जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva

Vidarva

 • नागपूर - वर्धा महामार्गावर गेल्या गुरुवारी अँक्सिस बँकेच्या व्हॅनमधून दोन कोटींच्या लुटीची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी मास्टरमाइंड असलेल्या पोलिसालाच अटक केली आहे. शैलेश मसराम असे अटक करण्यात आलेल्या कॉन्सटेबलचे नाव असून तो नागपूर शहर मुख्यालयात कार्यरत आहे. शैलेशने शेतात लपवून ठेवलेले दोन कोटी रुपये हस्तगत केले असून त्याची चौकशी सुरू आहे.
  March 12, 12:32 PM
 • नागपूर- शहरातील गोकूळ पेठमधील दोन कुटूंबात शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका बंगल्याला आग लावण्यात आली. त्या सुमारे अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले. आरोपी रवींद्र उर्फ मुन्नू यादव (36 ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यादव याचा दुधाचा व्यवसाय आहे . त्याचे जनावरांना बांधण्यावरून नेहमी शेजारी राहणार्या लोकांसोबत वाद होत होता. रवींद्र यादव याच्या शेजारी राजेंद्र दुबे हे राहतात. रवींद्र याचे दुबे यांच्या पत्नीसोबत जनावरे बांधण्यावरून...
  March 11, 05:50 PM
 • अमरावती- आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जमिनीत गाडून टाकून राज्यात पुन्हा एकदा युतीची सत्ता आणण्याचा निर्धार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अमरावती येथील जाहीर सभेत व्यक्त केला. सोबत येण्याची इच्छा असेल त्यांना घेऊन लढणार असल्याचे स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांनी या वेळी अप्रत्यक्षपणे मनसेप्रमुख राज ठाकरे यांना आवाहन केले. सभेत बोलताना उद्धव म्हणाले की, राज्याचा आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल आणि विदर्भातील जनताच तो करील. केंद्रीय...
  March 10, 04:57 AM
 • भंडारा- जिल्ह्यातील तीन अल्पवयीन बहिणींचा मृत्यू घातपाताचा प्रकार नसून अपघात असल्याचा अहवाल शनिवारी फॉरेन्सिक विभागाने दिल्याने या प्रकरणातील गुंता वाढला आहे. या मुलींवर बलात्कार झाला नसल्याचेही अहवालात म्हटले आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. पाठक यांनी घटनेनंतर 24 दिवसांनी पोलिस महानिरीक्षकांकडे अहवाल सादर केला आहे. मुलींचा मृत्यू बुडून झाल्याचे अहवालात नमूद आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर बलात्कार करून मुलींची हत्या झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट...
  March 10, 04:53 AM
 • सावनेर - पाटणसावंगी गावाजवळ झालेल्या सुमो आणि दुचाकीच्या अपघातात गर्भवती महिलेसह पतीचा मृत्यू झाला आहे. सावनेरहून नागपूरकडे निघालेल्या सुमोने पाटणसावंगी जवळ विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला जोरदार टक्कर दिली. यात दुचाकीस्वार आणि त्याची गर्भवती पत्नी ठार झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरला निघालेली सुमो (एम-एच-४९-बी-२६०७) अतिशय वेगात होती. तिचा चालक संजय कुमरे मद्यप्राशन करुन गाडी चालवत होता. त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने समोरुन येणा-या हिरो होंडा मोटर सायकलला...
  March 9, 12:33 PM
 • अमरावती - शहरातील एका आयुर्वेद महाविद्यालयाची मान्यता रद्द झाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी कॉलेजची तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी घडली. काही दिवसांपूर्वी निकष न पूर्ण केल्याने या महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात आली. याबाबत माहिती मिळताच संतापलेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाकडे याचा जाब विचारला. मात्र, योग्य उत्तर न मिळाल्याने त्यांनी कॉलेजमधील संगणक, फर्निचरची मोडतोड केली. घटनेनंतर पोलिसांना परिस्थिती नियत्रंणात आणल्याचे सूत्रांनी सांगितले.
  March 9, 05:28 AM
 • गडचिरोली - सध्या देशात गाजत असलेल्या भंडारा येथील तीन अल्पवयीन बहिणींच्या बलात्कार आणि खून प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने सुरू असून लवकरच यातील दोषी आरोपींना अटक करण्यात येईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी सांगितले. 16 फेब्रुवारी रोजी भंडारा येथील मुरमाडी गावातील तीन अल्पवयीन सख्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. बुधवारी या प्रकरणी मृत मुलींच्या आई आणि आजोबांची पोलिसांनी चौकशी केली. या प्रकरणात मुरमाडीतील...
  March 7, 04:16 AM
 • नागपूर - नागपुरातील एका शाळेच्या आवारातच एका 12 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्काराची खळबळजनक घटना घडली आहे. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय तपासणीमध्ये बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या 24 तासांमध्ये बलात्काराची ही तिसरी घटना आहे. याप्रकरणी मुलीच्या घराजवळ राहणारा 24 वर्षीय तरुण नंदकिशोर बावनकर याला अटक करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी आज सकाळी शाळेत प्रवेश करत असतानाच एका अज्ञात व्यक्तीने तिला उचलून नेले. तिला त्याने शाळेच्याच आवरात नेऊन...
  March 6, 04:24 PM
 • नागपूर - महिला व युवतींची छेड काढून परिसरात प्रचंड दहशत माजविणा-या आरोपीला मागील वर्षी ठेचून मारणा-या जमावाने सोमवारी नागपूर न्यायालयाबाहेर दगडफेक करून आरोपीच्या भावालाही फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या हल्ल्यात पोलिसांच्या गाडीचे नुकसान झाले. वसंतराव नाईक झोपडपट्टीतील इकबाल शेख व अक्रम ऊर्फ भु-या शेख या दोन भावांची शहरात प्रचंड दहशत होती. महिला, युवतींचीही ते नेहमी छेड काढायचे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने संतापलेल्या जमावाने 9 ऑक्टोबर 2012 रोजी...
  March 5, 06:35 AM
 • अकोला- मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी संख्याबळ आणि लोकांचा विश्वास मिळवावा लागतो. नुसते बोलून चालत नाही, असा टोला कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना लगावला. अकोला येथे कॉँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, चिटणीस अनिस अहमद, शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, समाज कल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत आदी नेते उपस्थित होते....
  March 3, 01:19 AM
 • भंडारा- जिल्ह्यातील मुरमाडी येथील तीन बहिणींचा अत्याचार करून खून करण्यात आला. या घटनेला 15 दिवस उलटले तरी आरोपींचा शोध घेण्यात यश आलेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेतले जात आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपींची माहिती देणार्यास एक लाखाचे इनाम जाहीर केले. मुरमाडी परिसरातील लाखनी व इतर गावांत पोलिसांनी सूचनापेट्याही लावल्या आहेत. ज्यांना या हत्याकांडाबाबत माहिती असेल त्यांनी या चिठ्ठीत ती द्यावी, संबंधितांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. 14...
  March 3, 12:48 AM
 • वर्धा - सेवाग्राम आश्रमातील बापुकुटी दिवसेंदिवस वादाच्या भोव-यात सापडत आहे. तीन वर्षांपूर्वी महात्मा गांधीजींचा चष्मा चोरी झाला होता. त्यानंतर पर्स चोरी आणि आता ताजे प्रकरण महिला कर्मचा-याच्या विनयभंगाचे घडले आहे. अशा घटनांमुळे सेवाग्राम आश्रमाची प्रतिमा मलिन होत आहे. शांती, अहिंसा यासाठी ओळखल्या जाणा-या गांधीजींच्या आश्रमात एकमेकांवर चिखलफेकीचे राजकारण सध्या सुरु आहे. दरम्यान गुरुवारी रात्री एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. बापुकुटीजवळ एक महिला आणि एक तरुण बोलत उभे...
  March 2, 02:28 PM
 • नागपूर - विदर्भातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एक खिडकी योजना लवकर लागू केली जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी अॅडव्हांटेज विदर्भ या गुंतवणूकदारांच्या परिषदेत मंगळवारी केली. विदर्भातील उद्योगाच्या सर्व अडचणी दूर केल्या जातील, असे आश्वासन राणे यांनी दिले. अॅडव्हांटेज विदर्भच्या समारोपात राणे म्हणाले की, विदर्भातील उद्योगासाठी शेजारी राज्यापेक्षा कमी दरात वीज उपलब्ध केली जाईल. विकास साध्य करण्यासाठी या भागातील नागरिकांनी उद्योगपतींसोबत काम करणे आवश्यक आहे....
  February 27, 06:48 AM
 • नागपूर - नागपूरमध्ये पहिले अरविंद कृषी मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. माजी कृषिमंत्री रणजित देशमुख यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून विद्यापीठाला त्यांच्या वडिलांचे नाव देण्यात आले आहे. शेतकरी आत्महत्या व अपु-या पावसामुळे गेल्या काही वर्षांपासून मी अस्वस्थ होतो, त्यामुळे विद्यापीठासाठी प्रयत्न सुरू केले, अशी माहिती देशमुख यांनी दिली. कृषितज्ज्ञांच्या सहभागातून विद्यापीठ शेतक-यांना प्रशिक्षण देणार आहे. विदर्भात सुरुवात केल्यानंतर संपूर्ण देशात केंदे्र स्थापन केली...
  February 27, 03:21 AM
 • नागपूर - विदर्भाच्या औद्योगिक विकासाला पोषक वातावरण निर्माण करण्यासोबत उद्योजकांनाही विशेष सवलती व दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून या भागाच्या औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देण्यात येईल. अॅडव्हान्टेज विदर्भ ही गुंतवणूकदारांची परिषद दरवर्षी आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी दिली. पहिल्याच दिवशी विदर्भात 18 हजार 461 कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रस्तावावर सामंजस्य करार झाले. अॅडव्हांटेज विदर्भ ही औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूकदारांची...
  February 26, 09:57 AM
 • नागपूर- भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष हेमंत दियेवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला. दियेवार यांनी मृत्यूशी झुंज दिली. परंतु, अखेर त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री 9 वाजता शहरातील शंकरनकर चौकात घडली. विदर्भ विकास परिषदेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांसह जवळपास अर्धे मंत्रिमंडळ शहरात असताना गुंडांकडून भरचौकात अशाप्रकारे गोळीबार करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मोटरसायकलवर आलेल्या दोन गुंडांनी दियेवार यांच्या गोळीबार केला. प्रॉपर्टी डीलर...
  February 25, 09:44 AM
 • भंडारा- भंडाऱ्यामधल्या तीन अल्पवयीन मुलींच्या अमानवी बलात्कार आणि हत्या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. या मुलींच्या आईने सासू, सास-यांवरच हत्येचा आरोप केला आहे. या प्रकरणी लाखनी पोलिसांनी रात्री या दोघांना चौकशीसाठी बोलावून घेतले होते. परंतु, नंतर त्यांना सोडून देण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी माहिती देणा-यास पोलिसांनी 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तर मुख्यमंत्र्यांनी मुलींच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे. भंडारा जिल्ह्यात 14 फेब्रुवारीला बेपत्ता झालेल्या...
  February 22, 11:58 AM
 • नागपूर - योगिता ठाकरे या सातवर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने दुस-यांदा सादर केलेला गोपनीय अहवाल (क्लोजर रिपोर्ट) न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला. या प्रकरणाच्या तपासावर आता न्यायालयाचे नियंत्रण राहणार आहे. 2009 मध्ये नागपूरमध्ये गडकरी यांच्या मालकीच्या कारमध्ये योगिताचा मृतदेह सापडला होता. आपल्या मुलीचा खून झाल्याचा संशय व्यक्त करून तिच्या आईने सखोल चौकशीची मागणी केली होती. पोलिसांवर दबाव येण्याची शक्यता गृहित धरून या प्रकरणाचा तपास मे 2010 मध्ये सीआयडीकडे...
  February 22, 08:45 AM
 • चंद्रपूर- अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांची मध्य प्रदेश तसेच राजस्थानात विक्री करणार्या रॅकेटचा चंद्रपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना जेरबंद केले आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 2012 मध्ये शहरातील इंदिरानगर परिसरातून पाच मुली बेपत्ता झाल्या होत्या. मध्य प्रदेशातील मुलासोबत येथील एका मराठी मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात होते. या चौकशीतून यामागे दलालांचे रॉकेट धक्कादायक बाब समोर आली आहे. राजस्थान-मध्यप्रदेश सीमेलगतच्या गावात 30 ते 50...
  February 21, 09:01 PM
 • भंडारा - तीन अल्पवयीन मुलींची बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी भंडा-याचे पोलिस निरीक्षक प्रकाश मुंडे यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बजावले आहेत. जिल्ह्यातील मुरमाडी गावातून एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुली 14 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांनी गावाजवळील एका विहिरीत या तिघींचे मृतदेह सापडले होते. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांचा बलात्कार करून खून करण्यात आल्याचे उघड झाले. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण...
  February 21, 11:33 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात