जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva

Vidarva

 • नागपूर -महाराष्ट्रात भाजपला निवडून आणण्याच्या वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या कारस्थानात आम्ही सहभागी नाही, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते मिलिंद पखाले यांच्यासह अनेक नेत्यांनी बुधवारी वंचित बहुजन आघाडी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. आंबेडकर यांच्या अनाकलनीय राजकारणामुळे राज्यात वंचित आघाडीची एकही जागा येणार नसल्याचे पखाले यांनी या वेळी सांगितले. पखाले हे गेल्या तीस वर्षांपासून आंबेडकर यांचे निकटचे सहकारी मानले जातात. त्यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचे...
  May 16, 09:41 AM
 • लोहारा -शेतजमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात करण्यात आलेल्या मारहाणीत एका माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिलांसह चौघे गंभीर जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना लोहारा तालुक्यातील कास्ती (बुद्रुक) येथे मंगळवारी रात्री घडली. लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील माजी सैनिक बालाजी भगवान कवठे (५०) हे सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी त्यांची सासरवाडी म्हणजेच कास्ती (बुुद्रुक) शिवारात मनोहर हरिपंत राकेलकर यांची पाच एकर ११ गुंठे शेतजमीन खरेदी केली. याच शेतात...
  May 16, 08:40 AM
 • नागपूर - गडचिरोली जिल्ह्यातील भूसुरुंग स्फोट प्रकरणात निष्काळजीपणा बाळगल्याचा आरोप असलेले कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांची बदली नंदुरबारला करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहीद पोलिस जवानांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत कारवाईची मागणी केली होती. १ मे रोजी झालेल्या या घटनेत १५ जवानांसह १६ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या आदल्या रात्री नक्षलवाद्यांनी दादापूर येथे २७ वाहनांची जाळपोळ केली. या घटनास्थळावर पोलिस पथक पोहोचत असताना मार्गातच भूसुरुंग...
  May 15, 08:51 AM
 • नागपूर - आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळातही आठ भाऊ, त्यांची १६ मुले, त्यांची बायका-मुले आणि सोळा भावांची मुले, सुना, नातवंडे असे एकूण साधारणत: ४४ ते ४५ जणांचे कुटुंब एकत्र राहते, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण, हे खरे आहे. नागपुरातील व्यापारी व उद्योजक रमेश मंत्री यांचे कुटुंब आजही एकत्र राहते. नागपुरातील शिवाजीनगर परिसरातील मंत्री निवास सदैव गजबजलेले असते. नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव हे मंत्री कुटुंबीयांचे मूळ गाव. शेती हा पारंपरिक व्यवसाय. श्रीकिसन मंत्री यांना माणकलाल व...
  May 15, 08:43 AM
 • चंद्रपूर- आंतरजातीय विवाह किंवा प्रेमप्रकरणांमधून हत्या होण्याचे प्रमाण सध्या प्रचंड प्रमाणात वाढले आहे. बारामतीमध्ये आज आईनेच पोटच्या मुलीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच चंद्रपुरातून अजून एक अशीच घटना समोर आली आहे. मुलीचे वडील आणि भावाने मिळून मुलीच्या प्रियकराला बेदम मारहाण करत ठार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. घटना चंद्रपूरातील घुग्गुस येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. योगेश जाधव(23) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेतील आरोपींनी हत्या केल्यावर...
  May 14, 04:56 PM
 • यवतमाळ- यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात सिझेरियनने प्रसूती झालेल्या 12 ते 14 महिलांना इन्फेक्शन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून या महिलांना नवजात बाळांसह रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहेत. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागात 21 एप्रिल रोजी सिझेरियन झालेल्या महिलांनी शस्त्रक्रियेच्या ठिकाणी प्रचंड दुखत असल्याची तक्रार केली होती. पण थोडी कळ सोसा, असे त्यांना सांगण्यात आले. यानंतर त्या महिलांना अनेक दिवस...
  May 13, 04:43 PM
 • माझा जन्म नागपूरमध्ये झाला, पण यवतमाळमधील पाटणबोरी हे माझे मूळ गाव. वडील रवींद्र पाटणबोरीमध्ये एका सिमेंट फॅक्टरीत काम करत होते. आई शाळेत शिक्षिका होती. दोघांच्या पगारावर घरगाडा फक्त चालत होता. माझे नववीपर्यंतचे शिक्षण पाटणबोरी येथे झाले. पुढील शिक्षणासाठी मी यवतमाळमध्ये आलो, तेव्हा शाळेतही मन रमत नव्हते. थ्री इडियट्स चित्रपटातील सोनम वांगचुकचा व्हायरस माझ्यात घुसलेला होता. मला काही तरी वेगळे करायचे होते. माझे विचार एेकून वडील रागावले, आधी ग्रॅज्युएशन पूर्ण कर, चांगले मार्क मिळाले तर...
  May 13, 09:47 AM
 • अकोला - आधी पावसाअभावी पिके नाहीत. त्यातही जे काही पीक हाती लागले त्याला याेग्य भाव मिळेना. काढणीचा पैसाही निघत नसल्याने पिकांवर नांगर फिरवल्याच्या विदारक घटना राज्यात अनेक ठिकाणी घडत आहेत. तेल्हारा तालुकाही त्याला अपवाद नाही. येथील केळी परदेशात निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र यंदा दुष्काळामुळे विहिरी, बोअरने तळ गाठले. लाखो रुपये खर्च करून जगवलेली केळीची झाडे आता डोळ्यादेखत सुकत असल्याचे पाहून शेतकरी वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यापैकी एकाने चक्क वाळलेल्या केळीच्या शेतात गुरे सोडून...
  May 13, 09:29 AM
 • नागपूर -अभिनेता आमिर खानच्या पाणी फाउंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या वाॅटर कप स्पर्धेला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी १ मे रोजी पाणी फाउंडेशनतर्फे शहरवासीयांसाठी महाश्रमदान आयोजित करण्यात येते. गावखेड्यात जाऊन श्रमदान करण्यासाठी संकेतस्थळावर जलमित्र म्हणून उत्साहाने नोंदणी होते, असे सांगतानाच दोन वर्षांत सुमारे दोन लाख शहरवासीयांनी महाश्रमदान करून जलश्रीमंती आणण्यात योगदान दिल्याची माहिती पाणी फाउंडेशनच्या सीईओचे कार्यकारी सहायक सागर कुनसावळीकर यांनी दिली....
  May 13, 09:12 AM
 • नागपूर -येथील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात पूर्वी सात टक्के असलेला बाल मृत्युदर आता २ टक्क्यांवर आला आहे. याचे श्रेय रुग्णालयातील वैशाली मेंढे यांना जाते. त्यांनी विविध माध्यमांतून केलेले हे प्रयत्न जागतिक आरोग्य संघटनेच्या नजरेत अाले अाणि थेट लंडन येथील राणी एलिझाबेथ क्वीन ट्रस्टने या कार्याची दखल घेतली आहे. मेंढे यांच्या कार्यपद्धतीवर एक लघुपट तयार करण्यात अाला असून हा लघुपट रुग्णालयांत जनजागृती म्हणून दाखवला जात आहे. मेंढे यांच्या प्रयत्नांमुळे डागा रुग्णालय...
  May 13, 08:56 AM
 • भंडारा- पसंत नसलेल्या मुलासोबत लग्न करायचे नव्हते म्हणून तरूणीने होणाऱ्या नवऱ्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे मुलीने आणि तिच्या प्रियकराने मिळून हे क्रूरकृत्य केले आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील येरली गावात ही धक्कादायक घटना घडली. विनोद कुंभारे असे हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. तर रिना मडावी आणि प्रफुल्ल परतेती अशी आरोपींची नावे आहेत. काय आहे प्रकरण? तुमसर तालुक्यातील येरली गावातील विनोद कुंभारेचे लग्न तिरोडा तालुक्यातील कोयलारी या...
  May 11, 01:05 PM
 • अमरावती- अमरावतीमधील हिंदू स्मशानभूमीतून नवजात बाळाचे पुरलेले प्रेत चोरीला गेल्याचा घटना समोर आली आहे. मृत बाळाचे वडील अमोल नागपूरकर यांनी या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. नागपूरकर यांच्या बाळाचा जन्म झाल्याच्या 24 तासात मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू 25 एप्रिलला झाला, त्यानंतर त्यांनी रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी बाळाच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करुन हिंदू स्मशानभूमीत मृतदेह पुरला. त्यावेळी स्मशानभूमीतील कर्मचारीही उपस्थित होते. यावेळी नागपूरकर यांना कळाले की,...
  May 10, 12:40 PM
 • नागपूर -उपराजधानी नागपुरात सुखवस्तू घरातील महिलांसाठी सुरू असलेल्या जुगार अड्ड्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चार महिलांना ताब्यातही घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अड्ड्याची सूत्रधारही महिलाच आहे. नागपुरातील जरीपटका परिसरात बुधवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. जरीपटका परिसरातील दयानंद पार्कजवळील एका घरातमध्ये अनेक महिन्यांपासून जुगाराचा अड्डा सुरू असल्याची निनावी तक्रार पोलिसांना मिळाली होती. मात्र, तिथे महिलाच जुगार खेळतात, अशी माहिती मिळालेली नव्हती. या...
  May 10, 10:16 AM
 • नागपूर -वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रवेशांना या वर्षीच मराठा आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेली विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला. न्यायालयाने निकाल देताना राज्य सरकारच्या चुकीमुळे हा घोळ झाल्याचे ताशेरे ओढले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एसईबीसी आरक्षण (मराठा) पूर्वानुलक्षी प्रभावाने या शैक्षणिक सत्रापासून लागू करता येणार नाही, ते पुढील...
  May 10, 09:06 AM
 • नागपूर -कर्जानं दिलेले पैसे मागण्यास गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या मुलगा व त्याच्या आईला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना चंद्रपुरात घडली. यामध्ये मुलगा ३० तर पत्नी ६० टक्के जळाली. चंद्रपूरातील सरकार नगरात राहणारे हरिश्चंद्र हरिणखेडे हे व्यवसायाने शिक्षक असून, त्यांनी जसबीर भाटीया उर्फ सोनू याच्याकडून ३ लाख रुपये व्याजाने घेतले होते. यातील २ लाख परत केले. उर्वरित रकमेतील ६० हजार मंगळवारी देण्याचे ठरले होते. ते घेण्यासाठी सोनू हा हरिणखेडे यांच्या घरी गेला आणि पूर्ण रकमेची...
  May 8, 10:28 AM
 • नागपूर -दुचाकीत पेट्रोल भरताना ऐटीत मोबाईलवर बोलणे एका दुचाकीस्वाराला चांगलेच महागात पडले. त्याच्या गाडीने पेट घेतला. त्यात गाडी पूर्ण जळाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र, या घटनेने धोक्याचा ईशारा दिलेला आहे. मंगळवारी स्थानिक टेलिफोन एक्सचेंज चौकातील इंडियन आॅईल पेट्रोलपंपावर एक मोटरसायकलस्वार पेट्रोल भरण्यास आला. गाडीत पेट्रोल भरत असताना काॅल आल्याने तो मोबाईलवर बोलत होता. तितक्यात अचानक त्याच्या गाडीने पेट घेतला. त्यात गाडी जळाली. अचानक घडलेल्या या...
  May 8, 10:05 AM
 • अमरावती -साडी डाळिंबी हीच मी लेईन, अशीच मला आयन्यात पाहीन...वैशाख वणवा चित्रपटातील या गीताची आठवण करून देणारे हे छायाचित्र. या गीतामध्ये ठसका होता, परंतु इथे मात्र चटका आहे...! त्यापासून झाडे वाचवण्यासाठी शेतमालकाने डाळिंबाची अख्खी बागच साड्यांनी झाकली आहे. साड्यांमुळे उन्हापासून डाळिंबाच्या झाडाचे, सोबत फळांचेही संरक्षण होत आहे. चार वर्षांपूर्वी लावलेली डाळिंबाची बाग या वर्षी बहरली होती. मात्र, दुष्काळ व उन्हामुळे झाडे सुकण्याचा धोका पाहता देशमुख यांनी ही उपाययोजना केली. अमरावती...
  May 8, 09:09 AM
 • मुंबई -राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा विद्यार्थ्यांच्या मेडिकलच्या प्रवेशावर दिलेल्या स्थगितीबाबत आपली बाजू सक्षमपणे मांडेल आणि विद्यार्थ्यांचा प्रवेश कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर मराठा समाजाच्या मेडिकलला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन शुक्रवारपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी...
  May 7, 09:56 AM
 • खामगाव -देवदर्शनासाठी गेलेल्या शहरातील दाळफैल भागातील देशमुख कुटुंबावर काळाने झडप घातली. ट्रेलरने कारला दिलेल्या जोरदार धडकेत देशमुख कुटुंबातील सहा जण व चालक असे एकूण सात जण जागीच ठार झाले. हृदयाला पाझर फोडणारी ही घटना सोमवारी ६ मे रोजी दुपारच्या सुमारास तामिळनाडूमध्ये घडली. प्राप्त माहितीनुसार, शहरातील दाळफैल भागातील रहिवासी मिलिंद नारायणराव देशमुख (४०) हे भुसावळ येथे रेल्वे पोलिसमध्ये कार्यरत आहेत, तर त्यांचा लहान भाऊ हेमंत नारायणराव देशमुख (३४) हा बंगळुरूला नोकरीला आहेत. मिलिंद...
  May 7, 09:22 AM
 • अकोला - येथील प्रसिद्ध व्यावसायिक आणि प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांचा खून करण्यात आला. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास शहरातील अशोक वाटिका चौकातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात ही हत्या झाली आहे. विशेष म्हणजे हे कार्यालय पोलिस अधिक्षकांच्या निवासस्थानापासून अगदी जवळ आहे. या हत्येमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. लाकडी फर्निचर आणि आग विझविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरने हुंडीवाले यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने हुंडीवाले यांचा जागीच मृत्यू...
  May 6, 04:24 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात