जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva

Vidarva

 • नागपूर- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडमधील कसनासूर गावात नक्षलवाद्यांनीतिघांची निर्घृण हत्या करून त्यांचे मृतदेह रस्त्यावर फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून हे हत्याकांड झाल्याचे बोलले जात आहे. मिळालली माहिती अशी की, मालू डोग्गे मडावी, कन्ना रैनू मडावी, लालसू कुडयेटी अशी हत्या झालेल्या तिघांची नावे आहेत. सोमवारी (ता.21) मध्यरात्री एकच्या सुमारास भामरागड तालुक्यातील कोसफुंडी फाट्याजवळ नक्षलवाद्यांनी तिघांची हत्या केली. हत्येनंतर त्यांचे मृतदेह...
  12:37 PM
 • अमरावती- शहरातील रतनगंजसारख्या गजबजलेल्या नागरीवस्तीत एकाने अवैध गॅस विक्री व अवैध रिफीलिंगसाठी घरातच मोठ्या प्रमाणात घरगुती व व्यावसायिक सिलिंडरचा साठा केला होता. या साठ्यावर गुन्हे शाखेने धाड टाकून भरलेले २३ आणि रिकामे ३४ असे एकूण ५७ सिलींडर जप्त केले आहेत. यावेळी पोलिसांनी अवैध विक्री करणाऱ्यासह त्याला पुरवठा करणाऱ्या एका ऑटोचालकालाही अटक केली आहे. ही कारवाई रविवारी झाली असून अटकेतील दोघांनाही सोमवारी न्ययायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. माहिती द्या,...
  12:10 PM
 • राळेगाव- तालुक्यातील सावरखेडा जंगल परिसरात वरध येथील एका ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची गळा आवळून हत्या करण्यात आली. ही घटना रविवार, २० जानेवारीला दुपारच्या सुमारास घडली असून आनंदराव खंडी वय ७५ रा. वरध ता. राळेगाव असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ही हत्या जादूटोण्यातून झाली असल्याचा आरोप नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, राळेगाव तालुक्यातील वरध येथील वृद्ध शेतकरी आनंदराव खंडी हे नेहमीप्रमाणे १९ जानेवारीला रात्री...
  12:04 PM
 • धारणी- मेळघाट वन व व्याघ्र प्रकल्पाच्या अरण्यातून वाघांसह अन्य वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे, तर त्यांची हत्या करण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. याबाबत वन्यजीवप्रेमींनी चिंता व्यक्त केली असतानाच अकोट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या कुसुंबी वर्तुळात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दीड वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झाल्यावर बिबट्या काही...
  12:01 PM
 • दारव्हा- वडिलोपार्जित असलेली शेतजमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून काकांनीच आपल्या १२ वर्षांच्या पुतण्याचे अपहरण केले. मात्र ही बाब लक्षात आलेल्या महिलांनी तातडीने केलेल्या पाठपुराव्यामुळे अवघ्या काही तासांतच अपहरणकर्त्यांना मुंडळ गावाजवळ नागरिकांनी ताब्यात घेतले. एखाद्या थ्रिलर सिनेमाच्या कथानकाप्रमाणे वाटणारा हा थरारक प्रकार सोमवार, २१ जानेवारी रोजी सकाळी शहरातील महेश कॉलनी परिसरात घडला. वल्लभ अरविंद कदम आणि श्रीपाद अरविंद कदम दोघेही रा. आरंभी व करण कांबळे रा. पुणे अशी...
  11:59 AM
 • अमरावती- सरकारी अनुदानासह मनपा फंडातून आधीच तब्बल ३० कोटी रुपये खर्च केल्या जात असताना शहराच्या स्वच्छतेसाठी आता नागरिकांकडून शुल्क वसूल केल्या जाणार आहे. प्रत्येेक घर ते प्रतिष्ठानांकडून ५० ते २५० रुपयांपर्यंत शुल्क तसेेच ओला व सुका कचरा वेगळा करुन न दिल्यास तब्बल ९ हजार रुपयांपर्यंत दंडाची आकारणी केली जाणार आहे. स्वच्छता व अारोग्य विभागाच्या घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम उपविधीला मनपाने मंजूरी दिली आहे. अस्वच्छतेचे झिंगाट करीत सत्तेत आलेल्या भाजप सरकारने स्वच्छता...
  11:57 AM
 • बुलडाणा- जळगाव खांदेशवरुन येणाऱ्या एसटी बसने आज २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास स्थानिक मलकापूररोड वरील गणेश नगर जवळ अचानक पेट घेतला. ही घटना लक्षात येताच चालक व वाहकाने प्रसंगावधान राखून प्रवाशांना तत्काळ बसमधून खाली उतरवले. यात सुदैवाने एसटी बस चालक, वाहकासह २८ प्रवाशी बालबाल बचावले. विशेष म्हणजे एसटी महामंडळाच्या वतीने ११ ते २५ जानेवारी या दरम्यान सुरक्षितता मोहिम राबवण्यात येत आहे. चिखली आगाराची एम.एच. ४०/ वाय / ५३४५ या क्रमांकाची बस जळगाव खांदेशवरुन परतीच्या मार्गाने...
  11:45 AM
 • चिखली - इंधन दरवाढ होत असताना मात्र प्रत्येक पेट्रोल पंपावर पंतप्रधान यांचा फोटो जाहिरात स्वरूपात लावलेला दिसतो. या फोटोला आज २१ जानेवारी रोजी चिखली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे फासून या इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक वातावरण बिघडविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे,अशी मागणी केली आहे. दररोज हळूहळू पेट्रोल व डिझेलचे दर वाढायला लागले. त्याचाच परिणाम म्हणून चिखली युवक कॉग्रेसकडून फलकावरील फोटोला काळे फासले. चिखली...
  11:44 AM
 • अकोला- अल्प पाऊस, कर्जमाफीच्या निकषांमुळे रब्बी कर्जाचे वाटप केवळ १४ कोटी ५६ लाखाच झाल्याची बाब पुढे आली असून, पेरणीही ६३ टक्केच झाली आहे. हेच वितरण गतवर्षी झाले होते ५७ कोटी ४५ लाख रुपये होते. याचा परिणाम शेतीवर झाला असून, यंदा केवळ ६३ टक्केच रब्बी हंगामातील पेरणी झाली आहे. रब्बी हंगामातील खातेदार शेतकरी संख्याही गतवर्षीच्या तुलनेने यंदा २२५५ ने घटली आहे. गतवर्षी कर्ज मिळालेल्या खातेदार शेतकऱ्यांची संख्या ३ हजार ८२३ तर यंदा हीच संख्या १ हजार ५६८पर्यंत पोहोचली आहे. निसर्गाचा लहरीपणा,...
  11:41 AM
 • अकोला- लग्नाचे आमिष दाखवून पोलिस उपनिरीक्षकाने (पीएसआय) महिलेचे शोषण केल्याचा प्रकार उजेडात आला असून, याप्रकरणी सोमवारी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पीएसआय हा वर्धा जिल्हयातील गिरड पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. वर्धा जिल्हयातील समुद्रपूर तालुक्यातील पोलिस ठाण्यात दीपक शालिग्राम निंबाळकर (३७) हा उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. निंबाळकर व अकोल्यात राहत असलेल्या एका घटस्फोटित महिलेशी ओळख झाली. मोबाइल फोनच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर ते दोघेही एकमेकांना...
  11:38 AM
 • अकोला- शहरातील सहा रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाच्या कामाबाबत जिल्हाधिकारी यांनी महापालिका आयुक्त पदाचा प्रभार असताना रस्त्याच्या कामाबाबत केवळ कंत्राटदारालाच दोषी ठरवले होते. तर अधिकाऱ्यांना क्लिन चिट देण्यात आली होती. कार्यवाहीच्या अहवालावर मंगळवारी होणाऱ्या सभेत चर्चा केली जाणार असून महासभेत तत्कालीन आयुक्तांसह शहर अभियंता यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती आहे. मनपाच्या इतिहासात प्रथमच आयुक्तांना दोषी ठरवण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याने या...
  11:36 AM
 • अकाेला -लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत वंचित बहुजन आघाडीने सहभागी व्हायचे की नाही, याबाबतची भूमिका आपण २३ जानेवारी राेजी जाहीर करू, अशी माहिती भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिव्य मराठीशी बाेलताना दिली. २०१९ च्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांना संधी देऊन काँग्रेसने २०२४ च्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही त्यांनी दिला काँग्रेसमध्ये दिलदारपणा नाही, कारण त्यांची कट्टरतावादी मते आम्हाला मिळत नाहीत, असा अनुभव आहे....
  11:13 AM
 • नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील खालच्या स्तरातील अनेकांना संघाविषयी पुरेसे ज्ञान नाही. हा स्तर अजूनही शाखेच्या कर्मकांडात अडकल्याने संघाची सांप्रदायिकतेकडे वाटचाल सुरू होते. आता संघाने हिंदुत्वाचा त्याग करीत हिंदुभावविश्वाचा स्वीकार करायला हवा, असे मत संघाचे माजी पदाधिकारी रामभाऊ तुपकरी यांनी दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केले. आरएसएस रिव्हॅल्यूड या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. या पार्श्वभूमीवर तुपकरींशी साधलेला संवाद... प्रश्न : संप्रदाय होण्याकडे संघाचा प्रवास सुरू...
  08:39 AM
 • नागपूर- बहिणीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याने भावाने तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही बहिणीच्या प्रियकराचा मृतदेह नाल्यात फेकला. ही घटना साकोली (जि.भंडारा) तालुक्यातील किही-एकोळी घडली अाहे. आरोपीने या कामात आई-वडिलांची मदत घेतली. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. अनिकेत बडोले (वय 22 वर्ष) असे मृत मुलाचे नाव आहे. अनिकेतचे गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. 18 जानेवारी रोजी अनिकेत मुलीसह तिच्याच घरी आक्षेपार्ह अवस्थेत सापडला...
  January 21, 05:52 PM
 • नागपूर- जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाला रोखण्याचा प्रयत्न करीत असलेल्या पोलिस पथकातील शिपायाला वाहनाखाली चिरडून ठार केल्याची आणखी एक घटना रविवारी रात्री चंद्रपूर जिल्ह्यात खंबाडा गावाजवळ घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तस्करांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलिस शिपायाचे नाव प्रकाश मेश्राम असे होते. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू असल्याने वाहनांच्या तपासणीसाठी ठिकठिकाणी पोलिस पथके तैनात केली जातात. मात्र, या वेळी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून...
  January 21, 05:35 PM
 • यवतमाळ- राज्यातील दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातील अस्तित्व फाउंडेशनच्या माध्यमातून कपडे पाठवण्यात आले होते. हा उपक्रम मागील तीन वर्षांपासून नित्यनियमाने संघटनेच्या माध्यमातून केल्या जात आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कपडे पाठवण्यात येतात. यंदासुद्धा हा उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून मराठवाड्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिकांसह पिण्यासाठीही...
  January 21, 02:22 PM
 • अमरावती- निसर्गाचा लहरीपणा, खडकाळ व मातीपेक्षा दगडंच जास्त अशी जमीन त्यामुळे लागवडीचा खर्चही पारंपरिक पिकांच्या उत्पादनातून वसूल होईना. मात्र शेतीशिवाय तर दुसरा पर्याय नाही, म्हणून बडनेरात राहणाऱ्या व टिमटाळा येथे शेती असलेल्या एका शेतकऱ्याने थेट खजुराची शेती करण्याचा अफलातून निर्णय घेतला. हा निर्णयच त्या शेतकऱ्याने घेतला नाही तर तीन वर्षांपूर्वी गुजरातमधून खजुराचे रोपटे आणले आणि खडकाळ जमिनीत खजुराची बाग फुलवली. विशेष म्हणजे तीन वर्षांत या बागेतील एकाही झाडावर या शेतकऱ्याने...
  January 21, 02:18 PM
 • खामगाव- एसटी बस, रेल्वेमधून प्रवास करताना दिसणारा केरकचरा, घाण साफ करण्याचे काम अभियंता असलेला माणूस गेल्या काही दिवसांपासून करत आहे. त्यांची प्रत्यक्ष कृती पाहून अनेकांमध्ये स्वत:हून बदल होत आहे. त्यांचा हा उपक्रम सर्व सामान्य प्रवाशांना प्रेरणादायी ठरत असल्यामुळे बहुतांश प्रवासी आता कचरा पेटीचा वापर करायला लागले आहेत. खामगाव पंचायत समितीमध्ये अभियंता असलेले शंकर घाटोळ यांनी कोणत्याही प्रकारचा कमीपणा न बाळगता एसटी बस, रेल्वेचा डबा ही सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्याचा चंग बांधलेला...
  January 21, 02:14 PM
 • अकोला- थॅलेसेमिया या आजाराने २३ वर्षापूर्वी मुलाचा मृत्यू झाला. तेव्हापासूनच कुणाचेही मूल या आजाराचे बळी ठरू नये, म्हणून ज्येष्ठ व्यावसायिक, भाजपचे नगरसेवक हरीश आलिमचंदानी यांनी खूणगाठ बांधून थॅलेसेमियाग्रस्तांसाठी काम सुरु केले. बसस्थानकाजवळ डे केअर सेंटरची स्थापना केली. या डेकेअर सेंटरमध्ये ५३ रुग्ण उपचार घेताहेत. त्यात पाच वर्षातील २४ बालकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २० रुग्णांवर बोनमेरो करून त्यांना जीवदान दिले . यासाठी हरीश आलिमचंदानी यांनी लाखोंच्या खर्चाचा भार सामाजिक...
  January 21, 02:10 PM
 • यवतमाळ- पोलिस लॉकअपमध्ये असलेल्या आरोपीस घरून आणलेला डब्बा देण्याच्या कारणावरून झालेल्या वादात पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी एकमेकांवर चक्क सर्व्हिस रिव्हॉल्व्हर ताणल्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे यावेळी पोलिस ठाण्यात उपस्थित कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती. त्यानंतर मध्यस्थी करुन कर्मचाऱ्यांनी ते प्रकरण शांत केले. मात्र पोलिस ठाण्यात चक्क अधिकाऱ्यांनी एकमेकांशी वाद करुन रिव्हॉल्व्हर ताणल्याच्या या घटनेची खमंग चर्चा आता शहरात सुरू झाली आहे. या प्रकरणात सुरू...
  January 21, 12:56 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात