जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकोट (जि. अकोला) -मराठवाड्याप्रमाणे विदर्भालाही दुष्काळाचे चटके बसत अाहेत. सातपुडा डाेंगराच्या पायथ्याशी असलेला अकोट (जि. अकाेला) तालुकाही त्याला अपवाद नाही.या तालुक्यातील बोर्डी, रामपूर, शिनपूर, सुकडी या गावांची तहान टँकरद्वारे भागवली जाते. परंतु केवळ दीड हजार लोकवस्तीच्या बोर्डी येथील ग्रामस्थांनी गल्लोगल्ली सुमारे ५० बोअरवेल स्वखर्चाने खोदून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला अाहे. इथले लोक भूगर्भातील पाणी अक्षरशः ओरबाडून काढत आहेत. या पाण्याद्वारे गावकऱ्यांची तहान भागत असली तरी...
  May 20, 10:22 AM
 • लोहारा -शेतजमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात करण्यात आलेल्या मारहाणीत एका माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिलांसह चौघे गंभीर जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना लोहारा तालुक्यातील कास्ती (बुद्रुक) येथे मंगळवारी रात्री घडली. लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील माजी सैनिक बालाजी भगवान कवठे (५०) हे सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी त्यांची सासरवाडी म्हणजेच कास्ती (बुुद्रुक) शिवारात मनोहर हरिपंत राकेलकर यांची पाच एकर ११ गुंठे शेतजमीन खरेदी केली. याच शेतात...
  May 16, 08:40 AM
 • अकोला - आधी पावसाअभावी पिके नाहीत. त्यातही जे काही पीक हाती लागले त्याला याेग्य भाव मिळेना. काढणीचा पैसाही निघत नसल्याने पिकांवर नांगर फिरवल्याच्या विदारक घटना राज्यात अनेक ठिकाणी घडत आहेत. तेल्हारा तालुकाही त्याला अपवाद नाही. येथील केळी परदेशात निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र यंदा दुष्काळामुळे विहिरी, बोअरने तळ गाठले. लाखो रुपये खर्च करून जगवलेली केळीची झाडे आता डोळ्यादेखत सुकत असल्याचे पाहून शेतकरी वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यापैकी एकाने चक्क वाळलेल्या केळीच्या शेतात गुरे सोडून...
  May 13, 09:29 AM
 • अकोला - येथील प्रसिद्ध व्यावसायिक आणि प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांचा खून करण्यात आला. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास शहरातील अशोक वाटिका चौकातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात ही हत्या झाली आहे. विशेष म्हणजे हे कार्यालय पोलिस अधिक्षकांच्या निवासस्थानापासून अगदी जवळ आहे. या हत्येमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. लाकडी फर्निचर आणि आग विझविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरने हुंडीवाले यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने हुंडीवाले यांचा जागीच मृत्यू...
  May 6, 04:24 PM
 • यवतमाळ -चंद्रपूर येथील महाकाली देवीचे दर्शन घेऊन बाळापूरकडे जाणाऱ्या जीपला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नववधूसह तीन जागीच महिला ठार, तर आठ जण जखमी झाले. हा अपघात घटना सोमवारी रात्री २ वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील मारेगावजवळ झाला. लक्ष्मीबाई भारत उपरे (५०), सारिका किसन भोपाळे (१६) आणि साक्षी देविदास उपरे (१९) अशी मृतांची नावे असून यातील साक्षी उपरे हिचा पाच दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर येथील उपरे कुटुंबीय २९ एप्रिल रोजी चंद्रपूर येथील...
  May 1, 09:33 AM
 • अकाेला -महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन साेहळ्यानिमित्त जारी झालेले िवशेष नाणे अकाेल्यातील अक्ष करन्सी या संग्रहालयात अाहे. अक्षय प्रदीप खाडे यांनी ते जपून ठेवले असून अनेक लाेक हे नाणे पाहण्यासाठी येत असतात. मुंबईत १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा साेहळा पार पडला हेता. साेहळ्यात प्रामुख्याने तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण उपस्थित हाेते. त्या दिवशी समारंभात शासनाने एक विशेष नाणे काढले होते. सदर नाणे या समारंभात...
  May 1, 08:47 AM
 • अकोला - बाळापूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या कवठा येथे एका व्यक्तीने मतदान यंत्र फोडले. मतदान यंत्राऐवजी बलेट पेपर द्वारे मतदान घ्यावे, अशी मागणी करीत त्याने इव्हीएम फोडले. कवठा-बहादूरा येथे सकाळी मतदानास प्रारंभ झाला. यावेळी मतदान केंद्रावर आलेल्या श्रीकृष्ण घ्यारे या इसमाने गोंधळ घातला. ईव्हीएम मशिनवर आपला विश्वास नसल्याचे सांगत त्याने बॅलेटद्वारे मतदान घेण्याची मागणी केली. घ्यारे याने मतदान यंत्र जमीनीवर आदळले. यामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला. बंदोबस्तावर...
  April 18, 01:47 PM
 • अमरावती-निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडनेरा ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वडगाव झिरे गावात स्फोटकांच्या साठ्यासह पोलिसांनी दोघांना अटक केली. दहशतवादविरोधी पथकाने रविवारी ही कारवाई केली. वडगाव झिरे येथील रोशन नानूजी गुज्जर विनापरवाना स्फोटक पदार्थ बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे वडगाव झिरे येथे मध्यरात्री धाड टाकून १४५ जिलेटिन कांड्या, १७८ इलेक्ट्रिक डिटोनेटर, एक डायनामोज बॉक्स व २०० मीटर इलेक्ट्रिक वायर असे साहित्य जप्त केले. लादुलाल काळुजीलाल चौधरी (काकरी खेडा,...
  April 16, 09:02 AM
 • बुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात...
  April 15, 04:57 PM
 • अकोला- वंचित बहुजन आघडीचे नेते प्रकाश आंबेडकर काही काळापासून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या वक्तव्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या आरोपामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सगळ्यात मोठे ब्लॅकमेलर असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. गांधी परिवाराचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ड वधेरांसाठी भाजपने त्यांना ब्लॅखमेल केल्याचा आरोप मोदींवर केला. शिवाय काँग्रेसने कोणासोबतच आघाडी...
  April 5, 12:20 PM
 • अकोला -अकोल्यात आज रविवारी सकाळी एका इमारतीला भीषण आग लागलीे. मोहम्मद अली रोडवरील एका जुन्या इमारतीतील जोडे-चप्पलाच्या गोदामाला ही आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी २० बंब लागले. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अग्निशामक दलाच्या गोपाल इंगळे आणि कलीम खान याला विजेचा जबर झटका बसला त्यात ते जखमी झाले आहेत. पहाटे साडे पाच वाजता ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या आगीत एक व्यक्ती जखमी झाला. मोहम्मद अली रोड हा अतिशय गजबजलेल्या लोकवस्ती आणि दुकानांचा भाग आहे. या आगीनंतर...
  March 24, 10:42 AM
 • मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद सरेंडर व्हायला तयार होता. तेव्हा शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राम जेठमलानी यांनी शरद पवार यांच्याकडे याबाबत प्रस्तावही दिला होता. मात्र, पवारांनी व्यक्तिगत पातळीवर निर्णय घेऊन प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले, असा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शरद पवार यांनी ही माहिती पंतप्रधान दिली होती का? त्यांनी व्यक्तिगत निर्णय घेतला का? आणि घेतला तर असा निर्णय घेणारे पवार कोण?, असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी...
  March 19, 03:15 PM
 • अकोला- मागील काही दिवसांपासून तळ्यात- मळ्यात सुरू असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने अखेर एमआयएमचे विद्यमान आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडी व एमआयएम यांच्यात युती असून औरंगाबादच्या जागेसाठी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला होता. परंतु, एमआयएमने या जागेसाठी दबाव वाढवल्यामुळे अखेर...
  March 17, 12:38 PM
 • अकोला- अकोल्याचे भाजपचे विद्यमान खासदार संजयशामराव धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. अकोल्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून धोत्रे यांची एन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. संजय धोत्रे यांचे तिकीट कापण्याने आहेत तणावात.. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात तिकीटासाठी संघर्ष सुरु आहे. मात्र,...
  March 16, 01:38 PM
 • अकोला- भारिप बहुजन महासंघ आता वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार असल्याची मोठी घोषणा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केली. भाजपच्या दबावाचे राजकारणामुळे देशभरात काँग्रेसची कुणासोबतही युती होत नाही. काँग्रेसची कुणासोबतही युती होऊ नये, यासाठी भाजप ब्लॅकमेलिंग करत असल्याचा घणाघाती आरोपही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला. अकोल्यात निवासस्थानी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेेस अध्यक्ष राहुल...
  March 14, 01:55 PM
 • अकोला- काँग्रेसबरोबर असलेल्या सर्व चर्चेचे प्रस्ताव संपले आहेत. आता चर्चा पुढे जाईल असे वाटत नाही. आज उद्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुखांची बैठक होणार आहे. त्यानंतर 15 मार्चला 48 उमेदवारांची यादी जाहीर केल्या जाईल. अशी घोषणा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या 22 उमेदवारांना काँग्रेसने स्वीकारावे,...
  March 12, 12:35 PM
 • दिग्रस- सात ते आठ महिन्यांपूर्वी एका मुलीची आणि मुलाची मैत्री झाली होती. तद्नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आर्णी येथील एका 19 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची तक्रार पीडितेच्या आईने दिग्रस पोलिसांत दिली. तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी तीन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्णी येथील 19 वर्षीय मुलीवर कोपरा येथील आरोपी अफरोज खान फिरोज खान याने यवतमाळ, माहूर, दिग्रस तालुक्यातील वाई-मेंढी शिवारात वारंवार अतिप्रसंग केला....
  March 8, 07:00 PM
 • अकोला- टीका करणारा प्रामाणिक असणे आवश्यक असून, सुपारी घेऊन टीका करणाऱ्यास यापुढे ठोकून काढण्यात येणार आहे, असा असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत दिला. लढाई हुकुमशाहशी असल्याने काही बाबतीत मीही हुकुमशाहच आहे, असा उच्चारही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीबाबतही त्यांनी भाष्य केले. वंचित बहुजन आघाडीने 22 जागा जाहीर केल्या असून, आता उर्वरित 26 जागांवरच चर्चा होणार असल्याचे अॅड.आंबेडकर म्हणाले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची...
  March 5, 06:19 PM
 • बिबी (बुलडाणा) - लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गावाच्या नावात असलेला चोर शब्दाचा कलंक पुसला जाणार आहे. हे गाव आता वीरपांग्रा म्हणून ओळखले जाईल. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले. यात चोरपांग्राचे नितीन राठोड यांनाही वीरमरण आहे. त्यांच्या तेरवीच्या निमित्ताने श्रद्धांजली म्हणून समस्त गावकऱ्यांनी गावाचे नाव बदलण्याचा संकल्प केला आणि हे नाव वीरपांग्रा करण्यासंबंधीचा ठराव ग्रामसभेने मंजूर केला. कित्येक दशकांपासून हे गावकरी गावाच्या नावामागे चोर असे...
  February 28, 11:47 AM
 • खामगाव- दहावीच्या परीक्षेच्या ताणामुळे तीन विद्यार्थिनींनी उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात दोघींचा मृत्यू झाला असून एकीवर अकोला येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. नयना सदाशिव शिंदे (16), निकिता अनिल रोहणकार (15), रुपाली किशोर उनवणे (15) अशी या तिघींची नावे आहेत. मिळालेली माहिती अशी की, नयना, निकिता आणि रुपाली या तिघींची येत्या 1 मार्चपासून दहावीची परीक्षा आहे. शुक्रवारी (ता.22) प्रात्याक्षिक परीक्षा दिल्यानंतर तिघींनी परीक्षेचा ताण घेतला. तिघींनी...
  February 24, 07:29 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात