Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • अमरावती- स्त्री शक्तीचा गौरवच समाजासाठी प्रेरणादायी असून, यापासून मलाही महिलांसाठी नवे काहीतरी करण्यास प्रोत्साहन मिळाले. मनुष्याचे वैचारिक सामर्थ्य त्याच्या स्वभावासह कार्याचा परिचय देत असते, असे मत अभिनेत्री अनिता राज यांनी व्यक्त केले. राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशनद्वारे मंगळवारी ११ सप्टेंबरला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित चौथ्या अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार २०१८ च्या वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. पुरस्कारांचे वितरण अभिनेत्री अनिता राज यांच्या हस्ते...
  September 12, 12:10 PM
 • अमरावती- जिल्ह्यातील भातकुली येथे गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका 50 वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनेसोबत अश्लील चाळे करत तिला शरीरसुखाची मागणी केली आहे. शोभालाल राठी विद्यालयात हा गंभीर प्रकार घडला. सुरेश ठाकूर असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याची पोलखोल झाल्यानंतर तो पसार झाला आहे. विद्यार्थिनीने थेट प्रशासनाकडे केली तक्रार मागणी पूर्ण केल्यास शाळेतून काढून टाकेन, अशा धमकीला न जुमानता पीडित विद्यार्थिनीने थेट प्रशासनाकडे यांसदर्भात...
  September 11, 06:13 PM
 • नागपूर- महाराष्ट्रात फक्त नागपुरातच निघणारी मारबतीची मिरवणूक सोमवारी काढली. १३७ वर्षांची परंपरा लाभलेली मारबत मिरवणूक नागपूरचे वैशिष्ट्य आहे. तर मारबतीला चालू घडामोडींवर भाष्य करणारे निघणारे बडगे आकर्षणाचे केंद्र होते. यावर्षी पहिल्यांदाच पत्नीपीडित, पुरुषांना खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्या महिलांचा निषेध करणारी व पुरुषांचे दु:ख व्यक्त करणारी भुरी मारबत आकर्षणाचे केंद्र होती. ४९८-अ, घरगुती हिंसाचार, विनयभंग, बलात्कार, घटस्फोट, खावटी, चाईल्ड कस्टडी आदी प्रकरणांत पुरुषांना पोलिस,...
  September 11, 12:23 PM
 • यवतमाळ- अनेक राज्यातील ट्रक चालक व वाहकाचा खून करून ट्रकमधील मुद्देमाल लुटणाऱ्या मध्य प्रदेशातील कुख्यात खाम्बरा गँगच्या एका सदस्याला पुसदमधून अटक केली. ही कारवाई रविवार,९ सप्टेंबर रोजी एलसीबी पथकाने पार पाडली. जितेंद्र उर्फ पिंटू किसन राठोड, वय ४७ वर्षे रा. कोपरा, ह. मु. ग्रीन पार्क, पुसद अशी आरोपीचे नाव आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, तामिळनाडू व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात ट्रक चालक व वाहकाचा खून करून त्यांचे मृतदेह फेकून ट्रकमधील मुद्देमालाची विल्हेवाट लावल्या...
  September 11, 12:15 PM
 • वरुड- महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवरील वसलेल्या पांढुर्णा येथे दरवर्षी प्रमाणे पोळ्याच्या करीला जांब नदीपात्रात भरलेल्या गोटमार यात्रेत सोमवारी (दि. १०) एकाचा मृत्यू झाला. यामध्ये ६ जण गंभीर, ३०० जण किरकोळ जखमी झाले. गंभीर ६ जखमींना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे, तर ३०० किरकोळ जखमींपैकी १२ जखमींना पुढील उपचारासाठी पांढुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून, उर्वरित जखमींना सुटी देण्यात आली. शंकर झीगु भलावी (२५) रा. भुयारी असे गोटमारीत मृत्यू झालेल्या मृतकाचे नाव...
  September 11, 12:03 PM
 • नागपूर- गावात जाण्यास रस्ताच नसल्यामुळे डाॅक्टर व परिचारिकांनी समयसूचकता दाखवत एका महिलेची प्रसूती ट्रॅक्टरवर केल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हितापाडी येथे ही घटना रविवारी घडली. गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या महिलेला ट्रॅक्टरने कसेबसे रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वाटेतच तिची प्रसूती झाली. भामरागड तालुका मुख्यालयापासून १३ किलोमीटर अंतरावर हितापाडी हे गाव आहे. आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत या गावाचा...
  September 11, 11:19 AM
 • नागपूर- ग्रामीण भागातील शिक्षणाची वाट खूप बिकट असते. त्यातही तो भाग आदिवासी असेल तर वाट बिकटच नाही अवघड होऊन जाते. संघर्षावर मात करीत ही मुले शिकतात. अनेकदा ही मुले शाळेपर्यत पोहोचू शकत नाही. हरकत नाही, आपण त्यांच्यापर्यंत शाळा घेऊन जाऊ, असे स्वप्न केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पाहिले. त्यांची स्वप्न पूर्ती आता होत आहे. नागपूर, मेळघाट, मध्य प्रदेशापर्यंत पसरलेल्या सुमारे ६६७ गावांना डिजिटली कनेक्ट करण्याच्या प्रकल्पाचे लोकार्पण सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात होणार...
  September 10, 12:25 PM
 • नागपूर- वाघांची संख्या वाढत असताना व्याघ्र प्रकल्पांच्या लगत वाघ आणि मानव संघर्षाच्या घटना देखील वाढत अाहेत. त्यावर उपाय म्हणून वाघांची संख्या फारच जास्त असलेल्या वनक्षेत्रातून काही वाघ स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावावर वन विभागात विचार सुरु असून या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्यासाठी समिती नेमण्यात आली असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिव्य मराठी शी बोलताना दिली. राज्याचे वन विभागाचे प्रमुख असलेले प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांच्या...
  September 10, 12:14 PM
 • पांढरकवडा- वसतिगृह बांधकामाच्या सिमेंट काँक्रिटिंगसाठी तात्पुरत्या खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून तीन शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना यवतमाळ िजल्ह्यातील पांढरकवडा शहरातील राधाकृष्णनगर येथे रविवारी उघडकीस आली. आदेश बाळासाहेब राठोड, संचेतन श्यामकिरण राठोड आणि सिद्धेश विकास मोगरकर (सर्व रा. पांढरकवडा) अशी मृतांची नावे आहेत. शहरात राधाकृष्णनगरात गेल्या काही महिन्यांपासून समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी तात्पुरता सिमेंट...
  September 10, 08:28 AM
 • वणी- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या लाठी येथील एका कुटुंबात व्यसनाधीन पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनेच पतीची हत्या केली. ही घटना दि. ७ सप्टेंबरला पहाटेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी पोलिसांनी त्या महिलेला अटक करत खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. लाठी येथे मोतीराम धोबे वय ४८ वर्ष तसेच त्यांची पत्नी माया वय ३७ वर्ष हे मोलमजुरी करून राहत आहे. त्यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. परंतु मोतीरामला दारूचे व्यसन जडल्याने या कुटुंबात किरकोळ वाद नित्याचेच झाले होते. मोतीरामच्या मनात संशयाचे भूत...
  September 8, 12:32 PM
 • अमरावती- चांदूर रेल्वे आणि अचलपूर येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर गुन्हेगारांनी हल्ला चढवून खून केला. या प्रकरणाचा सखोल व तंत्रशुद्ध तपास करून प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे. जेणेकरून आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी. असा तपास या दोन्ही प्रकरणात करण्याच्या सूचना शुक्रवारी (दि. ७) एडीजी परमबीर सिंग यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना झालेली शिक्षा लक्षात घेता भविष्यात पोलिसांवर हल्ला करण्याची कोणी हिम्मत करणार नाही, असेही त्यांनी...
  September 8, 12:25 PM
 • अमरावती- केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या मंगळवार.दि. ११ सप्टेंबरला अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनच्या अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कारांचे वितरण होणार आहे. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी दु. २ वाजता हा कार्यक्रम होईल. पालकमंत्री प्रवीण पोटे, खा.डॉ. विकास महात्मे, खा. आनंदराव अडसूळ, आ.ॲड. यशोमती ठाकूर यावेळी उपस्थित राहतील. केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन ११ सप्टेंबरला स. १०.२५ वाजता विमानाने दिल्ली येथून...
  September 8, 12:17 PM
 • अमरावती- अमरावती जिल्ह्यात चार महीन्यात आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये, यासाठी ठाण्यात असलेल्या एकूण मणुष्यबळाच्या किमान ३० ते ४० टक्के कर्मचारी रात्रीच्या ड्युटीसाठी कार्यरत ठेवावे. त्यामुळे गस्तीला चार ते पाच कर्मचारी सोबत फिरू शकतात. अशा सूचना राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक परमबीर सिंग (कायदा व सुव्यवस्था) यांनी शुक्रवारी अमरावती परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांना...
  September 8, 11:56 AM
 • नागपूर- दलित शब्द अवमानजनक नाही, तर उत्साह देणारा असल्याचा दावा करत हा शब्द वापरण्यास मनाई करणाऱ्या प्रसारण मंत्रालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानंतर केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने दलित शब्दाचा वापर करता येणार नाही, असे दिशानिर्देश जारी केले आहेत. दरम्यान, नागपुरात बोलताना आठवले म्हणाले, राज्यात रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळायला सुरुवात झाली असून दोन...
  September 7, 07:51 AM
 • नागपूर- चंद्रपूर महापालिकेच्या कर िवभागात गुरुवारी घडलेला प्रसंग पाहून गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटाची आठवण झाली. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना मकरंद अनासपुरे अनामत रक्कम भरण्यासाठी चिल्लर आणतो आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडते. असाच काहीसा मजेदार किस्सा चंद्रपूर महापालिकेत घडला. गृहकर भरण्यासाठी एका फेरीवाल्याने चक्क १४ हजार ८०८ रुपयांची चिल्लर आणल्याने ती मोजता माेजता कर विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. चंद्रपूर महापालिकेने नागरिकांना गृहकराच्या...
  September 7, 07:49 AM
 • नागपूर- राज्य सरकारने गडचिरोलीत नव्यानेच सुरू केलेल्या महिला व बाल रुग्णालयात मागील चार महिन्यात शून्य ते ५ वयोगटातील तब्बल ५९ नवजात अर्भक तसेच बालकांचा अाणि एका मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी या रुग्णालयात जाऊन माहिती घेतल्यावर उघडकीस आली. वैद्यकीय अधिकारी डॉ.जयंत पर्वते यांनी स्वत: ही माहिती दिली. या रुग्णालयात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ९७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५४ पदे अद्यापही रिक्त असल्याचा धक्कादायक...
  September 7, 07:33 AM
 • अमरावती- युवकांना रोजगारक्षम करण्याच्या दृष्टिने पश्चिम विदर्भातील ३२ महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू केल्या जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची विशेष योजना तसेच राष्ट्रीय कौशल्य योग्यता आराखड्याच्या अनुषंगाने विविध कौशल्य अभ्यासक्रम आरंभ केले जाणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत आज (५ सप्टेंबर) मान्यता दिली. सर्वच क्षेत्रात मागास असलेल्या पश्चिम विदर्भाच्या पाचही जिल्ह्यात...
  September 6, 12:30 PM
 • नागपूर- यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव तालुक्यात ऑगस्ट महिन्यात तीन गावकऱ््यांचा बळी घेणाऱ््या आक्रमक वाघिणीचा (टी १) उपद्रव थांबविण्यासाठी तिला शक्यतोवर बेशुद्ध करून पकडण्याचा अन्यथा तिला थेट गोळ्या घालण्याचे आदेश वन विभागाने जारी केले आहे. वन विभागाच्या या आदेशाला आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली असून त्यावर उद्या गुरुवारी निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात पांढरकवडा...
  September 6, 12:28 PM
 • नागपूर- आधीच गुलाबी बाेंडअळीमुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यावर सडन रोगाचे संकट घोंघावत होते. परंतु शेतकऱ्यांनी कापसाच्या बोंडाला चिकटून राहिलेल्या गुलाबी पाकळ्या हाताने काढून टाकाव्या, असा उपाय येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने सुचवित दिलासा दिला आहे. यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील काही भागात फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेतील कपाशीवर बोंडे सडण्याचा प्रकार समाेर आला होता. यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांना सीआयसीआरने दिलासा दिला आहे. सर्वसाधारणपणे कपाशीच्या...
  September 6, 12:23 PM
 • नागपूर- राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी नागपुरातील जयताळा परिसरात घडली. विनोद भगवान घिवंडे (वय २७) असे मृताचे नाव होते. जयताळा दाते लेआऊट परिसरातील राहत्या घरीच स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळी डोक्यात आरपार गेल्याने तो जागीच मृत्यूमुखी पडला. घटनेवेळी त्याचे आईवडील व पत्नी घरीच होती. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आठ वर्षांपासून तो एसआरपीएफमध्ये कार्यरत होता. ४ वर्षांपूर्वी त्याचा...
  September 6, 07:56 AM
 
जाहिरात

RECOMMENDED