जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Yavatmal

Yavatmal News

 • पुसद -सकल मराठा समाजाच्या मूक मोर्चावर शिवसेनेच्या मुखपत्रातून अाक्षेपार्ह व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याप्रकरणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत, राजेंद्र भागवत यांच्याविरुद्ध पुसद न्यायालयाने सोमवारी वॉरंट जारी केले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रात शांततेच्या मार्गाने मूक मोर्चे सुरू होते. असे असताना मराठा समाजाच्या मूक मोर्चावर शिवसेनेच्या मुखपत्रात हे व्यंगचित्र प्रकाशित केले होते. यात भारतीय सैन्य दलांमधील शहीद झालेल्या सैनिकांबाबतीत...
  April 24, 09:32 AM
 • आर्णी (यवतमाळ)- लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात २० मार्च २०१४ ला चाय पे चर्चा हा कार्यक्रम घेतला होता. शेती फायद्याची करणार, असा वायदाही त्यांनी देशाला येथूनच दिला. मोदी सत्तेत अाले, मात्र दाभडीतील शेतकऱ्यांचे नशीब काही पालटले नाही. येथे आता चाय पे नव्हे तर शेतकरी आत्महत्यांच्या चर्चा रंगत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. गेल्या साडेचार वर्षांत दाभडी गावात २० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून...
  February 5, 08:05 AM
 • यावल- तालुका दुष्काळग्रस्त असून ग्रामीण भागातील पाणी टंचाई संदर्भातील प्रत्यक्ष आराखड्याच्या बाबतीत तुम्हाला जर बैठकीत योग्य उत्तर देत येता नसतील तर तुम्ही प्रत्येक्षात काम कसे करतात? आरखडा सादर करताना कूपनलिकेचे २०० फुटापर्यंत प्रस्ताव तुम्ही पाठवले. मात्र, प्रत्यक्षात मंत्रीमहोदयांनी ४०० फूट वर पाणी लागेल म्हणून चारशे फुटला मान्यता दिली आहे. एवढं तुम्हाला समजत नाही का ? अशा शब्दात चोपडा आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी ग्रामीण पाणीपुरवठाच्या अधिकाऱ्यांना शिवसेना...
  January 5, 09:01 PM
 • यावल- येथील बराणपुर अंकलेश्वर मार्गावरील गिरडगाव गावाजवळ शनिवारी साडेबारा वाजेच्या सुमारास चोपड्याकडे जात असलेल्या ओमनीने अचानक पेट घेतला. ओमनीने एकदम पेट घेताच बर्निंग ओमनीचे ते दृष्य होते. थोड्याच वेळात ओमनी पुर्णपणे जळून खाक झाली. आग लागली तेव्हा ओमनीत प्रवासी होते पण कोणतीही मानव हानी झालेली नाही. यावल चोपडा रस्त्यावरील गिरडगाव गावाजवळ यावल कडून प्रवासी घेऊन जात असलेली यावल येथील रेहानखान यांच्या मालकीची ओमनी क्रमांक (एम.एच.१९ ए.एफ.५९८७) हिने अचानक पेट घेतला. वाहनात पाच...
  January 5, 09:01 PM
 • यवतमाळ- यवतमाळ जिल्ह्यातील बोराटी जंगल परिसरात टी-१ ऊर्फ अवनी वाघिणीला गाेळी घालून मारल्यापासून तिच्या दाेन्ही बछड्यांचा शाेध लागत नव्हता. अाईच्या मृत्यूनंतर अन्नपाण्याविना त्यांचा मृत्यू झाला असल्याच्याही वावड्या उठल्या. मात्र अाता १३ दिवसानंतर हे दाेन्ही बछडे वन विभागाने जंगलात लावलेल्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाले असून विहिरगावजवळ गस्तीपथकाला ते दोन्ही बछडे रस्ता पार करतानाही दिसून अाले अाहेत. त्यामुळे वन विभागाचा जीव भांड्यात पडला आहे. नरभक्षक असल्याचा अाराेप करत अवनीला राज्य...
  November 17, 08:44 AM
 • वणी-वणी परिसरात सध्या वाघाची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. दि. ५ नोव्हेंबरला वेकोलीच्या कोलार पिंपरी परिसरात वाघ दिसल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राळेगाव परिसरात वाघाने १३ जणांचा बळी घेतल्यावर वन विभागाने नरभक्षक वाघिणीचा शोध घेऊन तिला ठार केले. यानंतर वणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा वावर दिसत आहे. शिरपूर येथे एका शेतात वाघ दिसल्याने शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीती निर्माण झाली होती तर नीवली येथे वाघाने गाईची शिकार केली होती. त्यामुळे वन विभागाने...
  November 7, 11:57 AM
 • यवतमाळ - पाच हत्ती, इटालियन श्वान, पॅरामोटार, शार्पशूटर असा फौजफाटा तसेच ६ कोटी रुपये खर्च करत २०० जणांच्या चमूकडून अविरत शोध घेऊनही यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा भागातील हल्लेखोर वाघिण अवनीला पकडण्यात अपयशच आले आहे. मात्र, तिच्या दहशतीमुळे १८ गावांतील लोक जीव मुठीत धरून जगत आहेत. हा परिसर पहाडी, उंच-सखल व छोट्यामोठ्या नाल्यांचा असून यात रायमुनीया (लँटेना) नामक गवत मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. त्यामुळेच ४ ते ५ फूट उंचीच्या या गवतात अवनीला शोधणे अवघड काम असल्याचे या मोहिमेत प्रत्यक्ष...
  October 24, 08:04 AM
 • आर्णी (यवतमाळ) - आर्णी परिसरातून रेती भरून जाणाऱ्या 407 वाहन दिग्रज रोडवर उलटले. यात नांदेडच्या माहूर येथील रहिवासी असलेल्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. दिग्रज रोडवर शनिवारी सकाळी हा अपघात घडला आहे. दिगांबर नरहरी असे मृत्यूमुखी पडलेल्या चालकाचे नाव असून ते नांदेडच्या माहूर येथील किरोळी गावचे रहिवासी होते. आर्णी परिसरातील नदीवरून गाडी क्रमांक एम.एच. 02 सीई 8007 (407) मध्ये रेती भरून दिग्रज मार्गावरून जात असताना आर्णी जवळ असलेल्या पारधी बेड्यावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यानंतर अख्खे वाहन...
  May 6, 02:37 PM
 • यवतमाळ- स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ अन्याय निवारण समिती आणि विदर्भवादी संस्थांच्या वतीने मे रोजी स्वतंत्र विदर्भाचा ध्वज फडकवण्यात येणार आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांत धरणे, उपोषण करण्यात येणार आहे. या अंतर्गत यवतमाळ शहरातील नेताजी मार्केट परिसरात मे रोजी विदर्भाचा ध्वज फडकवला जाणार आहे. यवतमाळकरांनी महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळावा, असे आवाहन विदर्भ अन्याय निवारण समितीच्या क्रांती धोटे (राऊत) यांनी केले. विदर्भ अन्याय निवारण समितीच्या पुढाकारात शनिवार,...
  May 1, 11:21 AM
 • यवतमाळ- शेतीच्या वादावरून दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथील एकाच कुटुंबातील तीन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना गुरुवार, २७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. ही घटना लक्षात येताच उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता गृहात त्यांच्यावर उपचार सुरू असले तरी, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. उमेश...
  April 28, 09:37 AM
 • कळंब :तोंडातून एकही शब्द नाही की कानठळ्या बसणाऱ्या घोषणा नाहीत. एका रांगेत लाखावर समाजबांधव एकत्र येऊन आपल्या न्याय्य हक्कासाठी प्रशासनाकडे निवेदन देऊन परत शिस्तीत परततो. कुठलाही गोंधळ, गडबड न करता, मोर्चानंतर झालेला कचरा गोळा करून तरुण-तरुणी शिस्त घालून देतात. एखाद्या मोर्चातला असा हा शिस्तीचा पायंडा आणि वेदनेतला नि:शब्द हुंकार कळंबकरांनी इतिहासात प्रथमच अनुभवला. निमित्त होते मराठा मूक क्रांती विराट मोर्चाचे. कोपर्डी घटनेतील आरोपींना फासावर लटकवा, मराठा समाजाला आरक्षण द्या आदी...
  December 8, 03:15 AM
 • उमरखेड - शहरातील रोहिली पुऱ्यातून निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर गुरुवारी १५ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास दगडफेक झाली. यात तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह मिरवणुकीत सहभागी १० ते १५ नागरिक जखमी झाले. या घटनेमुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन दोन अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. त्याचवेळी आलेल्या पावसामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले. या घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी उमरखेडला भेट दिली. या...
  September 16, 01:17 AM
 • यवतमाळ-दारूबंदी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या वणी येथील १४ दारू दुकानांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी घेतला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केलेल्या १५ परवान्यांपैकी १४ परवाने कायमस्वरूपी रद्द, तर एक परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे. कायमस्वरूपी परवाना रद्द केलेल्या दुकानदारांमध्ये ए. एन. ठाकरे कुंभा ता. मारेगाव, एम. एच. नक्षिणे मुकुटबन ता. झरीजामणी, सी. एम. जयस्वाल, चिखलगाव, पी. जे. जयस्वाल,...
  August 13, 08:54 AM
 • पुसद- आई जेवायला देईना अन् बाप भिक मागू देईना या उत्कीला तंतोतंत लागू पडणारा प्रकार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने बीकॉमच्या विद्यार्थ्यांसोबत घडवला आहे. विद्यापीठाने बी.कॉम भाग दोन वर्षाचा निकाल रोखून धरल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विदर्भ अगोदरच शिक्षणाच्या क्षेत्रातही मागासलेलाच आहे. येथे मिळते त्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ ऑनलाईन झाले असतानाही अमरावती...
  August 13, 09:59 AM
 • यवतमाळ- यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील 24 तासांमध्ये चार शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे समाेर अाले अाहे. दरम्यान, आता तरी सरकारने दुष्काळग्रस्त शेतक-यांना भरीव मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी, मोहन जाधव यांनी केली आहे. कळंब तालुक्यातील देवनालाचे तुलसीराम राठोड, सोनेगाव येथील देवराव भागवत, घाटंजी तालुक्यातील बोदडीचे बन्सी राठोड तसेच केळापूर तालुक्यातील मोहदा येथील प्रकाश कुतरमारे अशी मृतांची नावे अाहेत. या शेतकऱ्यांनी विष घेऊन आत्महत्या...
  January 29, 05:19 AM
 • यवतमाळ/हिंगोली -दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात असल्याच्या संशयावरून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरच्या दोन तरुणांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली. शहा मुदस्सीर ऊर्फ तल्लहा (२५, शहा काॅलनी, उमरखेड) आणि शोएब अहेमद खान (२४, सिंचन नगर, आखाडा बाळापूर) अशी या दोघांची नावे आहेत. हैदराबादच्या गोपालपुरम पोलिसांनी या दोघांच्या बॅगा तपासल्या. त्यात आक्षेपार्ह कागदपत्रे व संशयित वस्तू आढळल्या असून, मोठे नेटवर्क समोर आले आहे. गुन्हे दाखल करून...
  October 25, 01:34 AM
 • औरंगाबाद - मेंदू विकारावर उपचार घेताना 2009 मध्ये वैद्यकीय बिलाची फाइल सादर केल्यानंतर जवान या पदावर कार्यरत कर्मचा-याचा 2011 मध्ये मृत्यू झाला. ती फाइल आता 2014 मध्ये मंजूर करण्यात आल्याचा प्रकार महानगरपालिकेत घडला आहे. आजारावर उपचार घेता घेता कर्मचारी मरण पावल्यानंतरही त्याच्या बिलाची रक्कम मंजूर होण्यास मनपाला तब्बल तीन वर्षे लागले असून या संतापजनक प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेंड्याची कातडी असलेल्या महापालिका प्रशासनाचा हा लाजिरवाणा प्रकार आज स्थायी समितीच्या...
  July 4, 04:09 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात