Home >> Maharashtra >> Western Maharashtra

Western Maharashtra

 • पापरी (ता. मोहोळ)- सोलापूर जिल्ह्यातील पापरीसह परिसरातील दूध उत्पादक शेतकरी दुधाने अंघोळ करताना दिसत आहे. दूध दरवाढीच्या मागणीसाठी शेतकर्यांनी स्वतःचा दुग्धाभिषेक करून शासनाचा निषेध केला आहे. दरम्यान, चार दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या दूध बंद आंदोलनाला पापरी परिसरातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्रांकडे दूध वाढने बंद केले आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून संकलन केंद्रात एकही लीटर दूध संकलित झाले नसल्याची माहिती...
  July 19, 03:25 PM
 • अकोले - कुमशेत, पाचनई, पेठाची वाडी, अंबित परिसरात सुरू असलेल्या पावसाची तीव्रता बुधवारी कमी झाली. कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या जाहगीरदरावाडी, बारी, वारंघुशी, घाटघर व रतनवाडी परिसरात पावसाने प्रमाण तुलनेत कमी झाले आहे. पाणलोट क्षेत्रात तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे भंडारदरा धरणात पाण्याची आवक चांगली सुरू आहे. बुधवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत पाणीसाठा ८५८७ दलघफू (७७.७८ टक्के ) झाला होता. सायंकाळी साठा ८० टक्क्यांपेक्षा जास्त झाला. घाटघरला १६५ व रतनवाडीत १६१...
  July 19, 11:28 AM
 • राहाता - सव्वा वर्षापूर्वी विवाह झालेल्या विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास पाथरे येथे घडली. विवाहितेला मारहाण करून तिला विहिरीत टाकल्याचा आरोप नातेवाईकांनी करत गोंधळ घातल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. मोठ्या पोलिस बंदोबस्तात विवाहितेवर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. कांचन राकेश कडू (वय २३) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह पाथरे येथील राकेश कडू याच्याबरोबर २३ मे २०१७ रोजी...
  July 19, 11:25 AM
 • नेवासे - शनिशिंगणापूर देवस्थानमधील कथित बेकायदेशीर नोकरभरती प्रकरणी गेले ५ दिवस चालू असलेले सरपंच बाळासाहेब बानकर, विश्वस्त डॉ. वैभव शेटे यांच्या नेतृत्वाखालील उपोषण प्रोसिडिंग व मागणीनुसार मिळालेल्या काही माहितीनंतर बुधवारी मागे घेण्यात आले. नोकरभरतीबाबतची प्रक्रिया व सर्व पगारपत्रके मिळावीत आणि देवस्थानच्या मालकीच्या सर्व वाहनांची माहिती मिळावी, यासाठी उपोषण चालू होते. नोकरभरती रद्द करत असल्याचा ठराव करून प्रोसिडिंग दिले होते. भरती रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांच्या...
  July 19, 11:23 AM
 • वाळकी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला तिसऱ्या दिवशी नगर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बहुतांशी सर्वच गावांतील संकलन केंद्रांवर शेतकऱ्यांनी दूध नेलेच नाही. परिणामी संकलन केंद्र सुरू असूनही दूध मिळू शकले नाही. गुंडेगावमध्ये शेतकऱ्यांनी दूध ओतून, तर तालुका शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या फोटोला दूध पाजून सरकारचा निषेध केला. नगर तालुक्यात प्रियदर्शनी ग्रूप, चितळकर दूध, अमूल, प्रभात यांच्याकडून सुमारे सव्वा लाख लिटर दूध...
  July 19, 11:23 AM
 • नगर - सीना नदीपात्रातील अतिक्रमणे हटवल्यानंतर महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी थकीत मालमत्ता करवसुलीसाठी कंबर कसली आहे. बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत. बुधवारी दुपारी खासदार दिलीप गांधी यांचे बंधू अनिलकुमार मनसुखलाल गांधी यांच्या कापडबाजारातील हॉटेल देवेंद्रला मनपा कर्मचाऱ्यांनी सील ठोकले. कारवाईची माहिती मिळताच गांधी यांनी अवघ्या पंधरा मिनिटांत ६ लाखांची थकबाकी धनादेशाद्वारे भरली. त्यानंत हॉटेलचे सील...
  July 19, 11:19 AM
 • सोलापूर- मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सुरु केलेल्या आंदोलनाची धार आणखी तीव्र केली आहे. पंढरपूरमधील सांगोला मार्गावर एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास बसवर झालेल्या दगडफेकीत चार प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. कोण म्हणतय देत न्याय, घेतल्याशिवाय राहत नाय, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अशा मजूकाराचे पत्रक सकल मराठा समाजाने दगडफेक केलेल्या एसटीबस समोर टाकण्यात आले आहेत. या घटनेची माहीती...
  July 19, 08:43 AM
 • माढा (सोलापुर) - दुध हे कोंबड्यांचे खाद्य नाही. त्यामुळे कोंबड्या दुध पितानाचे चित्र सहसा कुठे दिसत नाही. मात्र माढा तालुक्यातील उदरंगाव येथे आतापर्यंतचा हा समज खोटा ठरत आहे. येथील एका शेतक-याच्या 10 ते 12 कोंबड्या दुध पिऊन फस्त करत आहे. पशुवैदकीय अधिका-यांनीही हा प्रकार प्रथमच पाहायला मिळत असल्याचे सांगितले आहे तर परिसरातील शेतक-यांमध्येही सध्या याचीच चर्चा आहे. दुध दरवाढीकरिता पुकारलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी दुध बंद आंदोलनात उदरंगावचे तरुण शेतकरी केतन...
  July 18, 01:20 PM
 • नगर- केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणात आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांच्याविरुध्द दोषारोपत्र सादर न केल्याबाबतचा खुलासा सीआयडीने मंगळवारी न्यायालयासमोर सादर केला. दोघांच्या विरोधात कोणताही पुरावा न मिळाल्याने त्यांच्याविरुध्द दोषारोपपत्र सादर केले नसल्याचे सीआयडीने सादर केलेल्या लेखी खुलाशात म्हटले आहे. केडगावातील शाहूनगर परिसरात संजय कोतकर व वसंत ठुबे या दोन्ही शिवसैनिकांच्या दुहेरी हत्येप्रकरणी अटक झालेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर...
  July 18, 11:35 AM
 • नेवासे- शनिशिंगणापूर देवस्थानच्या वादग्रस्त नोकर भरतीप्रकरणातील १०६ कर्मचाऱ्यांची भरती रद्द केल्याचे सहायक धर्मादाय आयुक्त ज्ञानेश्वर दंडे यांनी जाहीर केले. दरम्यान, मंगळवारी शिंगणापूर गावात १०० टक्के बंद पाळण्यात आला. चौथ्या दिवशी रात्री उपोषणकर्त्यांनी मागितलेली कागदपत्रे धर्मादाय आयुक्तांमार्फत मिळाल्यानंतर उपोषण थांबले, पण लगेच रद्द झालेल्या नोकर भरतीतील कर्मचाऱ्यांनी बडतर्फी विरोधात उपोषणाची तयारी सुरू केल्याने वाद चिघळला. सोमवारी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी रात्री...
  July 18, 11:31 AM
 • अकोले- सह्याद्री पर्वतरांगेत हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी वसलेल्या कुमशेत, पाचनई, पेठाचीवाडी, अंबित, तसेच कळसुबाईच्या पायथ्याशी वसलेल्या जहागीरदरावाडी, बारी, वारंघुशी आणि भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील घाटघर व रतनवाडीसह संपूर्ण परिसराला रविवार, सोमवारनंतर मंगळवारीही अतिवृष्टीचा तडाखा बसला. २३ जूनला झालेल्या विक्रमी ३५३ मिलिमीटर अतिवृष्टीची पुनरावृत्ती सलग तीन दिवस कमी-जास्त प्रमाणात पहायला मिळाली. मंगळवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या चोवीस तासांत घाटघरला २५८ व रतनवाडीत २४३...
  July 18, 11:25 AM
 • राहुरी शहर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याला मंगळवारी टाकळीमिया येथे गायीचे शेण फासण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात शेतकरीहिताचा प्रकाश पडू दे, अशी प्रार्थना पंढरपूरच्या पांडुरंगाकडे करण्यात आली. दुधाच्या भाववाढीची कोंडी फोडण्यात सरकार अपयशी ठरत असल्याने निषेधाच्या घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि मोरे यांनी कार्यकर्त्यांसमवेत सायंकाळी हे आंदोलन केले. आंदोलन चिघळल्यास शासन जबाबदार राहील, असा इशारा मोरे यांनी दिला.निषेध म्हणून...
  July 18, 10:57 AM
 • सोलापूर- म्होरक्या या मराठी चित्रपटाचे निर्माते कल्याण पडाल यांच्या आत्महत्येस मंगळवारी दोन महिने पूर्ण झाले. परंतु या प्रकरणातील संशयित मुख्य सूत्रधार आणि कुख्यात गुन्हेगार श्रीनिवास संगा अद्याप पोलिसांना सापडत नाही. त्याला पकडून कठोर शिक्षा करण्याची मागणी पडाल कुटुंबीयांनी पोलिस आयुक्तांकडे केली होती. त्याचे स्मरण करणारे पत्र पुन्हा एकदा देणार असल्याचे सांगितले. संगा आणि त्याचा साथीदार संतोष बसुदे यांनी पडाल यांना कर्जाऊ रक्कम दिली होती. परतफेडीसाठी तगादा लावला. घरातून...
  July 18, 10:27 AM
 • सोलापूर- लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेस पक्षाला व नेत्यांना बाजार समितीचा निकाल नवसंजीवनी देणारा ठरला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निकालाने आत्मविश्वास वाढणारा ठरला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी नाराज काँग्रेसजनांना सोबत घेऊन बाजार समिती ताब्यात घेण्याची व्यूहरचना आखली होती, पण माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे सर्व काँग्रेसजनांना एकत्र आणून सहकारमंत्री सुभाष देशमुखांना बाजार समितीच्या...
  July 18, 10:23 AM
 • टेंभुर्णी- उजनी धरणातील पाणी पातळी मंगळवारी दुपारी चार वाजता उणे साठ्याच्या वर गेली. आता अधिक साठ्याकडे वाटचाल चालू झाली आहे. दौंड येथून सायंकाळी आठ वाजता ६६ हजार क्युसेक विसर्गाने पाणी उजनी धरणात मिसळत आहे. दरम्यान पाऊस थांबल्याने भीमा खोऱ्यातील धरणातून सोडण्यात आलेले पाणी कमी करण्यात आले आहे. पाच धरणातून १२ हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरण्याचा मार्गावर आहेत. गतवर्षी उजनी २० जुलै रोजी उणे साठ्याच्या वर गेले होते. यावर्षी उजनी शंभर...
  July 18, 10:18 AM
 • माळशिरस- कैवल्य सम्राट संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता धर्मपुरी येथे (जि. सोलापूर) आगमन झाले. उदंड उत्साहात सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. नानाविध फुलांनी माऊलींचा रथ सजवण्यात आला. दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. सोहळा पाहण्यासाठी आकाशातील ढगांची दाटी झाल्याचे चित्र होते. सावळ्या विठूरायाच्या दर्शनाच्या आेढीने निघालेल्या लाखो वारकऱ्यांचा समवेत माऊलींचा सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला.
  July 18, 10:15 AM
 • माढा (सोलापुर) - तालुक्यात दुध दरवाढीच्या विरोधात सुरू असलेल्या दुध बंद आंदोलनास दुस-या दिवशीही मोठा प्रतिसाद मिळाला. मंगळवारी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास बार्शी कुर्डूवाडी मार्गावरील रिधोरे येथे नेचर डिलाईटचे टेम्पो अडवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व दुध उत्पादक शेतकर्यांनी दोन टेम्पो मधील दुधाच्या पिशव्या ट्रे सह रस्त्यावर फेकुन दिल्या. यामुळे हजारो लिटर दुधाच्या पिशव्या पायदळी तर तुडविल्या गेल्याच शिवाय या दुधाच्या पिशव्यांवरुन वाहने देखील गेली....
  July 17, 09:27 PM
 • कोल्हापूर- भारत राखीव बटालियन मधील खेळाडू कर्मचाऱ्यांच्याकडून बंदोबस्तावर न पाठवण्यासाठी तसेच अन्य त्रास न देण्यासाठी चक्क 40 हजार रूपयांची लाच घेणारे सहायक समादेशक आणि त्याच्यासोबत पोलीस निरीक्षक अशा अन्य सहा जणांना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले, अशी माहिती विभागाचे पोलीस उपअधीक्षक गिरीष गोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत याच भारत राखीव बटालियनमध्ये सहायक फौजदार म्हणून कार्यरत असणाऱ्या एका खेळाडूने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर...
  July 17, 07:20 PM
 • नगर- मागील सभेचे कार्यवृत्त कायम करण्याच्या विषयावर आक्षेप घेत अजेंड्यावर नसलेले विषय कार्यवृत्तात घालण्यात आले आहेत. त्यामुळे इतिवृत्त कायम करण्यास स्थायी समितीच्या सभेत विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी विरोध केला. जे विषय अजेंड्यावर नसताना घुसवण्यात आले, त्यांची शासन स्तरावर चौकशी करण्याचे आदेश सभापती बाबासाहेब वाकळे यांनी दिले. त्यामुळे हे ठराव रद्द होण्याची शक्यता आहे. स्थायी समितीच्या सभेत सातव्या क्रमांकाचा विषय मागील सभेचे कार्यवृत्त कायम करण्यासाठी ठेवण्यात...
  July 17, 12:44 PM
 • अकोले- भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर व रतनवाडीसह संपूर्ण परिसराला दोन दिवस अतिवृष्टीचा तडाखा बसला. सोमवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत घाटघरला ढगफुटीचा सामना करावा लागला. घाटघरला ३४१ (१४ इंच) व रतनवाडीत ३२७ मिलिमीटर पाऊस पडला. रविवारी घाटघरला २६९, तर रतनवाडीस २४७ मिलिमीटर पाऊस झाला होता. भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल ७५६ दलघफू वाढ झाली. सोमवारी सकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातील साठा ७०२५ दलघफूवर (६३.६३ टक्के) पोहोचला. धरणात २४ तासात तब्बल ७७२ दलघफू नव्याने पाणी आले....
  July 17, 12:31 PM
 
जाहिरात

RECOMMENDED