जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva

Vidarva

 • नागपूर - निवडणुकांसाठी आम्हाला कोणतीही यात्रा काढायची गरज नाही. आम्ही लोकसभेच्या वेळेसच जमिनीची मशागत करून ठेवली आहे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता रवी भवन येथे पत्रकारांशी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ आॅगस्ट रोजी महाजनादेश यात्रा काढत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता ते बोलत होते. यात्रेशिवाय आम्ही निवडणुका जिंकू शकतो, असे ते म्हणाले. आयडियालॉजीचे...
  July 27, 09:20 AM
 • अकोला - तंत्रशिक्षणाला कल्पनेची जोड नि नवनिर्मितीची हौस असली की हात रिकामे राहत नाहीत. हेच अकोला तालुक्यातील आखतवाडा येथील आयटीआय झालेल्या युवकांनी दाखवून दिले आहे. टाकाऊ स्कूटरचे पार्ट वापरून या युवकांनी डवरणी यंत्र तयार केले आहे. एक लिटर पेट्रोल मध्ये तासभर चालणारे हे डवरणी यंत्र सफाईदार आंतरमशागत करीत असल्याने हे यंत्र सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. सचिन दुर्गे, युवराज भोपसे आणि विशाल इंगोले हे आखतवाडा गावातील थ्री इडियट्स. गावातील विजय तालोट यांच्या शेतात असलेला गोडाऊनला...
  July 26, 10:51 AM
 • नागपूर - जुलै महिना संपत आला तरी मराठवाडा व विदर्भात सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नाही. चक्क उन्हाळ्यासारखे कडक ऊन जाणवते आहे. अनेक भागात पाणीटंचाईचे संकट असून दुबार पेरणीमुळे शेतकरीही चिंताग्रस्त झाला आहे. पर्यावरणाचा सीएनपी रेशो नियंत्रणाबाहेर गेल्यामुळेच ही परिस्थिती आेढवल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. आता प्रदेशनिहाय एन्व्हायर्नमेंटल हेल्थ कार्ड तयार करणे हाच त्यावर एकमेव उपाय आहे, अशी माहिती राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेचे (नीरी) मुख्य अभियंता तसेच क्लायमेट...
  July 26, 07:28 AM
 • नागपूर - सलूनचालकाने न विचारताच मिशा भादरल्याचे नागपूर जिल्ह्यातील प्रकरण शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट हे प्रकरण चिघळते आहे. या प्रकरणात ग्राहकाच्या तक्रारीवरून सलूनचालकावर गुन्हा दाखल झाल्याने संतापलेल्या नाभिक संघटनेने या वादात उडी घेत तक्रारकर्ता ग्राहक किरण ठाकूर याच्यावर बहिष्कार घालण्याचा, त्याच्या दाढी-मिशा न भादरण्याचा निर्णय जाहीर घेतला आहे. नागपूर ग्रामीणमध्ये कन्हान येथे मागील आठवड्यात ही घटना घडली होती. दाढी करण्यासाठी कन्हान येथील फ्रेंड्स जेन्ट्स...
  July 22, 10:53 AM
 • नागपूर -आम्हाला आमचे आई-वडील अत्यंत प्रिय आहेत. त्यांना तंबाखूजन्य पदार्थ, खर्रा हे विष देऊन आमच्यापासून हिरावू नका. कृपया हे विषारी पदार्थ विकणे बंद करा.. या आशयाचे पत्र घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील चिमुकली मुले शाळा सुटल्यावर पानठेल्यावर जातात.. पत्रासोबत एक गुलाबाचे फूल देऊन तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचे आवाहन ते करतात. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात व्यसनमुक्तीचा मुक्तिपथ हा उपक्रम राबवला जात आहे. यात आता व्यसनमुक्तीसाठी शाळकरी मुलांची मदत...
  July 22, 08:58 AM
 • बिबी-भरधाव जाणाऱ्या ट्रक व कारची समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कारमधील राजस्थानचे दोन जण ठार झाले आहेत. ही घटना नागपूर-जालना महामार्गावरील बिबी येथून जवळच असलेल्या जांभळीच्या नाल्याजवळ खापरखेड घुले शिवारात शुक्रवार १९ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. नागपूर-जालना महामार्गावरील जांभळीच्या नाल्याजवळ एम एच ३८ - डी ०६६४ या क्रमांकाचा ट्रक व आरजे १४ - एसी ४५५८ या क्रमांकाच्या कारची समोरासमोर धडक होऊन मारुती स्विफ्टमधील राजस्थानच्या नागोर जिल्ह्यातील...
  July 21, 10:06 AM
 • अकोला-१५ जुलै रोजी शिल्पाचा विवाह मंगेश सोबत झाला. चौथ्या दिवशी ती सुखी संसाराची स्वप्ने उराशी घेवून सासरी शिवणी येथे नांदायला आली. तोच शनिवारी सकाळी रेल्वे पटरीवर हातपाय तुटलेल्या रक्तबंबाळ अवस्थेत शिल्पा दिसून आली. सध्या शिल्पा मृत्यूशी झुंज देत असून, तिच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ब्रम्ही येथील अजाबराव ढोके यांची मुलगी शिल्पाचा विवाह मंगेश तेलगोटे रा. शिवणी याच्यासोबत १५ जुलै रोजी रीतिरिवाजाप्रमाणे झाला. १९ जुलै रोजी तिला सासरी पाठवण्यात आले. शनिवारी सकाळी...
  July 21, 10:00 AM
 • बोरगाव मंजू- वृद्धापकाळात मुलाचा कोणताही आधार नसल्याने वृद्ध दाम्पत्यांना श्रावणबाळ योजनेतून दरमहा रक्कम मिळत होती. या रकमेवर नशेखोर मुलाचा डोळा होता. त्याने दारू पिण्यासाठी बापाला पैसे मागितले; मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने खाटेवर गाढ झोपेत असलेल्या वृद्ध बापावर मुलाने सबलीने वार करून ठार केले व मृतदेह फरफटत गुरांच्या गोठ्यात नेऊन टाकला व तो फरार झाला. ही घटना कान शिवणी येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली. नामदेव सहदेव राऊत (६५ ) असे मृताचे नाव आहे. तर चंदू नामदेव राऊत(३५) असे आरोपी...
  July 21, 09:55 AM
 • परतवाडा - शहरात विवेक अग्रवाल यांच्या घरावरील दरोड्याची घटना ताजी असतानाच सातत्याने हाेणाऱ्या चोऱ्यांनी कळस गाठला आहे. दरम्यान गुरुवार, १८ जुलै राेजी येथील गुजरी बाजारात फोडलेल्या पाच दुकानांच्या घटनेतील एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त कैद झाला असून, चोरट्यांनी कारचा वापर केल्याचे समोर आले. एकाच रात्री झालेल्या पाच चोऱ्यांमुळे शहरातील पोलिसांच्या कार्य तत्परतेवर शहरवासीयांकडून पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यातच नवनियुक्त पोलिस अधीक्षकांना चोरट्यांनी आपली सलामी...
  July 20, 11:01 AM
 • अमरावती -बदलीच्या मागणीसाठी अमरावती येथील महावितरण कार्यालयासमोर उपोषणास बसलेले नवरदेव निखिल तिखे यांना शुक्रवारी प्रशासनापुढे झुकावे लागले. कोणत्याही प्रकारची मागणी मान्य न करता उलट त्यांच्यावरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे महावितरणच्या मुख्य अभियंत्याने जाहीर करताच नवरदेव तिखे उपोषणस्थळ सोडून नियोजित लग्न सभामंडपात जाऊन बोहल्यावरच चढले. दरम्यान, वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित केल्याचा वर्कर्स फेडरेशनचा दावा...
  July 20, 08:44 AM
 • नागपूर -उपराजधानीच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या ट्रीपल आयटीमधील (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अॅन्ड टेक्नॉलॉजी) वैदर्भीय विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्मार्ट सिंचन यंत्र तयार केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयोगशीलतेची राष्ट्रीय पातळीवर नोंद घेण्यात आली. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०१९मध्ये (हार्डवेअर एडिशन) नागपुरातील ट्रीपल आयटीच्या चमूने देशात अव्वल क्रमांक पटकावला, अशी माहिती द टेरिफाईंग नाईटमेयर्स ग्रुपचा लीडर सौरव गजभिये याने दिली. या सिंचन...
  July 19, 10:16 AM
 • मेहकर -सोयरिक जुळल्यानंतर लग्नाला अवघे काही दिवस बाकी असतानाच उपवर तरुणीने प्रियकरा सोबत पलायन केले. त्यानंतर तिकडेच लग्न करून दोघेही प्रियकर-प्रेयसी दहा दिवसांनी पोलिस ठाण्यात हजर झाले. आम्ही लग्नाच्या बेडीत अडकल्याचा जबाब दोघांनीही पोलिसांकडे नोंदवला आहे. या दरम्यान, विवाह एकाशी ठरला आणि लग्न दुसऱ्यासोबतच केल्याची चर्चा अंत्री देशमुख येथील परिसरामध्ये चांगलीच रंगली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मेहरक तालुक्यामधील अंत्री देशमुख येथील एका युवतीचा विवाह रिसोड येथील...
  July 19, 10:06 AM
 • अमरावती -बदलीच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या वीज कर्मचाऱ्यांपैकी निखिल तिखे यांचे शुक्रवारी (दि. १९) लग्न होणार आहे. मात्र वीज कंपनीने अद्यापही त्यांच्या आंदाेलनाची दखल न घेतल्याने निखिल यांनी उपाेषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी बुधवारी त्यांना उपाेषणाच्या मांडवातच मेंदी लावण्यात आली, तर गुरुवारी हळदी लावण्यात आली. तोडगा न निघाल्यास शुक्रवारी लग्नसुद्धा याच मंडपात लागणार असल्याचे तिखे यांचे नातेवाईक व वीज कर्मचारी संघटनेने...
  July 19, 07:54 AM
 • वाशिम- आईने आपल्या दोन पोटच्या गोळ्यांसह स्वतःही आत्महत्या केल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील तोंडगावात घडली. घटनेमुळे परिसरात सर्वांनाच धक्का बसलाय. जयश्री गजानन गवारे(28) असे महिलेचे नाव आहे तर गणेश गजानन गवारे(05) आणि मोहित गजानन गवारे(03) अशी दोन चिमुकल्यांची नावे आहेत. दरम्यान आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण कौटुंबीक वादातून ही आत्महत्या झाली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. वाशिम तालुक्यातील तोंडगावातील रहिवासी असलेल्या जयश्री यांचा विवाह तालुक्यातील जांभरुण नावजी येथील...
  July 18, 08:37 PM
 • नागपूर -न्हाव्याने न विचारता मिशा कापल्या म्हणून ग्राहकाने त्याच्याविरुद्ध चक्क गुन्हाच दाखल केल्याची घटना समोर आली आहे. नागपूर ग्रामीणमधील कन्हान येथे मंगळवारी ही घटना घडली. मिशीवरून कन्हान शहर युवा दणका संघटनेचे अध्यक्ष किरण किसन ठाकूर यांनी फ्रेंड्स जेंट्स पार्लरचे चालक सुनील लक्षणे यांच्यातील हा वाद झाला. मात्र, सुनीलने आपल्याला धमकी दिल्याने म्हणत ठाकूर यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, ग्रामीण पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. काय घडले : किरण ठाकूर हे फ्रेंड्स जेंट्स...
  July 18, 10:56 AM
 • नागपूर -देशातील वाढती लोकसंख्या ही एकप्रकारे राष्ट्रीय आणीबाणीच आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणासाठी युद्धपातळीवर कार्य करणे गरजेचे असून यासाठी एका आयोगाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी राज्यसभेत केली. डॉ. महात्मे म्हणाले, लोकसंख्येचा विचार करताना दोन प्रकारच्या विचारधारा देशात आहेत. त्यात देशाजवळ सर्वात मोठे मनुष्यबळ असणे देशाच्या फायद्याचे असल्याचे सांगणारा एक विचार आहे, तर वाढती लोकसंख्या देशासाठी नुकसानकारक असल्याचे मानणाराही...
  July 18, 09:22 AM
 • बुलडाणा - बुलडाणा शहरातील गवळीपुरा भागात सोमवारी ३ बालकांच्या अपहरणाच्या चर्चेने खळबळ उडाली होती. सर्वत्र शोधाशोध करूनही त्यांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. मात्र, ही तिन्ही बालके त्याच भागातील एका बंद कारमध्ये १२ तासांनंतर आढळून आली. परंतु, त्यापैकी दोन बालके मृतावस्थेत तर एक बालिका बेशुद्धावस्थेत होती. बालिकेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. बालकांचा मृत्यू गुदमरून झाल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी बुलडाणा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे....
  July 17, 10:11 AM
 • नागपूर -नोकऱ्या नाहीत. हाताला काम नाही. बेरोजगारीची समस्या अत्यंत चिंताजनक पातळीवर येऊन पोहोचली आहे. सर्वसामान्य लोकांकडून मंत्र्यांना येणारे अर्ज व त्यावरील विषय पाहिल्यास ९० टक्के अर्ज केवळ नोकऱ्या वा हाताला काम मागणारे आढळून येतात. एवढ्या मोठ्या संख्येने येणारे अर्ज नेमके कसे हाताळायचे, असा प्रश्न पडतो, अशी धक्कादायक कबुली खुद्द राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिव्य मराठीशी संवाद साधताना दिली. नागपूरचे पालकमंत्री असलेल्या बावनकुळे यांनी रविवारी नागपुरातील रवी...
  July 16, 08:52 AM
 • चंद्रपूर - येथील शेणगावच्या एका शेतात महिला आणि पुरुषाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. प्राथमिक तपासातूनच या दोघांनी आत्महत्या केल्याचा खुलासा झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोन्ही मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी पाठवले. विशेष म्हणजे, आत्महत्या करणारी महिला आधीच विवाहित होती. तसचे तिला 6 वर्षांचा एक मुलगा देखील आहे. तर आत्महत्या करणारा पुरुष त्या महिलेचा प्रियकर होता. गळ्यातील मंगळसूत्र आणि घटनास्थळी लावलेल्या बाइकने या दोघांची ओळख पटली. शेणगाव येथील शेतात एका...
  July 15, 03:44 PM
 • नागपूर - विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजप आणि शिवसेना युतीच्या विरोधात महाआघाडी उभारण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असताना महाआघाडीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत वंचित बहुजन आघाडीने विदर्भात उमेदवारांचा शोध सुरूही केला आहे. रविवारी नागपुरात वंचित आघाडीच्या वतीने संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू करण्यात आली. विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवण्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रयत्न असून रविवारी आघाडीच्या संसदीय मंडळाचे सदस्य अण्णाराव पाटील, अशोक...
  July 14, 12:02 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात