जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva

Vidarva

 • नागपूर -२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात दारूबंदीचा मुद्दा महत्त्वाचा होता. महिलांकडून व्यापक आंदोलनानंतर २०१५ मध्ये या जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. आताही २०१९ च्या निवडणुकीत दारूबंदीचा मुद्दा असला तरी त्याचा दोन्ही अंगांनी राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच जातीपातींचे राजकारणही प्रभावी होत चालल्याने ही काट्याची लढत अखेरच्या टप्प्यात आपल्याकडे झुकवण्याचे शर्थीचे प्रयत्न काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू आहेत. चंद्रपूरच्या ग्रामीण...
  April 8, 09:31 AM
 • नागपूर -महाराष्ट्र व तेलंगणच्या सीमेवरील १४ गावांतील मतदारांना काेणत्या राज्यातील उमेदवारास मतदान करावे? हा प्रश्न पडला आहे. सुमारे ५००० मतदारांची नावे दाेन्ही राज्यांतील मतदार यादीत असणे, हे यामागील कारण आहे. या नागरिकांकडे दाेन्ही राज्यांतील मतदार आेळखपत्रेही आहेत. २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत यापैकी अनेकांनी दाेन्ही राज्यांत मतदान केल्याचा प्रकार समाेर आला हाेता. कारण सीमेलगतच्या चंद्रपूर व आदिलाबाद या मतदारसंघांत वेगवेगळ्या टप्प्यांत मतदान झाले हाेते; परंतु या वेळी दाेन्ही...
  April 7, 09:31 AM
 • अकोला- वंचित बहुजन आघडीचे नेते प्रकाश आंबेडकर काही काळापासून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या वक्तव्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या आरोपामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सगळ्यात मोठे ब्लॅकमेलर असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. गांधी परिवाराचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ड वधेरांसाठी भाजपने त्यांना ब्लॅखमेल केल्याचा आरोप मोदींवर केला. शिवाय काँग्रेसने कोणासोबतच आघाडी...
  April 5, 12:20 PM
 • दिग्रस -सत्तेवर आल्यास निवडणूक आयाेगाला तुरुंगात टाकू असे आक्षेपार्ह वक्तव्य जाहीर सभेत करणारे वंचित आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. ४ एप्रिल रोजी भरारी पथकप्रमुख विवेक निळकंठराव जाेशी यांच्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी सायंकाळी उशिरा ही कारवाई केली. ३ एप्रिल रोजी सायंकाळी दिग्रस येथे पार पडलेल्या जाहीर सभेत अॅड. आंबेडकर यांनी इलेक्शन कमिशन म्हणतो पुलवामाबद्दल तुम्ही बोलायचे नाही. आम्ही बोलू, आम्हाला संविधानाने अधिकार दिला आहे....
  April 5, 11:33 AM
 • नागपूर -महाराष्ट्रातील तमाम राजकीय नेत्यांना नागपूरचा कस्तुरचंद पार्क कायम खुणावत आलाय. आजवरच्या इतिहासात अनेक नेत्यांनी या मैदानावर लाखाेंच्या सभा गाजवल्या. पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते त्यांचे खापर पणतू राहुल गांधी यांच्या सभांनी गांधी- नेहरू परिवाराच्या सभांचे या मैदानावरील वर्तुळ गुरुवारी पूर्ण झाले. राहुल यांच्या आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी, आई साेनिया गांधी यांनी या मैदानावर लाखोंच्या सभा जिंकल्या. मात्र राहुल गांधी यांना गुरुवारच्या सभेत एवढी गर्दी...
  April 5, 08:55 AM
 • नागपूर -लोकसभा निवडणूक झाल्यावर राफेल विमान खरेदी घोटाळ्याची चौकशी केली जाईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल आणि चाैकीदार तुरुंगात जाईल. कोणीही वाचणार नाही, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी नागपुरात आयोजित जाहीर सभेत दिला. राफेल व्यवहाराची यूपीएने सुरू केलेली संपूर्ण प्रक्रियाच मोदी सरकारने संपवली. फ्रान्स सरकारवर दबाव टाकून अंबानींना ऑफसेट कंत्राट दिले गेले. या घोटाळ्याच्या चौकशीच्या तयारीत असलेल्या सीबीआय प्रमुखांना मध्यरात्री हटवण्यात आले. घोटाळा...
  April 5, 08:11 AM
 • नागपूर -देश पुन्हा अस्थिर करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. देशद्रोहाविरुद्धची तरतूद असलेला कायदा रद्द करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन काँग्रेसने देशाच्या सुरक्षेशी तडजोड करण्याचे, जवानांचे मनोबल तोडण्याचे प्रयत्न चालवले आहेत. महामिलावटवाल्यांना थोडीही संधी मिळाली तर देशात पुन्हा एकदा नक्षलवाद-माओवाद फोफावण्याचा धोका आहे. संरक्षणमंत्री राहिलेल्या शरद पवार यांना काँग्रेसचा हा जाहीरनामा मान्य आहे काय, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदिया येथील जाहीर सभेत बुधवारी...
  April 4, 09:23 AM
 • नागपूर -पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्का सहन न झाल्याने आयटीआयमधील एका शिक्षकाने पाच व दाेन वर्षांच्या दोन मुलींना अगोदर गळफास देत नंतर स्वत:ही आत्महत्या केली. पोटच्या मुलींना गळफास दिल्यानंतर तो फोटो शिक्षकाने पत्नीला व्हॉट्सअॅपवर पाठवला व नंतर स्वत: गळफास घेतला. ही भयंकर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये घडली. ऋषिकांत कदुपल्ली (४०) असे या शिक्षकाचे नाव आहे. ऋषिकांत हा पत्नी प्रगती (३२) व दोन मुलींसह शहरातील विवेकानंद वॉर्डातील जयभीम चौकात राहत होता. ऋषिकांतच्या...
  April 3, 08:58 AM
 • चंद्रपूर - येथील बल्लारपूर परिसरात एका शिक्षकाने आपल्या दोन चिमुकल्या मुलींना फासावर लटकवून मारले. यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे. बल्लारपूर येथे आपल्या पत्नी आणि 2 मुलींसह सुखात राहणारा शिक्षक असे करेल याचा विचारही कुणी केला नव्हता. परंतु, पोलिसांनी सखोल तपास केला तेव्हा या सुखी संसाराचे दुसरेच सत्य समोर आले. हत्या आणि आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची पत्नी काही दिवसांपूर्वीच एका ड्रायव्हरसोबत घर सोडून पसार झाली होती. त्याच गोष्टीच्या रागात...
  April 2, 02:41 PM
 • नागपूर -भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणूक प्रचारात वर्धा येथून रालोआच्या प्रचाराचा श्रीगणेशा करताना यूपीए सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा समाचार घेतला हाेता. पाच वर्षांनंतर याच ठिकाणाहूून प्रचाराचा नारळ फोडताना पंतप्रधानपदी असलेल्या मोदी यांचे बहुतांशी भाषण सरकारच्या उपलब्धींचा पाढा वाचण्याऐवजी राजकीय टीका- टिप्पणींवरच अधिक भर देणारे ठरले. काँग्रेस व राष्ट्रवादीमुळेच राज्यात विशेषत: विदर्भात दुष्काळाचे संकट ओढावल्याचा आराेप त्यांनी...
  April 2, 10:42 AM
 • अमरावती - भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकाच परिवारातील आहेत. लहानपणी ते हरवलेले भाऊ होते आणि आता एकमेकांना भेटले आहेत. प्रत्येक ठिकाणी क्लब करून ते निवडणुका लढवत असून, यांच्या क्लबचे प्रमुख नरेंद्र मोदी आहेत, अशी घणाघाती टीका एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी (दि. १) अमरावतीत केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयाेजित सभेत ते बाेलत हाेते. अमरावतीच्या निवडणुकीत आमची लढत अपक्ष उमेदवारासोबत आहे, असेही ते म्हणाले. अकॅडिमक हायस्कूलच्या...
  April 2, 09:59 AM
 • नागपूर-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभाग तसेच अन्य तपास यंत्रणांकडूनक रण्यात आलेल्या कारवाईमध्ये आतापर्यत िवदर्भात २ कोटी ५४ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती या रकमेविषयी नीट माहिती न देऊ शकल्यामुळे तसेच कोणतीही कागदपत्रे सादर न करू शकल्यामुळे ही रोकड आयकर खात्याकडे सोपविण्यात आली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर विदर्भात सर्वप्रथम कारवाई सावनेर तालुक्यात करण्यात आली. २८ मार्च रोजी सावनेर येथे ८० लाख रुपयांची रोकड यंत्रणेने जप्त...
  April 2, 09:17 AM
 • वर्धा -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा कधीकाळी आपले राजकीय गुरू म्हणून आदराने उल्लेख करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी साेमवारी वर्धा येथील महायुतीच्या जाहीर सभेत केवळ राष्ट्रवादीतील गृहकलह व शरद पवारांच्या कुुटुंबातील वादावर भाष्य केले. शरद पवार यांची आता पक्षावरील पकड निसटत चालली असून, पुतण्या अजित पवार यांनी पक्षावर ताबा मिळवण्यासाठी पवारांचीच हिट विकेट घेतली, अशी टीका माेदींनी केली. भाजप-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ माेदी यांची महाराष्ट्रातील पहिलीच सभा...
  April 2, 08:12 AM
 • वर्धा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील प्रचार सभेत काँग्रेससह राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी सांगितले, की दोन्ही पक्षांमध्ये व्होट बँकेचे राजकारण सुरू आहे. आणि असे करताना ते कुठल्याही स्तराला जाऊ शकतात. काँग्रेसने देशातील कोट्यवधी लोकांवर हिंदू दहशतवादाचा डाग लावण्याचा प्रयत्न केला. हिंदू कधी दहशतवाद करू शकतो? इतिहासात अशी एकही घटना घडली आहे का? असा सवाल मोदींनी उपस्थित केला. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर अनेक मान्यवर सहभागी होते....
  April 1, 01:23 PM
 • नागपूर -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आमचा केवळ वापर करून घेतला. परिवारात मुस्लिम लोकांना केवळ शोपीस म्हणून स्थान असल्याचा आरोप करीत संघ परिवारातील मुस्लिम संघटना असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या नागपुरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुस्लिम समाजात काम वाढवण्यासाठी संघाने काही वर्षांपूर्वी देशपातळीवर मुस्लिम राष्ट्रीय मंच स्थापन केला. या मंचाचे नेतृत्व संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेशकुमार यांच्याकडे आहे. लोकसभा निवडणुकीत मंचाने भाजपसाठी काम हाती...
  April 1, 11:57 AM
 • नागपूर - महाराष्ट्रातील विदर्भात पाेहोचलाे तेव्हा दुष्काळाची चाहूल लागली हाेती. शेतकरी आत्महत्येमुळे हा भाग कुप्रसिद्ध आहे. तीन वर्षांपासून या भागात दुष्काळ आहे. येथील फक्त जमीनच काेरडी झाली नाही तर शेतकऱ्यांची स्वप्नेही पापडी बनवून उखडू लागली आहेत. नागपुरात राहणारे शाहदेव रागात म्हणतात, सरकार तर आम्हाला मृतप्राय समजत आहे. आम्हाला विचारताे तरी काेण? म्हणण्यास दाेन हेक्टरची जमीन आहे. डाळिंबाची शेती करताे. परंतु मिळते काय? शाहदेव यांना जेव्हा शेतकरी सन्मान याेजनेसंदर्भात विचारले...
  March 26, 09:47 AM
 • नागपूर -मी जनतेचा उमेदवार असून जनताच मला निवडून आणेन, असा विश्वास भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. मला जनतेचे प्रचंड प्रेम मिळाले. अर्ज भरतानाच इतकी मोठी उपस्थिती पाहून मी भारावून गेलो आहे. जनतेचा प्रचंड प्रतिसाद, प्रेम, सदिच्छा व शुभेच्छा हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे, असे गडकरी म्हणाले. नितीन गडकरी राज्यात विक्रमी मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गडकरी राज्यात न भूतो न...
  March 26, 08:48 AM
 • मुंबई -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांच्या नाराजीची दखल घेत राहुल गांधी यांनी चंद्रपूरचा उमेदवार तडकाफडकी बदलला. विनायक बांगडे यांचे नाव वगळून त्या जागी चव्हाणांनी शिफारस केलेले सुरेश ऊर्फ बाळू धानाेरकर यांना तिकीट दिले. धानाेरकर यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा नुकताच राजीनामा देत काँग्रेसमध्ये येण्याची तयारी केली हाेती. मात्र तरीही त्यांना तिकीट नाकारल्याने अशाेक चव्हाण नाराज झाले हाेते. आता त्यांची नाराजी दूर झाली. चंद्रपूरमध्ये भाजपचे हंसराज अहिर यांच्याशी...
  March 25, 08:49 AM
 • अकोला -अकोल्यात आज रविवारी सकाळी एका इमारतीला भीषण आग लागलीे. मोहम्मद अली रोडवरील एका जुन्या इमारतीतील जोडे-चप्पलाच्या गोदामाला ही आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी २० बंब लागले. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अग्निशामक दलाच्या गोपाल इंगळे आणि कलीम खान याला विजेचा जबर झटका बसला त्यात ते जखमी झाले आहेत. पहाटे साडे पाच वाजता ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या आगीत एक व्यक्ती जखमी झाला. मोहम्मद अली रोड हा अतिशय गजबजलेल्या लोकवस्ती आणि दुकानांचा भाग आहे. या आगीनंतर...
  March 24, 10:42 AM
 • नागपूर -सांप्रदायिकता, जातीयता आणि परिवारवाद (घराणेशाही) ही सध्याच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. सध्या महाराष्ट्र किंवा देशाच्या पातळीवरही जी घराणेशाही सुरू आहे, तो लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. अनेक नेत्यांची मुले राजकारणात येत आहेत. तुम्ही कुणाचा मुलगा असणे हा गुन्हा नाही, हे मला मान्य. पण, निवडणुकीतील उमेदवारीची मागणी जनतेतून आली पाहिजे. ती आई-वडिलांच्या पुण्याईवर नको. याचा साऱ्याच राजकीय पक्षांनी अंतर्मुख होऊन विचार करावा. अगदी भाजपनेही.. असे परखड मतकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी...
  March 23, 10:07 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात