जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva

Vidarva

 • नागपूर -गळफास कसा घेतला जातो याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर पाहून त्याचे घरात अनुकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १२ वर्षीय बालिकेला प्राण गमवावे लागल्याची घटना शनिवारी नागपुरात उघडकीस आली. उत्तर प्रदेशातून नागपुरात स्थायिक झालेले राठोड कुटुंबीय केसापुरी परिसरात राहतात. व्यवसायाच्या निमित्ताने विनोद राठोड शनिवारी बाहेर गेले होते. त्यांचा मोबाइल मुलगी शिखाजवळ होता. यूट्यूबवर ती सातत्याने दोन मुलींनी कसा गळफास घेतला ते पाहत होती. ती क्लिप तिने आपल्या आईलाही दाखवली होती. दरम्यान, आई व...
  July 1, 07:30 AM
 • अमरावती -मेळघातील लाकूड विघटन करणाऱ्या बुरशीचा उपयाेग करून आदिवासींच्या कुपोषणावर मात करण्यासाठी कमी खर्चात उपलब्ध हाेऊ शकणाऱ्या औषधाच्या निर्मितीवर संशोधन करत असलेल्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या मुकुंद फिस्के याने गुजरातेत पार पडलेल्या राष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सवात देशातील ७८० विद्यापीठांमधून द्वितीय क्रमांक पटाकावला. पावसाळ्यात सर्वत्र लाकडावर छत्रीच्या आकाराची बुरशी आढळून येते. मेळघाटात तिचे प्रमाण सर्वाधिक आढळते. मेळघाटातील आदिवासींना पुरेसा व सकस...
  July 1, 07:23 AM
 • बुलडाणा -शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या एक अठरा वर्षीय युवकावर तसेच जनावरांना चारा पाणी करणाऱ्या एका पासष्ट वर्षीय वृध्दावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना २७ जून राेजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील घुटी शिवारात घडली आहे. या घटनेमुळे शेतकरी व मजुरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.  येथून काही अंतरावर असलेल्या उटी येथील दत्ता मधुकर आमले वय १८ हा युवक आज दुपारच्या सुमारास घुटी शिवारात बकऱ्या चारत होता. एवढ्यात दबा धरून...
  June 30, 05:28 PM
 • खामगाव - गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी पाहत असताना अचानक विहिरीजवळील माती खचल्याने चार विद्यार्थी दाबले गेले. मात्र, वेळीच गावकऱ्यांनी धाव घेतल्याने तिघांना बाहेर काढण्यात यश आले, तर एका विद्यार्थ्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी खामगाव तालुक्यातील पोरज येथे घडली. यशवंत प्रमोद हेरोडे(१२) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी दिवसभर नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने ही मोहीम अखेर यशस्वी झाली....
  June 30, 09:34 AM
 • अकोला - पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यात शेतात पेरणी करताना वीज कोसळून चार शेतकऱ्यांसह पाच जण ठार झाले. यात बुलडाणा जिल्ह्यातील वरवट खंडेराव (ता. संग्रामपूर) येथील दोन तर यवतमाळ जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. शनिवारी वरवट खंडेराव येथे श्रीकृष्ण कांशीराम ढभाळ (६९) शेतात पेरणी करत असताना वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, जस्तगाव येथील युवराज विश्वास गव्हांदे (वय ३५)...
  June 30, 08:59 AM
 • नागपूर- नागपूर विद्यापीठातून अजब प्रकार समोर आला आहे. विद्यापीठातील 3 प्राध्यपकांनी 2 दिवसांत 1.5 लाख रुपयांच्या चहा-नाश्ता केला. विद्यापीठीत बोर्ड ऑफ स्टडीजच्या बैठकीदरम्यान हे चकित करणारे प्रकरण समोर आले आहे. बिलानुसार, दोन दिवसांत प्राध्यपकांनी नाश्त्याशिवाय 99 कप चहा आणि 25 कप कॉफी पिली. बैठकीचे हे बिल पास करण्यासाठी विद्यापीठाच्या अकाउंट विभागाकडे पाठवण्यात आले. विभागाने रक्कम पाहून बिल पास करण्यास नकार दिला. त्यानंतर बिलालाल व्हॉइस चांसलरकडे पाठवण्यात आले. त्यांनी बिल पाहून...
  June 28, 06:16 PM
 • नागपूर : अभिनेता आयुषमान खुराणाचा बहुप्रतिक्षित चित्रपट आर्टिकल 15(Article 15) शुक्रवारी 28 जुलै रोजी नुकताच प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाला नागपुरात प्रदर्शनादरम्यान ब्राह्मण आणि करणी सेनेनी विरोध केला आहे. शहरातील अनेक ठिकाणी ब्राह्मण आणि करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहात घुसून चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मात्र खबरदारी घेत हा प्रयत्न हाणून पाडला. संघटनांकडून देण्यात आला होता इशारा अनुभव सिन्हा दिग्दर्शित आर्टिकल 15 चित्रपटाला प्रदर्शनाआधीपासून करनी सेना...
  June 28, 02:47 PM
 • नागपूर -मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेला निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा नसून या निर्णयाला निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल. सर्वोच्च न्यायालयात हा निर्णय टिकण्याची शक्यता कमी आहे, असे मत राज्यातील कायदेतज्ञांनी व्यक्त केले आहे, तर मराठा आरक्षणाविराेधात याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीही हा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचे सांगत सर्वाेच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयाचे सर्वच...
  June 28, 10:16 AM
 • नवी दिल्ली/नागपूर -वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मराठा आरक्षण लागू करण्यासाठी राज्य शासनाने काढलेला अध्यादेश आणि त्यानंतर विधिमंडळात त्याच्या कायद्यातील रूपांतर करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून या वादाला तूर्तास तरी पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतील आरक्षणाचा वाद मागील तीन महिन्यांपासून सुरू होता. सुरुवातीला...
  June 25, 11:57 AM
 • मेहकर -नागपूर येथून मुलीची भेट घेऊन औरंगाबादकडे येणाऱ्या क्षीरसागर कुटुंबाच्या जीपला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकासह चौघे ठार झाले. यात दोन महिलांचा समावेश आहे. शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास नागपूर-औरंगाबाद महामार्गावर अंजनी बुद्रुक फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. मूळ कन्नड येथील मनोहर क्षीरसागर औरंगाबादला स्थायिक आहेत. तीन दिवसांपूर्वी ते कुटुंबासह बोलेरो गाडीने विवाहित लहान मुलीला भेटण्यासाठी नागपूरला गेले होते. शनिवारी दुपारी ते परत निघाले. रात्री...
  June 24, 09:01 AM
 • राज्य सरकारने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा समाजाला ईबीसी श्रेणी तयार करून आरक्षण देण्याचा निर्णय गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर रोजी घेतला होता. त्यासाठी अध्यादेशही काढला. याचे विधेयकात रुपांतर करणे आवश्यक असल्याने गुरुवारी हे विधेयक मंजूर करण्यात आले. विधेयक मंजूर झाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि...
  June 21, 08:24 AM
 • हेल्थ डेस्क- आंतराष्ट्रीय योगा दिवस 2019 यावेळी 21 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. संपूर्ण देशातील लोक फिट राहण्यासाठी योगाता अभ्यास करताना दिसत आहेत. यात नागपूरही कमी नाहीये. जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद असलेल्या नागपूरच्या ज्योती आमगे या महिलेने उद्याच्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने गुरुवारी नागपुरात आंतराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे हिच्यासह योगासने करून योग संदेश दिला. योगा का करावा ? प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनाचे ध्येय आणि ते कसे...
  June 20, 04:36 PM
 • नागपूर - राज्यात भंडारा आणि धुळे जिल्ह्यात घडलेल्या अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ९ महिलांचे प्राण गेले आहेत, तर ८ जण गंभीररीत्या जखमी आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली-लाखांदूर मार्गावर कुंभली गावाजवळ भरधाव काळीपिवळी टॅक्सी चुलबंद नदीत कोसळल्याने ६ महाविद्यालयीन युवती ठार आणि ३ प्रवासी गंभीर जखमी झाले, तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात कंटेनरने रिक्षाला उडवल्याने ३ महिला ठार, तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. साकोलीवरून प्रवासी घेऊन येणारी काळीपिवळी टॅक्सी अनियंत्रित होऊन...
  June 19, 09:34 AM
 • अमरावती- लोकसभेच्या निवडणुकीत पैसे घेऊन भाजपला मतदान केल्याचा आरोप करत, पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच पदाधिकाऱ्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचे समोर आले आहे. अमरावतीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी संदीप ताजने यांच्यासह अन्य नेत्यांना कार्यकर्त्यांनी लाथा-बुक्क्यांसह खुर्च्या फेकून मारहाण केली. बुहजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी संदीप ताजणे, राष्ट्रीय महासचिव सुरेश रैना, कृष्णा बेले प्रदेश महासचिव, प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार...
  June 17, 06:42 PM
 • नागपूर- सध्या सोशल मीडियाचा अतिवापर जीवघेणा ठरत असल्याचे दिसून येत आहे. या सोशल मीडियाने नागपूरात एकाचा बळी घेतला आहे. नागपूरच्या काटोलमध्ये चालत्या गाडीत फेसबूक लाईव्ह करताना अपघात होऊन 2 भावांचा मृत्यू झाला, तर अन्य 7 जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे अपघातानंतही फेसबूक लाईव्ह काही काळ सुरूच होते. हा अपघात 16 जून रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरात झाला. पुंकेश पाटील कार चालवत होता, तर त्याचा भाऊ संकेत पाटील मोबाईलवरून फेसबूक लाईव्ह करत होता. चालत्या कारमध्ये फेसबूक लाईव्ह करत...
  June 17, 04:18 PM
 • वर्धा- येथील आर्वीमधल्या गुरुनानक धर्मशाळेजळील जोगणामाता मंदिर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. 7 वर्षांच्या चिमुकल्याला कडक उन्हाने तापलेल्या फरशीवर बळजबरीने बसवले, यात त्याचा पार्श्वभाला दुखापत होऊनत्वचाजळाली आहे. सध्या त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. चिमुकला दानपेटीतील पैसे चोरत असल्याच्या आरोपावरुन आरोपी अमोल ढोरेने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. आर्वीतील गुरुनानक चौकात जोगणामाता मंदिरात चिमुकला शनिवारी दुपारी 11 वाजताच्या सुमारास खेळायला गेला...
  June 17, 12:46 PM
 • नागपूर -विधानसभा निवडणुकीला चार महिने बाकी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याच पक्षाच्या सहा मंत्र्यांना डच्चू देऊन अधिवेशनाच्या तोंडावर आक्रमक विरोधकांच्या भात्यातील हवाच काढून घेतली. पक्षश्रेष्ठींच्या मर्जीतील असूनही प्रकाश मेहता या कॅबिनेट मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आराेपामुळे पद गमवावे लागले. तर राजकुमार बडाेले, विष्णू सावरा या ज्येष्ठ मंत्र्यांना अकार्यक्षमता भाेवली, असाच निष्कर्ष राजकीय वर्तुळातून काढला जात आहे. यापूर्वी...
  June 17, 09:44 AM
 • नागपूर -लोकसभा निवडणुकीचा शिमगा संपला तरी त्याचे कवित्व सुरूच आहे. सत्तेच्या मोहापायी नेमकी काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचे चित्र सध्या पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळत आहे. सरकारचे नेतृत्व करणाऱ्या लोकांकडून अत्यंत अभद्र भाषेचा वापर होत असून सत्तेचा माज करणाऱ्यांना जनता धडा शिकवत असते, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरात बोलताना केली. संघाच्या अ. भा. वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमात भागवत बोलत होते. मागील निवडणुकीत निवडून आलेल्या...
  June 17, 09:38 AM
 • मोर्शी (अमरावती) - मोर्शी चांदूरबाजार रस्त्यावर शनिवारी सकाळी श्रीराम ट्रॅव्हेल्सच्या प्रवाशी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून जवळपास 40 प्रवाशी जखमी आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास अंजनगाव वरून पांढुर्णा येथे मोर्शीमार्गे ही बस जात होती. बस क्र.MH 27 BF 501 माधापुरी शिवारात वळणदार रस्त्यावर अचानक उलटली. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या...
  June 15, 05:37 PM
 • नागपूर -वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मराठा आरक्षण लागू करण्यासाठी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी फेटाळली. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आरक्षण लागू करण्यात आल्याने ते या वर्षी लागू करण्यात येणार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. राज्य सरकारने...
  June 14, 08:53 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात