Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • नागपूर - माणुसकीला काळिमा फासणारी घटना नागपूरमधील हिंगणे एमआयडीसी परिसरात मंगळवारी घडली. एका सहा महिन्यांच्या गरोदर महिलेवर दोन नराधमांनी बलात्कार केला. पीडित महिलेने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली असून, दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. येथील हिंगणे एमआयडीसी परिसरामध्ये पीडित महिला आणि तिचा पती राहत होते. महिलेच्या पतीला ओळखणारे, पण विशेष ओळख नसलेले दुर्गेश तिवारी आणि संदीप ढोरे हे मंगळवारी त्याला भेटायला आले होते. या भेटीदरम्यान त्यांनी पार्टीचा बेत आखला. नंतर धोका...
  May 30, 05:10 AM
 • नागपूर - स्लमडॉग मिलेनिअर या चित्रपटातील गाणी ही ऑस्कर पुरस्काराच्या योग्यतेची नव्हती. तसेच ऑस्कर आजकाल विकत घेतले जाते, असे मी एेकले आहे, अशी टीका प्रख्यात संगीतकार इस्माईल दरबार यांनी ए. आर. रेहमान यांचे नाव न घेता केली. दरम्यान, दरबार यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यासाठी त्यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांचीही भेट घेतली आहे
  May 29, 01:57 AM
 • नागपूर - संकुचित आणि क्षेत्रीय राजकारण करण्यापेक्षा एखादा वैश्विक विचार असलेला पक्ष आपल्याला आवडतो, असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनबाई स्मिता ठाकरे यांनी केले आहे. काही महिन्यांपूर्वी त्या काँग्रेसमध्ये जाणार, अशी चर्चा जोरात होती. शुक्रवारी त्यांनी नागपुरात नितीन गडकरींची भेट घेऊन राष्ट्रीय पक्षाला पसंती दिली असल्याने त्या भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा अटकळही राजकीय वर्तुळात बांधल्या जात आहेत.
  May 29, 01:46 AM
 • नागपूर - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या ५४ व्या वाढदिवशी वॉर्ड क्रमांक ९७ चे कार्यकर्ता ५४ किलोचा केक त्यांना भेट देणार आहेत. गडकरी यांच्या निवासस्थांनी जाऊन त्यांना हा केक भेट म्हणून दिला जाणार आहे. वॉर्ड अध्यक्ष देवेंद्र काटोलकर यांनी ही माहिती दिली. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त पंचवटी वृद्धाश्रमात फळेही वाटण्यात येणार आहेत. याच श्रीकृष्णनगरमधील हनुमान मंदिरात विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे.
  May 28, 12:03 AM
 • नागपूर - अवैध व्यवसायात वर्चस्वाच्या मुद्द्यावरून उत्तर नागपूरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामुळे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच गेल्या सोमवारी रात्री दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा हाणामारी झाल्याने परिस्थिती आणखीनच बिकट झाली. पाचपावली आणि यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुगाराच्या अड्ड्यांवर काही राजकीय कार्यकर्त्यांचे वर्चस्व वाढू लागले होते. यावरून कार्यकर्त्यांमध्ये वादावादी होत...
  May 27, 11:59 PM
 • यवतमाळ - हवामान बदलाच्या पाश्र्वभूमीवर पुढील वर्षी नवे राष्ट्रीय जलधोरण तयार करण्यात येणार असून, त्यात पाण्यामुळे अद्यापही विकासापासून वंचित राहिलेल्या प्रदेशांच्या संतुलित विकासावर भर देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी गुरुवारी (ता. 26) विदर्भ पाणी परिषदेत केले. व्यासपीठावर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा पाणी परिषदेचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण मंत्री संजय देवतळे, रोहयो मंत्री तथा परिषदेचे...
  May 27, 03:35 PM
 • युनियन कार्बाइडच्या जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक विषारी कच-यास नष्ट करण्याची जबाबदारी डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडे देण्यात आली आहे. डीआरडीओने यासाठी सैद्धांतिक परवानगी दिली आहे. मात्र अद्याप सुरक्षा मंत्रालयाने यास परवानगी दिली नाही. यासाठी ग्रुप ऑफ मिनिस्टर संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांना भेटून त्यांची परवानगी मिळवणार आहेत. आेव्हर साइट कमिटीच्या बैठकीत रासायनिक कच:याची विल्हेवाट लावण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. याआधी पिथमपूर येथे 350 टन कच:यातून 40 टन कचरा...
  May 27, 01:33 PM
 • नागपूर ढगाळ वातावरणामुळे विदर्भात उन्हाचा पारा घसरला आहे. त्यामुळे मागील आठवड्यात उन्हाचे चटके सहन करणा:या वैदर्भीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.मागील आठवड्यात शहरातील पारा चक्क ४४.६ वर गेला होता. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमान सतत कमी होत आहे. रविवारी नागपूरचे तापमान ४१.८ अंशांपर्यंत खाली घसरले. विदर्भातील इतरही शहरांचे तापमान कमी झाले आहे.
  May 24, 12:26 PM
 • अकोला महापालिका बरखास्त करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या कार्यकत्र्यांनी सोमवारी (ता. 23) अकोला महापालिकेवर मोर्चा काढला होता. काही शिवसैनिकांनी महापालिकेला टाळे ठोकण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. याचवेळी काही नगरसेवकांनी कार्यालयात घुसून खुच्र्यांची तोडफोड केली. अकोला महापालिकेची सभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. याचवेळी सर्वच पातळीवर अपयशी ठरलेली महापालिकाच बरखास्त करावी, अशी मागणी करत शिवसेनेचा मेार्चा महापालिकेवर धडकला. सुरक्षा...
  May 24, 12:10 PM
 • नागपूर जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढविल्याने ती ठार झाली. नागपूर जिल्ह्यातील उमर तालुक्यापासून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या दहिगावातील लिलाबाई शेंडे (वय 25) ही महिला रविवारी सकाळी गावाजवळ असलेल्या जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेली होती. याचवेळी जंगलात वाघाने तिच्यावर अचानक हल्ला केला, यात गंभीर जखमी झालेल्या लिलाबाईचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाची वन विभाग व स्थानिक पोलिसांनी नोंद केली आहे.
  May 23, 12:10 PM
 • अकोला - कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करणारे अकोला पोलिस कामाच्या ताणाने वैतागले आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात पोलिस मनुष्यबळ असलेल्या हजारो कर्मचा:यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यायची आहे. अकोला पोलिस मुख्यालयांतर्गत जवळपास १ पोलिसांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी पोलिस आयुक्तांकडे याबाबत पत्र पाठविले आहे. दरम्यान, समाजात वेगळा संदेश जाईल या भीतीने अकोला पोलिस प्रशासनाने ही माहिती अत्यंत गोपनीय ठेवली आहे. गृहखात्याची उदासीनता सध्या अकोला पोलिस विभागामध्ये कर्मचा:यांचा मोठ्या...
  May 23, 12:03 PM
 • नागपूर - रेल्वे स्टेशनमधील कर्मचारी असो की तिकीट चेकर, यापैकी कुणीही गणवेशाशिवाय ड्युटीवर येणार नाही, असा आदेशच रेल्वेन बोर्डाने काढला आहे. मुख्य वाणिज्य प्रबंधक व तिकिट तपासणी पथकालाही गणवेशाशिवाय काम करण्याची जी सुट होती, तीही आता नवीन नियमानुसार रद्द करण्यात आली आहे. रेल्वेतील काही ठराविक कर्मचारी नेहमीच गणवेशात दिसतात, मात्र स्टेशनवर तिकिट देणारे कर्मचारी, तिकिट तपासणीस आणि तपासणी पथकातील कर्मचारी नेहमीच साध्या कपड्यांमध्ये ड्युटीवर असतात. मात्र आता रेल्वे बोर्डाचे मुख्य...
  May 22, 10:35 AM
 • नागपूर येथील महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचा परिसर आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या हॉर्टिकल्चर क्षेत्रातील शेतात उष्णतेमुळे मोठी आग लागली. या आगीत शेतामधील पीक आणि झाडे जळून खाक झाली. पहिल्यांदा उष्णतेमुळे एका झाडाला आग लागली. दरम्यान जोराचा वारा सुटल्यामुळे आग परिसरामध्ये पसरली आणि शेजारीच असलेल्या महाराजबाग प्राणीसंग्राहलय परिसरातील बांबूच्या बेटाने पेट घेतला. आगीचे वृत्त समताच अग्लिशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
  May 22, 10:26 AM
 • अकोला - एकदा दारूचे व्यसन लागले की, दारू पिणारा कोठेही दारू पिऊ शकतो. सध्या शहरात ठिकठिकाणी अंडा-पावच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात संध्याकाळी आणि काही प्रमाणात दिवसादेखील दारू पिणा:यांच्या रांगा लागत आहेत. दारू पिण्याची हौस बारच्या तुलनेत अंडा-पावच्या गाड्यावर स्वस्तात भागवता येते. त्यामुळे मागच्या काही दिवसांत अंडा-पाव चालविणा:या गाडीवाल्यांची चांगलीच चांदी होत आहे. मिनी बारबारमध्ये ज्याप्रमाणे थंड पाणी, बर्फ, चकना, सलाड मिळतो पण तिथे तसा खिसाही गरम असायला पाहिजे. अंडा-पावच्या...
  May 21, 03:43 PM
 • नागपुर - शहर व परिसरात चार दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसानंतर जवळपास अर्धे शहर अंधारात बुडाले. राज्य सरकारने वीज वितरणासाठी खासगी क्षेत्रातील 'स्पॅँको' या कंपनीकडे जबाबदारी दिली आहे. परंतु गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम कंपनीने केले नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकत्र्यांनी शुक्रवारी वीज कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. भाजपचे आमदार विकास कुंभारे आणि अखिल भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष बंटी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली...
  May 21, 02:59 PM
 • नागपूर - उत्तरेकडून येणा-या उष्ण वा-यांमुळे विदर्भ अधिकच तापत असून शुक्रवारी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे एका वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्यामुळे विदर्भात उष्माघाताच्या बळींची संख्या सहावर गेली आहे.देसाईगंज येथील रेल्वे स्टेशनजवळ किसन सीताराम रामटेके यांचा कोसळून मृत्यू झाला. त्यांना ग्रामीण हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले. यापूर्वी देसाईगंज येथेच संगीत शिक्षक मधुकर माडे यांचाही उष्माघाताने...
  May 20, 05:06 PM
 • नागपूर - लोकप्रतिनिधींनी मेट्रोच्या क्षेत्रात कपात करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या सर्वांचाच विरोध लक्षात घेता समाधानकारक तोडगा काढावा लागेल. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असे सांगून; नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी मेट्रोरिजनचे क्षेत्र 25 ऐवजी 10 किलोमीटर करण्याचे स्पष्ट संकेत पत्रपरिषदेत दिलेत.भास्कर जाधव यांनी स्थानिक रविभवनात महापालिका आणि सुधार प्रन्याससंदर्भात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. यातून विविध योजना, प्रकल्पांची माहिती...
  May 20, 05:01 PM
 • यवतमाळ - महाराष्ट्रात कॉग्रेसने स्वीकारलेल्या आक्रमक धोरणाचा भाग म्हणून २६ मे रोजी यवतमाळ येथे होणा-या विदर्भ पाणी परिषदेचा उपयोगही पक्षाकडून आपला टक्का वाढविण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कॉग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे, तसेच केंद्रीय जलसंपत्ती मंत्री सलमान खुर्शीद हे या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. पाण्यावर पहिला हक्क पिण्यासाठी, त्यानंतर कृषिसाठी आणि त्यानंतर उद्योगासाठी, अशी या परिषदेची मध्यवर्ती कल्पना आहे. विदर्भात आपले संख्याबळ...
  May 20, 11:57 AM
 • गडचिरोली - भामरागड तालुक्यातील गावांमध्ये सीआरपीएफ आणि सी-६ च्या तुकड्यांनी केलेल्या कारवाईच्या वेळी नक्षलवाद्यांशी त्यांची तुंबळ चकमक उडाली. यात सी-६ दलाचे कमांडर चिन्ना वेंट्टा यांच्यासह दोन एसपीआ, एक जवान असे ४ जण शहीद झाले. गोळीबारात १५ नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. कारवाईत ठार झालेल्या दोन नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या वेळी पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल व एके ४७ रायफल घेऊन नक्षली पळून गेले. नारगुंडा, जांबिया गट्टा, ताडगाव,...
  May 20, 11:35 AM
 • अकोला - अकोला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेत शिक्षक सदस्यांच्या पैशांची उधळपट्टी पतसंस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकाने केल्याची तक्रार उर्वरित पाच संचालकांनी केली आहे. संस्थेतून २८ ते २१ मध्ये जवळपास १३ लाख १४ हजार ५४१ रुपयांची उचल केली. या उचलीमुळे पतसंस्थेला मात्र, व्याजापोटी मिळणा:या १ लाख ६८ हजार रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. या घटनेनंतर पतसंस्थेचे संचालक शशिकांत गायकवाड, अरुण धांडे, ज्ञानेश्वर टोहरे, साहेबराव पातोंड यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे...
  May 20, 09:25 AM
 
जाहिरात

RECOMMENDED