Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • नागपूर-दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करांनी वाहनाची धडक देऊन थेट पोलिस उपनिरीक्षकालाच ठार केल्याची घटना घडली आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मौशी चोरगावजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. छत्रपती चिडे असे मृताचे नाव होते. दरम्यान, चिडे यांच्या मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. चंद्रपुरात दारूबंदी आहे. मात्र, या...
  November 7, 08:31 AM
 • नागपूर- यवतमाळ जिल्ह्यातील टी वन उर्फ अवनी या कथित नरभक्षक वाघीणीला ठार मारल्यामुळे भाजपच्या नेत्या, केंद्रीयमंत्री मनेका गांधी प्रचंड संतापल्या आहेत. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर त्यांनी आपला राग काढला असून त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करणारे निवेदन त्यांनी प्रसिद्धीला दिले आहे. अवनीसह तीन वाघ, डझनभर बिबटे आणि ३०० रानडुकरांना या मंत्र्यांच्याच आदेशान्वये ठार मारण्यात आले असून असा माणूस अजून मंत्रिपदी कसा राहू शकतो, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे....
  November 5, 07:00 AM
 • नागपूर - घरातून निर्माण होणारा ओला व सुका कचरा, रुग्णालयांचा जैव-वैद्यकीय कचरा, बांधकामाचा राडारोडा यामुळे आरोग्य साखळी धोक्यात आली आहे. पण ई-कचरा या सगळ्या कचऱ्यांपेक्षा आरोग्याला घातक असल्यामुळे इतर कचऱ्याबरोबर टाकता येत नाही व जमिनीत (लँडफील) गाडता येत नाही. ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी आपल्या महानगरपालिकांकडे वेगळी यंत्रणा नाही. संयुक्त राष्ट्र पर्यावरण रक्षण संस्थेच्या अहवालानुसार २०२० पर्यंत भारतात ई-कचऱ्याच्या प्रमाणात ५०० टक्क्यांची वाढ होईल. त्यामुळे ई-कचऱ्याचे...
  November 4, 08:15 AM
 • राळेगाव- राळेगाव तालुक्यात गेल्या दीड वर्षात १३ जणांचा बळी घेणाऱ्या T१ वाघिणीला ठार करण्यात वनविभागाला अखेर यश आले. वाघिणीचा शोध घेतला जात असताना अचानक ती समोर येऊन आक्रमक होत जिप्सीवर चालून आल्याने तिला शूट करण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली. शूटर असगर अली खान यांनी हा नेम साधला. बोराटीच्या जंगलातील नाल्यालगत या वाघिणीला ठार करण्यात आले. यानंतर पंचनामा करून तिला नागपूरला हलवण्यात आले. राळेगाव जंगलातील सराठी बोराटी येथील कंपार्टमेंट नंबर १४९ या ठिकाणी या वाघिणीला...
  November 4, 07:35 AM
 • नागपूर- यवतमाळ जिल्ह्यातील टी-1 या हल्लेखोर वाघिणीला बेशुद्ध करण्याचे प्रयत्नच झाले नाहीत. व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने नमूद केलेली प्रक्रिया पार न पाडताच तिला ठार मारण्यात आले, असा आरोप वाघिणीला वाचविण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंतपर्यंत लढणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. जेरील बानाईत यांनी केला असून वन विभागाच्या कारवाई विरोधात हाय कोर्टातदाद मागणार असल्याची घोषणा डॉ. बानाईत यांनी केली आहे. वन विभागाच्या वतीने खासगी शूटर असगरअली खान याने शुक्रवारी रात्री वाघिणीला गोळ्या घालून ठार...
  November 3, 04:30 PM
 • नागपूर - सध्या संपूर्ण विदर्भात वाघांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तृणभक्षी प्राणी सोडून वाघ आता नरभक्षी होऊ लागली आहेत. त्यामुळे या परिसरातील लोक प्रचंड दहशतीत आहेत. साम्राज्य विस्ताराच्या शोधात वाघ हजारो किमीचा प्रवास करतात. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीपासून निघालेल्या वाघाने वर्धा मार्गे अमरावती आणि आता थेट मध्य प्रदेशातील बैतुलपर्यंत प्रवास केला आहे. या वाघाने ७० दिवसांत ३५० किमीचा प्रवास केला. एखाद्या वाघाने केलेला हा आजवरचा सर्वात लांब पल्ल्याचा प्रवास मानला जातो. या...
  November 3, 08:44 AM
 • अमरावती - बाजारभावापेक्षा अधिक भाव देण्याची बतावणी करून शेकडो शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची हळद अतुल लव्हाळेने खरेदी केली तसेच परिचित असलेल्या काही श्रीमंत व्यक्तींना गाठून त्यांनाही हळदीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याची बतावणी केली. याचप्रकारे शहरातील एका व्यक्तीकडून तब्बल ७५ लाख रुपये घेतल्याच्या तक्रारीवरून अतुल लव्हाळेविरुद्ध फसवणुुकीचा दाखल होता. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने लव्हाळेला बुधवारी (दि. ३१) रात्री अटक केली आहे. अतुल साहेबराव लव्हाळे...
  November 2, 12:24 PM
 • नागपूर- अयाेध्येत राम मंदिर बांधण्यासाठी संसदेत कायदा करण्यात यावा, अशी मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात केली होती. मात्र, कायदा करण्यासाठी संसदेत आवश्यक दोनतृतीयांश बहुमत नसल्यामुळे त्याबाबत आताच सांगता येणार नाही, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सरसंघचालकांच्या मागणीलाच छेद दिला आहे. पक्ष संघटन व बूथ रचनेचा आढावा घेण्यासाठी दानवे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यासाठी नागपूरला आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. दानवे म्हणाले, अयोध्येत राम...
  October 30, 08:10 AM
 • वर्धा- भारतीय जनता पक्ष हा राज्यभरात सध्या क्रमांक एकचा पक्ष असून, मागील काळात लढवलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपने विजय संपादन केलेला आहे. अजेंड्याप्रमाणे बोलायचे तर वेगळ्या विदर्भासाठी एकमत असेल तर त्याचा निर्णय घेता येऊ शकतो, असे आश्वासनवजा मत मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात सुरू असलेल्या तर्कविर्तकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी संपूर्ण राज्याचा दौरा सुरू...
  October 29, 07:06 AM
 • यवतमाळ- ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारीत यवतमाळ येथे होत असून संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री तथा लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. अरुणा ढेरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रविवारी साहित्य महामंडळाच्या बैठकीत प्रदीर्घ चर्चेनंतर डॉ. अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी बैठक संपल्यावर डॉ. ढेरे यांच्या नावाची घोषणा केली. साहित्य संमेलन अध्यक्ष निवड आणि संमेलनाच्या तारखा निश्चित करण्यासाठी ही बैठक...
  October 29, 06:46 AM
 • नागपूर-राज्यातील महापौर त्यांना असलेल्या अधिकारांबाबत समाधानी नाहीत. शहराचा प्रथम नागरिक या नात्याने महापौरांना जादा प्रशासकीय व वित्तीय अधिकार मिळावेत. पालिकेने पाठवलेल्या प्रस्तावांवर निश्चित कालावधीत निर्णय व्हावेत, अशा मागण्या नागपुरातील महापौर परिषदेत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी महापालिकांचे उत्पन्न वाढवण्याचा सल्ला दिला. आयएएस अधिकारी स्वतःलाच हुशार समजतात : आयएएस अधिकारी स्वतःलाच हुशार समजतात आणि ते आहेतच. पण लोकप्रतिनिधीनाही...
  October 28, 06:44 AM
 • नागपूर- पांढरकवडा येथील हल्लेखोर अवनी वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी १७ सप्टेंबर २०१८ रोजी वन विभागाने मोहीम सुरू केली. या मोहिमेला २७ आॅक्टोबर रोजी एक महिना ०७ दिवस म्हणजे ४० दिवस पूर्ण झाले. सुरुवातीला जुजबी स्तरावर असलेली मोहीम वाघिणीने घेतलेल्या बळींची संख्या वाढल्यावर व माध्यमांत प्रकरण गाजल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हाती घेतली. सध्या २७ वाहने माेहिमेत आॅन ड्यूटी आहेत. यात २ जिप्सी फक्त पेट्रोलवर चालणाऱ्या आहेत. ४० दिवसांत २७ वाहनांवर ७ लाख ११ हजार ८०२ रुपये ३० पैसे...
  October 27, 07:12 AM
 • अमरावती /धामणगाव रेल्वे - धामणगाव रेल्वे तालुक्यात मंगरूळ दस्तगीर व अंजनसिंगी येथे दोघांवर हल्ला करून त्यांना ठार करणाऱ्या वाघाची चांगलीच दशहत निर्माण झाली असतानाच राज्याच्या प्रधान वन संरक्षकांनी त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन शूट करण्याची परवानगी बुधवारी (दि.२४ आॅक्टोबर) िदल्यामुळे अंजनसिंगी येथील गावकऱ्यांसह वन विभागालाही िदलासा िमळाला आहे. तीन िदवसांपासून वाघाला बेशुद्ध करण्याची परवानगी मिळावी,यासाठी वन विभाग पाठपुरावा करीत होता. सध्या वाघाने त्याचा मुक्काम हलवला असून, बुधवारी...
  October 25, 12:34 PM
 • नागपूर - सीबीआयमध्ये सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडींचे मूळ रफाल घोटाळ्यातच आहे. सीबीआय प्रमुख आलोक वर्मा यांनी रफाल घोटाळ्याची याचिका स्वीकारल्याने त्यांना रजेवर पाठवण्यात आले आहे. कायद्याच्या दृष्टीने पंतप्रधानांना सीबीआय प्रमुखांना हटवण्याचा अधिकारच नाही. सीबीआयची विश्वसनीयतादेखील संपुष्टात आणण्यात सरकारला यश आले असून देशाची वाटचाल बनाना रिपब्लिकच्या दिशेने सुरू झाली असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. सीबीआयच्या प्रमुखांची नियुक्ती तसेच त्यांना...
  October 25, 09:29 AM
 • धामणगाव रेल्वे - मंगरूळ दस्तगीर येथील राजेंद्र निमकर यांचा शुक्रवारी जीव घेतल्यानंतर दोन दिवसांपासून अंजनसिंगी परिसरात ठाण मांडून बसलेल्या वाघाने गावातील मोरेश्वर बाबाराव वाळके (वय ४५) या शेतमुजराचा बळी घेतल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. २३) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. नरभक्षक वाघ अंजनसिंगी परिसरात फिरत असल्याने शेतकरी व शेतमजुरांनी शेतात न जाण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. दरम्यान, वाघाला मारण्याची, नरभक्षक घोषित करण्याची परवानगी अद्यापही न मिळाल्यामुळे वाघाचा धुमाकूळ...
  October 24, 12:13 PM
 • नागपूर - पारंपरिक पद्धतीची भातशेती (धान) अत्यल्प उत्पादनामुळे तोट्याची ठरत असताना त्यावर उपाय म्हणून राज्यात प्रथमच सेंद्रिय ब्लॅक राइसचे (काळा तांदूळ) उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. नागपूर जिल्ह्यातील ६ तालुक्यांत शेतकऱ्यांचे गट तयार करून ७० एकर क्षेत्रात हा प्रयोग राबवण्यात आला. कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत राबवण्यात आलेला हा राज्यात पहिलाच प्रयोग असल्याचा दावा होत आहे. या प्रयोगासाठी खास छत्तीसगडमधून बियाणे मागवण्यात आले. दहा बचत गटांना बियाण्यांसह जैविक खते,...
  October 24, 08:46 AM
 • नागपूर- भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात अवैध वाळू तस्करी करतानामंगळवारी ट्रॅक्टर व प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळीमध्ये झालेल्या भीषण अपघातात 3 महिलांच्या जागीच मृत्यू झाला. अपघातात 9 जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांमध्ये अरुणा मोहनकर (वय- 45), कल्पना सरोदे (वय-26) व वंदना गोपाले (वय-40) यांचा समावेश आहे. अपघात होताच ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे. दरम्यान, भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. वाळू चोरी करून भरधाव वाहने चालविण्यामुळे होणाऱ्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे....
  October 23, 05:50 PM
 • नागपूर - आयएलअँडएफएस अपयशी ठरल्यावर अमेरिकेच्या लेहमन ब्रदर्ससारखेच संकट निर्माण झाले आहे. देशातील गैर बँकिंग फायनान्स कंपन्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. देशात पेमेंट क्रायसिस तयार होत असून आगामी दिवस आर्थिक संकटाचे आहेत, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला. अमरावती व अकोला येथील परिषदांसाठी यशवंत सिन्हा, खासदार शत्रुघ्न सिन्हा व आपचे खासदार संजयसिंह नागपुरात आले होते. या वेळी यशवंत सिन्हा म्हणाले, एलआयसीमधील जनतेचा पैसा सरकार मुक्तपणे उधळत आहे. कच्च्या तेलाचे...
  October 23, 08:57 AM
 • अमरावती -शिक्षण संस्थांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या सरकारी जमिनींवर डल्ला मारण्याचा डाव आमदार रवी राणा यांनी आखला असून, साईनगरच्या पाठोपाठ आता बडनेराच्या विजय मिलचा भुखंड गिळंकृत करण्याची कारवाई त्यांनी सुरू केली आहे. बडनेरा नवीवस्ती येथील विजय मिलची जागा राणांच्या घशात न घालता त्या जागेवर गरिबांची घरे आणि रोजगार मिळावा म्हणून उद्योग सुरू करण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. एकेकाळी बडनेरा शहराचे भूषण असलेल्या विजय मिलला अखेरची...
  October 22, 12:00 PM
 • नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान जगात सर्वोत्तम आहे. राज्यकारभार करताना अनेकदा पेचप्रसंग उद््भवतात. अशा वेळी गीता, बायबल आणि कुराणापेक्षाही संविधान मार्गदर्शक ठरते, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...
  October 19, 09:36 AM
 
जाहिरात

RECOMMENDED