जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

  • मुंबई/नागपूर- मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे गुरुवारी (ता.3) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी नागपुरात एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या पार्थिवावर आंबझरी स्मशानभूमीत सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1927 रोजी मध्य प्रदेशातील रायपूर शहरात झाला होता. नागपूर येथील महापालिकेच्या...
    January 3, 01:14 PM
  • शिरखेड- सततच्या नापिकीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. त्यातच अप्पर वर्धा धरण असलेल्या मोर्शी तालुक्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह शेतातील पिक जगवण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. अशातच शासनाने मोर्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित केला असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. शिरखेड परिसरात शेतकऱ्यांना अन्य पिकांसह संत्रा बागा जगविण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागत असून, त्यांच्यापुढे संत्रा बागा कशा जगवाव्यात हा प्रश्न निर्माण झाला आहे....
    January 3, 12:47 PM
  • अमरावती- पंतप्रधान आवास योजनेतून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साडेचार वर्षांत केवळ २६ टक्केच घरकुलांची कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत. ग्रामीण भागात मंजूर २९ हजार २५० पैकी २१ हजार ९१३ घरकुलांचे काम प्रगतीपथावर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मोठ्या प्रमाणात कामे अपूर्ण असताना आवास साॅफ्ट आणि भौतिक दृष्ट्या कशाप्रकारे ५० टक्के कामे पूर्ण झाल्याचा आभास निर्माण केल्या जात आहे. सर्वांना हक्काचे घर मिळावे म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान आवास योजना हा महत्वकांक्षी योजना...
    January 3, 12:46 PM
  • नागपूर- माझा श्री रामावर पूर्णि विश्वास आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावे ही रामाची इच्छा आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर होईलच, अशी नि:संदिग्ध ग्वाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे दिली. सेवासदन शिक्षण संस्थेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिलेल्या महा मुलाखतीत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी वटहुकूम काढण्याविषयी विचार केला जाईल, असे म्हटले...
    January 3, 08:59 AM
  • नागपूर- लाठीचा वापर हा गुन्हा असताना आणि त्याबाबत नागपुरात तक्रार दाखल केली असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांवर अद्यापही गुन्हे दाखल होत नाहीत. याविरोधात आपण लोकशाही मार्गाने लढा देऊ आणि पोलिसांना कारवाईस भाग पाडू, असा इशारा माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केला. खोपडे नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले, १८ ऑक्टोबर २०१८ रोजी संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात स्वयंसेवकांनी लाठी हाती बाळगून मिरवणूक काढली. भादंविच्या कलम १५३ (अ) नुसार हा दखलपात्र गुन्हा आहे....
    January 3, 07:14 AM
  • नागपूर- विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील पवनी वनक्षेत्रात सलग दाेन दिवसांत दाेन वाघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने पशुप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त हाेत आहे. २०१८ या सरलेल्या वर्षात एकट्या महाराष्ट्रात तब्बल २० वाघ मारले गेले. त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यातील कथित नरभक्षक अवनी वाघिणीच्या शिकारीचे प्रकरण तर देशभर गाजले. राज्यात वाघांची संख्या वाढल्याचे कागदोपत्री दावे वन विभागाकडून होत असले तरी वाघांचे संवर्धन करण्याची मोहीम सपशेल अपयशी ठरली असल्याचेच दिसून येते. राज्यात...
    January 2, 08:17 AM
  • नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमटाऊन असलेल्या नागपुरात नववर्षाच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांची ह त्या करण्यात आली आहे. यात एका गुंडाचा समावेश आहे. मिळालेली माहिती अशी की, पहिली घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तर दुसरी घटनाइमामवाडा परिसरात घडली आहे. एमआयडीसीतील राजीव नगरातील कुख्यात गुंड रणजीत लडी याला आणि त्याच्या एका साथीदाराला परिसरातील लोकांनी बेदम मारहाण केली. यात रणजीत लडीचा मृत्यू झाला असून...
    January 1, 12:55 PM
  • धारणी- भररस्त्यावर आदिवासी महिलेचे बळजबरीने चुंबन घेऊन घटनेचे चित्रिकरण व्हायरल केल्याच्या घटनेने धारणी येथे तणाव निर्माण झाला. दरम्यान, याप्रकरणी आरोपी मो. वसीम मो. आरिफ सौदागर (वय ३०, रा. धारणी)याच्यासह चित्रिकरण करणाऱ्या अल्पवयीन मुलालाही अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून पोलिस बंदोबस्त लावण्यात आहे. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून, आरोपीवर आदिवासी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचाही गुन्हा दाखल आहे. पीडित ४५ वर्षीय महिला धुणीभांडीचे कामे करते. शुक्रवारी...
    December 30, 12:14 PM
  • तिवसा- तंत्रज्ञानाचा केला तर विधायक कामासाठी नाहीतर विध्वंसक कामासाठी वापर होऊ शकतो. तिवसा येथे समाजमाध्यमाचा विधायक कामासाठी वापर केल्याने महिलेचे दागिने नुकतेच परत मिळाले. परंतु तंत्रज्ञााचा वापर चोरीची युक्ती शिकण्यासाठी तरुणाने केला खरा पण अपयश आल्याने चोरीच्या प्रयत्नात गजाआड होऊन बसावे लागले. तिवसा येथील शिक्षक कॉलनीस्थित असलेल्या एटीएम फोडण्यासाठी शहरातली अलीम करीम शहा (वय २१, रा. वॉर्ड क्रमांक ३) याने अॅन्ड्रॉईड मोबाइलवर युट्यूबच्या माधम्यातून एटीएम फोडण्याचा अभ्यास...
    December 30, 12:10 PM
  • नागपूर- साहेबराव कधी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची शान हाेता. त्याच्या डरकाळीने सर्व जंगल थरथरत हाेते. परंतु अाज डरकाळीच्या जागी वेदनांनी त्याचा जीव पिळवटून निघत अाहे. नागपुरातील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या ९ वर्षीय वाघाची भाषा समजणे मानवाच्या आवाक्यातील नाही. परंतु त्याच्या वेदना डाेळ्यांनी सहज पाहू शकताे. त्याला एक पंजा नाही. अाता सन २०१९ मध्ये त्याला कृत्रिम पंजा लावण्यात येणार अाहे. जगात प्रथमच वाघाला कृत्रिम पंजा लावला जाणार अाहे. साहेबराव व त्याचा भाऊ सन...
    December 30, 08:57 AM
  • धामणगाव रेल्वे- येथील मोरेश्वर सावरकर यांचा सावत्र बाप व पत्नीच्या अनैतिक संबंधातूनच खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली असून शुक्रवार (दि. २८) दोघांनाही अटक करण्यात आली आहे. मोरेश्वरचा रविवारी (दि. २३) गंगाजळीनजीकच्या उर्ध्व कालव्यात मृतदेह आढळून आल्यानंतर पत्नीनेच पतीचा खून झाल्याची तक्रारही पोलिसात दाखल केली होती. धामणगाव रेल्वे येथील मोरेश्वर सावरकर (वय ३०) याचा रविवारी (दि. २३) गंगाजळीनजीकच्या उर्ध्व वर्धा कालव्यात मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचा पंचनामा केला असता...
    December 29, 11:53 AM
  • चंद्रपूर : महाराष्ट्रातील एका गावात रात्रीच्या वेळी शाळा सुरू केली जाते. फक्त शाळाच सुरू होते असे नाही तर मुले देखील अगदी शिक्षणाच्या ओढीने या शाळेत येत आहेत. येथे शालेय शिक्षणासोबत योगा आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून घेण्यात येते. आपल्या या विशेषतेमुळे महाराष्ट्रामध्ये या शाळेची चर्चा आहे. 3 शिक्षकांवर आहे 123 विद्यार्थ्यांची जबाबदारी महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील पालडोह गावात ही शाळा आहे. जिल्हा परिषदची ही शाळा संध्याकाळी 5 ते रात्री 8 दरम्यान सुरू असते. येथे इयत्ता...
    December 29, 12:15 AM
  • परतवाडा- स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या सुशील ऊर्फ बंटी मारोतराव दुर्गे (वय ३४, रा. रवी नगर, गौरखेडा कुंभी) या युवकाने गुरुवार, २७ डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रविनगर येथील मारोतराव दुर्गे डाक विभागातून सेवानिवृत्त झाले असून, त्यांचा मुलगा बंटी उर्फ सुशिल दुर्गे यांचे बी.ए.,बी.एड. पर्यंत शिक्षण झाले. मागील अनेक दिवसांपासून बंटी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तो सतत अभ्यासात राहून नोकरीच्या संधीची वाट पाहत होता असे शेजारच्या नागरिकांनी सांगितले....
    December 28, 11:37 AM
  • नागपूर- केळीच्या फायबरपासून (तंतू) चलनासाठी लागणारा कागद तयार करण्यात येत आहे. जळगावच्या ताप्ती व्हॅली केळी प्रक्रिया आणि उत्पादने सहकारी सोसायटीतर्फे केळीच्या खोडापासून मूल्यवर्धित उत्पादने घेण्याचा देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. केंद्र सरकारतर्फे निवडण्यात आलेल्या देशातील दहा कल्पक आणि अभिनव प्रकल्पांत या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर याचे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती ताप्ती व्हॅली केळी प्रक्रिया...
    December 28, 07:36 AM
  • नागपूर- उपराजधानी नागपुरातील जिल्हा न्यायालयापुढे वकीलांमधील खूनी संघर्षाचे प्रकरण ताजेच असताना न्यायालयाच्या व्हरांड्यातच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश के. आर. देशपांडे यांना सरकारी वकीलाने मारहाण केल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेनंतर पोलिसांनी वकीलास ताब्यात घेऊन अटक केली. व्यक्तीगत दिवाणी प्रकरणात आपल्या विरोधात निवाडा दिल्याच्या कारणावरून वकीलाने हा हल्ला केल्याचे उघड झाले आहे. दुपारी बारा वाजताच्या सुमारास न्यायमंदिरच्या सातव्या माळ्यावर ही घटना घडली....
    December 26, 06:36 PM
  • मुंबई/नागपूर- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तरुण भारतमधून खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येनंतर पंढरपूरमध्ये मोठी सभा घेतली. दोन्ही सभांमध्ये त्यांनी राम मंदिरावरुन भाजपला लक्ष्य केले होते. त्यावर विठ्ठला, हाच खरा अपराधी..! या शीर्षकाखाली अग्रलेखात संघाने उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला आहे. उद्धव ठाकरेंना बोलण्याचे भान नाही, आगामी निवडणुकांमध्ये जनताच त्यांना फळ देईल, असेही अग्रलेखात म्हटले आहे. उद्धव टाकरेंना काय...
    December 26, 02:33 PM
  • यवतमाळ - समारंभ आटोपून परत कळंबकडे निघालेल्या प्रवाशांच्या क्रुझरला समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 7 जणांचा जागेवर मृत्यू झाला असून 8 जण जखमी आहेत. ही घटना यवतमाळ-नागपूर मार्गावर असलेल्या चापर्डा या गावाजवळील वळणावर सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. कळंब तालुक्यात येणाऱ्या पार्डी या गावातील काही नागरिक सोमवारी एका सभारंभासाठी यवतमाळमध्ये आले होते. कार्यक्रम आटोपून ते रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गावाकडे परत निघाले होते. दरम्यान, चापर्डा...
    December 25, 12:53 PM
  • वाशीम- भाजपविरोधी विचारांच्या पक्षांनी एकत्र येत या शेतकरीविरोधी सरकारला घरी पाठवावे, असे जनतेच्या मनात आहे. मात्र, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडी स्वाभिमानी शेतकरी पक्षाला केवळ १ जागा देणार असल्याचे माध्यमांतून कळत आहे. भाजपविरोधात जायचे म्हणून कुणाच्याही मागे आम्ही फरपटत जाणार नाही. सन्मानजनक जागा दिल्या तरच महाआघाडीसाेबत जाऊ, अन्यथा स्वतंत्र लढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. तुपकर म्हणाले, आम्ही...
    December 24, 07:55 AM
  • नागपूर- फेसबुकवर विवाहितेचा अश्लील व्हिडीओ शेअर होतो. क्षणात तो व्हायरलही होतो. 5000 हून जास्त लोक व्हिडीओ पाहातात, शेअर करतात. अखेर तो व्हिडीओ संबंधित विवाहितेच्या स्मार्टफोनवर जातो. आपलाच तसला व्हिडीओ पाहून विवाहितेच्या पायाखालची जमीन सरकते. ती थेट पोलिस स्टेशन गाठते. तक्रार नोंदविते. पोलिस तपास करतात. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करणार्याला अटक करतात. आरोपी दुसरा, तिसरा कुणी नाही तर पीडित महिलेचा पतीच निघतो. अशीच घटना कळमेश्वर तालुक्यात घडली आहे. विशेष म्हणजे महिलेचे लव्ह मॅरेज झाले आहे....
    December 23, 02:17 PM
  • नागपूर- भंडारा शहरात सुरु असलेल्या आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेच्या शनिवारी सकाळच्या झालेल्या उद्घाटनानंतर देण्यात आलेल्या जेवणातून 115 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. जेवणानंतर मळमळ होणे, डोके दुखणे, उलट्या होणे, असा त्रास सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 97 विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारानंतर क्रीडा संकुलनात विश्रांतीसाठी पाठविण्यात आले आहे. 18 विद्यार्थी त्यात 15 विद्यार्थी आणि 3...
    December 23, 02:04 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

    जाहिरात
      जाहिरात