जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • नागपूर- मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकरी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत. कापसाचा प्रश्न एवढा चिघळला असताना मुख्यमंत्र्यांचा चहादेखील विषासमान आहे, असे म्हणत विरोधकांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या चहापानावर बहिष्काराची परंपरा या वेळीही कायम ठेवली. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याप्रमाणेच आणखी तीन मंत्र्यांनीही आपल्या संस्थांसाठी देणग्या स्वीकारल्या असून, त्यांचा भंडाफोड या अधिवेशनात करण्याचा इरादा विधानसभेतील विरोधी...
  December 12, 04:44 AM
 • नागपूर - सक्षम लोकायुक्त आणि लोकपाल याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतरच राज्यात भूमिका घेतली जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले. राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा केला नाही तर आळंदीला उपोषण करण्याचा इशारा अण्णांनी राज्य सरकाला दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णांची राळेगणसिद्धीला भेट घेऊन हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबतचा कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, या कायद्याबाबत आपण अण्णांना पत्र...
  December 12, 04:38 AM
 • नागपूर- राज्यातील आजवरचे सर्वात कमजोर मुख्यमंत्री, अशी टीका करून विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱयांच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची परंपरा विरोधकांनी यंदाही कायम ठेवली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अन्य काही मंत्र्यांनीही चहापान कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची आजची महत्त्वपूर्ण बैठकच रद्द करण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांवर ओढवली. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱया अधिवेशनात विरोधकांबरोबरच राष्ट्रवादीकडूनही...
  December 11, 11:34 PM
 • कापूस, धान, सोयाबीन उत्पादक शेतकऱयांच्या आर्थिक मदतीसाठी तसेच मुंबईतील गिरणी कामगाराच्या घरांचा प्रश्न आणि चैत्यभूमीच्या प्रश्नावरून विधिमंडळात सरकारला घेरण्याची विरोधकांनी केलेली तयारी, नगरपालिका निवडणुकींच्या रणधुमाळीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील उघड झालेला बेबनाव, विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावरून भाजपमध्येच सुरू झालेले कुरघोडीचे राजकारण आणि पालिका निवडणुकांच्या यशापयशाची धाकधूक या पार्श्वभूमीवर सोमवारपासून नागपुरात सुरू होणाऱया राज्य विधिमंडळाच्या हिवाळी...
  December 11, 11:30 PM
 • नागपूर- राज्यातील दंत महाविद्यालयांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या 20, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 43 जागा वाढवण्यात आल्या आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या वाढीव जागांपैकी 10 जागा औरंगाबाद दंत महाविद्यालयात, तर 10 जागा नागपूर दंत महाविद्यालयात वाढवण्यात येणार आहेत. नागपूर दंत महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्याही 14 जागा वाढल्या आहेत. विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढवण्यासोबतच प्राध्यापकांचीही 67 पदे भरली जाणार आहेत. नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे यांनी दंत...
  December 11, 12:35 AM
 • खासदार प्रकाश माथुर आणि शोभना भारतिया यांनी शेतक-यांच्या पॅकेजबद्दल माहितीची विचारणा केली होती. विदर्भातील शेतक-यांची खरी अडचण ही त्यांचे नेतृत्व करण्यासाठी खंबीरपणे कोणी उभे राहत नाही. केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातील सात मंत्र्यांचा समावेश असून यातील विदर्भातील प्रफुल्ल पटेल आणि मुकुल वासनिक यांचा समावेश आहे. काँग्रेसची सत्ता राज्यात आणि केंद्रात आहे. तरी देखील काँग्रेस पक्ष शेतक-यांसाठी काही करत नसल्याची ओरड होत आहे. विदर्भातील बडे प्रस्थ असणारे विलास मुत्तेमवारांकडे केंद्र...
  December 10, 11:43 PM
 • बल्लारपुर (चंद्रपुर)/नागपुर: केटरिंगचे काम देण्याचे आमीष दाखवून चौघांनी एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बल्लारपूर येथील रहिवासी गुड्डू कांबळे (25) याचा केटरिंगचा व्यवसाय आहे. सिद्धार्थ गोपकर (19), मनोज गायत्रे (25) आणि रंजीत गवई (26) हे तिघे त्याच्याकडे कामाला आहेत. गुड्डू आणि सिद्धार्थ या दोघांनी राजेंद्र प्रसाद वार्डात राहणार्या पीडित मुलीला...
  December 9, 04:00 PM
 • नागपूर - आमदार म्हणून निवडून गेल्यानंतरही अनेक विधानसभा सदस्यांना सभागृहात आपले प्रश्न कसे मांडावे याचे टेक्निक नसते. त्यामुळे ते मागे पडतात किंवा आपले म्हणणे रेटण्यासाठी कधी कधी गोंधळही घातला जातो. हे प्रकार टाळण्यासाठी आमदारांना सभागृहात प्रश्न कसे मांडावे याचे खास प्रशिक्षण दिले जात आहे. नागपूर विधान भवनातील वि. स. पागे सभागृहात ज्येष्ठ पत्रकार नागेश केसरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिबिर होत आहे.केसरी यांनी सांगितले की, विधानसभेच्या कामकाजाची अनेक सदस्यांना महिती...
  December 8, 11:10 AM
 • नागपूरः नागपुरातील मध्यवर्ती भागात असलेल्या केअर रुग्णालयात दुपारी आग लागल्यामुळे खळबळ उडाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावर आग लागली असून रुग्णांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. आग कशामुळे लागली ते अद्याप कळू शकले नाही. शहरातील धंतोली भागात हे रुग्णालय आहे. रुग्णालयात अद्ययावत सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मध्य भारतातील रुग्ण येथील सेवेचा लाभ घेतात. आग लागली त्यावेळी रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल होते. तसेच ओपीडीमध्येही अनेक रुग्ण...
  December 5, 04:19 PM
 • यवतमाळ - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना मुखमंत्री आणि कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील जबाबदार आहेत, असा आरोप सुधीर सुधीर मुनगंटीवार यांनी यवतमाळमधील प्रचार सभेत बोलताना केला.धामणगाव रेल्वे येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जाहीर सभेत काल देविदास सबाने या शेतकर्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यवतमाळ येथील जिल्हा रूग्णालयात सबाने यांची भेट घेतल्यानंतर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री आणि...
  December 5, 01:51 PM
 • भंडारा - नक्षलींचा नेता किशनजीच्या मृत्यूनंतर संतापलेल्या नक्षलवाद्यांनी गडचिरोली व भंडारा जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणावर हिंसक कारवाया सुरू केल्या आहेत. शनिवारी रात्री त्यांनी भंडारा जिल्हय़ातील देवरी तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींची कार्यालये जाळली. ककोडी भागातील पिपरखाडी आणि मिसपिरी या दोन गावात प्रवेश करून नक्षलवाद्यांनी तेथील ग्रामपंचायत कार्यालयातील फर्निचर व दस्तऐवज पेटवून दिले. तीन दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी धमदीटोला येथे पोलिसांवर गोळीबार केला होता. त्यांच्याशी लढताना...
  December 5, 01:28 PM
 • नागपूर- एकीकडे महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना 12 डिसेंबरपासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानीतील विधिमंडळाच्या सभागृहाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी अधिवेशनाच्या खर्चात कपात केल्याचा दावा फोल ठरला आहे. हिवाळी अधिवेशनासाठी सध्या सभागृहात नवीन फरशा बसवण्यात येत आहेत. तसेच भिंतींना अत्याधुनिक प्लायवूड लावण्यात येत आहे. सभापतींच्या आसनांना मुळापासून उखडून नव्याने बसवण्यात येत...
  December 5, 02:16 AM
 • अमरावती: धामणगाव रेल्वे येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जाहीर सभेत रविवारी एका कापूस उत्पादक शेतकर्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. अरूण देविदास सबाने (45) असे या शेतकर्याचे नाव आहे. सबाने यांच्यावर यवतमाळ येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. धामणगाव रेल्वे नगरपालिका निवडणुकीच्या कॉंग्रेसच्या प्रचारार्थ रविवारी दुपारी मुख्यमंत्री पृथ्वीराच चव्हाण यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. चव्हाण यांचे भाषण...
  December 4, 06:44 PM
 • नागपूर येथील अनेक वर्षे रखडलेल्या मिहान विमानतळाच्या जमिनीसाठी प्रतिहेक्टर तब्बल दीड कोटी रुपये मोबदला शेतकर्यांना देण्यास राज्य सरकार तयार झाले आहे. आतापर्यंतच्या प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या दरामध्ये हा सर्वात जास्त मानला जातो. राज्य विमान प्राधिकरणाची शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. याआधी 17 सप्टेंबर रोजी या विषयावर मुख्यमंत्री व शेतकरी यांची बैठक झाली होती. त्यामध्ये सरकारने त्यांना 1 कोटी 25 लाख रुपये...
  December 4, 12:23 PM
 • नागपूर - राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत निराधार लोकांच्या मदतीसाठी राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्यानुसार कैद्यांच्या निराधार कुटुंबिय, सिकलसेलचे रुग्णांनाही आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. संजय गांधी निराधार योजनेत अनेक सुधारणा करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कडक धोरण अवलंबविण्याचे आदेश नुकतेच सामाजिक न्याय विभागाने एका शासकीय परिपत्राकाद्वारे काढले आहेत. यापूर्वी कुटुंबियांचा आधार नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना...
  December 4, 04:32 AM
 • नागपूर - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १२ तारखेपासून येथे सुरु होणार आहे. विदर्भातील कास्तकरी सध्या कापसाला ६ हजार रुपये भाव मिळावा यासाठी आंदोलन करीत आहेत. यासोबतच प्रमुख विरोधी पक्ष शिवसेना - भाजप युतीनेही कापूस दिंडी, रास्ता रोको आंदोलन करुन विदर्भातील कास्तक-यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या अधिवेशनात कापसाचा मुद्दा ऐरणीवर राहण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी उत्तर प्रदेशाचे चार छोट्या छोट्या...
  December 3, 05:42 PM
 • नागपूर - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर दहावीच्या परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहेत. दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने मात्र अद्याप परीक्षांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत.
  December 2, 11:42 AM
 • मेहकर - मेहकर-सुलतानपूर रस्त्यावर सोमवारी पहाटे दोन खासगी बसची समोरासमोर धडक होऊन 16 जणांचा मृत्यू झाला होता. सर्व मृतांची नावे पोलिसांनी जाहीर केली असून ओळख पटलेले पाच मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. मृतांमध्ये नागपूर, अमरावती व पुणे जिल्ह्यातील प्रवाशांचा समावेश आहे. मृतांची नावे पुढीलप्रमाणे : शेख इकबाल शेख बब्बू (नागपूर), साबीर खान वाहीद खान, नामदेव भालेराव, बेबी भालेराव, ताई भालेराव, मंगला भालेराव (सर्व रा. शिरपूर जैन), सचिन अनिलराव घडीतकर (मंगळूर पीर), केतकी कमलाकांत...
  November 30, 02:02 AM
 • कापसाला योग्य भाव देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहेत. तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्याची केलेली घोषणा ढोंगीपणाची असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.नागपूर येथे 12 डिसेंबरपासून सुरू होणार्या विधिमंडळाच्या अधिवेशनावर लक्ष केंदित करून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या मोझरी येथे 8 डिसेंबरला कापूस आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असे ते म्हणाले.ऊसाच्या...
  November 29, 03:57 AM
 • नागपूर महामार्गावर बुलडाण्यानजीक सोमवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास दोन लक्झरी बसच्या भीषण अपघातात 16 प्रवासी ठार झाले. धडकेनंतर दोन्ही बसनी पेट घेतल्याने 15 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 56 जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना औरंगाबाद, जालना तसेच मेहकरच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. अपघातात दोन्ही बसचे चालक ठार झाले.नागपूरहून पुण्याकडे जाणारी सैनी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस (एमएच 31, सीडी 5661) मेहकर-सुलतानपूर रोडवर सारंगपूर गावानजीक पुण्याहून नागपूरकडे जाणा-या रॉयल...
  November 29, 03:22 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात