जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva

Vidarva

 • नागपूर - मिहान प्रकल्पग्रसांना विकसित जमीन दिली जाणार असून तसा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवणार असल्याचे एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक युपीएस मदान यांनी सांगितले आहे. शनिवारी मदान यांनी दिवसभर विभागीय आयुक्त कार्यालयात प्रकल्पग्रस्तांसोबत चर्चा केली. यावेळी बहुतेक जणांनी विकसित जमीन देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन एका महिन्यात या एकाच विषयावर तीनवेळा बैठका घेण्यात आल्या आहेत. शनिवारची बैठक ही शेवटची बैठक होती, आता यानंतर आठ दिवसांत मंत्रीमंडळासमोर अहवाल...
  June 19, 04:13 PM
 • नागपूर - गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या मान्सूनने विदर्भाच्या सीमेत प्रवेश केला आहे. हवामान खात्यानुसार येणाऱ्या दोन दिवसात विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे.हवामान खात्यानुसार मंगळवारी (ता.१९) रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे, पुढे दोन दिवस हा पाऊस चालू राहण्याची शक्यता आहे. उत्तर बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भात मान्सून दाखल झाला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियामध्ये या आधीच मान्सून आल्याची आधिकारिक घोषणा करण्यात आली आहे.
  June 19, 04:01 PM
 • गोंदिया - नक्षलग्रस्त भागात कर्मचा-यांची जाणवणारी कमतरता आणि त्यामुळे विकासाला बसणारी खीळ ही कोंडी लवकरच फोडण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स्यव्यवसाय विकास विभागाचे मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिली आहे. राज्यातील मत्स्यव्यवसाय,पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातील रिक्तपदे भरण्याची कार्यवाही सुरु केली असून, येत्या दोन महिन्यात ही पदे भरली जाणार आहेत. असे चव्हाण यांनी येथील विश्रामगृहावर आयोजित आढावा बैठकीत म्हटले आहे. चव्हाण पुढे म्हणाले की, गोंदिया...
  June 18, 05:29 PM
 • नागपूर - जिल्ह्यातील ७३ गावे धोकादायक आणि ७९ गावे रेड झोन घोषीत करण्यात आली आहेत. नागपूरमध्ये होणा-या पावसाने या गावांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. येथे पुनर्वसनाची कामे सुरु आहे. मात्र सध्यातरी या गावक-यांना पाऊस आल्यानंतर आपले बि-हाड पाठीवर टाकून सुरक्षित स्थळ शोधण्याची कसरत करावी लागत आहे. नागपूरमध्ये नदी-नाल्यांच्या किना-यावर असणारी गावे मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्यात या गावांमध्ये पाणी घुसण्याचे आणि पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. जिल्हा...
  June 18, 11:09 AM
 • बुलडाणा: सोयीसुविधांच्या बाबतीत कायम मागास असलेल्या विदर्भातील समस्यांकडे राज्य शासनाचे फारसे गांभीर्याने लक्ष नसल्याचा आरोप होत असला तरी मिळालेला निधी विकासकामांवर खर्च करण्यात प्रशासनही अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचाह अनुभव आजवर विदर्भवासीयांना आला आहे. गेल्या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे ३०२ रस्ते आणि १४९ पूल नादुरुस्त झाले असून, ते दुरुस्त करण्यासाठी अपेक्षित निधी मिळालेला नाही. जो निधी मिळाला तोही खर्च झाला नसल्याचे दिसून येते. बुलडाणा...
  June 18, 02:00 AM
 • नागपूर: येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात जवळपास महिनाभर गाजलेल्या रॅगिंग प्रकरणात केवळ एका विद्यार्थ्याला दोषी ठरवण्यात आले आहे. या विद्यार्थ्याला तीन महिन्यांसाठी कॉलेजमधून निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई करताना कॉलेज प्रशासनाने कमालीची गुप्तता बाळगली होती. दरम्यान, दंत महाविद्यालयातील अॅण्टी रॅगिंग कमिटीला अंधारात ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. या महाविद्यालयातील चिराग भावसार या विद्यार्थ्याची पाच विद्यार्थ्यांनी...
  June 18, 01:52 AM
 • नागपूर - कुख्यात गुन्हेगार राहुल मेश्रामवर गुरवारी हिवरेनगर भागात सशस्त्र हल्ला करण्यात आला. राहुलला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. राहुल मेश्रामवर या आधीही खून, चोरी, मारामारी या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी मनोज हाडगेच्या मित्राच्या खुनामध्ये राहुल मेश्रामचे नाव समोर आले होते, असे सांगण्यात येत आहे कि मनोजनेच बदला घेण्यासाठी राहुल मेश्रामवर हल्ला केला असावा. नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची चौकशी चालू आहे.
  June 17, 06:33 PM
 • नागपूर - शहर परिसरातील चौकांमध्ये लागलेले सिग्नल शो पीस झाले आहेत. काही सिग्नल तुटलेले आहेत तर काही बंद आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. महानगरपालिकेने सिग्नलच्या नुतनीकरणासाठी एका खाजगी कंपनीला ३ करोड रुपयांचे काम दिले आहे. पण अजून त्या कंपनीने काम सुरु केलेले नाही. सिग्नल खराब असल्यामुळे चौकांमध्ये अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे. कोणी स्वतःला वाचवत आहे, तर कोणी बेधडक गाडी चालवत आहे. ज्या चौकात पोलीस नाहीत तेथे वाहन चालक भरधाव वेगात गाड्या चालून अपघातांना निमंत्रण देत आहेत.
  June 17, 06:32 PM
 • नागपूर - महाराष्ट्र शासनाने 15 वर्ष जून्या स्कूल बस बंद करण्याचा आदेश दिली आहे. तसेच स्कूल बस चालवण्या संबंधी मार्च 2011 मध्ये नवे नियमही लागू करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे स्कूल बस चालक नाराज आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार नागपूर शहरात 70 आणि ग्रामीण भागात जवळजवळ 80 बस या 15 वर्ष जून्या आहेत. शासनाच्या या नव्या निर्णयावर फेर विचार व्हावा यासाठी स्कूल बस चालक आणि परिवहन आयुक्त याच्यात नुकतीच बैठक झाली यावेळी शिक्षण संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या बैठकीत बस चालकांनी 15...
  June 16, 09:55 AM
 • वर्धा: सेवाग्राममधील बापू कुटीतून रहस्यमरीत्या गायब झालेल्या महात्मा गांधींच्या ऐतिहासिक चष्म्याची किंमत फक्त २०० रुपये आहे! ज्या चष्म्यातून बापूजी जगाकडे अत्यंत प्रेमाने पाहात असत, त्या चष्म्याची व्यावहारिक किंमत पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत २०० रुपये एवढी लावण्यात आली आहे. सेवाग्राम प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती मल्हारराव गडकरी यांनी तब्बल ७ महिन्यांनी ही तक्रार नोंदविली आहे. दुसरीकडे आंतरराष्टीय बाजाराात बापूजींच्या या चष्म्याची किंमत लाखो रुपये सांगितली जाते. २०...
  June 16, 07:42 AM
 • अकोला: सीईटी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे नैराश्यातून रुचिका मेटकर या विद्यार्थिनीने बुधवारी आत्महत्या केली. अकोला येथील रहिवासी असणाया रुचिकाला वैद्यकीय शाखेत प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी तिने गेल्या वर्षी पहिल्यांदा सीईटी परीक्षा दिली होती. मात्र, त्यावेळेस कमी गुण मिळाल्यामुळे यावर्षी पुन्हा परीक्षा दिली होती. मंगळवारी सीईटीचा निकाल जाहीर झाला यामध्ये रुचिकाला १६५ गुण मिळाले. हे गुण मेडिकल प्रवेशासाठी पुरेसे नाहीत, या समजुतीतून तिने आत्महत्या केली. दरम्यान, यानंतर पोलिसांना...
  June 16, 03:32 AM
 • वाशीम: हिंगोली जिल्ह्यातील वाढोणा येथील पारधी समाजातील युवकाला रिसोड पोलिसांनी कोठडीत बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास करणा-या अमरावती सीआयडीच्या पथकाने मंगळवारी रिसोडच्या पोलिस निरीक्षकासह नऊ पोलिस कर्मचा-यांवर खुनाचा व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोन पोलिसांना ताब्यातही घेतले असून इतर आरोपी फरारी आहेत. ९ मे रोजी रिसोड पोलिसांनी सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील पारधी समाजातील युवक बेंग्या नैनू ऊर्फ जगन पवार (वय २५), राजू शेषराव पवार (वय २८)...
  June 16, 02:43 AM
 • वर्धा - सेवाग्राम आश्रमात असलेला महात्मा गांधीजींचा चष्मा चोरीला गेल्याचे प्रकरण साडेतीन महिन्यांनंतर उघडकीस आले. या प्रकाराची चर्चा सुरू असल्याने आता या चष्म्याचा शोध घेण्याची जबाबदारी सीआयडीकडे सोपविली आहे. गांधीजींच्या शिष्या निर्मलाबेन यांनी भेट दिलेला हा चष्मा फेब्रुवारी महिन्यातच चोरीला गेल्याचे आश्रमाच्या वतीने सांगण्यात आले. सेवाग्राम आश्रमाचा हीरक महोत्सव तीन दिवसांवर आला आहे. याच दरम्यान ही चोरीची बाब उघड झाल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले...
  June 15, 06:51 PM
 • नागपूर - शिक्षण विभाग आणि महाराष्ट नॉलेज कॉर्पोशन (एमकेसीएल) यांच्यातील डीटीएड (शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम) प्रवेश प्रक्रियेसंदर्भात करार संपुष्टात आल्याने यंदाची डीटीएडची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. ही प्रक्रिया १५ जूनपासून सुरू होणार होती.गेल्या अनेक दिवसांपासून एमकेसीएल आणि शिक्षण विभागामध्ये करारासंदर्भात चर्चा सुरू होती. परंतु दोन्ही बाजूकडून योग्य तोडगा निघू न शकल्यामुळे करार मोडित निघाला. त्यामुळे एमएससीईआरटीचे अध्यक्ष डॉ. श्रीधर साळुंके यांनी सोमवारी जिल्हा शिक्षण व...
  June 15, 06:43 PM
 • शेगाव । संत गजानन महाराज संस्थानने जानेवारी महिन्यापासून सुरू केलेल्या वारकरी प्रशिक्षण शिबिरात आतापर्यंत मराठवाड्यासह राज्यातील ५२२ युवकांनी सहभाग नोंदवला आहे. टीव्ही वाहिन्यांच्या वाढत्या आक्रमणात भारतीय संस्कृतीची ओळख टिकून राहावी, या उद्देशाने वारकरी प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. अर्ध्यावर शाळा सोडलेल्या इयत्ता ८ किंवा १० वीच्या गरीब मुलांना तसेच १४ ते ३० वयोगटातील तरुणांना शिबिरात सहभागी करून घेतले जाते. यावर्षी २७ जानेवारीपासून शिबिरास प्रारंभ झाला. अकोला, बुलढाणा,...
  June 15, 06:26 PM
 • अकोला - रुचिका मेटकर या विद्यार्थिनीने सीईटीमध्ये कमी गुण मिळाल्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. वैद्यकीय शाखेत प्रवेश घेण्यासाठी याआधीही गेल्या वर्षी पहिल्यांदा तिनं सीईटी दिली होती. परंतु, त्यात कमी गुण मिळाल्यानं ती यंदा पुन्हा परीक्षेला बसली होती. काल जाहीर झालेल्या निकालात रुचिकाला कमी गुण मिळाले होते. रुचिका हा धक्का सहन करू शकली नाही. राहत्या घरी गळफास लावून रुचिकाने आत्महत्या केली.
  June 15, 12:32 PM
 • अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासींमध्ये कुपोषणाचे प्रमाण काही केल्या कमी होत नाही. कुपोषणमुक्तीच्या नावाखाली केंद्र व राज्य सरकारने या भागात कोट्यवधी रुपयांचा निधी दिला, मात्र तरीही मागील वर्षभरात मेळघाटातील ८४४ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. धारणी व चिखलदरा तालुक्यात तर गेल्या दोन महिन्यांत ६७ बालके याच कारणामुळे दगावली. या पार्श्वभूमीवर आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान मेळघाट परिसरातील आदिवासी भागाचा दौरा करणार आहेत. मात्र या भागात सर्व काही आलबेल आहे असे...
  June 13, 02:26 AM
 • अमरावती: पावसाचे आगमन होताच शेतकयांना वेध लागतात ते पेरणीचे. सध्या विदर्भात मोठ्या प्रमाणावर पेरणीची कामे शेतक-यांनी सुरू केली असली तरी बाजारात बियाणे व खतांची कृत्रिम टंचाई असल्याने त्यांना सोयाबीनसह इतर बियाणांचे वाण व हवी ती खते मिळेनाशी झाली आहेत. तर दुसरीकडे कृषी विक्रेते या बियाणांची दलालांच्या मदतीने काळ्याबाजारात विक्री करून मलिदा लाटत आहेत. विदर्भात खते व बियाणांचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार दरवर्षीच होतो. अमरावतीतील जुन्या कॉटन मार्केटमधील संतोष ट्रेडर्स या दुकानात...
  June 13, 01:51 AM
 • नागपूर । अनेक वर्षे काँग्रेससोबत असलेल्या रामदास आठवले यांना आत्ताच हिंदुत्व का आठवले? भाजप- शिवसेनेचे हिंदुत्व त्यांना मान्य आहे का? असा सवाल करतानाच राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शिवशक्ती- भीमशक्तीच्या उदयाच्या अधीच अस्त झाला आहे. निवडणूक लागू द्या, युतीवाल्यांना रामदास आठवणार नाहीत. अशी मार्मिक टीकाही राणे यांनी केली. नागपुरात आले असता, पत्रकारांसोबत बोलताना राणे म्हणाले की, दलित मतदार हा नेहमीच काँग्रेससोबत राहिला आहे. काँग्रेसनेदेखील त्यांच्यासाठी विविध योजना...
  June 12, 08:02 PM
 • नागपूर- रामदेव बाबा व अण्णा हजारे यांच्याही संपत्तीची व त्यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांनी पत्रकार परिषदेत केली. धोटे म्हणाले, बाबा रामदेव व सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यासह सर्व साधू, संत, संन्याशी व स्वतःला समाजसेवक म्हणवणारे त्या सगळ्यांची संपत्ती व त्यांना सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्नाची चौकशी करावी. नेत्यांवर भ्रष्ट्राचार व काळा पैसा असल्याचा आरोप लावणारे बाबा रामदेव यांची संपती ११०० करोड रुपये आहे. एवढी संपत्ती...
  June 12, 07:08 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात