जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • मुंबई - जुलै ते सप्टेंबर 2013 या कालावधीत मुदत संपणार्या 451 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी व काही रिक्त जागांसाठी 23 जून रोजी मतदान होणार असून संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू झाली, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. निवडणुकीसाठी 15 एप्रिल 2013 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असून नामनिर्देशन पत्रे 4 ते 8 जून 2013 या कालावधीत स्वीकारली जातील. 10 जून 2013 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे 12 जून 2013 पर्यंत मागे घेता येतील....
  May 25, 04:54 AM
 • ठाणे - मुंब्रा येथील इमारत दुर्घटना प्रकरणात स्थानिक न्यायालयाने दोन आरोपींना जामीन मंजूर केला. ठाणे मनपा आयुक्त कार्यालयातील आरोपी अधिकार्याचा चालक रामदास बुरूड व बांधकाम साहित्य पुरवठादार अफरोज अन्सारी यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. बिल्डर आणि मनपा अधिकार्यातील लाचेच्या देवाणघेवाणीत बुरूडने मध्यस्थाचे काम केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. न्यायालयाने पोलिस कॉन्स्टेबल जहांगीर सय्यद, मनपा अभियंता सुभाष रावल आणि मनपा अधिकारी सुभाष वाघमारे, किसन मडके आणि...
  May 19, 12:05 PM
 • ठाणे- ठाण्यातील व्यापार्यांनी एलबीटीविरोधात शनिवारपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. दुसरीकडे व्यापार्यांच्या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवला असून मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. बंदची हाक मागे घ्या, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचाही इशारा मनसेने दिला आहे. काही भागात मनसे कार्यकर्त्यांनी व्यापार्यांनी बंद दुकानांचे शटर परस्पर उघडून बंद उधळला. दरम्यान, अक्षय्य तृतीच्या निमित्ताने ठाण्यातील दुकानदारांनी शहरात दुकाने उघडली होती. परंतु आजपासून पुन्हा एकदा...
  May 18, 03:52 PM
 • ठाणे - कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज दवाखान्यात डॉट प्लस केंद्रावर वैद्यकीय अधिकारी नसल्याने टीबीच्या रूग्णांची दैन्या होत आहे. ती तातडीने अधिकारी नेमून सोडावावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. राज्य सरकारने डॉट प्लस केंद्रासाठी वैद्यकीय अधिका-याचे पद मंजूर केले आहे. मात्र त्या पदावर कोणाचीही नियुक्ती न झाल्याने पालिकेच्या रूग्णालयात टीबी रूग्णांची दररोज रूग्णांचे हाल होत आहे. त्यामुळे लवकर वैद्यकीय अधिका-याची नेमणूक करावी, असे...
  May 18, 12:20 PM
 • मुरबाड - सासरच्या लोकांकडून पैशांसाठी वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. प्राप्त माहितीनुसार कर्जत तालुक्यातील खांडस गावाची गौरी भोईरची (20) मुरबाडच्या सदानंद शेळके याच्याशी मागील वर्षी लग्न झाले होते. शेळके कुटूंबीयांचा न्यायालयीन वाद सुरू होता. तो लढवण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी गौरीला माहेराकडून पन्नास हजार रूपये आणावे यासाठी तिचा पती, सासरा, सासू, नणंद यांच्याकडून सतत मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. यास कंटाळून गौरीने आत्महत्या केली. तिच्या...
  May 17, 03:35 PM
 • वसई - येथील हनुमान नगर मध्ये बिल्डिंगवर अॅंटीना लावताना खाली पडून युवकाचा मृत्यू झाला. मृत्य युवक राहुल पवार (वय-23, राहणार घाटकोपर) विरारमधील गणेश बिल्डिंगवर डिश अॅंटींना लावण्यासाठी आला होता. इमारतीवर असलेल्या पत्र्यावर चालत असताना पत्रा तुटून राहूल खाली पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. तो डीबी इन्फोत कामाला होता.
  May 16, 12:12 PM
 • ठाणे - भगवान परशुरामाच्या जीवनावर 5 हजार भागांची टीव्ही मालिका काढण्यात येणार असून येत्या दिवाळीत त्याचा पहिला भाग प्रदर्शित होईल, अशी आशा या प्रोजेक्टशी संबंधित सूत्रांनी व्यक्त केली. दूरचित्रवाणी मालिकेद्वारे परशुरामाचे जीवन लोकांसमोर यावे, यासाठी देशभर या देवतेशी संबंधित माहिती गोळा करण्यात आली आहे, असे सुशील योगी यांनी सांगितले. सोमेश्वर प्रॉडक्शन कंपनीमार्फत मालिकेची निर्मिती केली जाणार आहे. भाइंदरमध्ये मालिकेचे चित्रीकरण होणार आहे.
  May 15, 11:23 AM
 • ठाणे- भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेले राज्य व केंद्रातील कॉँग्रेसप्रणीत सरकार घालवण्याची वेळ आली आहे. भगवान श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने अनेक राक्षसांचा वध केला, त्याप्रमाणे मतदारांनी कॉँग्रेस आघाडी सरकारला ठार करावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. सरकार आणि सत्ताधार्यांमुळे संपूर्ण देश विविध समस्यांनी ग्रासला आहे. सरकारमुळे भ्रष्टाचार वाढला असून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. मतदारांनी...
  May 12, 07:03 AM
 • ठाणे- तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांचा लढा यापुढे सुरूच राहील, असा निर्धार भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी व्यक्त केला. सरकारने पुनर्वसन कार्यक्रम राबवला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी त्याविरोधात न्यायालयीन लढाई सुरू आहे. नाईक यांचे चर्चगेट ते डहाणू लोकल रेल्वेवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. आपल्या तीन कामांसाठी आंदोलन सुरूच राहील. यात मच्छीमारांना डिझेलमध्ये सबसिडी, शेतकर्यांच्या धर्तीवर मच्छीमारांना मदत तसेच तारापूर अणुऊर्जा...
  May 12, 07:03 AM
 • ठाणे - दिव्यात तपासणीसाठी आलेल्या महिलेवर डॉक्टरने बलात्कार केला. डॉक्टरने बलात्कार करण्यापूर्वी महिलेला बेशुध्द केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिव्यातील डॉ विलियम जेकब याच्या दवाखान्यात 24 वर्षीय पीडित महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार जेबक याने तिला एक पदार्थ दिला व त्यानंतर ती बेशुध्द झाली. या दरम्यान तिच्यावर डॉक्टरने बलात्कार केला असा आरोप पीडित महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारावरून डॉक्टरविरूध्द गुन्हा दाखल करण्यात...
  May 4, 01:15 PM
 • खोपोली- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एलपीजीचा टँकर उलटला. जवळपास 8 तास वाहतूक ठप्प होती. या 8 तासांमध्ये प्रवाशांचे आतोनात हाल झाले. या अपघाताने द्रुतगती महामार्गाची कंत्राटदार आयआरबी कंपनीच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे बारा वाजल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे झालेल्या मनस्तापावरुन प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. आज सकाळी एमएच-०४ सी ए ५९६४ क्रमांकाचा टॅक्र खोपोली जवळील अंडा पोइन्टजवळ उलटला. त्यानंतर सकाळी 9 वाजतापासून दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली. ही गळती...
  May 3, 04:59 PM
 • वेंगुर्ले - समुद्राच्या अंतर्गत भागात मान्सूनला अनुकूल असलेल्या घडामोडी घडत आहेत. कोकणात अचानक तापमानात वाढ झाली असून उन्हाची झळ वाढली आहे. शुक्रवारी भारतीय हवामान विभगाने यंदा पावसाळा लवकर सुरू होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुरूप समुद्रात हालचाली होत असल्याचे काही मच्छीमारांनी सांगितले. वाढत्या उष्णतेमुळे आंबा लवकर पिकत आहे.
  April 30, 01:05 PM
 • कणकवली - पश्चिम घाटातील पर्यावरण संवर्धनासाठी माधव गाडगीळ आणि कस्तुरीरंगन या दोन समित्या स्थापण्यात आल्या. पुढे आणखी समित्या येतील, परंतु त्यात सर्वसामान्यांचा विचार न झाल्यास पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही, असे आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले. नगरवाचनालयाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगता प्रसंगी ठेवण्यात आलेल्या आज पर्यावरण विचार-एक नित्यकर्म या परिसंवादात आमदार जठार बोलत होते. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष वि.शं. पडते, महेश काणेकर, जान्हवी जोशी, कौस्तुभ ताम्हाणकर, डॉ कुमुद...
  April 29, 11:58 AM
 • ठाणे - अवकाळी पाऊस आणि बदलते हवामान याचा जबरदस्त फटका कोकणातील आंबा उत्पादनाला बसला असल्याचे निरीक्षण दोन संस्थांनी नोंदवले आहे. कोकणातील आंबा उत्पादन 2011 आणि 2010 च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटणार असल्याचे या संस्थांच्या अहवालात म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांपासून कोकणातील अल्फान्सोसह (हापूस) विविध वाणाच्या आंब्याचे उत्पादन सातत्याने घटत असल्याचे या संस्थांनी म्हटले आहे. कोकण विकास परिषद आणि संस्कार या दोन संस्थांनी कोकणातील आंबा उत्पादनाचा अभ्यास केला. त्याअंती त्यांनी हे निरीक्षण...
  April 27, 12:00 AM
 • ठाणे- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथ तालुक्यातील वांगणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक- 2 मध्ये संकल्प ग्रुपतर्फे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. वांगणीचे सरपंच खंडेराव कालेकर, उपसरपंच सुखदेव पडवळ, सरचिटणीस एकनाथ शेलार, ग्रामपंचायत सदस्या योजना सांळुखे, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता महेंद्र साळवे, सॅम्युअल कांबळे, माजी सरपंच विजय पावस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक घन:श्याम युवराज कांबळे यांनी केले....
  April 24, 04:19 PM
 • ठाणे - मनीषा ओगले यांनी सर्वात मोठय़ा बॅगमध्ये पेंटिंग करण्याचा विश्वविक्रम केला. त्यांनी पर्यावरण सुरक्षेवर रविवारी 21 फूट लांब, 27 फूट रुंद कापडी पिशवीवर दहा तास 44 मिनिटांपर्यंत पेंटिंग केली. त्यात जागोजागी पाणी वाचवा, झाडे वाचवा, नो प्लॅस्टिक बॅग आदी संदेशही लिहिले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले आहे. सर्वात मोठा हँड पेंटेड कुर्ता (40x20 फूट) तयार करण्याचे लिम्का रेकॉर्डही त्यांच्या नावे आहे.
  April 23, 10:41 AM
 • अलिबाग- आत्मक्लेश करून चूक सुधारता येत नाही. दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा वारसा अजित पवारांनी सांगू नये. त्यांच्या काकांनीच यशवंतरावांच्या पाठीत खंजीर खुपसला होता, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथे शनिवारी केली. शिवसेनेच्या निर्धार सभेत ते बोलत होते. या वेळी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, मनोहर जोशी आदींची उपस्थिती होती. ठाकरे म्हणाले, सिंचन प्रकल्पांच्या किमतीत वाढ होण्यासाठी सुनील तटकरे जबाबदार आहेत. शिवसेनेची सत्ता आल्यास...
  April 21, 03:05 AM
 • कल्याण - शुक्रवारी ( ता.19) कल्याण पूर्वमध्ये ट्रॅक्टरने मोटरसायकल्स आणि रिक्षांना दिलेल्या धडकेत एक ठार, तर चौघे जखमी झाले.कल्याणहून डोंबिवलीच्या दिशेने जाणा-या ट्रॅक्टरने विजय नगर येथील 4 मोटारसायकलींसह 5 रिक्षांना धडक दिली. यात 1 ठार झाला. जखमींना कल्याण आणि मुंबई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रॅक्टरची चालक गायब असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
  April 20, 12:54 PM
 • ठाणे- अनधिकृत बांधकामावरील कारवाई विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले असून त्यांनी आज (गुरुवारी) ठाणे बंद पुकारला आहे. या बंदमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे. रिक्षा, बस बंद असल्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय झाली आहे. ज्ञानसाधना महाविद्यालय प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु विद्यापीठाच्या परीक्षा या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ठाणे बंद म्हणजे राजकीय नेते आणि बिल्डरांचे साटेलोटे...
  April 18, 03:08 PM
 • ठाणे - ब्रिटिश काळखंडानंतर प्रथमच राज्यात जमिनीची फेरमोजणी होत असल्याची माहिती कोकण विभागाचे भूमी अभिलेख उपसंचालक विलास पाटील यांनी दिली. ठाण्यात भूमी अभिलेख विभागाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. जमीन फेरमोजणीची प्रायोगिक तत्त्वावरील कामे पुण्यातील मुळशी तालुक्यात सुरू करण्यात आली आहे. जमीन मोजणीच्या कामाचे आता पूणपणे संगणकीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना केव्हाही जमिनीची माहिती मिळू शकेल. पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यात, दुस-या टप्प्यात 12 , तर...
  April 17, 12:47 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात