Home >> Maharashtra >> Vidarva

Vidarva

 • वर्धा- पुलगावमधील लष्कराच्या दारुगोळा डेपोत जुनी स्फोटके निकामी करताना भीषण स्फोट झाला. यात 6 जण ठार तर 8 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. स्फोटामुळे परिसरात हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्राच्या वर्ध्यातील पुलगावमधील लष्करी तळावर जबलपूरच्या खमरिया आर्डिनन्स फॅक्टरीचे कर्मचारीजुनी स्फोटके नष्ट करण्यासाठी आले होते. त्याचवेळी हा अपघात घडल्याची माहिती मिळाली...
  08:40 PM
 • अमरावती-शहरात मागील काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्था ढासळल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. यातही राजापेठ ठाण्याच्या हद्दीत तर सातत्याने चाकू हल्ले, भरदिवसा लूटमार अशा घटना वारंवार घडत आहे. यातच आणखी एका गंभीर घटनेची भर रविवारी (दि. १८) दुपारी पडली. छत्री तलावावर कॅमेरा घेवून फोटोशूट करण्यासाठी गेलेल्या तीन युवकांवर चार अल्पवयीन हल्लेखोरांना चाकूने हल्ला चढवला. यामध्ये एका २१ वर्षीय युवकाचा गळा चिरुन त्याला गंभीर जखमी केले आहे. राजापेठ पोलिसांनी या गंभीर प्रकरणात अल्पवयीन...
  01:13 PM
 • पातूर-अनैतिक संबंधातून प्रौढ प्रियकराने युवतीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात युवती गंभीर जखमी झाली तर प्रौढ प्रियकराचा मृत्यू झाला. ही हत्या की आत्महत्या? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही घटना पातूर पासून दहा किलोमीटर अंतरावरील विवरा येथे घडली. विवरा येथील करिष्मा ऊर्फ भुरी शेख हसन (वय २० वर्ष) हिला बोथा काझी येथील नियामत खा (वय-५० वर्ष) हे त्यांच्या मुलासाठी मागणी घालायला काही महिन्यांपूर्वी आले होते. परंतु करीष्माच्या आई वडिलांनी नकार दिला. यामुळे नियामत खा संतप्त होवून तेथून...
  01:09 PM
 • अकाेला -शिवसेनेतील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण- गटबाजी साेमवारी शेतकरी अात्महत्याग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य वितरण वितरणासारख्या संवेदनशील कार्यक्रमाच्या निमित्ताने चव्हाट्यावर अाली. कार्यक्रमापासून डावलण्यात अाल्याचा अाराेप करीत आमदार गाेपिकिशन बाजाेरीया यांनी कार्यक्रम सुरु असतानाच युवा सेना पदाधिकाऱ्यांशी स्वत:च्या निवासस्थानी चर्चा केली. त्यांच्यासह शिवसेना, युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. या कार्यक्रमानंतर संपर्क प्रमुख खा. अरविंद...
  01:04 PM
 • नागपूर- नागपुरात रविवारी झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघड झाले अाहे. परीक्षा केंद्रात मोबाइल बंदी असताना अश्विनी जनार्दन सरोदे (२३) या परीक्षार्थी तरुणीने चक्क पाण्याच्या बाटलीत लपवून मोबाइल आत नेला व त्याद्वारे प्रश्नपत्रिका फाेडली. केंद्राबाहेरील साथीदाराने तिला माेबाइलद्वारे उत्तरे पुरवल्याचा संशय अाहे. अश्विनी व तिचा साथीदार शुभम भास्करराव मुंदाने यांच्याविराेधात गुन्हा दाखल झाला. शुभमला अटक झाली अाहे....
  07:48 AM
 • नागपूर- गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व कोरची तालुक्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या न्याहाकल-हेटळकसा जंगल परिसरात सोमवारी सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांत सुमारे पाऊण तास चकमक चालली. या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या, तर काही नक्षलवादी जखमी झाले आहेत. नक्षलविरोधी अभियानाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्याहाकल-हेटळकसा जंगल परिसरात नक्षलवाद्याचा तळ असल्याची गुप्त माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सी-60 पथकासह विशेष पथकातील जवानही रविवारी...
  November 19, 09:32 PM
 • बुलडाणा- डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आलेल्या एका ट्रकने अचानक पेट घेतला. आग एवढी झपाट्याने पसरली की ती विझवणे कोणालाही शक्य झाले नाही. ट्रक क्षणात जळून खाक झाला. ही घटना खामगाव तालुक्यात टेंभुर्णा गावाजवळील अग्रवाल पेट्रोल पंपावर घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
  November 19, 09:24 PM
 • धामणगाव रेल्वे (अमरावती)- अवैध वाळूचा ट्रक परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदाराच्या वाहनावर घातल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सातेफळ फाट्याजवळ घडली. यात तहसीलदार, चालक व एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून वाहनाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. धामणगावचे तहसीलदार अभिजित नाईक यांच्याकडे नुकताच चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला. शासकीय कामानिमित्त ते सोमवारी त्यांच्या शासकीय वाहनाने चांदूर रेल्वे येथे जात होते. सातेफळजवळ एक ट्रक...
  November 19, 09:12 PM
 • अमरावती - दरवर्षी दिवाळीच्या हंगामात खासगी बसवाहतूकदारांकडून प्रवाशांची मनमानी आर्थिक लूट केली जाते. त्यामुळे एप्रिल २०१८ मध्ये प्रवासी भाडे आकारणीबाबत खासगी बसेसला शासनाने मर्यादा घालून दिल्या होत्या. त्यानंतरही यंदाच्या दिवाळीत प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट वसूल करून खासगी बसवाहतूकदारांनी अापली दिवाळी साजरी केली. प्रवाशांची भरमसाठ लूट झाल्याची बाब प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) दिवाळीनंतर आठ दिवसांनी लक्षात आल्यावर त्यांनी कारवाई सुरू केली असून,शुक्रवारी...
  November 19, 04:05 PM
 • अमरावती - अमरावतीकरांना मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी शासनाने मंजूर केलेल्या ११४ कोटींपैकी ८३ कोटी रुपयांचे काम मजिप्राने आडके नामक कंत्राटदाराला दिले आहे. कंत्राटदाराने हे काम मुदतीत १० ऑक्टोबर २०१८ पर्यंत पूर्ण न केल्याने मजिप्राने पुन्हा अडीच महीने मुदतवाढ दिली. दरम्यान, मागील तीन महिन्यांतील कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी शनिवारी बैठक घेतली. मात्र या बैठकीत आमदारांनी अपूर्ण कामाबाबत विचारलेल्या कोणत्याही प्रश्नावर कंत्राटदाराचे प्रतिनिधी...
  November 19, 11:44 AM
 • अमरावती - वलगाव मार्गावरील नमक कारखान्याच्या मागील बाजूला असलेल्या असीर काॅलनीमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून चोरट्यांनी तिला ठार करून दोन अालमारी व तिजोरीमधून जवळपास २५० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि सुमारे ८३ हजार रुपयांची रोख लंपास केल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि. १८) दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नागपुरी गेट व गाडगेनगर ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.ताहेराबानो हाजी आदिल अहमद (६२, रा....
  November 19, 11:38 AM
 • अकोला - दुष्काळसदृश स्थितीची घोषणा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांसाठी दुष्काळी उपाययोजना सुरु केल्या आहेत. या उपाययोजनेचाच एक भाग म्हणून पाचही तालुक्यातील ५२ हजार ८०० विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक सत्रात मोफत एसटी प्रवास करता येणार आहे. ही सवलत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिक्षण घेण्यास जाणाऱ्या गाव-खेड्यांतील विद्यार्थ्यांसाठी आहे. हे सर्व विद्यार्थी जुलै २०१८ चे चालू शैक्षणिक सत्र सुरु झाल्यापासून दरमहा...
  November 19, 11:37 AM
 • नागपूर - उपराजधानी नागपुरात २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या अॅग्रो व्हिजन प्रदर्शनाच्या उद््घाटनासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांना बांबूच्या धाग्यांपासून निर्मित भगव्या कफनीचे दोन जोड भेट देणार आहेत. बांबू शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष असून भविष्यात बहुपयोगी बांबूपासूनच रोजगार मिळेल, असा ठाम विश्वास गडकरींना आहे. त्यामुळे पाहुण्यांना बांबूपासून निर्मित वस्तू देणे हा त्यांचा आवडता छंद आहे. ७० टक्के बांबूचे धागे व ३० टक्के...
  November 19, 08:36 AM
 • अमरावती - शहरातून अपहरण करून राजस्थानात युवतीची विक्री केल्या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये दोन महिला दलालांचाही समावेश आहे. शहरातील या युवतीची राजस्थानात दीड लाख रुपयात विक्री झाल्याचे अटकेतील आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान शुक्रवारी (दि. १६) रात्री अटक केलेल्या दोन्ही महिलांना न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रवीणकुमार न्यानलालजी सोनी (२६), शांती लाल न्यानमलजी सोनी (२७, दोघेही रा. सिरोई, राजस्थान), कुलदीप...
  November 18, 12:27 PM
 • अकोला - चौघांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपी तिघा बापलेकांना जिल्हा व सत्र न्यायाधीश(तिसरे) न्यायाधीश व्ही.डी. केदार यांनी विचारले, की या आरोपामध्ये फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे. फाशी किंवा जन्मठेपेच्या शिक्षेविषयी तुम्हाला काही बोलायचे आहे का? त्यावर आरोपी वडिलांनी हात जोडले तर दोन्ही भावांनी स्व हस्ताक्षरातील एक चिठ्ठी न्यायाधीशांना दिली. दोन्ही पक्षांचा शिक्षेवरील युक्तिवाद ऐकल्यानंतर या खटल्याची पुढील तारीख २० नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. याच दिवशी आरोपींना शिक्षा...
  November 18, 12:12 PM
 • अकाेला - अाज दीर्घकाळ राज्य करणे शक्य नसून, जनता सातत्याने पर्याय शाेधते. चंचलतेचे मूळ याच प्रक्रियेत अाहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अामदार जयंत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले. त्यानंतर तेथे उपस्थित नेत्यांमध्ये राजकीय वक्तव्याची जुगलबंदीच रंगली. निमित्त हाेते मराठा भूषण माजी अामदार (कै.) डाॅ. कुसुमताई काेरपे स्मृती शिल्प अनावरण साेहळ्याचे. लाेकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर विविध राजकीय पक्षांत मंथन सुरु असतानाच एका व्यासपीठावर भाजप, राष्ट्रवादी व कांॅग्रेसचे...
  November 18, 12:10 PM
 • नागपूर- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी जाणारे पर्यटक, जिप्सीचालक आणि गाईड्सना 1 डिसेंबरपासून मोबाइल फोन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन आर प्रवीण यांनी शुक्रवारी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यात वन विभागाने नमूद केले आहे की, व्याघ्र प्रकल्पात पर्यटक सफारी दरम्यान मोबाइल वा स्मार्टफोनच्या वापरामुळे वाघ आणि बिबट्याचे लोकेशन जगजाहीर होते. अनेक पर्यटक वाघांच्या लोकेशनच्या लिंक पाठवतात. त्यामुळे वाघांच्या जीवाला...
  November 17, 08:28 PM
 • बुलढाणा- सख्खा चुलत भाऊ पक्का वैरी निघाल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात घडली आहे. भानापूर परिसरातील एका शेतकर्याच्या शेतातील विहिरीत त्याच्या चुलत भावाने विष टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विहिरीतील पाणी वापरण्याआधी हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. परिसरात दुष्काळ असताना विहिरीतील पाणी विषारी केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. मिळालेली माहिती अशी की, सुलतानपूर येथील शेतकरी गजानन मारोती राजगुरू यांची भानापूर शिवारात शेती आहे. राजगुरु हे आपल्या...
  November 17, 03:32 PM
 • अकाेला- बाखराबाद येथील एका परिवारातील चाैघांच्या सामूहिक हत्याकांडात शिक्षेवर शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी हाेणार अाहे. याप्रकरणी न्यायालयाने १४ नाेव्हेंबर राेजी अाराेपी तिघा बापलेकांना दाेषी ठरवले हाेते. उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाखराबाद येथे १४ एप्रिल २०१४ राेजी २ एकर शेत जमिनीच्या वादातून चार नातेवाइकांचे हत्याकांड घडले हाेते. विश्वनाथ माळी, वनमाला माळी, याेगेश माळी व राजेश माळी हे मृत्युमुखी पडले हाेते. याप्रकरणी त्यांचेच नातेवाईक असलेले आरोपी...
  November 17, 12:17 PM
 • अकोला-प्लास्टिकच्या वापरावर बंदी असतानाही घडी पुस्तिकेला प्लास्टिकचे वेष्टन लावणाऱ्या कृषी आणि आरोग्य विभागाच्या प्रभारी प्रमुखांना सभेमध्येच दंड ठोठावण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनातील बैठकीत ही घटना घडली. प्लास्टिक बंदी लागू झाल्यापासून सरकारी कार्यालयात झालेली ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही यंत्रणांच्या प्रभारी प्रमुखांना भान राखण्याचा सल्ला या वेळी दिला....
  November 17, 12:12 PM
 
जाहिरात

RECOMMENDED