जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • मुंबई- ठाण्यातील डोंबिवली एमआयडीसीमधील एक कंपनी आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झाली. अल्ट्रा प्युअर फेम असे या कंपनीचे नाव आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10.30 च्या सुमारास डोंबिवली एमआयडीसीत असलेल्या अल्ट्रा प्युअर फेम कंपनीला किरकोळ आग लागली. मात्र, नंतर ही आग भडकत गेली. तसेच शेजारीच सिलेंडर गॅसचे गोदाम असल्याने ही आग तेथे पोहताच सिलेंडर टाक्यांचे स्फोट झाले व...
  March 5, 01:05 PM
 • ठाणे - मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके येथील मूळ रहिवासी असून, आजही या ठिकाणी दाऊदच्या मालकीचे टुमदार घर आहे. परंतु, 15 वर्षांपासून ते बंद असून, मुंबके ग्रामपंचायत त्याला ताब्यात घेणार आहे. त्या दृष्टीने शुक्रवारी एक बैठक झाली. परंतु, त्यामध्ये काही निर्णय होऊ शकला नाही. दाऊदचे घरावर आहे प्रेम या घरात दाऊदच्या वडिलांचे बालपण गेले. एवढेच नाही तर लहापणी दाऊदसुद्धा येथे नेहमीच येत असे. त्यामुळेच आपल्या वडिलांच्या आठवणी...
  February 26, 01:04 PM
 • ठाणे - देशातील सर्वात छोटे हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरान येथील एका पिकनिक स्पॉटवरून कोसळल्याने बुधवारी एका महिलेचा मृत्यू झाला. नीलम सिंह (वय32) असे मृताचे नाव असून, खाली पडल्यानंतर तिचा संपूर्ण देह रक्ताने माखलेला होता. नेमका कसा झाला अपघात ? - आपली लहान बहीण सुमन हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नीलम हे कुटुंबासोबत माथेरानला आली होती. - घोड्यावरून डोंगरावर चढताना ती खाली कोसळली. - तिच्या कुटुंबीयांनी तिला तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र, त्या ठिकाणी एकही डॉक्टर नव्हता. -...
  February 25, 03:23 PM
 • ठाणे - महाराष्ट्रात असेही एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी जगभरातून पर्यटक येतात. मात्र, येथील जो रस्ता आहे तो जगातील सर्वांत धोकादायक मार्गापैकी आहे. त्यामुळे या रस्त्यावरून कोणत्या प्रकारचे वाहन नेण्याला बंदी आहे. केवळ टॉय ट्रेनच त्या रस्त्यावरून धावते. त्यातही ही ट्रेन अगदी उंच उंच डोंगऱ्यावरून दिसणाऱ्या खोल दरीच्या कडेला अगदी खेटून धावते. त्यामुळे आपसुकच प्रवाशांच्या काळजाची धडधड वाढते. भर थंडीत अंगाला घाम फुटतो. डोळे पांढरे होतात. विशेष प्रशिक्षण घेतलेलाच चालक या ठिकाणाहून ही...
  February 24, 09:58 AM
 • ठाणे - अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग सेल आणि ठाणे क्राइम ब्रँचने भिवंडीमध्ये एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड करून पती-पत्नीसह एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली. त्यांच्या तावडीतून एका 20 वर्षीय युवतीची सुटका करण्यात आली. वेगवेगळे अमीष देऊन बांगलादेशातील मुलींना भारतात आणले जात होते. नंतर या ठिकाणी त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. एवढेच नाही भारतातील वेगवेगळ्या शहरात त्यांना विकले जात होते. - या मुलींची विक्री 10 ते 30 हजारांपर्यंत केली जात असे. - मुलींना बांगलादेशापासून ते...
  February 23, 09:40 AM
 • ठाणे -सर्वच नाटकांवर सिनेमा करायची गरज नाही. नाटकाच्या कथेत दम असेल तरच त्यावर सिनेमा करण्यासाठी दिग्दर्शकाने पुढे यायला हवे. अन्यथा निर्मात्याला खड्ड्यात घालण्याचा प्रकार होईल. सर्वोत्तम कथा प्रवाही असून त्यावर नाटकच काय सिनेमाप्रमाणे चांगली मालिकाही होऊ शकते, असे मत अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावे यांनी मांडले. नाट्य संमेलनातील नाटकांचे माध्यमांतर काय हरवतं? काय गवसतं? या परिसंवादात ते बोलत होते. प्रशांत दामले, समीक्षक सुधीर नांदगावकर, समीक्षक गणेश मतकरी, समीक्षक अमोल परचुरे यांचा...
  February 21, 05:32 AM
 • ठाणे -महाराष्ट्र शासन नाट्यसंमेलन भरवण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेला सन २००४ पासून २५ लाख रुपयांचे अनुदान देते; पण गेल्या काही वर्षांत वाढलेली महागाई लक्षात घेता शासनाने अाता नाट्यसंमेलनाच्या आयोजनासाठी पुढील वर्षापासून ५० लाख रुपयांचे अनुदान नाट्य परिषदेला द्यावे, अशी मागणी नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी शनिवारी केली. नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे नाट्य परिषदेचे कार्यवाह दीपक करंजीकर यांनी गवाणकर यांची प्रकट मुलाखत घेतली, या वेळी ते...
  February 21, 05:29 AM
 • ठाणे - उल्हानगर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना त्यांच्या कारसह शनिवारी जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात त्यांची गाडी जळून खाक झाली. परंतु, सुदैवाने ते सुखरुप बचावले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवाला असून, अधिक तपास सुरू आहे. नेमके काय झाले... - शनिवारी दुपारी जनसंपर्क अधिकारी भदाणे हे आपल्या कार बसत होते. - अचानक हेल्मेट परिधान केलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी भदाणे यांच्या दिशेने ज्वलनशील पदार्थ फेकले. - कारने तात्काळ पेट घेतला. - प्रसंगावधान राखत भदाणे...
  February 20, 06:24 PM
 • ठाणे -पुण्यानंतर महाराष्ट्रात नावाजलेली सांस्कृतिकनगरी म्हणजे ठाणे. याच महानगरात हाेणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनानिमित्त शुक्रवारी दुपारी ख्यातनाम नाटककार श्याम फडके यांच्या ब्राह्मण सोसायटीतील निवासस्थानापासून अपूर्व उत्साहात नाट्यदिंडी काढण्यात अाली. नाट्यदिंडीतील पालखीत नटराजाची मूर्ती व आद्य नाटककार विष्णुदास भावे यांचे छायाचित्र ठेवलेले होते. पालखी उचलण्याचा मान ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर तसेच संमेलनाचे...
  February 20, 04:17 AM
 • ठाणे(बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी) -भारतीय सिनेमाचे बाॅलीवूड जगत मुंबईत असून या जगताला एकापेक्षा एक कलाकार मराठी रंगभूमीने दिलेत. बाॅलीवूडसाठी मुंबईत अत्याधुनिक स्टुडिअाे आहेत. मात्र नाटकवेड्या महाराष्ट्राच्या नाटकांना मात्र मुंबईत स्वत:चे हक्काचे घर नाही. शतकाचा इतिहास असलेल्या नाटकाने आपल्या राज्याला सांस्कृतिक व सामाजिक दिशा दिली आहे. या साऱ्याचा मान म्हणून मुंबईत संग्रहालयाच्या रूपाने नाट्यसृष्टी उभारली जाईल, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिले....
  February 20, 03:58 AM
 • अंबडवे, रत्नागिरी- घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव अंबडवे (ता. मंडणगड, रत्नागिरी) हे जागतिक दर्जाचे स्थळ होण्यासाठी राज्य सरकार सर्वोतपरी मदत करेल असे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सांसद आदर्श गाव योजनेतील अंबडवे येथील विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी दिले. खासदार अमर साबळे यांनी सांसद आदर्श गाव योजनेतील दत्तक घेतलेल्या अंबडवे येथील अंगणवाडीच्या इमारतीचे भूमिपूजन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार अमर साबळे,...
  February 19, 04:35 PM
 • रायगड - छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सर्व जगापुढे यावा, जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर रायगड यावा, या उद्देशाने रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे वैभव आणि इतिहासाची साक्ष असलेले गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध अाहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केले. किल्ले रायगड व पायथा पाचाड येथे अायाेजित रायगड महाेत्सवाच्या समाराेप कार्यक्रमात ते बाेलत हाेते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योगमंत्री सुभाष...
  January 25, 03:44 AM
 • अलिबाग- किल्ले रायगडावर गुरुवारपासून रायगड महोत्सवास सुरूवात झाली. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या महोत्सवात नागरिक, पर्यटकांना शिवकालीन युग अनुभवता येणार आहे. रविवारपर्यंत हा मोहोत्सव चालेल. त्या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे या किल्ल्याविषयी खास माहिती... शिवाजी महाराजांनी रायगडाला केले राजधानी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला होता. याच ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यामुळे या किल्लाला खूप महत्त्व आहे. याच...
  January 22, 03:38 PM
 • ठाणे - कल्याण परिसरात भीख मागून आणि कचरा वेचून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका वृद्ध भिकाऱ्याच्या घरात आग लागली. यात तीन गोणी नोटा जळून खाक झाल्या. ही घटना मंगळवारी रात्री घडली. दरम्यान, या भिकाऱ्याने इतर काही गोण्या बाहेर सुरक्षित लपवून ठेवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मदतीसाठी आलेले झालेले आवक् आग विझवण्यासाठी मदतीसाठी आलेले लोक हा प्रकार पाहून आवक् झाले. या तीनही गोण्यांमध्ये नोटांना कोंबून भरण्यात आले होते. कशी लागली आग..... - कल्याण येथील लहुजीनगरातील मोहने...
  January 14, 11:33 AM
 • रत्नागिरी - प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते, हे सर्वश्रुत आहे. मात्र, आपले प्रेम इतरांपेक्षा वेगळे आहे, हे सिद्ध करण्यासाठी दापोली येथील एका सहासी प्रेमी युगुलाने मुरुड-कर्दे समुद्राच्या पात्रातून प्यारासेलिंगमधून उंच भरारी घेत आपला साखरपुडा पार पाडला. मनाली वाळिंबे आणि रोहण कुलकर्णी अशी त्यांची नावे आहेत. पुढील स्लाइड्सवर पाहा, साखरपुड्याचे थरारक फोटोज...
  January 4, 12:56 PM
 • ठाणे- भिवंडीत भुईवाडा परिसरातील पोलिस स्टेशनमागील दुमजली इमारत मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कोसळली. यात एकाचा मृत्यू झाला आहे. ढिगार्याखालून 7 जणांना बाहेर काढण्यात आले असून एक जण ढिगार्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. मृताच्या वारसाला 4 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. भिवंडीच्या तांडेल मोहल्ला ही इमारत होती. इमारत कशी कोसळण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. ढिगारा उपसण्याचे काम सुरु असून जखमींना इंदिरा गांधी रुग्णालयात उपाचारासाठी हलवण्यात आले आहे. अस्तक बेग,...
  December 29, 01:03 PM
 • ठाणे- कल्याणमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नायट्रोजन सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. कल्याण पूर्व भागात मलंगरोडवर असलेल्या आर्य गुरुकुल शाळेत आज दुपारी तीनच्या सुमारास हा स्फोट झाला आहे. सिलिंडर स्फोटात फुगे फुगविणा-या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर शाळेतील 12 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना डोंबिवलीतील एपीईएस रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जखमी विद्यार्थ्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर तर काहींची स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. आर्य गुरूकुल शाळेत...
  December 24, 05:07 PM
 • ठाणे- ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर एका एशियाड एसटी बसला आज दुपारी लागलेल्या आगीत ती जळून संपूर्ण खाक झाली. सुदैवाने यात कोणतेही जिवीतहानी झाली नाही. वाहक व चालकाने दाखवलेल्या हुशारीमुळे ती टळली. सोमवारी दुपारी बोरीवलीहून ठाण्याला ही बस चालली होती. यात वाहन, चालकासह 18 प्रवासी होती. मात्र, घोडबंदर रस्त्यावर बस येताच बसमध्ये स्पार्किंग होऊन बसला आग लागली. चालकाला गाडीत काही तरी बिघाड झाल्याचे लक्षात त्याने उडी मारली व प्रवाशांना बाहेर पडण्यास सांगितले. त्याचवेळी बसला खालच्या बाजूने आग...
  December 15, 10:53 AM
 • रत्नागिरी - कंटनेर आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ७ ठार, तर ३२ जण जखमी झाल्याची घटना मुंबई- गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. प्रभाकर क्षीरसागर, संतोष करंजकर, नारायण कुलकर्णी, भास्कर कोकाटे, राजाराम कुलकर्णी, िवजया सुर्वे आणि यशवंत माेहिते अशी मृतांची नावे आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंटेनरच्या धडकेने एसटी एका झाडाला अडकल्याने दरीत पडता पडता वाचली. दोन तासांहून अधिक वेळ एसटीतील प्रवासी गाडीतच अडकून पडले होते. बुधवारी...
  December 10, 02:35 AM
 • मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना केलेले विनम्र आवाहन माता-भगिनी, बांधवांनो, सविनय जय महाराष्ट्र ! कल्याण-डोंबिवलीमधील सर्व पक्षांचे भवितव्य आपण रविवारी ठरविणार आहात. निवडणुक काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष वगळता इतर कोणत्याही पक्षाने विकासाच्या मुद्दयांवर भाष्य केले नाही. याउलट त्यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवरच आरोप करुन कुरघोडी करण्यात धन्यता मानली. आज कल्याण-डोंबिवली या शहरांचा अक्षरशा बोजवारा उडाला आहे. रस्त्यांची चाळण झालीय, अरुंद...
  October 31, 03:53 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात