जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • मुंबई- ट्रक आणि कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील पाच जण जागीच ठार झाल्याची घटना ठाण्यातील खारेगाव टोल नाका येथे सोमवारी पहाटे घडली. सोमवारी सकाळी कारमधील पाचही जण ठाण्याकडे जात होते. याच वेळी समोरून येणाया ट्रकने कारला जोरदार धडक दिली. अपघात इतका जबरदस्त होता की, त्यात कारचा अक्षरश: चुराडा झाला. घटनेनंतर पोलिस आणि नागरिकांनी कारचा पत्रा तोडून छिन्नविच्छन अवस्थेतील मृतदेह बाहेर काढले. मृत प्रवासी हे अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
  June 18, 02:55 AM
 • ठाणे - माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेला तीन मुलांसह घराबाहेर काढणार्या एका कुटुंबातील सात जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी पीडित महिलेचा ठाण्यातील एका व्यक्तीशी विवाह झाला. 2009 मध्ये सासरच्या मंडळीकडून माहेरहून पैसे आणण्यासाठी तिचा छळ सुरू झाला. दोन दिवसांपूर्वी तिला याच कारणावरून तीन मुलांसह घराबाहेर काढण्यात आले. यानंतर तिने पतीसह कुटुंबातील सात जणांविरोधात पोलिसांत तक्रार दिली.
  June 16, 12:45 PM
 • ठाणे - कंपनीतून डीलरकडे विक्रीसाठी नेण्यात येत असलेल्या सुमारे 35 लाख रुपये किमतीच्या सिगारेट आठ जणांच्या सशस्त्र टोळीने पळवून नेल्याची घटना ठाण्यातील भिवंडी कमान रस्त्यावर घडली. मंगळवारी रात्री फोरस्क्वेअर कंपनीच्या सिगारेट घेऊन एक ट्रक निघाला होता. रात्री भिवंडी कमानजवळ ट्रक आल्यानंतर आरोपींनी चालकाला बाहेर काढून मारहाण केली व ट्रकमधील सिगारेट टेम्पोत भरून तेथून पोबारा केला. या प्रकरणी अज्ञात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  June 13, 12:52 PM
 • ठाणे - लकी इमारत दुर्घटनाप्रकरणी अटकेत असलेल्या ठाणे महापालिकेच्या उपअभियंत्याने न्यायालयाकडे जामीन देण्याची मागणी केली आहे. रमेश इनामदार असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले नाही, असे कारण देत त्याचे वकील रवींद्र भट यांनी विशेष न्यायाधीशांकडे जामिनीसाठी अर्ज केला आहे. अलीकडेच इनामदार यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. लकी इमारत दुर्घटनाप्रकरणी इनामदार यांचा काहीही संबंध नाही, तसेच पोलिसांनी याबाबत अजूनही आरोपपत्र दाखल केले नाही. त्यामुळे त्यांना जामीन...
  June 13, 12:29 PM
 • ठाणे- ठाणेसह परिसरात रविवारीरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची भंबेरी उडाली असताना मुंब्रा येथील कचरा वेचणारी तीन मुले सोमवारी सकाळी नाल्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे ठाणे महापालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मुंब्र्यातील नारायण नगरात असलेला नाल्याला पूर आल्याने त्यात पिंकी राठोड, गीता राठोड व कल्लू राठोड ही तीन मुले वाहून गेली. तिघेही कचरा वेचण्याचे काम करत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवान घटनास्थळी...
  June 10, 12:57 PM
 • मुंबई- पत्नीला विषारी औषध पाजून पतीने ठार केल्याची घटना भिवंडी येथील कुंभारवाड्यात घडली. याप्रकरणी पती नारायण नारगे याला पोलिसांनी अटक केली आहे. नारायणचा पत्नी शांतीबाईशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. काही वेळानंतर त्याने पत्नीला कप भरून विषारी औषध पाजले. घटनेनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला
  June 10, 11:58 AM
 • ठाणे- कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पोलिस जागीच ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना ठाण्यातील कल्याण येथे घडली. बबन मुंडे (40) असे मृत पोलिसांचे नाव आहेत. शनिवारी रात्री दीडच्या सुमारास ड्युटी संपल्याने मुंडे आणि त्यांचा सहकारी दुचाकीवरून घरी जात होते. याच वेळी समोरून भरधाव येणार्या कारने दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मुंडे यांना तपासून मृत घोषित केले. घटनेनंतर कारचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
  June 10, 11:48 AM
 • ठाणे- एसटीचा कारला धक्का लागल्याने कारमधील दोघांनी एसटीचालकाचे अपहरण केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली. माउली भडके असे अपहरण झालेल्या चालकाचे नाव आहे. भडके पुण्याहून दादरला एसटी घेऊन येत होता. मानखुर्दजवळ आल्यानंतर एसटीचा एका कारला धक्का लागला. त्यामुळे चिडलेल्या कारमधील दोघांनी भडकेला मारहाण करून त्याचे अपहरण केले. यानंतर दोघांनी त्यांच्या भावाला फोन करून दहा हजार रुपयांची मागणी केली. भावाने पैसे दिल्यानंतर त्यांनी चालकाला सोडून दिले. घटनेनंतर अज्ञात आरोपींविरोधात पोलिसांनी...
  June 9, 12:37 AM
 • ठाणे- वनस्पतींपासून चांदी बनविण्याचा गुप्त फॉर्म्युला प्राप्त करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात एकाची कारमध्ये जिवंत जाळून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली होती. परंतु, तपासानंतर सत्य बाहेर आले आणि सर्वांना धक्काच बसला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, मृतकाचे नाव नरेंद्र पटेल (51) असे आहे. सोमवार 3 जून रोजी पालघर आणि केळवा मार्गात दासगाव पाडा येथे एक कार संपूर्णपणे जळालेलया अवस्थेत आढळून...
  June 8, 08:03 PM
 • ठाणे- तरुणींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणार्या ठाण्यातील एका दलालाला पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून अटक केली. त्याच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीसह तीन तरुणींची सुटका केली. मोदीन मंडल असे आरोपीचे नाव आहे. मंडल हा मूळ कोलकात्याचा रहिवासी आहे. काही वर्षांपासून तो मुंब्य्रात राहतो. तो सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती खबर्याने पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक त्यांच्याकडे पाठवले. प्रत्येकी दीड हजार रुपये घेतल्यानंतर त्याने ग्राहकांना तरुणींकडे पाठवले. याच वेळी...
  June 8, 07:03 AM
 • ठाणे - 74 जणांचे बळी घेणा-या शिळफाटा येथील लकी इमारतीच्या दोन मुख्य आरोपी बिल्डरांना पोलिसांनी 60 दिवसांत आरोपपत्र दाखल न केल्याने जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी प्रसिद्ध वकील माजिद मेमन यांनी न्यायालयात केली. सलीम शेख आणि जमील कुरेशी अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी विशेष न्यायाधीश के. आर. वारीर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मेमन यांनी दोघांच्या वतीने काम पाहिले. पोलिसांनी 60 दिवसांत आरोपपत्र दाखल केले नाही. त्यामुळे दोघेही जामिनास पात्र असल्याचे मेमन यांनी सांगितले. यावर दोन्ही...
  June 7, 01:24 PM
 • रायगड - गुरूवारी(ता.6) रायगडावर शिवाजी महाराजांचा 340 वा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समितीने केले आहे. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजी महाराज, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रायगडाच्या परिसरात शिव राज्याभिषेकासाठी येणा-या लोकांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या आहेत. संपूर्ण...
  June 6, 01:47 PM
 • ठाणे - तरूणीला बेशुध्द करून तिच्यावर चर्चच्या फादर बलात्कार केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी येथील श्रीनगर पोलिस ठाण्यात आरोपी ब्रिजमोन के.एल. याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वागळे इस्टेट येथे राहणारा ब्रिजमोन यांने पीडित मुलीला आपल्या घरी बोलवले आणि तिला बेशुध्द करणारे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला व त्याचे त्याने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले.याविषयी कुठेही बोलण्याचा प्रयत्न केल्यास रेकॉर्ड क्लिपिंग समाजासमोर उघड करील व कुटूंबातील सदस्यांना जीवे...
  June 5, 01:37 PM
 • ठाणे - लुईसवाडीत राहणारे घनश्याम अग्रवाल यांच्या क्रेडिट कार्डातून 811.65 युरो क्रेडिट झाले. या व्यवहाराबाबत त्यांना कोणतीही माहिती नव्हती. या फसवणुकीविरूध्द त्यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फ्रान्सच्या एलएल डोफ्युजन या हाऊसहोल्ड अॅप्लायन्स दुकानात डिसेंबर 2012 मध्ये हा गुन्हा घडला. अग्रवाल यांचे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. बँकेने त्यांच्या खात्यावर 811.65 क्रेडिट झाल्याचे माहिती दिली. युरोची खरेदी केली नसल्याचे त्यांनी बँकेला सांगितले. त्याची भारतीय किंमत 60,780 हजार...
  June 4, 05:11 PM
 • ठाणे- तारापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांवर तयार करण्यात आलेल्या शॉर्ट फिल्मला ब्राझील येथील युरेनियम फिल्म फेस्टिव्हलमध्ये यल्लो पुरस्कार मिळाल्याची माहिती दिग्दर्शक प्रदीप इंदूलकर यांनी दिली. इंदूलकर मूळ तारापूर येथील रहिवासी आहेत. 1960 मध्ये अणुउर्जा प्रकल्पाची निर्मिती झाल्यानंतर येथील नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात स्थलांतर झाले होते. हाच धागा पकडत इंदुलकर यांनी गेल्या वर्षी या विषयावर शार्ट फिल्म तयार करून युरेनियम फेस्टिव्हलमध्ये पाठवली. गेल्या शनिवारी...
  June 3, 06:43 AM
 • ठाणे - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टँकर व खासगी बसच्या भीषण धडकेत 14 ठार, तर 36 जण जखमी झाले. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मेढवणजवळ हा अपघात झाला. ही खासगी बस अहमदाबाहून मुंबईकडे येत होती. याच वेळी समोरून येणा-या टँकरच्या चालकाचे नियत्रंण सुटल्याने टँकर बसवर आदळला. अपघातानंतर जिल्हाधिकारी मनोज गोहाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि नागरिकांच्या मदतीने मृत आणि जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील...
  May 30, 05:10 AM
 • ठाणे - जिल्ह्यातील कल्याण परिसरात महापालिकेच्या टाकीत एका तरुण महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत महिलेची अद्याप ओळख पटली नसून पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. कल्याण परिसरातील एका टाकीतून दुर्गंधी येत असल्याने येथील रहिवाशांनी पोलिसांत तक्रार दिली. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी टाकीत एका गोणी आढळून आली. यात महिलेचा मृतदेह आढळून आला. छायाचित्र - संग्रहित
  May 28, 01:59 PM
 • नाशिक/ठाणे /पुणे/सांगली - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण बाहेर आल्यानंतर पोलिसांनी मुंबईसह राज्यभरातील छोट्या- मोठय़ा सट्टेबाजांवर धडक कारवाई सुरू केली आहे. नाशिक, सांगली, ठाण्यासह पुण्यात बुधवारी व गुरूवारी कारवाई करत 16 जणांना अटक करण्यात आली. नाशकातील सट्टेबाजांचा पोलिस गेल्या 20 दिवसांपासून मोबाईल टॉवर लोकेशनद्वारे माग घेत होते. अखेर बुधवारी हे पाच जण त्यांच्या जाळय़ात सापडले. नाशिक रोड परिसरातील एका बंगल्यात सट्टेबाजी करणार्या राजेंद्र देवेंद्र सावना (नाशिक रोड)...
  May 27, 12:32 PM
 • ठाणे- चौदा गावे हद्दीतील वनजमीन, गाळे इत्यादींवरील अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणे तातडीने दूर करावीत, असे निर्देश ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले. या आदेशामुळे गावांतील अनधिकृत बांधकामे करणा-यांचे धाबे दणाणले आहे. नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेली व आता कल्याण तालुक्यात समाविष्ट करण्यात आलेली नारिवली, पिंपरी, वाळकण, नागावई आणि दहिसर ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी तक्रार केली होती. त्यामुळे पालकमंत्र्यांनी अतिक्रमणे त्वरित हटविण्याचे आदेश दिले. या १४ गावांच्या...
  May 27, 12:32 PM
 • ठाणे - मुंबईची रहिवासी इशरत जहॉँच्या बनावट चकमकीतील मृत्यू प्रकरणात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि पोलिसांनी निष्पाप कॉलेज तरुणीला अतिरेकी ठरवत ठार मारल्याचा आरोप पवार यांनी केला. अतिरेक्यांना ठार मारणार्या पोलिसांचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया मोदी यांनी त्या वेळी दिली होती. चकमक गुजरात पोलिसांच्या शिरपेचातील तुरा आहे. मुंबई पोलिसांना त्यात अपयश आल्याचे ते म्हणाले होते, असे पवार...
  May 27, 12:30 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात