Home >> Maharashtra >> Vidarva >> Amravati

Amravati News

 • अमरावती- कंपनीच्या ट्रकमधून सोयाबीनचे पोते चोरताना दिसल्यामुळे एका व्यक्तीने चोरट्यांना हटकले. यावेळी तिघापैकी एकाने हटकणाऱ्या व्यक्तीला वीट मारून जखमी केले व सोयाबिीनचे पोते लंपास केले. या प्रकरणी तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी रविवारी (दि. ११) गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दाद्या ऊर्फ अविनाश विनोद रणधीर (२१), स्वप्नील लक्ष्मण भेंडारकर (२५) आणि शैलेश नामदेव गणवीर (२३, तिघेही रा. मिलचाळ, नवीवस्ती बडनेरा) असे पोलिसांनी अटक...
  November 13, 12:34 PM
 • अमरावती- शहरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय युवकाने एका युवतीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून मागील सव्वा वर्षांपासून वारंवार तिचे शारिरीक शोषण केले. युवतीने त्याला लग्नासाठी गळ घातली तर त्याने लग्नाला नकार देऊन पीडित युवतीला मारहाण केली तसेच मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, मला टाईमपास करायचा, असे म्हणून विश्वासघात केल्याची तक्रार पीडितेने रविवारी (दि. ११) रात्री फ्रेजरपुरा पोलिसात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार व विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला आहे. स्वप्नील दादाराव घुटके (२४, रा....
  November 13, 12:14 PM
 • अमरावती-निसर्गात ऋतु नुसार बदल होतात. दरवर्षी होणारे पक्ष्यांचे स्थलांतर हा बदलाचाच एक भाग आहे. हिवाळ्यात शहराच्या आजूबाजूला असलेल्या जलाशयावर ही अनेक दूरदेशीचे पाहुणे पक्षी स्थलांतर करून येतात. दरम्यान, शहरापासून जवळच असलेल्या सावर्डीनजीकच्या तलावावर वन्य अभ्यासकांना मंगोलियावरून आलेल्या राजहंसाचे दर्शन काही दिवसांपूर्वीच घडले आहेत. राजहंस, सोनटीटवा, रफ, काळ्या पोटाचा सूरय, शेंडी बदक, वूड सँडपायपर, युरेशियन कर्लू, पिन टेल असे स्थलांतरित पक्षी काही दिवसांपूर्वीच वन्यजीव...
  November 12, 12:18 PM
 • अमरावती- एका ठकाने बँक ऑफ महाराष्ट्राच्या राठीनगर शाखेत फोन करून शहरातील एका नामांकित व्यापाऱ्याचे नाव वापरून एका व्यक्तीला ८ लाख ४० हजार रुपयांची आरटीजीएसद्वारे रक्कम ट्रान्सफर करण्याची विनंती बँक अधिकाऱ्यांना केली. या वेळी बँक अधिकाऱ्याने केवळ एका ईमेलच्या आधारे सदर रक्कम ट्रान्सफर केली. मात्र काही वेळातच ज्या व्यापाऱ्याच्या खात्यातून रक्कम कमी झाली, त्याने बँकेसोबत संपर्क करून सदर रक्कम आपण ट्रान्सफर करायला सांगितली नव्हती. हे स्पष्ट झाल्यावर बँकेची फसगत झाल्याचे...
  November 7, 10:54 AM
 • अमरावती- शहरासह परिसरात गुटख्याचा पुरवठा होणाऱ्या बेलोरा येथील गोदामात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाल्यामुळे अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्याने पोलिसांच्या मदतीने शनिवारी (दि. ३) उशिरा रात्री गोदामावर धाड टाकली. यावेळी रात्रभर सुरू असलेल्या कारवाईत तब्बल ४४ लाख ४६ हजार रुपयांचा गुुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मागील अनेक वर्षांपासून राज्यात गुटखा विक्रीवर नियमानुसार बंदी आहे. असे असतानाही शहरात सर्रासपणे गुटखा...
  November 5, 10:33 AM
 • अमरावती-बेमुरवत प्रशासन व जन प्रतिनिधींच्या कर्तव्य शून्यतेमुळे अमृत योजनेच्या मुख्य कंत्राटदाराचे एका पेक्षा एक नमुने समोर येत अाहेत. मुख्य कंत्राटदाराने उपकंत्राटदार नेमणे बेकायदेशीर असताना त्यांची नेमणूक करून कामाचे लाखो रुपये थकवल्याने संतप्त झालेल्या या उपकंत्राटदारांनी मुख्य कंत्राटदार पी. एल. आडके यांच्या कार्यालयालाच बुधवारी कुलूप ठोकले. कामे पूर्ण करूनही ऐन दिवाळीच्या तोंडावर आडके यांनी बिले न दिल्याने सर्व उपकंत्राटदार कमालीचे चिडल्याचे आज दिसून आले. दरम्यान...
  November 1, 11:56 AM
 • अमरावती- एका ३८ वर्षीय विवाहित महिलेची चंद्रपूरला राहणाऱ्या आपल्यापेक्षा कमी वयाच्या युवकासोबत ओळख झाली व नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. यातच युवकाने वारंवार शारीरिक शोषण केले. दरम्यान या प्रकारामुळे विवाहितेला पतीने सोडून दिले. मात्र ऐनवेळी त्या युवकाने ही विवाहितेला लग्नासाठी नकार दिला. या प्रकारामुळे पीडित महिलेने मंगळवारी (दि. ३०) गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून युवकाविरुध्द बलात्काराचा व त्याच्या तीन नातेवाइकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा...
  October 31, 12:15 PM
 • अमरावती- दर्यापूर ते भातकुली मार्गावरील सायत गावाजवळ सोमवारी (दि. २९) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दर्यापूरातील रहिवासी एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. या प्र्रकरणी भातकुली पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आनंद संतोषराव काठोळे (२२, रा. साईनगर, दर्यापूर) असे मृतक तर शुभम गजानन कुंभारकर (रा. दर्यापूर) असे जखमी युवकाचे नाव आहे. आनंद व शुभम हे दोघे मित्र असून त्यांच्या मोपेड दुचाकीला अज्ञात वाहनाने...
  October 31, 12:08 PM
 • अमरावती- शहरातील राजेंद्र महादेव चौधरी व सुनील पंत नावाच्या दोन अवैध सावकाराच्या घरावर सहकार विभागाने धाडी टाकून पोलिसात तक्रार दिली होती. सहकार विभागाने ज्या तक्रारदाराच्या तक्रारीवरून अवैध सावकारांविरुद्ध कारवाई केली. त्या तक्रारदाराने चौधरीकडून अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या अडीच लाखांचे चौधरीने तब्बल २० लाख रुपये अवघ्या दोन वर्षांत वसूल केल्याचे तक्रारदाराने आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सोमवारी (दि. २९) दिलेल्या बयाणात नमूद केले आहे. शहरातील रहिवासी व...
  October 30, 11:28 AM
 • अमरावती- राममंदिराचा विषय भाजपने सोडला नाही. मात्र, विकासाच्या मुद्द्यावर आगामी निवडणुका लढवणार आहे. तर, भाजप आणि शिवसेनेची युती व्हावी, ही जनतेची अपेक्षा असल्याची भावना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त दिली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी दानवे अमरावतीत आले होते. या वेळी एका पत्रकार परिषदेत दानवे म्हणाले, केंद्रात भाजपचे बहुमत असले तरी राममंदिर बांधण्यासाठी घटनात्मक तरतूद करावी लागणार आहे. 25 वर्षांत...
  October 29, 06:36 PM
 • तिवसा - चंद्रपूर जिल्ह्यामधील वरोरा येथून निघालेल्या वाघाने धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर व अंजनसिंगी येथील दोघांसह काही जनावरांचा बळी घेतल्यानंतर बुधवारी मध्यरात्री तो तिवसा तालुक्यातील रघुनाथपूर परीसरात दाखल झाला असून या वाघाने शेतात बांधलेल्या गाईच्या एका वासराची शिकार केल्याची बाब गुरुवारी (दि. २५) सकाळी उघडकीस आली. गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास हा वाघ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ओलांडून तळेगाव ठाकूरकडे कूच केल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे....
  October 26, 11:39 AM
 • धारणी- मेळघाटातील बेरदा बल्डा येथील एका गरोदर आदिवासी महिलेसह तिच्या बालकाला वाचविण्यासाठी तब्बल तीन दिवसानंतर आरोग्य विभागाच्या पथकाला यश आले आहे. काडमी हिरालाल सावळकर (वय-28) असे या महिलेची नाव असून ती बेरदा येथील राहाणारी आहे. काडमी सावळकर या महिलेची नोद आरोग्य विभागासह अगंणवाडी केंद्रात करण्यात आली होती. महिलेवर औषधोउपचार आणि शासणाकडून मिळणार्या योजनाचा लाभही या महिलेला देण्यात आला होता. मात्र, अचानक या महिलेसह संपूर्ण कुटूंब अंद्धश्रद्धेच्य आहारी गेले. तेव्हापासून ही महिला...
  September 24, 05:49 PM
 • अमरावती- अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर खोचक टीका केली आहे. दानवेंच्या मतदार संघाची अवस्था बिहारपेक्षाही वाईट आहे. अवैधदारु विक्रीपासून ते वाळूची तस्करी जालन्यातून होते. दानवेंच्या आर्शीवादानेच हे उद्योग जालन्यात सुरु आहेत, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला आहे. लोकसभा जालन्यातूनच लढणार.. आमदार बच्चू कडू यांनी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे म्हटले आहे. दानवे यांचा पराभव करुनच परत येऊ, असाही निर्धार बच्चू कडू यांनी यावेळी बोलून...
  September 22, 04:26 PM
 • अमरावती- जिल्ह्यातील भातकुली येथे गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका 50 वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनेसोबत अश्लील चाळे करत तिला शरीरसुखाची मागणी केली आहे. शोभालाल राठी विद्यालयात हा गंभीर प्रकार घडला. सुरेश ठाकूर असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याची पोलखोल झाल्यानंतर तो पसार झाला आहे. विद्यार्थिनीने थेट प्रशासनाकडे केली तक्रार मागणी पूर्ण केल्यास शाळेतून काढून टाकेन, अशा धमकीला न जुमानता पीडित विद्यार्थिनीने थेट प्रशासनाकडे यांसदर्भात...
  September 11, 06:13 PM
 • अमरावती- जिल्ह्यातील अचलपूर येथे पेट्रोलिंगदरम्यान मंळवारी पहाटे पेट्रोलिंगदरम्यान सहायक पोलिस उपनिरीक्षक शांतीलाल पटेल यांची काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चार ते पाच गुंडांनी पटेल यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. पटेल यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले, मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पोलिस स्टेशनपासून जवळच ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एक पसार...
  September 4, 12:31 PM
 • अमरावती- शहरातील एका 26 वर्षीय डॉक्टर तरुणीचा डॉक्टर असलेल्या तरुणासोबत तीन महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. तरुणीला चिखलदऱ्याला फिरण्यासाठी त्या डॉक्टर तरुणाने तगादा लावल्यामुळे तरुणी त्याच्यासोबत गेली. दरम्यान त्याठिकाणी त्याने तरुणीसोबत असभ्य वर्तन केले. तसेच पाच लाख रुपये आणखी हुंडा दिला तरच लग्न करेल, अशी धमकी दिली होती. त्यामुळे डॉक्टर तरुणीने त्याच्याविरुद्ध मंगळवारी फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी त्या डॉक्टर तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे....
  August 21, 10:35 PM
 • अमरावती- मुलाने गावातील मुलीसोबत पळून जावून लग्न केल्याने दलित महिलेच्या घराला एकाने आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील तिवसा पोलिस ठाण्याअंतर्गत कवाडगव्हान गावात ही घटना घडली आहे. आगीत दलित महिलेच्या घर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या प्रकरणी तिवसा पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेली माहिती अशी की, बेबी लक्ष्मण मेंढे (वय-49) असे दलित महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी गणेश चपंत काळे (रा.कव्हाडव्हान)...
  August 18, 03:15 PM
 • अमरावती- नागपूरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका सतरा वर्षीय मुलीवर परिसरातीलच एका तरुणाने चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला होता. पीडिती मुलगी आता सात महिन्यांची गरोदर आहे. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून नागपूरी गेट पोलिसांनी गुरूवारी अल्पवयीन तरुणाविरुद्ध बलात्कार, जीवे मारण्याची धमकी देणे तसेच विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुलीने तिच्या आई-वडिलांना आपबिती सांगितली. दरम्यान, तेव्हा उशीर झाला होता. त्यावेळी पीडिता दोन महिन्यांची गरोदर होती. पीडितेचे...
  August 17, 09:42 PM
 • अमरावती- गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीवर तिच्या सावत्र बापानेच वाईट नजर टाकली. दरम्यान बुधवारी (ता. 8) या सावत्र बापाने तरुणीचा विनयभंग करून तिच्या हातावर चाकूने वार केला. यात पीडिता जखमी झाली आहे. या प्रकरणी सावत्र बापाविरुद्ध विनयभंग तसेच चाकूने वार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी, तिची आई, सावत्र वडील तसेच तेरा वर्षाच्या सावत्र भावासोबत गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला आहे. अठरा वर्षांपूर्वी पीडित मुलीचे वडील घर सोडून निघून...
  August 9, 08:09 PM
 • अमरावती-शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणांविरोधातएका आठवड्यात दुसर्यांदा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. खासदार अडसूड यांनी आमदार राणा यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याचा आरोप केला आहे. खासदार आनंदराव अडसूळ यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आमदार राणा यांनी केला आहे. खासदार अडसूळ हे मुंबईतील सिटी बँकेचे अध्यक्ष आहेत. अडसूळ आणि त्यांचे स्वीय सहाय्यक सुनील भालेराव यांनी पदाचा गैरवापर करून सीटी बँकेत सुमारे 900 कोटींचा...
  August 7, 12:27 PM
 
जाहिरात

RECOMMENDED