होईल. या तंटामुक्तीच्या कामाची दखल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतली असून तंटामुक्त योजनेची परिषद भरविण्याचा मान ठाण्याला देण्यात आला आहे. महाराष्ट्रात १५ ऑगस्ट २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यात एकूण...
  May 20, 06:06 PM
 • ठाणे - अंबरनाथ येथीस स्कायवॉकचे बांधाकास पूर्णत्वास आले असून, तो लवकरच नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. या स्कायवॉकचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. या स्कायवॉकचे काम मूळ नकाशाप्रमाणे केले नसल्याने संबंधित ठेकेदाराचे देयक अदा करू नये, अशी मागणी अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या आयुक्तांना नगराध्यक्षांनी तसे निवेदन पाठविले आहे. अंबरनाथ शहरात गेल्या दोन वर्षांपासून या स्कायवॉकचे काम सुरू आहे. उल्हासनगर, तसेच बदलापूर...
  May 20, 06:04 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात