Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • अमरावती - शहरातून अपहरण करून राजस्थानात युवतीची विक्री केल्या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये दोन महिला दलालांचाही समावेश आहे. शहरातील या युवतीची राजस्थानात दीड लाख रुपयात विक्री झाल्याचे अटकेतील आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान शुक्रवारी (दि. १६) रात्री अटक केलेल्या दोन्ही महिलांना न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रवीणकुमार न्यानलालजी सोनी (२६), शांती लाल न्यानमलजी सोनी (२७, दोघेही रा. सिरोई, राजस्थान), कुलदीप...
  November 18, 12:27 PM
 • अमरावती - दरवर्षी दिवाळीच्या हंगामात खासगी बसवाहतूकदारांकडून प्रवाशांची मनमानी आर्थिक लूट केली जाते. त्यामुळे एप्रिल २०१८ मध्ये प्रवासी भाडे आकारणीबाबत खासगी बसेसला शासनाने मर्यादा घालून दिल्या होत्या. त्यानंतरही यंदाच्या दिवाळीत प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट वसूल करून खासगी बसवाहतूकदारांनी अापली दिवाळी साजरी केली. प्रवाशांची भरमसाठ लूट झाल्याची बाब प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) दिवाळीनंतर आठ दिवसांनी लक्षात आल्यावर त्यांनी कारवाई सुरू केली असून,शुक्रवारी...
  November 18, 12:17 PM
 • नागपूर- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी जाणारे पर्यटक, जिप्सीचालक आणि गाईड्सना 1 डिसेंबरपासून मोबाइल फोन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन आर प्रवीण यांनी शुक्रवारी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यात वन विभागाने नमूद केले आहे की, व्याघ्र प्रकल्पात पर्यटक सफारी दरम्यान मोबाइल वा स्मार्टफोनच्या वापरामुळे वाघ आणि बिबट्याचे लोकेशन जगजाहीर होते. अनेक पर्यटक वाघांच्या लोकेशनच्या लिंक पाठवतात. त्यामुळे वाघांच्या जीवाला...
  November 17, 08:28 PM
 • नागपूर-बल्लारपूर- गोंदिया पॅसेंजरखाली येऊन वाघांच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना जंगल परिसरात गुरुवारी सकाळी त्यांचे मृतदेह अाढळून अाले. अाधी दाेन बछड्यांचे मृतदेह ट्रॅकवर सापडले. नंतर काही वेळाने तिसऱ्या बछड्याचा मृतदेह ट्रॅकपासून काही अंतरावर सापडल्याची माहिती मुख्य वन संरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी दिली. अपघातात गंभीर जखमी झालेला तिसरा बछडा थोड्या अंतरावर जाऊन मरण पावला असावा. मृत बछड्यांचे वय ६ ते ७ महिने असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जंगलात खेळता...
  November 16, 07:51 AM
 • नागपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 18 नोव्हेंबर रोजी नागपुरात येणार आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे आयोजित जाहीरसभेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांचा काही काळ नागपुरात थांबणार आहेत. मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छिंदवाडा येथे जाहीरसभेला संबोधित करणार आहेत. त्यासाठी मोदी रविवारी नागपुरात येणार असून काही काळ ते विमानतळावरच थांबणार आहेत. नंतर तेथून ते हेलिकॉप्टरने छिंदवाडा येथे रवाना होणार आहेत, अशी माहिती...
  November 15, 04:51 PM
 • नागपूर-नक्षल कारवायांमधील सक्रिय सहभागाच्या अाराेपामुळे अटकेत असलेल्या प्रा. शोमा सेन यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अर्ज पाठवून निवृत्ती लाभ देण्याची मागणी केली आहे.प्रा. सेन ११ जुलै रोजी सेवानिवृत्त होणार होत्या. मात्र, ६ जून रोजी त्यांना अटक झाल्याने १४ जून रोजी निलंबित करण्यात आले होते. विशेष म्हणजे या प्रकरणानंतर अजूनपर्यंत विद्यापीठाने त्यांची साधीअंतर्गत चौकशी केलेली नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर इंग्रजी...
  November 15, 08:25 AM
 • नागपूर- दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केलेला गडचिरोलीचा अजित रॉय हा नक्षलवाद्यांना काडतुसांचा पुरवठा करायचा. नक्षलवाद्यांच्या एका बड्या नेत्याशीही त्याचे घनिष्ठ संबंध होते, अशी माहिती नक्षलविरोधी अभियानातील सूत्रांनी दिली. लवकरच गडचिरोली पोलिसांचे पथकही दिल्ली जाऊन अजित रॉयची चौकशी करणार आहे, अशी माहिती नक्षलविरोधी अभियानाचे महानिरीक्षक अरुण शेलार यांनी सोमवारी दिली. गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूरच्या अजित रॉय (वय ४८) याला नक्षलवाद्यांशी संशय असल्याच्या...
  November 13, 11:53 AM
 • नागपूर-आम्ही शिवसेनेवरील आमचे प्रेम प्रकट करत असतो, तर ते लपून प्रेम करणारे आहेत, असे स्पष्ट करताना आम्हाला शिवसेनेसोबत युती करायचीच आहे. ते इतर वेळी काय बोलतात हे सोडून द्या. पण उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण तुम्ही एेकले असेल तर सर्व काही स्पष्ट होईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरील भाजपचे प्रेम हे एकतर्फी नाही, असे स्पष्टच सांगितले. शनिवारी नागपुरात रामगिरी येथे फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेला कुठलाही निर्वाणीचा इशारा आपण दिलेला...
  November 11, 10:40 AM
 • यवतमाळ- महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यात ठार करण्यात आलेल्या अवनी वाघिणीच्या मृत्यूवरील चर्चा अजूनही थांबलेली नाही. अवनीला ठार मारण्याचे नियोजन कसे झाले त्याची ही माहिती. - सर्वोच्च न्यायालयाने अवनीला मारण्यासाठी ११ सप्टेंबरला मंजुरी दिली होती. दुसऱ्या दिवशीपासून मोहीम सुरू झाली. तिने १३ माणसांची शिकार केली होती, असे सांगितले जाते. या मोहिमेत वन विभागाचे सुमारे २०० अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होता. -विभागाने राळेगाव तहसीलच्या लोणी गावातील जंगलात बेस कॅम्प बनवला....
  November 11, 09:08 AM
 • नागपूर - येथे दिवसाढवळ्या एका ऑटोरिक्शा चालकाचा काठ्यांनी मार-मारून त्याचा खून करण्यात आला आहे. आरोपी त्याचेच प्रतिस्पर्धी रिक्शा चालक होते. ही धक्कादायक घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रस्त्यावरच झालेल्या या हत्येच्या वेळी लोक तेथून ये-जा करत होते. पण, कुणाचीही त्यांना रोखण्याची हिंमत झाली नाही. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. यावरून झाला होता वाद... - नागपूरच्या नंदनवन परिसरात व्यवसायात वर्चस्वावरून वाद सुरू होता. त्याच वादातून दोन ऑटो रिक्शा...
  November 10, 05:48 PM
 • नागपूर- सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करताना प्रदूषणाची समस्या निर्माण होते. रस्ते तयार करताना कालावधीही अधिक लागतो. या समस्येवर उपाय म्हणून देशात सिमेंट काँक्रीटचे रेडिमेड रस्ते तयार करण्याचे नेदरलंड येथील तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. उपराजधानी नागपुरात सिमेंट काँक्रीटचे मोठाले ब्लॉक्स तयार करून ते थेट रस्ते म्हणून जोडण्याचा प्रयोग विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉल़ॉजी (व्हीएनआयटी) येथे यशस्वी ठरला असून लवकरच नागपूरच्या रिंगरोडच्या ३०० मीटरचे कामही याच...
  November 10, 10:21 AM
 • नागपूर-यवतमाळ येथे नियोजित साहित्य संमेलनात अजूनपर्यत कोणताही वाद उपस्थित झालेला नसला तरी अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या एकांगी कारभाराविषयी दबक्या आवाजात बोलल्या जात आहे. जोशी यांच्या दहशतीमुळे कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नाही. या संदर्भात यवतमाळच्या आयोजक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोणीही बोलण्यास नकार दिला. यावरून जोशी यांच्या दहशतीची कल्पना यावी. एरव्ही महामंडळाची स्वायत्तता आणि संलग्न तसेच घटक संस्थांच्या...
  November 10, 09:15 AM
 • नागपूर- टी 1 वाघीण अवनी मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य श्री बिलाल , वन्यजीव संवर्धन ट्रस्ट चे अध्यक्ष अनिष अंधेरीया हे समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितिन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील. सदर समिती टी 1 वाघीण मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्व तसेच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीने...
  November 10, 09:07 AM
 • नागपूर- अवनी वाघिणीला ठार करावे लागले, याचे दु:खच आहे. मात्र, वाघिणीमुळे ठार झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांचे काय? त्यांच्या घरात दिवाळी कशी साजरी झाली, याचा विचार आपण कधी करणार आहोत? या मुद्यावर सध्या नुसतेे राजकारण सुरु असून या संपूर्ण प्रकरणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कुठेही दोष नाही, या शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वनमंत्र्यांना शुक्रवारी क्लीनचिट दिली. यवतमाळ जिल्ह्यातील टी-1 उर्फ अवनी या वाघिणीला ठार करण्यात आल्याच्या घटनेनंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार...
  November 10, 07:16 AM
 • नागपूर -माॅर्निंग वाॅकला फिरायला गेलेले २ शिक्षक अपघातात ठार झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे घडली. नागोराव बनसिंगे (४१) व हेमंत लाडे (५२) हे शिक्षक दुर्गेश्वर चौधरी यांच्यासह बुधवारी सकाळी फिरायला निघाले. छिंदवाड्याहून माळेगावकडे जात असलेल्या एका बोलेरो वाहनाने तिघांनाही मागून धडक मारली. यात दोघे ठार, तर चौधरी जखमी झाले.चालक दिलीप वाघाडाला अटक झाली अाहे. मृत व जखमी हे सर्व शिक्षक आहेत. दिवाळीच्या सुटीनिमित्त हे तिघेही एकत्र आले होते. त्यांनी काही बेत आखले होते. एरवी कामात...
  November 9, 08:53 AM
 • नागपूर- भाभा अणुसंशोधन केंद्रातील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. शरद पवार यांनी ईशान्य भारतातील धानाचा स्थानिक जातीशी नैसर्गिक संकर करून तळोधी रेड राइस ही नवी जात विकसित केली आहे. हा लाल तांदूळ त्याच्या अँटिऑक्सिडेंट गुणधर्मामुळे कर्करोगासारख्या आजारांवरही उपयोगी सिद्ध होत आहे. शिवाय, मधुमेह, हृदय विकारसारख्या आजारात भात खाणे सोडावे लागते, मात्र, लाल तांदळामुळे भात खाणे सोडावे लागत नाही. त्यामुळे डॉक्टरदेखील लाल तांदळाची शिफारस करीत असल्याची माहिती डाॅ. शरद पवार यांनी दिव्य मराठीशी...
  November 9, 08:48 AM
 • दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या माफियाच्या ट्रकने चंद्रपूर जिल्ह्यात पोलिस उपनिरीक्षकाला चिरडून मारले. विदर्भातील तीन जिल्ह्यांत दारूबंदी आहे. वर्धा, गडचिरोलीपाठोपाठ चंद्रपुरात एप्रिल २०१५ पासून दारूबंदीला सुरुवात झाली. बेकायदेशीर दारू व्यवसायातील विविध प्रकारचे वाढते गुन्हे हा चंद्रपूर जिल्ह्याला नवीन प्रकार नाही. कारण बंदी सुरू झाल्यापासून दारू माफियांचा दारू उद्योग वरचेवर फोफावतच आहे. तो इतका जबरदस्त वाढलाय की, ते आता कोणालाच बधत नाहीत. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये दारूबंदी...
  November 8, 06:44 AM
 • नागपूर- अवनी अर्थात टी-1 वाघिणीला ठार केल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राज्य सरकारवर चौफर टीका होत आहे. आता नरभक्षक वाघिणी अवनीला (टी-1) ठार करण्यात सहभागी असलेल्या हैदराबादचा शूटर नवाब शाफत अली खान याने प्रतिक्रिया दिली आहे. अवनी वाघिणीच्या दोन बछड्यांचाही माणसांची शिकार करण्यात सहभाग होता, असा धक्कादायक खुलासा अली यांनी केला आहे. अवनीचे बछडे सब अॅडल्ट म्हणजे 10 ते 11 महिन्यांचे आहेत. अर्थात ते शिकार करण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वाघिणीचे बछडेही नरभक्षक होऊ शकतात,...
  November 7, 03:02 PM
 • नागपूर- मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन शिक्षकांना भरधाव गाडीने उडवले. यात दोघांचा जागेवरच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे बुधवारी ही घटना घडली. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. नागोराव गुंडेराव बनसिंगे (वय 41) व हेमंत भाऊराव लाडे (वय-52) हे दोन शिक्षक दुर्गेश्वर चौधरी या आपल्या मित्रासह बुधवारी सकाळी फिरायला निघाले होते. त्यावेळी एम. एच. ३१, ईएन ९८७ या बोलेरो गाडीने छिंदवाड्याहून माळेगावला जात असताना जनता लॉनसमोर...
  November 7, 01:15 PM
 • नागपूर- यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील टी-१ उर्फ अवनी या वाघिणीला ठार मारण्याचा निर्णय ही मानव-वन्यप्राणी संघर्षाचा कळस गाठणारी घटना म्हणून पाहिली जाते. राज्यात सध्याच्या घडीला तब्बल ९०० गावांना मानव-वन्यप्राणी संघर्षाचा सामना करावा लागत असून गावांचे वनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या योजना कुचकामी ठरल्या आहेत. परिणामी या गावांत येत्या काळात हा संघर्ष पराकोटीला पोहोचण्याचा धोक्याचा इशारा वन्यजीव अभ्यासकांनी दिला आहे. टी-१ उर्फ अवनी वाघिणीच्या हत्येने...
  November 7, 08:32 AM
 
जाहिरात

RECOMMENDED