जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • ठाणे/ उमरगा/ औरंगाबाद - राज्यासाठी शनिवारचा दिवस घातवारच ठरला. ठाण्याजवळ पेट्रोलचा टँकर उलटून झालेल्या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात उमरग्याजवळ जीप व ट्रकच्या धडकेत पाच जण ठार झाले. करमाडजवळ नातलगाच्या अंत्यविधीहून परतणारी कार उभ्या ट्रकवर आदळल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. मुंबई-अहमदाबाद मार्गावर शनिवारी पेट्रोलचा टँकर उलटून झालेल्या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला. टँकरमधील तिघे व 4 पादचारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. टँकर मुंबईकडे जात होता. दुपारी तीन...
  March 23, 01:48 AM
 • ठाणे- ठाण्यातीत समतानगरातील सुंदरबन पार्क या इमारतीच्या बाराव्या मजल्याला आज (रविवार) पहाटे भीषण लागली आहे. या दूर्घटनेत तीन जण जखमी झाल्याचे समजते. इमारतीत अनेक रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आग आटोक्यात आल्याचे अग्नीशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले. अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरु आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
  March 16, 07:53 AM
 • रायगड- अलिबागमधील भायमळ्यातील फटाक्याच्या फॅक्टरीत आज (गुरुवारी) भीषण स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण फॅक्टरीत आग पसरली. आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमार फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. त्यानंतर काही क्षणातच आग सर्वत्र पसरली. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
  March 4, 02:45 PM
 • ठाणे - केंद्रीय कृषिमंत्री या नात्याने मी मुख्यमंत्र्यांना भेटतच असतो. मग त्यात गैर ते काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केला. काही दिवसांपूर्वी पवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. तेव्हा पवारांनी त्याचे खंडण केले होते. परंतु शनिवारी स्वत:हून त्यांनी याबाबत खुलासा केला. देशात अधिकाधिक प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन व्हावे ही कृषिमंत्री या नात्याने माझी जबाबदारी आहे. त्यासाठी वेगवेगळय़ा राज्यांत दौरेही...
  February 9, 05:30 AM
 • ठाणे - डिझेलने भरलेल्या टॅँकरला लक्झरी बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बसचालकासह नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर इतर 14 जण गंभीर जखमी झाले. मुंबई- अहमदाबाद महामार्गावर पालघरनजीक मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये काही पुण्यातील प्रवाशांचा समावेश आहे. पर्पल ट्रॅव्हल्सची ही बस पुण्याहून अहमदाबादकडे जात होती. मध्यरात्री पालघर तालुक्यातील मनोर पोलिस ठाण्याजवळील कुडे गावाजवळ ही बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टॅँकरला धडकली. टँकरमध्ये मोठ्या...
  January 30, 01:10 AM
 • मुंबई- मुंबई अहमदाबाद महामार्गावर काल रात्री दिडच्या सुमारास लक्झरी बस डिझेल टॅंकरला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 8 जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर इतर 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही लक्झरी बस पुण्याहून अहमदाबादला जात होती. बस जेव्हा पालघर तालुक्यातील मनोर पोलिस स्टेशनजवळ असलेल्या कुडे या गावाजवळ आली, तेव्हा ती रस्त्याच्या कडेला थांबलेल्या डिझेल टॅंकरला धडकली. अपघात होताच टॅंकरमधील डिझेलने पेट घेतल्याने या प्रवाशांचा झोपेतच...
  January 29, 12:11 PM
 • ठाणे / मुंबई - ठाणे महापालिकेतील राड्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या सत्ताधारी शिवसेना भाजप युतीची कोंडी झाली आहे. भाजपचे उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी केलेल्या गद्दारीमुळे महायुतीच्या उमेदवाराचा परिवहन सभापतीपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्याचा आरोप झाला. तसेच त्यांना मारहाणही झाली. त्यानंतर त्यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला असला तरी आता त्यांनी नगरसेवकपदावरूनही दूर व्हावे, अशी जोरदार मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे. मात्र पाटणकर यांचा राजीनामा घेतल्यास युती अल्पमतात जाऊ शकते,...
  December 25, 04:17 AM
 • ठाणे- मित्रायु ग्रुपच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोठेघर वाफे (केंद्र-सापगाव, ता- शहापूर) येथे सौरऊर्जा मंडळाची स्थापना करण्यात आली. सौरऊर्जातज्ज्ञ अभय यावलकर यांनी विद्यार्थ्यांना सौरऊर्जा काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन जीवनातील सौरऊर्जेच्या महत्वाबद्दलची विद्यार्थ्यांना जाणीव करुन दिली. सूर्य हा ऊर्जेचा स्त्रोत कसा ठरु शकतो, याविषयीचे माहिती दिली. मित्रायु मंडळाने सौरऊर्जेवर चालणारे दोन पंखे आणि दिवे शाळेला भेट दिल्याबद्दल कार्यक्रमाच्या...
  December 24, 05:49 PM
 • ठाणे- राज्यात जादूटोणाविरोधी कायदा मंजूर होऊन 24 तासही होत नाहीत, तोच ठाणे जिल्ह्यात नरबळीचा प्रकार उघडकीस आला आहे. आजारी पत्नीला वाचविण्यासाठी एका महिलेचाच नरबळी दिल्याची घटना वसई येथे घडली आहे. याप्रकरणी बळी देणा-या मांत्रिकासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. वसईतील वाळीव गावात हा नरबळीचा धक्कादायक प्रकार उघड झाला. प्राप्त माहितीनुसार, ही घटना 17 नोव्हेंबरच्या आधी घडली आहे. बळी देण्यात आलेल्या महिलेचा मृतदेह 17 नोव्हेंबरला पोलिसांना सापडला होता. महिलेचे शीर धडावेगळे करण्यात आले होते....
  December 14, 03:06 PM
 • मुंबई -उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नीतेश राणे यांच्यासह त्यांच्या तीन समर्थकांना आज (बुधवार) जामीन मंजुर करण्यात आला. चौघांना जामीन मिळाला असला तरी त्यांना दररोज पेडणे पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. त्यांना देश सोडण्यासही मनाई करण्यात आली आहे. नितेश व त्यांचे काही सहकारी काल (मंगळवार) दोन वाहनांतून येत होते. सिंधुदुर्ग-गोवा सीमेवरील धारगल टोल नाक्यावर तिन्ही गाड्या रोखण्यात आल्या होत्या. टोल कर्मचार्यांनी त्यांना प्रतिवाहन 250 रुपये शुल्क भरण्यास सांगितले होते....
  December 4, 12:40 PM
 • अलिबाग - इंदापूरजवळील पोटनेर येथील जैन मंदिरात सोमवारी मध्यरात्री मुनीश्वर प्रशांतविजयजी महाराज यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी दोन तरुणांना अटक केली आहे. दरम्यान, किरकोळ रकमेसाठी ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी रात्री मुनीश्वर आपल्या खोलीत विश्रांती करत असताना प्रकाशकुमार गर्ग आणि फुलाराम नवरामजी मेघराज यांनी खोलीत घुसून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वेळी त्यांनी मुनींच्या डोक्यात लोखंडी पाईप घातला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला....
  December 4, 12:02 AM
 • ठाणे - ठाण्याचा कलेचा वारसा जतन करताना बालमनातील सुप्त कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेतर्फे यंदाही बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा 11 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत गडकरी रंगायतनमध्ये महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
  November 11, 04:29 AM
 • कल्याण- कल्याण-ठाकुर्ली रेल्वे स्टेशनदरम्यान फास्ट ट्रॅकवरून वेगाने जात असलेल्या मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेसखाली चिरडून रेल्वेच्या चार गँगमनचा मृत्यू झाला. पत्री पुलाजवळ ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हे गँगमन रेल्वे ट्रॅकच्या पाहणीचे काम करीत होते, असे सांगण्यात येत आहे.
  November 3, 12:08 PM
 • ठाणे - चित्रपटात काम देतो असे सांगून मुलाखतीस बोलावून अश्लील संभाषण करणा-या निर्मात्याला तरुणीने चोप दिला. ही घटना ठाण्यात घडली. दरम्यान, घटना समजल्यानंतर तिच्या मदतीसाठी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. झारखंड येथील ज्योतिकुमार याने एका हॉटेलमध्ये तरुणीला बोलावले होते. त्याने तिच्याशी अश्लील संभाषण करत चित्रपटात काम करायचे असेल, तर त्याग करण्याची तयारी आहे का, असा प्रश्न विचारला. त्यामुळे संतापलेल्या तरुणीने त्याच्या श्रीमुखात भडकावली. इतकेच नव्हे तर त्याला रस्त्यावर सर्वांसमोर...
  October 28, 12:34 AM
 • ठाणे - ज्वेलरी शॉपवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या गँगस्टर अबू सालेमच्या सहकार्यासह एकाला ठाणे पोलिसांनी अटक केली. राजेश हाट्टेकर व सचिन केदार अशी आरोपींची नावे आहेत. राजेश हा अबू सालेम गँगशी संबंधित असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वीही राजेश व त्यांच्या सहकार्यांनी एक ज्वेलरी शॉप फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. राजेश याच्यावर 12 खुनांच्या गुन्ह्यांसह इतर 30 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. 2006 मध्ये तुरुंगात असताना त्याने सालेमवर हल्ला केल्याचे सांगण्यात येते.
  October 26, 11:39 AM
 • ठाणे - ठाण्यातील शहापूर तालुक्यातील एका 19 वर्षीय विवाहित तरुणीची सासरच्या मंडळीनी विवस्त्र करून धिंड काढल्याची घटना रविवारी घडली. एवढय़ावरच न थांबता तिचे मुंडणही करण्यात आले. पीडित तरुणीने योगेश पाटील याच्यासोबत मे महिन्यांत विवाह केला होता. लग्नानंतर योगेश हा सासरवाडीत राहत होता. या विवाहामुळे योगेशचे कुटुंबीय नाराज होते. 30 ऑगस्ट रोजी योगेशच्या कुटुंबीयांनी दोघांनाही घरी आणले होते. तेव्हापासून या विवाहितेला त्रास दिला जात होता. रविवारी अत्याचाराची परिसीमाच गाठली.
  October 14, 05:17 AM
 • रोहा (रायगड)- साखर कारखाना खरेदी-विक्रीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारां यांनी फेटाळला आहे. सध्या उठसुट आरोप करणे ही आता फॅशन झाली आहे. अशा प्रकारे आरोप करणारे विचारवंत आणि गणित तज्ञ झाल्याचा टोलाही पवारांनी लगावला. फेब्रुवारीमध्ये राज्यसभा निवडणूक लढविणार असल्याचे पवार यांनी सांगितले. रोहा येथील पत्रकार परिषदेत बोलत शरद पवार यांनी अनेक मुद्यांना स्पर्श केला. महाराष्ट्रात मोडकळीस आलेल्या साखर कारखान्यात कोट्यवधींचा...
  October 12, 05:11 PM
 • ठाणे- अज्ञात व्यक्तींनी 10 दुचाकींसह व्यायामशाळा जाळून टाकल्याची घटना रविवारी मध्यरात्री वागळे इस्टेट येथे घडली. घटनेनंतर या परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. रविवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी रघुनाथनगर, किसननगर हे नागरी वसाहतीत सात दुचाकी जाळून टाकल्या. त्यानंतर हाजुरी व जरांडेवाडी भागातही 3 दुचाकी पेटवून दिल्या. एवढय़ावर न थांबता त्यांनी परिसरातील व्यायामशाळाही जाळली. सकाळी काही नागरिक फिरण्यासाठी बाहेर निघाले असता हा प्रकार उघडकीस आला.
  October 1, 10:03 AM
 • मुंबई/ औरंगाबाद - ठाणे जिल्ह्यात मुरबाडजवळ डोंगराळ भागात रविवारी सकाळी औरंगाबादकडे येणारे युनायटेड हेलिकॉप्टर या खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळून चालक दलाचे तीन सदस्य, दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला. जुहू येथून निघालेले हे हेलिकॉप्टर औरंगाबाद विमानतळावर इंधन भरण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता उतरणार होते. रिलायन्स डेपोच्या अधिकार्यांना तशी सूचना होती. मात्र हेलिकॉप्टर आलेच नाही. सकाळी अकराच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती डेपोला देण्यात आली.दोन-तीन महिन्यांतून एकदा इंधन भरण्यासाठी...
  September 30, 06:19 AM
 • ठाणे- वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी छत्रपती शिवाजी रुग्णालयाच्या पाच डॉक्टरांना अटक केली आहे. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी एका विद्यार्थ्याने तक्रार दिली आहे. मंगेश राणे, अच्युत नरोटे, प्रभाकर तलावडे, शैलेश गदा आणि किशन नाश्ते अशी या पाच डॉक्टरांची नावे असून हे सर्व 23 ते 27 वयोगटातील आहेत. तसेच शरद पाटील नावाच्या आणखी एका आरोपीचा या प्रकरणात समावेश आहे. या...
  September 29, 07:12 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात