Home >> Maharashtra >> Vidarva

Vidarva

 • वणी- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या लाठी येथील एका कुटुंबात व्यसनाधीन पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनेच पतीची हत्या केली. ही घटना दि. ७ सप्टेंबरला पहाटेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी पोलिसांनी त्या महिलेला अटक करत खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. लाठी येथे मोतीराम धोबे वय ४८ वर्ष तसेच त्यांची पत्नी माया वय ३७ वर्ष हे मोलमजुरी करून राहत आहे. त्यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. परंतु मोतीरामला दारूचे व्यसन जडल्याने या कुटुंबात किरकोळ वाद नित्याचेच झाले होते. मोतीरामच्या मनात संशयाचे भूत...
  September 8, 12:32 PM
 • अमरावती- चांदूर रेल्वे आणि अचलपूर येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर गुन्हेगारांनी हल्ला चढवून खून केला. या प्रकरणाचा सखोल व तंत्रशुद्ध तपास करून प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे. जेणेकरून आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी. असा तपास या दोन्ही प्रकरणात करण्याच्या सूचना शुक्रवारी (दि. ७) एडीजी परमबीर सिंग यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना झालेली शिक्षा लक्षात घेता भविष्यात पोलिसांवर हल्ला करण्याची कोणी हिम्मत करणार नाही, असेही त्यांनी...
  September 8, 12:25 PM
 • अकोला- आगामी निवडणुकांची आचारसंहिता आडवी येणार नाही, याची काळजी घेऊन जलयुक्तच्या कामांचे नियोजन करा, असे निर्देश-वजा-कठोर आवाहन कृषी व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी केले आहे. कोणत्याही परिस्थितीत आचारसंहितेची सबब ऐकून घेतली जाणार नाही. तसे झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात शुक्रवारी सचिव एकनाथ डवले यांनी सुजलाम सुफलाम अकोला या भविष्यकालीन प्रकल्पाचे लॉंचींग केले. या वेळी ही मांडणी...
  September 8, 12:18 PM
 • अमरावती- केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या मंगळवार.दि. ११ सप्टेंबरला अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनच्या अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कारांचे वितरण होणार आहे. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी दु. २ वाजता हा कार्यक्रम होईल. पालकमंत्री प्रवीण पोटे, खा.डॉ. विकास महात्मे, खा. आनंदराव अडसूळ, आ.ॲड. यशोमती ठाकूर यावेळी उपस्थित राहतील. केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन ११ सप्टेंबरला स. १०.२५ वाजता विमानाने दिल्ली येथून...
  September 8, 12:17 PM
 • अकोला- प्रत्येक क्षेत्रात महिलांनी स्वत:चे वेगळे अस्तित्व सिद्ध केले आहे. एकीकडे यशाच्या उत्तुंग शिखरावर महिला आहेत तर दुसरीकडे आजही मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. शिक्षण म्हणजे फक्त शालेय, महाविद्यालयीन पदव्या घेणे नाही तर जीवन जगण्यासाठी आवश्यक ती मुल्ये जोपासणे आहे. स्त्री शिक्षण हे फक्त पदवीपुरते शिक्षण न घेता जीवनमुल्य जपणारे शिक्षण घ्यावे, असे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केले. श्रीमती...
  September 8, 12:12 PM
 • अकोला- मनपाच्या जवळपास ९६ चौरस कि.मी. क्षेत्रफळातील बोटावर मोजण्या इतके व्यावसायिक वगळल्यास इतर व्यावसायिक विना परवाना व्यवसाय करीत आहे. यामुळे मनपाला लाखोंच्या उत्पन्नापासून वंचित राहावे लागत आहे. याकडे पदाधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले आहे. मनपाचे मालमत्ता, पाणीपट्टी, विकास शुल्क, परवाना, दैनिक वसुली, अतिक्रमण आदी उत्पन्न देणारे विभाग आहे. मात्र मालमत्ता कर वगळता उत्पन्नाच्या इतर स्त्रोतांकडे मनपाने दुर्लक्ष केले आहे. मनपा क्षेत्रात काही व्यवसाय वगळता प्रत्येक व्यवसायासाठी...
  September 8, 12:05 PM
 • अमरावती- अमरावती जिल्ह्यात चार महीन्यात आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये, यासाठी ठाण्यात असलेल्या एकूण मणुष्यबळाच्या किमान ३० ते ४० टक्के कर्मचारी रात्रीच्या ड्युटीसाठी कार्यरत ठेवावे. त्यामुळे गस्तीला चार ते पाच कर्मचारी सोबत फिरू शकतात. अशा सूचना राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक परमबीर सिंग (कायदा व सुव्यवस्था) यांनी शुक्रवारी अमरावती परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांना...
  September 8, 11:56 AM
 • बुलडाणा- माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी शौर्य २ मिशन प्रशिक्षणासाठी आदिवासी आश्रम शाळा किन्ही नाईक तालुका चिखली जिल्हा बुलडाणा येथील अकरावीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ते आज, ७ सप्टेंबर रोजी दार्जिलिंगकडे रवाना झाले आहेत. राज्यात झालेल्या इतर विभागातील प्रशिक्षित विद्यार्थी शासनामार्फत माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी मिशन शौर्य २ साठी पाठवण्यात येणार आहे. यामध्ये आदिवासी विद्यालयाचे विद्यार्थी रतन ओंकार इंगळे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा...
  September 8, 11:47 AM
 • अकोला- कल्याणी बारीला या ३२ वर्षीय महिलेची हत्या रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी दोन युवकांनी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या दोन्ही युवकांची शरीरसुखाची मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी कल्याणीचा साडीने गळा आवळून खून केला, अशी कबुली पोलिसांना दिली. विशेष म्हणजे कल्याणीच्या खुनाचा संशय तिच्या पतीवर होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात तिचा पतीच आरोपी असल्याचे समोर आले होते. मात्र पोलिस साशंक असल्याने त्यांनी सखोल तपास करून मुख्य आरोपींना गुरुवारी गजाआड केले. रमाबाई आंबेडकर...
  September 7, 12:36 PM
 • अकोला, मूर्तिजापूर- मद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकाने बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घरात घुसून मुलीसोबत अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच मुलीच्या वडिलांनी संतापाच्या भरात युवकावर सपासप चाकूने वार केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना माना पोलिस ठाण्याच्या अंतर्गत मंडुरा येथे घडली. शुभम देवानंद तेलमोरे वय २२ असे मृतक युवकाचे नाव आहे. बुधवारी रात्री शुभम तेलमोरे हा गावातच अवैधपणे दारूची विक्री करणाऱ्या रामा वासुदेव चौके याच्या घरी दारू...
  September 7, 12:35 PM
 • अकोला- कोट्यवधी रुपयाच्या मालमत्ता कर वसुलीकडे दुर्लक्ष केल्याचा फटका मालमत्ता कर विभागातील ६ कर वसुली लिपिकांना बसला. या कर वसुली लिपिकांना ६ सप्टेंबर रोजी आयुक्त जितेंद्र वाघ यांनी निलंबित केले. दरम्यान सहा कर्मचाऱ्यांचे एकाच दिवशी निलंबन झाल्याने आता कर वसुली कर्मचाऱ्यांची संख्या केवळ २९ राहिली आहे. महापालिकेचे क्षेत्रफळ वाढून १२५ चौरस किलोमीटर झाले आहे. मालमत्तांची संख्याही १ लाख ५० हजाराच्या वर गेली आहे. मालमत्तांची संख्या वाढल्याने तसेच रिअसेसमेन्ट आणि करवाढ केल्याने...
  September 7, 11:55 AM
 • नागपूर- दलित शब्द अवमानजनक नाही, तर उत्साह देणारा असल्याचा दावा करत हा शब्द वापरण्यास मनाई करणाऱ्या प्रसारण मंत्रालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानंतर केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने दलित शब्दाचा वापर करता येणार नाही, असे दिशानिर्देश जारी केले आहेत. दरम्यान, नागपुरात बोलताना आठवले म्हणाले, राज्यात रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळायला सुरुवात झाली असून दोन...
  September 7, 07:51 AM
 • नागपूर- चंद्रपूर महापालिकेच्या कर िवभागात गुरुवारी घडलेला प्रसंग पाहून गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटाची आठवण झाली. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना मकरंद अनासपुरे अनामत रक्कम भरण्यासाठी चिल्लर आणतो आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडते. असाच काहीसा मजेदार किस्सा चंद्रपूर महापालिकेत घडला. गृहकर भरण्यासाठी एका फेरीवाल्याने चक्क १४ हजार ८०८ रुपयांची चिल्लर आणल्याने ती मोजता माेजता कर विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. चंद्रपूर महापालिकेने नागरिकांना गृहकराच्या...
  September 7, 07:49 AM
 • नागपूर- राज्य सरकारने गडचिरोलीत नव्यानेच सुरू केलेल्या महिला व बाल रुग्णालयात मागील चार महिन्यात शून्य ते ५ वयोगटातील तब्बल ५९ नवजात अर्भक तसेच बालकांचा अाणि एका मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी या रुग्णालयात जाऊन माहिती घेतल्यावर उघडकीस आली. वैद्यकीय अधिकारी डॉ.जयंत पर्वते यांनी स्वत: ही माहिती दिली. या रुग्णालयात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ९७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५४ पदे अद्यापही रिक्त असल्याचा धक्कादायक...
  September 7, 07:33 AM
 • अकाेला- प्रधानमंत्री अावास याेजनेतून लाभार्थ्यांवर झालेला अन्याय, काेसळलेली अाराेग्य यंत्रणा आणि अपंगांसाठीचा अखर्चित राहिलेल्या निधी, या मुद्द्यांवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या अांदाेलकांनी बुधवारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात धाव घेत अांदाेलन केले. दरम्यान, सीईअाेंच्या कक्षात घुसण्यासाठी अांदाेलक व पोलिसांमध्ये संघर्ष झाला. अपात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे वितरण करण्यात अाले असून, पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात येत असल्याचा अाराेप अांदाेलकांनी...
  September 6, 12:38 PM
 • अकोला- जिल्ह्यातील जल प्रकल्पाच्या साठवण क्षमतेच्या ७५ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात ४१ प्रकल्प मिळून ३५१.७७ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता आहे. तूर्तास २६०.८७ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात ९२.३५ टक्के जलसाठा उपलब्ध झाला असला तरी अकोट तालुक्यातील तीन लघु प्रकल्पात अद्यापही जिवंत जलसाठा उपलब्ध झालेला नाही. परंतु यावर्षी मुबलक जलसाठा उपलब्ध झाल्याने रब्बीच्या पेऱ्यात वाढ होणार आहे. जिल्ह्यात दोन मोठे, तीन मध्यम ३६ लघु प्रकल्प...
  September 6, 12:38 PM
 • अमरावती- युवकांना रोजगारक्षम करण्याच्या दृष्टिने पश्चिम विदर्भातील ३२ महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू केल्या जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची विशेष योजना तसेच राष्ट्रीय कौशल्य योग्यता आराखड्याच्या अनुषंगाने विविध कौशल्य अभ्यासक्रम आरंभ केले जाणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत आज (५ सप्टेंबर) मान्यता दिली. सर्वच क्षेत्रात मागास असलेल्या पश्चिम विदर्भाच्या पाचही जिल्ह्यात...
  September 6, 12:30 PM
 • नागपूर- यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव तालुक्यात ऑगस्ट महिन्यात तीन गावकऱ््यांचा बळी घेणाऱ््या आक्रमक वाघिणीचा (टी १) उपद्रव थांबविण्यासाठी तिला शक्यतोवर बेशुद्ध करून पकडण्याचा अन्यथा तिला थेट गोळ्या घालण्याचे आदेश वन विभागाने जारी केले आहे. वन विभागाच्या या आदेशाला आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली असून त्यावर उद्या गुरुवारी निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात पांढरकवडा...
  September 6, 12:28 PM
 • नागपूर- आधीच गुलाबी बाेंडअळीमुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यावर सडन रोगाचे संकट घोंघावत होते. परंतु शेतकऱ्यांनी कापसाच्या बोंडाला चिकटून राहिलेल्या गुलाबी पाकळ्या हाताने काढून टाकाव्या, असा उपाय येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने सुचवित दिलासा दिला आहे. यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील काही भागात फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेतील कपाशीवर बोंडे सडण्याचा प्रकार समाेर आला होता. यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांना सीआयसीआरने दिलासा दिला आहे. सर्वसाधारणपणे कपाशीच्या...
  September 6, 12:23 PM
 • चिखली- चिखलीत भाजपच्या दहीहंडी कार्यक्रमात मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे हिला भाजप कार्यकर्त्यांनी सेल्फी काढण्याच्या नादात धक्काबुक्की केल्याची घटना घडली. आशीर्वाद मेडिकलसमोरील मैदानावर कृष्ण जन्माष्टमीनिमित्त भाजपने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. नेहा स्टेजवर चढत असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तिला सेल्फी काढण्याच्या नादात धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे नेहा प्रचंड संतापली होती. कार्यक्रमस्थळी व्यवस्थित नियाेजन नसल्यामुळे तिला हा त्रास सहन करावा लागला....
  September 6, 09:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED