जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva

Vidarva

 • नागपूर -लोकसभा निवडणुकीचा शिमगा संपला तरी त्याचे कवित्व सुरूच आहे. सत्तेच्या मोहापायी नेमकी काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचे चित्र सध्या पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळत आहे. सरकारचे नेतृत्व करणाऱ्या लोकांकडून अत्यंत अभद्र भाषेचा वापर होत असून सत्तेचा माज करणाऱ्यांना जनता धडा शिकवत असते, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरात बोलताना केली. संघाच्या अ. भा. वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमात भागवत बोलत होते. मागील निवडणुकीत निवडून आलेल्या...
  June 17, 09:38 AM
 • मोर्शी (अमरावती) - मोर्शी चांदूरबाजार रस्त्यावर शनिवारी सकाळी श्रीराम ट्रॅव्हेल्सच्या प्रवाशी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून जवळपास 40 प्रवाशी जखमी आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास अंजनगाव वरून पांढुर्णा येथे मोर्शीमार्गे ही बस जात होती. बस क्र.MH 27 BF 501 माधापुरी शिवारात वळणदार रस्त्यावर अचानक उलटली. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या...
  June 15, 05:37 PM
 • नागपूर -वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मराठा आरक्षण लागू करण्यासाठी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी फेटाळली. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आरक्षण लागू करण्यात आल्याने ते या वर्षी लागू करण्यात येणार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. राज्य सरकारने...
  June 14, 08:53 AM
 • नागपूर - नक्षलवादी चळवळीतील मोस्ट वाँटेड दांपत्य नर्मदाक्का आणि किरणकुमार यांना मंगळवारी अटक करण्यात आल्याची अधिकृत घोषणा गडचिरोली पोलिसांकडून पत्रपरिषदेतून करण्यात आली. या दांपत्याचा ७ दिवसांचा पोलिस कोठडी रिमांड घेण्यात आला असून १ मे रोजी महाराष्ट्रदिनी गडचिरोली जिल्ह्यात जांभूरखेडा येथील नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटाच्या घटनेची योजना नर्मदाक्का आणि किरणकुमार या दोघांनी आखली होती, असा दावा गडचिरोली पोलिसांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत...
  June 13, 09:36 AM
 • चंद्रपूर- क्रिकेट विश्वात वाघ अशी ओळख असलेला वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार ब्रायन लारा सध्या सहकुटुंब चंद्रपूरमध्ये आला आहे. तिकडे इंग्लंडमध्ये वर्ल्डकपची धामधूम सुरू आहे, पण लारा चंद्रपुरमध्ये कशाला आला प्रश्न अनेकांना पडला असेल. तर झाले असे की, लारा चंद्रपुरातील ताडोब अभयारण्य पाहायला आला आहे. लाराला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची भुरळ लागली आहे. वाघ पाहण्यासाठी लारा कालपासून ताडोबात आला आहे. तो मंगळवारी इथे आला असून, एका खासगी रिसॉर्टमध्ये मुक्कामी आहे. गुरुवारी तो मोहुर्ली...
  June 12, 06:18 PM
 • नागपूर -तलाव बांधून झाला, विहीर खोदून झाली, बोअरवेलही मारून झाली. तरीही पाणी काही लागले नाही. कारण भूगर्भातच पाणी नाही तर ते भूतलावर कसे येणार? कारण बेसुमार उपशामुळे भूगर्भातील पाणीसाठा संपुष्टात येतोय. ही पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे वा ते साठवून वापरणे हा एकमेव उपाय आहे. त्यासाठीच वर्धा येथील वैद्यकीय जनजागृती मंचाने भूजल मॉइस्ट सॉइल यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे छतावरून वाहून जाणारे पावसाचे थेंब अन् थेंब पाणी अंगणातील टाकीत साठवणे सोपे झाले आहे. िवदर्भात...
  June 10, 09:01 AM
 • नागपूर -चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. ५ दिवसांपूर्वीच आईच्या कुशीतून बाळाला नेऊन ठार केल्यानंतर आता एका वृद्धेला घरातून फरपटत नेत मारून टाकल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४ वाजता घडली. गयाबाई पैकू हटकर (६५, गडबोरी, ता. सिंदेवाही) असे मृताचे नाव आहे. गयाबाई अंगणात झोपलेल्या असताना बिबट्या झोपडीत शिरला. बिबट्याने अंगणात खाटेवर झोपलेल्या गयाबाईंना फरपटत नेले. प्रतिकाराची अंगात ताकद नसल्याने गयाबाई बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव वाचवू शकल्या नाहीत. गावकऱ्यांच्या...
  June 8, 11:44 AM
 • अमरावती -शासकीय कार्यालयांमध्ये खेटे घातल्याशिवाय काम होतच नाही, हा नेहमीचाच अनुभव. अनेकदा कर्मचारी, अधिकारी जेवायला गेले अाहेत, नंतर किंवा उद्या या... अशीही बोळवण केली जाते. दीड-दोन तासांनंतरही संबंधित अधिकारी जागेवर आल्याचा दिसत नाही. यामुळे अनेक वैतागलेल्या सर्वसामान्यांनी मायबाप शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. अखेर त्यावर राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. शासनाने शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भोजनवेळ निश्चित करण्यासाठी आदेश काढला आहे. यामुळे आता दुपारच्या...
  June 8, 09:44 AM
 • अकोट -भरउन्हात कचरा वेचता वेचता १२ वर्षीय मुलगा अाडाेशाला उभ्या असलेल्या नादुरुस्त कारमध्ये जाऊन बसला. उत्सुकतेपाेटी ताे गाडी न्याहाळत असतानाच कारचे दरवाजे लाॅक झाले. क्षणभर काहीच समजले नाही. मात्र बराच वेळ प्रयत्न करूनही दार न उघडल्याने त्याने मदतीसाठी हाकाही मारल्या. अाजूबाजूला काेणीच नसल्याने त्याच्या मदतीला काेणीही अाले नाही. काही वेळाने श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी अकाेट तालुक्यातील देवरी फाट्यापासून जवळच असलेल्या अालेवाडी येथे ही घटना घडली. सायंकाळी या घटनेचा...
  June 6, 10:18 AM
 • अकोला - मनसेने स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे, कारण या पक्षाला आता सुवर्णसंधी आहे. शिवसेनेचे खासदार जरी निवडून आले असले, तरी हा पक्ष कोमात आहे. युतीचा १३५-१३५ व भाजपचे मित्रपक्ष १८ असा फॉर्म्युला ठरला असला तरी मनसेला भाजप व मित्रपक्षांच्या १५३ जागांवर स्कोप आहे. त्यांनी ही सुवर्णसंधी गमावू नये, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे १० व काँग्रेसचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला....
  June 5, 09:54 AM
 • अकोला - राज्यात सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले असताना भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीला दणका दिला. राष्ट्रवादीचे 10 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा आंबेडकरांनी केला आहे. यासोबतच, पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत उतरून मोठ-मोठ्या राजकीय पक्षांना हादरवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला मुस्लिम मते मिळाली नाहीत. औरंगाबाद वगळता वंचित आघाडीला मुस्लिमांचे समर्थन मिळाले नाही अशी खंत देखील दलित नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. पत्रकार...
  June 4, 04:17 PM
 • नागपूर -उन्हाळ्याच्या गरमीमुळे घराचे दार उघडे ठेवून झोपलेल्या आईच्या कुशीतून ९ महिन्याच्या बाळाला बिबट्याने ओढून नेत ठार केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोडबोरी या गावामध्ये घडली. रविवारी पहाटेचा तीन ते साडेतीनचा सुमार. झोपडीवजा घरात जमिनीवर महानंदा तिच्या ९ महिन्यांच्या बाळासह झोपली होती. बिबट्याने चिमुकल्या स्वराजला जबड्यांमध्ये पकडले व तो झोपडीबाहेर पडला. खडबडून जाग्या झालेल्या महानंदाने बिबट्याचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत बिबट्या बाळाला...
  June 3, 10:03 AM
 • नागपूर - ड्राय डे बाबत संपूर्ण राज्यासाठी एकत्रित धोरण आणण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न असून त्यात ड्राय डेचे दिवस कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्यात उत्सव व सण विचारात घेऊन ड्राय डे निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. मात्र, आता संपूर्ण राज्यासाठीच एकत्रित ड्राय डे चे दिवस निश्चित करण्यात येत आहे. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती...
  June 2, 09:13 AM
 • नागपूर - परिवहन खाते कायम राहताना इतर खाती बदलली गेल्याने मी कुठेही नाराज नाही. देशाची आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक असून देशाचा जीडीपी आणि रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आपल्याकडे अत्यंत महत्त्वाच्या मध्यम व लघु उद्योग खात्याची जबाबदारी सोपविली असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरात बोलताना व्यक्त केले. केंद्रात पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर प्रथमच नागपुरात दाखल झालेल्या गडकरी यांचे शनिवारी विमानतळावर जोरदार स्वागत...
  June 2, 09:06 AM
 • नागपूर - येथे गो एअर विमान कंपनीच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मुलाचा मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. मुलाकडून त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करवून घेते होते यामुळे तो नेहमी तणावात राहत असल्याचे मुलाच्या वडिलांनी सांगितले. मंथन चव्हाण असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. मंथन नागपूरच्या चंद्रमा नगरात राहत होता. तो सोनेगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गो एअर विमान कंपनीत कमांडिंग...
  June 1, 04:50 PM
 • नागपूर-महाराष्ट्रात वाघांची संख्या २० टक्क्यांनी वाढली असल्याचे २०१८ मध्ये पार पाडण्यात आलेल्या गणनेतून स्पष्ट होत आहे. येत्या काही दिवसांत भारतीय वन्यजीव संस्थान या केंद्रीय संस्थेकडून गणनेची अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. २०१८ मध्ये देशव्यापी व्याघ्र गणनेची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. त्यानंतर वाघांचे अस्तित्व असलेल्या सर्व राज्यांनी डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थानकडे व्याघ्र गणनेचा अहवाल सोपवला आहे. वाघांची नेमकी संख्या जाणून घेण्यासाठी वन्यजीव...
  May 31, 08:32 AM
 • नागपूर -पाकिस्तानच्या बालाकोटवरील एअर स्ट्राइकनंतर भारतीय हद्दीत विमाने पाठवून बॉम्ब टाकणाऱ्या पाकिस्तानला मोठा धडा शिकवण्याची सुवर्णसंधी भारताला पूर्ण क्षमतेचे युद्ध लढण्याची तयारी नसल्याने गमावावी लागली, असे धक्कादायक मत मेजर जनरल जी. डी. बक्षी (सेवानिवृत्त) यांनी दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केले. चीन आणि पाकिस्तानकडून वाढता धोका लक्षात घेता अत्याधुनिक शस्त्रसामग्रीची खरेदी आणि विकासासाठी मोदी सरकारने वेगाने पावले उचलायला हवीत, असा इशारा जनरल बक्षींनी दिला आहे. ते पुढे...
  May 30, 09:00 AM
 • वर्धा : स्पर्धा वाढल्यामुळे विद्यार्थी टक्केवारीच्या मागे धावत आहेत. टक्केवारीच्या मागे धावताना ते आपल्या जिवाचाही विचार करत नाहीत. त्यात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले तर टोकाची पावले उचलतात. वर्ध्यातील अडेगाव येथे असाच काहीसा प्रकार घडला आहे. बारावीच्या परिक्षेत आपल्या मुलीने मिळवलेल्या गुणांबाबत पालक खुश होते. मनासारखे गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीने आपले जीवन संपवले. पूजा विजय भिसे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. राहत्या घरी गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा पूजा जनता वरिष्ठ...
  May 29, 05:53 PM
 • नागपूर - राज्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सूर्य अक्षरश: आग ओकतो आहे. मंगळवारी चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ४७.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. राज्यात २ जूनपर्यंत उष्णतेची लाट राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. चंद्रपूर येथे सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. यापूर्वी २९ मे २०१८ रोजी ४८ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले होते. नागपूर येथे यापूर्वी २३ मे २०१३ रोजी ४७.९ म्हणजेच अंश असे सर्वाधिक तापमान...
  May 29, 09:18 AM
 • नागपूर -वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मराठा आरक्षण लागू करण्यासाठी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले असून सोमवारी न्यायालयाने राज्याचे महाअधिवक्ता, राज्य सरकार आणि सीईटी सेलला नोटीस बजावत १० जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना याच वर्षी मराठा आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून हा वाद सुरु आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया...
  May 28, 10:22 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात