जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • ठाणे - मुंबई व परिसरात महिलांवरील अत्याचारांचे सत्र सुरूच असून ठाण्यातील अकोली येथील एका 35 वर्षीय आदिवासी महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. घटनेनंतर सागर हडळ (21), संजय आरांडे (30), मोहन कडक (32), जगदीश गावित (22) अशी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत, तर पाचवा आरोपी विनोद कुमार हा फरार झाला आहे. पीडित महिला ही अकोली येथील रहिवासी आहे. सोमवारी रात्री ती घरी जात असताना पाचही जणांनी तिला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. घटनेच्या दुसर्या दिवशी...
  September 26, 10:18 AM
 • ठाणे- मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळील दिवान बानू कॉम्प्लेक्स ही चार मजली इमारत आज (शनिवारी) सकाळी साडे सात वाजता कोसळली. अनेक रहिवासी इमारतीच्या ढिगा-याखाली अडकल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असल्याचे कळते. अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या डागडुजीचे काम सुरु होते. इमारतीला तडेही गेले होते. अखेर इमारत कोसळलीच.पालिकेचे कर्मचारी आणि अग्निशामन दलाच्या कर्मचार्यांकडून ढिगारा उपासण्याचे काम सुरू आहे.
  September 21, 05:39 PM
 • ठाणे - ग्राहकाला योग्य सेवा न पुरवल्याबद्दल मोबाइल सेवा पुरवणार्या कंपनीने ग्राहकाला पाच लाख रुपये द्यावे, असा आदेश ठाणे जिल्हा ग्राहक न्यायमंचने दिला आहे. लूप मोबाइल कंपनीने कोणत्याही कागदपत्राची शहानिशा न करता एका ग्राहकाला दुसर्या ग्राहकाच्या नावाचे डुप्लिकेट सीम कार्ड अदा केले. त्यामुळे या ग्राहकाच्या खात्यातून पाच लाख रुपये डुप्लिकेट सीमधारकाने मोबाइल बँकिंगद्वारे काढले, असा ठपका ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण कक्षाने (टीडीसीआरएफ) ठेवला आहे. मालाड येथील रहिवासी...
  September 19, 07:12 AM
 • मालवण - तालुक्यातील सागरी हद्दीतील तळाशिल येथे अवैध मासेमारी करणार्या रत्नागीरीतील दोन मिनी पर्ससीननेट ट्रॉलर्स स्थानिक मच्छीमार व मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्यांच्या जाळ्यात अडक ले. यातील एका टॉलरवर बांगडा व काप मासळी आढळून आली. तर दुसरे टॉलर अधिकृत असल्याने तो सोडून देण्यात आले. सांगरी हद्दीत सुरुवातीपासून मिनी पर्ससीननेटधारकांनी अवैध मासेमारी करायला सुरवात केली होती. यामुळे पारंपारीक मच्छीमारांचा व्यवसाय अडचणीत आल्याने त्यांनी सबंधितावर कारवाई करण्याची मागणी मत्स्य...
  September 19, 07:10 AM
 • खोपोली- सामुहिक बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला असताना खोपोली येथे एका तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी वडीलांसोबत भांडण झाल्यामुळे घर सोडून आली होती. तिच्या परिस्थितीचा फायदा घेऊन 5 जणांनी सलग पाच दिवस एका लॉजमध्ये तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. खोपोलीमध्ये राहणा-या एका मुलीला फूस लावून पळविल्यानंतर बलात्काराची घटना ताजी असतांनाच या घटनेने खळबळ उडाली आहे. प्राप्त...
  September 8, 03:51 PM
 • ठाणे - अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत आसारामबापूंना अटक केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या हजारो सर्मथकांनी रविवारी उल्हासनगर स्थानकात रेल्वे व लोकल गाड्या अडविल्या. या आंदोलनामुळे प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास बापूंचे सर्मथक रेल्वेस्थानकावर जमा झाले होते. संतांवर खोटे आरोप लावून त्यांच्यावर सूडाने कारवाई करणार्या सरकारच्या निषेधाच्या घोषणा त्यांनी दिल्या. या आंदोलनामुळे कल्याण-कर्जत मार्गावरून जाणार्या गाड्या एक तास...
  September 2, 07:33 AM
 • ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासीन भटकळ याच्या बिहारमध्ये झालेल्या अटकेवरून उत्तर भारतीयांवर पुन्हा निशाणा साधला आहे. दहशतवादी भटकळला बिहारमध्ये आसरा मिळतोच कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. येथील एका कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. याचवेळी अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा बाऊ करु नका, असे सांगत राज यांनी स्वतःच्या अंगठ्या विसर्जित करण्याचा किस्सा सांगितला. (पुढील स्लाइडमध्ये वाचा, राज ठाकरेंनी का केल्या अंगठ्या...
  August 31, 03:49 PM
 • ठाणे - सातव्या मजल्यावरील फ्लॅटवर जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेलेली पंधरावर्षीय मुलगी सुमारे तीन तास अडकून पडल्याची घटना ठाण्यात घडली. पूजा जाधव असे मुलीचे नाव असून तिला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. ठाण्यातील तुलसीदास सोसायटीत पूजा आपल्या कुटुंबीयांसोबत राहते. शनिवारी सकाळी पूजा बाहेर गेली होती. यानंतर दुपारी परतल्यानंतर ती सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये जाण्यासाठी लिफ्टमध्ये चढली. मात्र, मध्येच अचानक लिफ्ट बंद पडली. काही जणांनी तिला लिफ्टमध्ये जाताना पाहिले होते....
  August 18, 04:11 AM
 • ठाणे - उल्हासनगरातील कॅम्प क्रमांक ३ येथील हिराघाट परिसरात राहणा-या एका 21 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला करणारा माथेफिरू अद्यापही बेपत्ता आहे. यामुळे उल्हासनगर आणि ठाणे परिसरातून संताप व्यक्त होत आहे. शनिवारी माथेफिरु तरुणाने तरुणीच्या चेह-यावर उकळते तेल फेकले होते. त्यानंतर 24 तास उलटूनही त्या माथेफिरूला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. उल्हासनगर येथील शिवाजी चौकातील एका दवाखान्यात पीडित तरुणी काम करते. याच भागात वडापाव विक्रीचा व्यवसाय करणा-या अजित तलरेजाशी काही...
  July 29, 12:05 PM
 • ठाणे - अल्पवयीन मुलीवर अत्याचार व बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. पूर्व पालघरमधील जीवदानी नगरातील संदीप बळवंत(36) या आरोपीचे त्याच भागातील अल्पवयीन मुलीशी अनैतिक संबंध होते. या संबंधातून मुलगी गरोदर राहिली. बळवंतने गप्प बसण्यासाठी मुलीला धमकी दिली व रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात केला, अशी तक्रार पीडिताच्या आईने दिली आहे. गर्भपातावेळी आरोपीच्या दोन बायका, मेहुणी व अन्य एक जण उपस्थित होता. या प्रकरणात चौघांनाही...
  July 17, 11:03 AM
 • ठाणे - अवैध जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी ठाणे मनपातल भाजप नगरसेविका चांदणी दुलानी यांचे पद सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केले. पालिकेत काँग्रेस आघाडी व सत्ताधारी युतीचे संख्याबळ प्रत्येकी 65 आहे. मात्र आता दुलानी यांचे पद रद्द झाल्याने युतीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. दुलानी ह्या कोपरी प्रभागातून निवडून आल्या होत्या. मात्र त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार कॉँग्रेसच्या पराभूत उमेदवार अरुणा भुजबळ यांनी केली होती. नंतर हे प्रकरण कोर्टात गेले.
  July 16, 03:38 AM
 • ठाणे - पत्नी व पाचवर्षीय मुलीची हत्या केल्याप्रकरणी हवाईदलाच्या अधिकार्याला स्थानिक न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राजेशकुमार भाडोरिया असे अधिकार्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच जोधपूर येथील हवाई दलातील अधिकार्याला विवाहबाह्य संबंध ठेवल्याच्या आरोपावरून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यानंतर आलेल्या या निर्णयाने भारतीय हवाई दलाबद्दल उलट सूलट चर्चा सुरु झाली आहे. भाडोरिया ठाण्यात पत्नी व पाचवर्षीय मुलीसह राहत होता. मार्च 2010 मध्ये त्याचा पत्नीशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला...
  July 11, 12:51 PM
 • ठाणे- क्षुल्लक कारणावरून एका 19 वर्षीय तरुणाने नातेवाइकाला ठार केल्याची घटना बुधवारी ठाण्यात घडली. अरविंद जावलिया असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अरविंदचा धाजी दोहिया यांच्याशी एका गोष्टीवरून वाद झाला होता. त्यानंतर त्याने दोहिया यांना काठीने बेदम मारहाण केली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोहिया यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अरविंदला अटक झाली.
  July 11, 11:53 AM
 • ठाणे- लकी इमारत दुर्घटनाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोन मुख्य बिल्डरांनी दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. अजीज सिद्दिकी आणि जमील शेख अशी आरोपींची नावे आहेत. प्रसिद्ध विधिज्ञ माजिद मेमन यांच्यामार्फत दोघांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाले असल्याने दोघे अर्ज मागे घेत असल्याचे मेमन यांचे सहवकील सुनील भारके यांनी न्यायालयात सांगितले.
  July 8, 04:41 PM
 • खोपोली- खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीतील स्टील मोल्डिंग प्रकल्पात शुक्रवारी रात्री झालेल्या स्फोटात 15 जण जखमी झाले. या घटनेमुळे खोपोलीकर चांगलेच भयभीत झाले आहे. स्पोटानंतर लागलेल्या आगीने कंपनीच्या जवळपासच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींमुळे चिमुरड्यांचा मोठ्याप्रमाणात समावेश आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. स्फोट झाल्याची बातमी संपूर्ण शहरात पसरताच एकाच हाहा:कार माजला होता. त्यानंतर संतप्त जमावाने कारखान्यातील वाचमन केबिन,मुख्य कार्यालय, अनेक वाहने तसेच यंत्रांची तोडफोड...
  July 6, 04:44 PM
 • ठाणे- भिवंडीतील नारपोली भागात दुमजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून 35 जण जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री साडेबारा ते दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अरिहंत कॉम्प्लेक्स या औद्योगिक वसाहतीत ही दुमजली इमारत होती. यामध्ये रेडिमेड कपडे शिलाईचे काम सुरू होते. दुर्घटना घडली त्यावेळी इमारतीत 45 कामगार काम करत होते. यापैकी आतापर्यंत 20 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. परंतु ढिगार्याखाली आखणी काही जण दाबले गेले असल्याची शक्यता वर्तवली...
  July 4, 10:17 AM
 • रायगड- रायगडचे माजी खासदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते दिनकर बाळू पाटील यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. उरणमधल्या साडेबारा टक्क्याच्या कायद्याचे जनक तसेच प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारे नेते अशी त्यांची ओळख होती. पाटील यांनी सातवेळा आमदार होते. दि.बा.पाटील यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई या गावात झाला होता. अत्यंत प्रतिकृल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. ते वकील झाले. त्यानंतर पनवेल नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पनवेल-उरण...
  June 24, 07:53 PM
 • ठाणे - बिल्डर सुनील लहोरिया हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने विकासक आरोपीचा जामीन फेटाळला.आरोपी सुमीत बच्छेवार याच्याविरुद्ध गंभीर आरोप असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. या प्रकरणातील आरोपींची यादी मोठी आहे, त्यामुळे अर्जदाराच्या जामीन अर्जावर निकाल देण्याची ही योग्य नाही, असे न्यायाधीशांनी आदेशात म्हटले. लहोरिया यांच्या वाशी येथील निवासस्थानाबाहेर 16 फेब्रुवारी रोजी दोन बंदूकधार्यांनी त्यांची हत्या केली होती. मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रात शूटर व्यंकटेश शेट्टीयार, आणि माजी...
  June 23, 12:45 PM
 • रायगड - ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीनुसार शुक्रवारी पहाटे रिमझिम पाऊस व दाट धुक्याच्या साक्षीने रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ध्वजारोहणाने प्रारंभ झाला. ढोल-ताशांचा गजर, शिवरायांचा जयजयकार व मंत्रोच्चाराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्यानिमित्त गुरुवारपासूनच शिवभक्तांनी रायगडावर हजेरी लावली होती. शुक्रवारी धारेश्वर (पाटण-सातारा) येथील नीलकंठ शिवाचार्य महाराज यांनी राज्याभिषेक सोहळ्याचे आचार्य म्हणून कर्तव्य पार पाडले. त्यांनी उपस्थित...
  June 22, 07:11 AM
 • ठाणे- अनधिकृतपणे बांधण्यात आलेली लकी कंपाऊंडमधील इमारत कोसळण्याची घटनेनंतर आज मुंब्र्यात रेल्वे स्थानकाजवळ आणखी एक इमारत कोसळली आहे. या घटनेतील मृतांचा आकडा 10 वर गेला आहे. त्यात एका दोन महिन्यांची चिमुकली आणि 7 वर्षांचा एका चिमुकल्याचा समावेश आहे. तर 7-8 जण इमारतीत अडकल्याची भीती आहे. स्मृति नावाची ही इमारत सुमारे 35 वर्षे जुनी आहे. धोकादायक इमारत म्हणून ठाणे महापालिकेने या इमारतीला नोटीस दिली होती. त्यानंतर रहिवाशांनी एका बिल्डरकडून इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु केले होते. परंतु काम...
  June 21, 02:54 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात