जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • रायगड - प्रेमात आणि युद्धात सगळे काही क्षम्य आहे, असे म्हटले जाते. एवढेच नाही तर इश्क जब हद से गुजर जाए तो जुनून बन जाता है, हे हिंदी गीतही प्रसिद्ध आहे. त्यातून प्रेमात बुडालेली व्यक्ती इतरांचा जीवही घेऊ शकते. असाच प्रकार रायडग जिल्ह्यात घडला. एका मजनू पोलिस कर्मचाऱ्याने त्रिकोणी प्रेमातून दुसऱ्या आपल्याच सहकाऱ्याच्या दुचाकीमध्ये बॉम्ब लावून त्याचा शांत डोक्याने खून केला. ही घटना रायगड जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या आवारात बुधवारी घडली. निकेश पाटील (28) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव तर...
  October 30, 05:07 PM
 • मुंबई- ठाण्यातील प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार (वय 46) यांनी आज दुपारी दोनच्या सुमारास आपल्या मानेत गोळ्या झाडून आत्महत्या केली. सूरज परमान हे महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्रीच्या (MCHI-Credai) ठाणे विभागाचे अध्यक्ष होते. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सूरज परमार हे आज दुपारी आपल्या सुरु असलेल्या साईटवर गेले होते. कासारवडवली येथे परमार यांची कॉसमॉस हेवन नावाच्या...
  October 8, 09:34 AM
 • ठाणे - येत्या 27 सप्टेंबरला जागतिक पयर्टन दिन आहे. त्या अनुषंगाने जगातील धोकादायक किल्ल्यापैकी एक असलेल्या गडाविषयी divyamarathi.com माहिती देणार आहे. माथेदार आणि पनवेलदरम्यान तब्बल 2300 फूट उंचावर तो आहे. वर गेल्यानंतर दाट जंगल लागते. त्यामुळे एकट्या, दुकड्यांनी किल्ल्यावर जाणे म्हणजे धाडसाचेच आहे. प्रबळगड या नावाने त्याला ओळखले जाते. सायंकाळ होताच या ठिकाणी कुणीही थांबत नाही. चढण्यास सर्वात अवघड हा किल्ला मुंबई-पुणे हमरस्त्यावरुन दिसतो. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला...
  September 24, 10:52 AM
 • ठाणे  -   महाराष्‍ट्र असेही एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी जगभरातून पर्यटक येतात. मात्र, येथील जो रस्‍ता आहे तो जगातील सर्वांत धोकादायक मार्गापैकी आहे. त्‍यामुळे या रस्‍त्‍यावरून कोणत्‍या प्रकारचे वाहन नेण्‍याला बंदी आहे. केवळ टॉय ट्रेनच त्‍या रस्‍त्‍यावरून धावते. त्‍यातही ही ट्रेन अगदी उंच उंच डोंग-यावरून दिसणा-या खोल दरीच्‍या कडेला  अगदी  खेटून धावते.  त्‍यामुळे आपसुकच प्रवाशांच्‍या काळजाची धडधड वाढते. भर थंडीत अंगाला घाम फुटतो. डोळे पांढरे होतात. विशेष  प्रशिक्षण घेतलेलाच चाकल या...
  September 23, 11:15 AM
 • ठाणे - येथे तृतीयपंथ्यांनी बसवलेल्या गणवतीचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, तृतीयपंथींनी मिरवणूक काढली. यामध्ये ढोलताशाच्या तालावर किन्नर लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ताल धरला. ठाण्यामध्ये अनेक वर्षांपासून तृतीयपंथी गणपती बसवतात. कोण आहे लक्ष्मी नारायण त्रिपाठी तृतीयपंथ व्यक्तींनी नेता आणि मानवी हक्काची कार्यकर्ता म्हणून लक्ष्मी नारायण त्रिपाठी नेहमीच प्रकाशझोतात असते. ती उत्कृष्ट भरतनाट्यम डांसरसुद्धा आहे. मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून तिने बीए केले....
  September 22, 08:53 AM
 • ठाणे- दुचाकीवर असलेले दोन सोनसाखळीचोर ट्राफिक पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने सापडल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ठाण्याच्या कोणत्या भागात ही घटना घडली याची नेमकी माहिती उपलब्ध नसली तरी ही पोस्ट कालपासून ऑनलाईन जगात फिरत आहे. यात दुचाकीवरील दोन तरुण रस्त्यावरुन जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरताना दिसतात. या महिलेसोबत एक मुलगीही या फोटोत दिसते. त्यानंतर महिलेचा आरडाओरडा ऐकून एक ट्राफिक पोलिस दुचाकीस्वारांना पकडतो. त्याच्या मदतीला इतरही पोलिस...
  September 19, 03:01 PM
 • मुंबई - हाय प्रोफाइल शीना बोरा मर्डर केसमध्ये आणखी एक नवा खुलासा समोर आला असून, मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी आपल्या जिवाला धोका असल्याची भीती शीना हिने मैत्रिणीजवळ व्यक्त केली होती. यासाठी तिच्यावर स्लो पॉयजनचा प्रयोग झाल्याचेही तिने मैत्रिणीला सांगितले होते. शिवाय तिने केलेल्या वैद्यकीय चाचणीमध्येही स्लो पॉयजन आढळून आल्याचे तिच्या मैत्रिणीने सांगितले. दोन महिन्यापर्यंत चालला उपचार शीनाच्या मैत्रिणीने सांगितले, वर्ष 2012 च्या सुरुवातीला शीना ही वारंवार आजारी पडायला लागली....
  August 30, 02:02 PM
 • ठाणे - दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नाव बदलून ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड केल्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. याप्रमाणेच आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केली. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाचे संभाजीनगर करावे, अशी मागणी आहे. आम्ही संभाजीनगर असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय केंद्रात अडकला. आत केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे. त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करावे, असे...
  August 30, 05:21 AM
 • ठाणे- ठाण्यातील बी केबिन परिसरातील तीन मजली इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले. ढिगार्याखाली 17 जण अडकले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कृष्णा निवास असे या इमारतीचे नाव आहे. 50 वर्षे जुन्या या इमारतीत एकूण पाच कुटुंबे राहत होती. अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु आहे. ढिगार्याखाली अजून 17 जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (मंगळवार)...
  August 4, 05:07 PM
 • रत्नागिरी - जिल्ह्यातील दापोली येथील कर्दे समुद्र किना-यावर पिकनिकसाठी आलेल्या पाच तरुणांपैकी दोघांचा बुडून करुण अंत झाला. ही घटना शनिवारी घडली. अक्षय मोरे आणि रवी पाटील अशी त्यांची नावे असून, ते पुण्यातीलदिघी येथील रहिवाशी आहेत. अक्षय आणि रवि हे दोघे शनिवारी त्यांच्या इतर तीन मित्रांसोबत पिकनिकसाठी दापोली येथील समुद्र किना-यावर गेले होते. दरम्यान, समुद्रात उतरलेत. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते खोल पाण्यात गेले. त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला.एक तासाच्या शोध...
  August 2, 10:22 AM
 • ठाणे -डाेंबिवलीच्या ठाकुर्ली परिसरात चाेळेगावातील मातृकृपा चारमजली इमारत मंगळवारी रात्री काेसळली. यात दाेन जण ठार झाले, तर ढिगा-याखाली २५ ते ३० जण अडकल्याची भीती अाहे. ही इमारत धाेकादायक म्हणून जाहीर केलेली हाेती. दुपारी इमारतीचा काही भाग काेसळला, त्यावेळी रहिवाशांना दुसरीकडे स्थलांतरीत हाेण्याच्या सूचना देण्यात अाल्या हाेत्या. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले.
  July 29, 02:13 AM
 • रायगड महाराष्ट्राची अस्मिता आणि जगातील थोर राजांपैकी एक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला होता. याच ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यामुळे या किल्लाला अन्यन साधारण महत्त्व आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पाय-या आहेत. पण, हा किल्ला कोणी बांधला ? त्याचा इतिहास काय ? हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक कराच... रायगडाचा इतिहास...
  July 15, 12:49 PM
 • ठाणे - दांपत्याच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून २५ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी ठाण्याच्या स्थानिक न्यायालयाने स्वयंपाक्यास तीन वर्षांचा कारावास ठोठावला आहे. सुब्रतो सन्याल असे आरोपीचे नाव असून तो मूळ कोलकात्याचा आहे. सत्यकाम राऊत यांच्या आईवडिलांसाठी स्वयंपाक करण्यासाठी सुब्रतोला ठेवण्यात आले होते. मात्र, ३० एप्रिल आणि १ मे २०१३ च्या रात्री त्याने राऊत दांपत्याच्या जेवणात गुंगीचे औषध टाकले आणि दागिन्यांसह २५ लाख १४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या औषधीमुळे राऊत यांच्या...
  July 8, 02:00 AM
 • मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. गेल्या काही वर्षात कोकणात मनसेची झालेली दयनिय परिस्थिती पाहाता राज यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे. राज यांच्या या दौऱ्यातून ते कोकणातील पक्षाची बांधणी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान आज राज ठाकरे यांनी मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूण इथल्या सवतसडा धबधब्याचा आनंद घेतला आणि धबधब्याची मनसोक्त छायाचित्रेही घेतली. तसेच राज यांनी बुरोंडी (दापोली) येथील भगवान परशुरामांच्या ४० फुटी भव्य...
  June 24, 03:33 PM
 • रायगड - सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला झालेल्या अपघातात स्फोट होऊन दोन जण जखमी झाले आहेत. मुंबईगोवा महामार्गावरील पेण-हमरापूर फाट्यावर रविवारी पाहाटे सहाच्या दरम्यान दोन ट्रक एकमेकांना धडकून अपघात झाला. यातील एक ट्रक एलपीजी सिलिंडरने भरलेला होता. दोन्ही ट्रकची टक्कर एवढी भीषण होती की त्यामुळे सिलिंडरचा स्फोट होऊन घटनास्थळी आगीचे लोळ उठत होते. सकाळी दहा वाजता दरम्यान आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र अजूनही मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. अपघात झाल्यानंतर सिलिंडरचे...
  May 24, 11:24 AM
 • ठाणे - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी भिवंडी न्यायालयात हजेरी लावली. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राहुल यांना न्यायालयात उपस्थित राहण्यापासून सूट दिली होती. तरीही राहुल सकाळी ११ वाजता हजर झाले. न्यायालयासमोर उपस्थित राहीन असे वचन मी दिले होते, ते पूर्ण करण्यासाठीच मी हजर झालो, असे त्यांनी सांगितले. न्यायालयाचा आदर करतो : राहुल गांधी...
  May 9, 03:22 AM
 • मुंबई- आठ दिवसापूर्वीच लग्न झालेल्या आणि माहेरी परीक्षा देण्यासाठी आलेल्या नवविवाहितेची दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी चाकूने भोकसून हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील जुना पासपोर्ट ऑफिस परिसरात घडली. भररस्त्यात बुधवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेत नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाला तर हल्लेखोर फरार झाले आहेत. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. प्रियंका प्रमोद खराडे (24) असे या मृत तरूणीचे नाव आहे. प्रियंका ठाण्यातील किसननगरमध्ये राहते....
  May 7, 02:18 PM
 • मुंबई- पक्षाचा आदेश डावलत पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे ठाणे महानगरपालिकेतील मनसेच्या तीन नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीच ही कारवाई केली आहे. ठाणे महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती सुधाकर चव्हाण, नगरसेविका तेजस्विनी चव्हाण व राजश्री सुनिल नाईक अशी तीन नगरसेवकांची नावे आहेत. या तिघांना पक्षातून निलंबित केल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी दिली आहे.
  March 31, 04:08 PM
 • ठाणे - आपल्या मुलीवर आरोपींनी दुस-यांदा बलात्कार करू नये म्हणून आईने आपल्या १३ वर्षांच्या मुलीचे मुंडन केल्याची घटना ठाण्यात घडली. काही दिवसांपूर्वी घडलेली ही घटना शुक्रवारी उजेडात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवा भागात राहणा-या अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यांपूर्वी बलात्कार झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद लियाकत आणि रोहित या दोन युवकांना अटक केली होती. काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी या मुलीच्या कुटुंबियांना मारहाण केली. केस परत घेतली नाही तर...
  March 21, 04:49 AM
 • ठाणे - मुस्लिम यूथ फोरम तर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे शत्रू होते का? या परिसंवादाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामी विचार मांडायचे की नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. मुस्लिम यूथ फोरमच्या वतीने शनिवारी (21 फेब्रुवारी) ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाचा विषय छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे शत्रू होते का? हा आहे. मात्र, ठाणे पोलिसांनी...
  February 20, 06:03 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात