जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • अमरावती- केंद्र शासनाच्या दूरस्थ शिक्षण पद्धती अंतर्गत दुर्गम भागातील आदिवासी मुला मुलींनाही संगणकाचे ज्ञान मिळावे म्हणून सात वर्षांपूर्वी एक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. मुलांना प्रवेश देऊन त्यांना शिक्षण देण्याचे काम शासनाने एका संस्थेला दिले होते. त्या संस्थेने शासनाकडून तब्बल १११ मुलांचे सुमारे ४४ लाख २८ हजार रुपये लाटले मात्र यातील अनेक विद्यार्थ्यांना आपला संगणक अभ्यासक्रमाला प्रवेश आहे, हेसुद्धा माहीत नव्हते. प्रत्येकाला शिष्यवृत्ती मिळणे अपेक्षित असताना अनेकांना...
  December 22, 11:21 AM
 • नागपूर: महाराष्टाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये न्यायालयाच्या बाहेरच एका वकीलावर त्याच्यासोबत काम करणाऱ्या दुसऱ्या वकीलाने जीवघेणा हल्ला केला, आणि त्यानंतर विष प्राशन केले. नागपूरच्या विधी महाविद्यालयातून निवृत्त झालेले सदानंद नारनवरे हे नागपूरच्या जिल्हा न्यायलयात वकीलीचा व्यवसाय करतात. त्यांनी नुकतीच वकीलीची सनद मिळालेला वकिल लोकेश भास्कर याला आपल्याकडे सहाय्यक म्हणून कामास ठेवले. रोजप्रमाने ते दुपारी चार वाजता न्यायालयाच्या बाहेर खुर्ची आणि टेबल टाकुन बसले हाते,...
  December 21, 08:28 PM
 • अमरावती- राज्यातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात सराव करणारा तसेच पाच वेळा विदर्भ केसरी राहिलेले संजय तीरथकर यांचा पठ्ठा शोएब खानने विदर्भाला पहिले पदक दिले आहे. त्याने गादी गटात ७९ किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले, त्यामुळे विदर्भातील कुस्तीचा गढ अशी ख्याती असलेल्या अंबानगरीतील कुस्ती वर्तुळात आनंद साजरा होत आहे. जालना येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शोएबने पहिल्या फेरीत नाशिक शहराच्या कुमार बाभरेचा...
  December 21, 11:26 AM
 • वरुड - कधी काळी संत्र्यामुळे धनसंपन्न झालेल्या वरुड तालुक्यातील संत्र्यावरच सध्या दुष्काळाचे काळे ढग घोंघावत असून पाण्याअभावी संपूर्ण तालुक्यातीलच संत्रा आगामी सहा महिन्यात नष्ट होण्याची गंभीर भिती निर्माण झाली आहे. दरम्यान, जगण्याचे एकमेव साधन असलेल्या या बागा जगवण्यासाठी सात-आठ किमीची पाईपलाईन टाकून धरणावरून पाणी आणण्याचे दिव्य काम करावे लागत आहे. दरम्यान, पाण्याअभावी आगामी पाच महिने तालुक्यातील संत्रा उत्पादकांसाठी जीवन-मरणाची लढाई ठरणार आहे. वरुड तालुक्यात सुमारे ५१ हजार...
  December 20, 12:38 PM
 • नागपूर - शिक्षण संस्थांनी शिक्षण शुल्काच्या वसुलीसाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांवर कारवाई करू नये, केंद्राने विद्यार्थ्यांच्या खात्यात मेंटेनन्स शिष्यवृत्ती जमा करावी व पुढील आदेशापर्यंत शुल्क परतावा शिष्यवृत्ती स्थगित ठेवावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क व मेंटेनन्स शिष्यवृत्तीचा परतावा विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेण्यात आला. यास संस्थांनी न्यायालयात आव्हान दिले....
  December 20, 09:15 AM
 • नागपूर- चारचाकी आणि दुचाकी वाहनांमधील कप्पे, टूलबॉक्स, डिझेलच्या टाक्यांमध्ये तयार केलेले स्वतंत्र कप्पे, कापूस अथवा धान्याची पोती, कलिंगड किंवा कोहळ्याचा गर काढून तयार केलेले कप्पे, गॅस सिलिंडर.. शाळकरी मुलांची दप्तराचा दारूच्या तस्करीसाठी या साधनांचा वापर सर्रासपणे केला जात आहे. दारूबंदी लागू असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात तळीरामांची तलफ भागवण्यासाठी तस्करांकडून दारूच्या छुप्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या क्लृप्त्यांमुळे स्थानिक पोलिस यंत्रणाही मेटाकुटीला आली आहे. या...
  December 19, 08:12 AM
 • रोके से ना रूके हम| मर्जी से चले हम बादल सा बरसे हम। सूरज सा चमके हम...स्कूल चले हम... नागपूर- दूरदर्शनवर सर्व शिक्षा अभियानाच्या प्रचारार्थ एकेकाळी गाजलेल्या या गीताने एका पिढीच्या मनात घर केले होते. शिक्षणापासून एकही घटक वंचित राहू नये म्हणून हे सर्वशिक्षा अभियान देशात राबवण्यात आले. यातून अनेक नवसाक्षर घडले आणि आज यातून काही पिढ्या सुशिक्षित, उच्चशिक्षित झाल्या. ज्या जिद्दीतून हे साध्य झाले ती जिद्द आजही कायम आहे. चंद्रपूर जिल्ह्यात फक्त दोन सख्ख्या बहिणींसाठी सुरू असलेली जिल्हा...
  December 19, 08:02 AM
 • नागपूर- धावत्या कारमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड करून पोलिसांनी दोन दलालांना अटक केल्याची घटना ताजी असताना नागपूर शहरात आणखी एक हॉय प्रोफाइल सेक्स रॅकेट उघड झाले आहे. मानेवाड्यातील तपस्या चौकाजवळीत इराई विहार येथील शाईन युनिसेक्स सलूनमध्ये पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. युनिसेक्स सलूनमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी खातरजमा केली असता सलूनमध्ये सेक्स रॅकेट सुरु...
  December 18, 02:23 PM
 • अमरावती - शहरात मागील महिनाभरात राजा पेठ आणि गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन मोठ्या घरफोडीच्या घटना घडूनही अजूनही पोलिसांना या दोन्ही चोऱ्यांमधील चोरट्यांना पकडण्यात यश आले नाही. पोलिसांच्या तपासाची गती पाहता मागील अकरा महिन्यांत आयुक्तालयाच्या हद्दीत दिवसा व रात्री असे सुमारे १३९ घरफोडीचे गुन्हे दाखल झाले.त्यापैकी फक्त ३२ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. मागील वर्षी याच कालखंडात दाखल घरफोडींची संख्या १६६ होती. यंदा ही संख्या कमी असली तरी गुन्हे उघड करण्याचे प्रमाण...
  December 18, 11:41 AM
 • अमरावती- अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी दरवर्षी पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून जनजागृती पंधरवडा आयोजित केला जातो. वाहतूक पोलिस, आरटीओकडून नियम तोडणाऱ्या वाहनचालकांकडून दंड आकारला जातो. मात्र दंड आकारून वाहन चालकांवर फारसा फरक पडत नसल्याचे शासनाच्या ही निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता सदर वाहनचालकाचा परवानाच निलंबित करण्यासाठी आरटीओकडे पाठवावा आणि आरटीओने परवाना निलंबित करावा, असे आदेश शासनाने संबधित...
  December 17, 10:43 AM
 • अमरावती- शहरातील रुक्मिणीनगरमध्ये राहणारे नेत्रतज्ज्ञ डाॅ. अतुल कढाणे यांना जेनेरिक मेडिसिन कंपनीची जिल्ह्याची फ्रँचायझी देण्याचे आमिष देऊन पंधरा लाख रुपयांनी गंडवल्याचा प्रकार नुकताच समोर आला. या प्रकरणी डॉ. कढाणे यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी शनिवारी दि.(१५) रात्री कंपनीच्या दोन भागीदार मालकासह कंपनीचे दोन प्रतिनिधी अशा चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अजित वासुदेव भाकरे (४७, रा. गणेशनगर, नागपूर), विवेक अरविंद गिरी (दत्त कॉलनी, अकोला), मकरंद श्याम किशोर...
  December 17, 10:43 AM
 • नागपुर- कर्जबाजारीपणा, नैसर्गिक संकटांमुळे दीनवाणे झालेले शेतकरी आत्महत्या करीत असतानाच नागपुरचे राज मदनगर, अनिकेत शेटे व गोपाल शर्मा या उच्चशिक्षित युवकांनी दिग्गज कंपन्यांतील लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडून अभिनव शेती करण्याची मोहिम हाती घेतली आहे. राज मदनकर-१५ लाखांची नोकरी सोडून नैसर्गिक शेतीसाठी पुढाकार राज मदनकर हा देशातून निवडलेल्या ५० जणांपैकी एक स्वच्छ भारत दूत आहे. तो अमेरिकन बँकेत १५ लाखांच्या पॅकेजवर काम करत होता. मात्र, शेती करण्याच्या उद्देशाने नोकरीला रामराम...
  December 17, 08:09 AM
 • delete
  December 16, 02:43 PM
 • अमरावती- बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या म्हसला गावात बकऱ्या चारण्याच्या वादातून ३२ वर्षीय युवकाचा गावातीलच एका व्यक्तीसोबत वाद झाला. या वेळी त्या युवकाने थापड मारली. याच थापडेचा वचपा घेण्यासाठी पाच जणांनी युवकाला गावातच बेदम मारहाण करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १६) रात्री घडली. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. शुद्धोधन माणिकराव वानखडे (३२, म्हसला) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी...
  December 16, 10:55 AM
 • आर्णी- यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे शुक्रवारी दुपारी भररस्त्यावर भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या झाली होती. या घटनेचे शनिवारी पहाटे उमटले. संतप्त जमावाने ग्रामीण रुग्णालयातील अॅम्बुलन्स पेटवली. या घटनेने शहरात तणाव निर्माण झाला आहे. शनिवारी सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे. शहरासह ग्रामीण रुग्णालयात पोलिस बंदोबस्त आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी नीलेश हिम्मतराव मस्के याच्यासह त्याचा मित्र ओम गजानन बुटले याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. यात...
  December 15, 04:47 PM
 • अमरावती- राजापेठ ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका एकोणतीस वर्षीय विवाहितेवर परिचित असलेल्या २६ वर्षीय युवकाने वारंवार अत्याचार केला. या प्रकाराबाबत कोणालाही सांगितले किंवा बाहेर कुठे वाच्यता केल्यास, मुलांना ठार मारेल, अशी धमकी अत्याचार करणाऱ्या युवकाने दिल्याची तक्रार पीडितेने राजापेठ पोलिसात दिली आहे.या तक्रारीवरून पोलिसांनी १३ डिसेंबरला युवकाविरुद्ध बलात्कार, विश्वासघात तसेच धमकी देणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला. अल्पेश उत्तमराव खडसे (२६, रा. जेवडनगर) असे पोलिसांनी गुन्हा...
  December 15, 10:47 AM
 • नागपूर- बादशहा अकबराच्या काळात १० हजारांच्या घरात असलेला चित्ता नंतर संस्थानिक आणि राजे-रजवाड्यांच्या शिकारीच्या नादामुळे नामशेष झाला. भारतातील गवताळ प्रदेशातील वातावरण चित्त्यांसाठी पोषक असल्याने १८ चित्ते भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयात खटला चालवण्यासाठी भक्कम आर्थिक पाठबळ हवे. त्यासाठी समाजातील दानशूर तसेच वन्यजीवप्रेमींनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन अँड रुरल डेव्हलपमेंट संस्थेच्या अध्यक्षा आणि ख्यातनाम चित्ता...
  December 15, 07:35 AM
 • आर्णी - यवतमाळच्या आर्णीमधील ग्रामीण रुग्णालय परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. दुपारी पाऊणे दोनच्या सुमारास नीलेश मस्के यांच्यावर हा हल्ला झाला. हल्ला थांबवण्यासाठी गेलेले अमित बुटले यांच्यावरही हल्लेखोरांनी हल्ला चढवला. यात नीलेश मस्के ठार झाला असून बुटले यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. नीलेश मस्के हा पूर्वी शिवसेना कार्यकर्ता होता. युवासेनेच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यानंतर मस्के यांनी भाजपमध्ये...
  December 14, 03:55 PM
 • अमरावती - शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार संजय रावसाहेब बंड (५२) यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, आई व दोन भाऊ असा परिवार आहे. बंड हे अमरावती जिल्ह्यातील वलगाव मतदारसंघातून तीन वेळा शिवसेनेतर्फे आमदार म्हणून निवडून आले होते. नव्वदच्या दशकात विद्यार्थी चळवळीतून बंड यांनी राजकारणात प्रवेश केला. भारतीय विद्यार्थी सेनेतही त्यांनी काम केले. १९९६ मध्ये ते प्रथम अामदार म्हणून...
  December 14, 10:51 AM
 • वरुड- गावी. जाण्यासाठी येथील बसस्थानकात बसची वाट पाहात असलेल्या एका अल्पवयीन युवतीला घरी सोडून देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवत एका शेतात नेत जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. ही घटना ९ डिसेंबर रोजी घडली. याबाबत घाबरलेल्या पीडितेने गुरुवारी कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबियांनी त्वरित पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आराेपीला अटक केली. सलमान शहा कासम शहा (वय ३५, रा. वरुड) असे आरोपीचे नाव आहे. बसस्थानकात बसची वाट पाहत असलेल्या...
  December 14, 09:50 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात