Home >> Maharashtra >> Vidarva

Vidarva

 • नागपूर - स्वातंत्र्यापासून गेली अनेक वर्षे विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भाला आता विकासाची चाहूल लागत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (मनरेगा) राज्यातील मुख्यालय हे नागपूरला होणार आहे. याआधी राज्य सरकारने वस्त्रोद्योग संचालनालय आणि खनिकर्म संचालनालयाचे मुख्यालयही उपराजधानीतच करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, सरकारने नागपूर करारात या शहरात 26 विभागांचे मुख्यालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर 50 वर्षांनंतरही राज्य सरकारने या...
  September 9, 04:06 AM
 • भंडारा - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. या पुरामुळे 16 मार्गावरील वाहतूक बंद झाली असून जिल्ह्यातील सुमारे अडीचशे घरांची पडझडही झाली.सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्यात दणक्यात पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळपर्यंत संपलेल्या 24 तासांत साकोले येथे सर्वाधिक म्हणजे 118 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वैनगंगा नदीपात्रातून बुधवारी सकाळी 7.3 मीटर पुराचे पाणी वाहत आहे. अतिवृष्टीमुळे इतर उपनद्या व नाल्यांनाही पूर आला असून, त्यामुळे...
  September 8, 04:51 AM
 • नागपूर: गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचा वापर विशेष योजनांसाठी केला जाणार आहे. या विशेष योजनांना 30 हजार आदिवासी कुटूंबांना लाभ मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी उपाययोजनांतर्गत आर्थिक वर्ष 2011-12 साठी सुमारे 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचा वापर आदिवासी बांधवांना मुख्य समाज प्रवाहात आणण्यासाठी केला जाणार आहे. आदिवासी कुटूंबांना नागरी सुविधा पुरविणे. त्यात...
  September 7, 01:06 PM
 • नागपूर रेल्वेस्टेशनपासून जवळच व सीताबर्डी किल्ल्याच्या पूर्व उतारावर टेकडी गणेशाचे मंदिर आहे. हे मंदिर लष्करी निर्बंधित क्षेत्रात असल्याने तेथे पक्के बांधकाम करता येत नाही. हे स्थान भोसलेकालीन असावे, असे जुनेजाणते लोक सांगतात. शुक्रवार तलावाचे पाणी पूर्वी सीताबर्डी किल्ल्यापर्यंत होते व भोसले राजे नावेतून तेथे गणेश दर्शनासाठी येत, असेही सांगितले जाते. येथील गणेशामूर्ती ही भोकरीच्या झाडाखाली उघड्यावर होती. याठिकाणी पूर्वी मोठे मंदिर होते, परंतु मुस्लिम राजवटीत ते उद्ध्वस्त...
  September 7, 01:53 AM
 • नागपूर - वाढत्या महागाईला तोंड देता देता आधीच नाकीनऊ आलेल्या खासगी क्षेत्रातील कर्मचारी-कामगारांच्या हक्काच्या ईपीएफवरील व्याजाची मुदत 36 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत घटवण्याचा घाट केंद्र सरकार घालत आहे. या निर्णयामुळे शासकीय तिजोरीवरील भार काहीसा कमी होणार असला तरी हातावर पोट असलेल्या देशातील लाखो कर्मचा-यांचे मात्र नुकसानच होणार आहे. सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) केंद्र सरकार साडेनऊ टक्के व्याज देते. आपण एखाद्या कंपनीतील काम सोडल्यानंतरही या कालावधीत जमा...
  September 6, 06:05 AM
 • नागपूर - वन विभागातील वनरक्षकांच्या 184 पदांसाठी 27 हजार 863 अर्ज प्राप्त झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील 73 पदासाठी सर्वाधिक 14 हजार 887 अर्ज आले आहेत. विक्रमी अर्ज आल्याने वन्यजीवांसाठी अतिसंवेदनशील भागात कार्यरत कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी वनरक्षकांना अर्जाची छाननी करण्यासाठी मुख्यालयात बोलवण्यात आले. या पदासाठी केवळ 12 वी उर्त्तीर्णची पात्रता असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहेत.
  September 5, 12:52 AM
 • अमरावती - राजापेठ पोलिस स्टेशनच्या लॉकअप मधून एक आरोपी फरार झाला आहे. संकेत गोविंदराव ठक्कर (३०) असे त्याचे नाव असून स्वागतम् कॉलनी, गोपाळनगर भागात तो पळून गेला आहे. त्यामुळे पोलिसांची मोठी नाचक्की झाली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला असून त्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. संकेत ठक्कर पळून गेला तेव्हा कर्तव्यावर असलेल्या ४ पोलिसांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या कडे पाठविण्यात आला आहे. आरोपी संकेत आणि त्याचा साथीदार अंकुश दादाराव रंधवे (१९) यांना बॅग...
  September 3, 01:14 PM
 • नागपूर: राज्यात मोठ्या प्रमाणात फोफावणा-या शिक्षण संस्थांचा बाजार रोखण्यासाठी शासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे गेल्या पाच वर्षांत महाविद्यालयांत सरासरी रिक्त राहणारी विद्यार्थी संख्या त्यांच्या कोट्यातून कमी करण्यात येणार आहे. उच्च शिक्षण विभागाचा याबाबत अहवाल येताच कारवाई केली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयांतील एकूण प्रवेश क्षमतेच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या तोकडीच असल्याचे दिसून येते. ग्रामीण...
  September 1, 12:45 AM
 • यवतमाळ: केंद्र सरकारने सन २०११-१२साठी कापसाच्या आधारभूत किमतीत ३० टक्के वाढ करत ३१५० रुपयांहून ३३०० रुपये भाव घोषित केला आहे. सरकारने गेल्या दोन वर्षांमध्ये आधारभूत किमतीमध्ये वाढ केली नाही. मात्र, कापसाचे बियाणे, खत आणि वाढत्या मजुरीत वाढ झाल्याने सरकारने आधारभूत किंमत ६ हजार रुपये करावी, अशी मागणी होत आहे. कापूस पणन महासंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या संदर्भातील ठराव मंजूर केला असून तो केंद्राकडे पाठविला आहे, अशी माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन. पी. हिराणी यांनी पत्रकार...
  August 31, 02:13 AM
 • नागपूर: जरीपटका भागात मंगळवारी पूर्ववैमनस्यातून दोन गटांत वाद होऊन गोळीबार करण्यात आला, त्यात तिघे गंभीर जखमी झाले. जरीपटका भागातील चावला चौकात जेटवानी कुटुंबीयांच्या मालकीच्या जागेत त्यांचे २ ते ३ व्यवसाय आहेत. या जागेजवळ बाजार रस्ता असून तिथे वाहने उभी केली जातात. यावरून कुरबुरी होत होत्या. जेटवानी कुटुंबीयांनी त्या ठिकाणी भिंत उभारली होती. मात्र, त्यास सुशील कल्याणी या वकिलाने विरोध केला. त्यामुळे जेटवानी कुटुंबीयांचे कल्याणी यांच्यासोबत भांडण झाले. या भांडणात कल्याणी यांच्या...
  August 31, 02:10 AM
 • नागपूर: राज्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी युतीच्या काळात ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, सत्ता परिवर्तन झाल्यानंतर या योजनांना आवश्यक निधी मिळाला नसल्याने त्या ठप्प झाल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ७१ पाणीपुरवठा योजना निधीअभावी बंद पडल्या आहेत. त्यातील सर्वाधिक योजना गोंदिया या आदिवासी जिल्ह्यातील आहेत.शहरासह ग्रामीण भागातही पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध व्हावे यासाठी राज्य सरकारच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने...
  August 31, 01:20 AM
 • नागपूर: रामलीला मैदानावरील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे समाजातील सर्वच घटकांची अवस्था ते आले... ते लढले... आणि ते जिंकले.. अशी झाली आहे. देशातील नामांकित मॅनेजमेंट गुरूही अण्णांच्या प्रेमात पडले आहेत. अण्णा हजारे आजच्या घडीला सामाजिक व राजकीय ब्रँड ठरले आहेत. आंदोलनाचे यश, त्यामागचे नियोजन, पडद्यामागची योजना, त्यातील सुसूत्रता, आंदोलन संपण्याची साधली गेलेली अचूक वेळ... सारेच काही अचंबित करणारे होते. त्या दृष्टीने अण्णांचे आंदोलन व्यवस्थापन क्षेत्रातील...
  August 30, 04:35 AM
 • नागपूर: प्रस्तावित नॅशनल लॉ स्कूल नागपूरहून मुंबईला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्याने विदर्भात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. ही संस्था नागपुरातच व्हावी या मागणीसाठी उच्च न्यायालयातील बार असोशिएनचे अध्यक्ष अनिल मार्डीकर यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ नुकतेच राज्यपाल के. शंकरनारायणन यांना राजभवनात भेटले. तेव्हा याविषयी आपण मुख्यमंत्र्याशी चर्चा करू, तसेच आपण मुख्यमंत्र्यांनाही भेटून चर्चा करावी, अशी सूचना राज्यपालांनी शिष्टमंडळाला केली.प्रस्तावित नॅशनल लॉ स्कूल...
  August 30, 12:16 AM
 • नागपूर: पवित्र हज यात्रा करण्याचे प्रत्येक मुस्लिमांचे स्वप्न असते. भारतामधून हजला जाणा-यांची संख्यादेखील मोठी आहे. या यात्रेसाठी मुस्लिमांसाठी यंदा कोटा वाढवण्यात आला आहे. सध्या देशात हज यात्रेसाठी जो कोटा उपलब्ध आहे त्यामध्ये १० हजारांनी वाढ करण्यात आली असून महाराष्ट्राचा कोटा दोनशेंनी वाढला आहे. हज कमिटी आॅफ इंडिया देशातील विविध राज्यांतील मुस्लिमांची संख्या लक्षात घेऊन त्या राज्यांसाठी कोटा निश्चित करणार आहे. सौदी सरकारकडे सध्या उपलब्ध असलेल्या कोट्यामध्ये ४० हजारांची वाढ...
  August 30, 12:13 AM
 • नागपूर: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नागपूरसह वर्धा, अमरावती जिल्ह्यांतील प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. तसेच वीज कोसळून वर्धा, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील तीन शेतक-यांचा मृत्यू झाला तर एक जण पुरात वाहून गेला.भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलिस ठाण्यात अंतर्गत ऊसगाव येथील शेतकरी मंजनाथ जगन्नाथ येळेकर (वय 40) हा शेतातील झाडाखाली थांबला असता झाडावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला. गडचिरोली तालुक्यातील मुधोरी येथील रमेश सोभा मंजुमकर (वय 50) शेतातून घरी येत...
  August 29, 01:54 AM
 • गडचिरोली: आज महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्यात विचारशक्ती व निर्णयक्षमता आहे. तरीदेखील दिवसेंदिवस मुलीची संख्या कमी होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी व मुली वाचविण्यासाठी समाजपरिवर्तनाची गरज असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकासमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले. लेक वाचवा तसेच केंद्र सरकार पुरस्कृत राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण योजनेचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. सरकारने मुलींना बारावीपर्यंत मोफत शिक्षणाची सोय केली आहे....
  August 29, 01:52 AM
 • अमरावती: भ्रष्टाचाराविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा प्रभाव शुक्रवारी (ता. 26) जिल्ह्यात कायम होता. दर्यापूर येथे राज्य राखीव पोलिस दलातील निवृत्त जवान श्रीकृष्ण साहेबराव गावंडे यांनी टॉवरवर चढून 'शोले स्टाइल' आंदोलन करून सगळ्याचे लक्ष वेधले. गावंदे शिवर रोडवरील एका मोबाईल कंपनीच्या टॉवरवर चढलेल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. उपविभागीय महसूल अधिकारी विनोद शिरभाते आणि पोलिसांनी त्यांची समजून घातल्यानंतर ते खाली उतरले. दुसरीकडे अमरावती...
  August 27, 04:40 PM
 • नागपूर- कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भात शु्क्रवारी (ता.26) तीन शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. चंद्रपूर, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी एका शेतकर्याचा यात समावेश आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव येथील भोजराज मारोती नवघडे (38) त्यांच्यावर बॅंक आणि सेवा सहकारी सोसायटीचे 50 हजार रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडायचे याची चिंता त्यांना होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी रोवणीची कामे केली; मात्र मजुरांना पैसे कोठून द्यायचे, हा प्रश्न त्यांना पडला...
  August 27, 03:00 PM
 • नागपूर - राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरून काढण्यासाठी शासनाने याबाबतच्या नियमात शिथिलता आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे या महाविद्यालयातील प्राध्यापकांना आता पदोन्नतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. याबाबतचा प्रस्ताव मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे (एमसीआय) पाठविण्यात आला असून त्यांनी हिरवा झेंडा दाखविताच त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे.या निर्णयाचा राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील अधिव्याख्याता, सहयोगी...
  August 27, 01:40 AM
 • नागपूर - दूरसंचारचा वाढता पसारा, इंटरनेटने व्यापलेल्या जाळ्यात टपाल खात्याचा श्वास कोंडला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागात असणारा बँकांचा अभाव आणि कर्जाची असुविधा यालाच संधी मानत आता टपाल खात्याला बँकांचे स्वरूप दिले जात आहे. या बदलाकडे टपाल खात्याचा व्यावसायिक चेहरा म्हणून बघितले जात आहे. टपाल खात्याच्या बँकिंग सुविधेचा ग्रामीण भागातील नागरिकांना थेट लाभ मिळणार आहे. असे असले तरी ही व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी अनेक अडथळे पार करावे...
  August 26, 01:40 AM
 
जाहिरात

RECOMMENDED