Home >> Maharashtra >> Western Maharashtra

Western Maharashtra

 • सोलापूर - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेण्यासाठी होणारी एमएचटी-सीईटी ही सामायिक प्रवेश परीक्षा यंदा जेईई मेनच्या धर्तीवर ऑनलाइन घेतली जाणार आहे. त्यावर सरकारने शिक्कामोर्तब केले असून, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने त्याबाबतचे परिपत्रक त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. सीईटीप्रमाणे अभ्यासक्रमाचे स्वरूप व रचना तयार केली. पहिल्यांदा आॅनलाइनद्वारे होणाऱ्या सीईटी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगची पद्धत राहणार...
  11:34 AM
 • सोलापूर - सूर्य मावळतीला चाललेला...गोरज मुहूर्तावर लगीनघाई सुरू झालेली...वऱ्हाडी मंडळींची एकच लगबग... तो मंगलमय क्षण अाला... हजारो लोकांच्या साक्षीने १०७ जोडप्यांनी रेशीमगाठी बांधल्या... निमित्त होते लोकमंगल सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे... रविवारी हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात हा सोहळा रंगला. लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने त्याचे आयोजन केले होते. हजारोंच्या हातांनी मंगल अक्षदा टाकण्यात आल्या. त्यानंतर उभयतांच्या धर्म, प्रथेप्रमाणे पूजा व होमहवन करण्यात आला. तत्पूर्वी सकाळी...
  11:21 AM
 • नगर - काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादी 40, तर काँग्रेस 22 जागा लढवणार आहे. दोन्ही काँग्रेसकडून युनायटेड रिपब्लिकन पक्ष व कम्युनिस्ट पक्षाला प्रत्येक तीन अशा सहा जागा देण्यात येणार आहेत. रविवारी सायंकाळी उशिरा दोन्ही काँग्रेसकडून पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीच्या निर्णयासाठी गेल्या तीन दिवसांपासून बैठका सुरू होत्या. आमदार संग्राम जगताप व सुजय विखे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर आघाडीचा...
  11:17 AM
 • जामखेड - सरदवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रवींद्र शहाजी भापकर यांची राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान (नॅशनल आयसीटी अवॉर्ड) पुरस्कारासाठी निवड झाली. हा पुरस्कार २१ ला दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणार आहे. या शिक्षकाची माहिती घेण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाची टीम सरदवाडी येथे आली होती. सरदवाडीची लोकसंख्या १२५० असून बहुसंख्य लोक ऊसतोडणीसाठी जातात. मात्र, त्यांची मुले शिक्षणासाठी गावातच आहेत. भापकर गेल्या सहा वर्षांपासून अध्यापनात संगणकाचा वापर करत आहेत....
  11:15 AM
 • पंढरपूर - कार्तिकी एकादशीच्या अनुपम सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे पाच ते साडेपाच लाख भाविक रविवारी पंढरपुरात दाखल झाले आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाची शासकीय महापूजा करण्यासाठी राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे सपत्नीक येथे दाखल झाले. यंदा राज्याच्या काही भागात पावसाने हुलकावणी दिल्याने भाविकांची संख्या मात्र रोडावल्याचे दिसत आहे. शहरातील मठ, धर्मशाळा, मंदिर परिसरातील चिंचोळ्या गल्लीमधील मोठ्या...
  09:01 AM
 • सोलापूर - शहरात चार दिवसांआड पाणीपुरवठा होतोय, नगरसेवकांना भांडवली निधी दिला जात नाही, महापालिका आयुक्त नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक देतात, शहरात अंधार आहे, दिवाबत्तीचा सोय नाही, डेंग्यूसह साथीचे आजार शहरात पसरतात. यासह अन्य कारणासाठी शनिवारी झालेल्या महापालिका सभागृहात काँग्रेस, एमआयएम, बसप, राष्ट्रवादी, माकप नगरसेवकांनी सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत माठ फोडले. समस्यांचे डिजिटल जॅकेट अंगावर परिधान करून सभागृहात घोषणाबाजी केली. सभा तहकूब करून जाताना महापौरांचा रस्ता...
  November 18, 11:38 AM
 • संगमनेर - दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला मोटारसायकलवरून पळवून नेत तिच्यावर दोन दिवस अत्याचार करणाऱ्या आरोपीला पॉस्को कायद्यांतर्गत संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षांची कैद सुनावली, तर त्याचा साथीदार असलेल्या दुसऱ्या आरोपीला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. भरत काळू दुटे आणि सागर बहिरू साबळे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. दोन वर्षांपूर्वी अकोले तालुक्यातील पाडोशी येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला आरोपी भरत दुटे याने पळून जाऊन लग्न करण्याचा आग्रह धरला...
  November 18, 11:32 AM
 • नगर - महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासाठी पाच दिवसांनंतर अखेर राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे डॉ. सुजय विखे यांना वेळ मिळाला. शनिवारी विखे व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यात जागावाटप व आघाडीबाबत चर्चा झाली आहे. दरम्यान, शिवसेनेने तिसरी यादी जाहीर केली असताना भाजप सोमवारी दुसरी यादी जाहीर करणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केली असताना काँग्रेस-राष्ट्रवादीत मात्र अजूनही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही....
  November 18, 11:30 AM
 • कर्जत- गणेशोत्सवाच्या वर्गणीचा हिशेब मागितल्याचा राग येऊन कोपर्डी येथे १५ ला रात्री झालेल्या भांडणात शिवाजी ऊर्फ संजय किसन सुद्रिक (४५ वर्षे) याचा खून झाला. गणेश बंकट सुद्रिक (३० वर्षे) हा जखमी झाला आहे. या प्रकरणी संदीप गोरख सुद्रिक व अतुल विशाल सुद्रिक (कोपर्डी) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. बबन चव्हाण यांच्या किराणा दुकानासमोर शिवाजी ऊर्फ संजय किसन सुद्रिक व संदीप गोरख सुद्रिक हे गप्पा मारत होते. शिवाजी याने संदीपला गणपतीची वर्गणी किती झाली, खर्च किती झाला आणि किती पैसे...
  November 17, 12:42 PM
 • नगर- महापालिका निवडणुकीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदवणारेे व ऑफलाइन अर्ज नेणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ३२९ जणांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्याने वादग्रस्त ठरलेल्या श्रीपाद छिंदमनेही अर्ज दाखल केला आहे. सुटी वगळता अवघे तीन दिवस उरले असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी वाढणार आहे. २० नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना गती आली आहे. युती, आघाडीचा घोळ...
  November 17, 12:37 PM
 • सोलापूर-राज्यात चारा छावणीसाठी ९०० कोटी रुपयांचा आराखडा केला आहे तर सोलापूर जिल्ह्यात चारा छावणीसाठी ५७० कोटी रुपयांची मागणी केली आहे. काही आकडे चुकले असण्याची शक्यता असून त्या दुरुस्त करण्याच्या सूचना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. चारा छावणीच्या आकडेवारीवर महसूलमंत्री पाटील यांनी अवाक् होऊन हा आराखडा कोण तयार केला, असा प्रश्नही आढावा बैठकीत उपस्थित केला. पण संबंधित अधिकारी समोर आलेच नाहीत. विशेष म्हणजे जिल्हा पुरवठा कार्यालयाने यापूर्वी तयार...
  November 17, 12:32 PM
 • नगर- अहमदनगरचा माजी उपमहापाैर व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणारा भाजपचा पूर्वाश्रमीचा नेता श्रीपाद छिंदम महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरला अाहे. वादात अडकल्यामुळे छिंदमला यंदा काेणीही उमेदवारी दिली नाही, तरी त्याने प्रभाग ९ क मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला अाहे. महानगर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग अाला अाहे. सुटी वगळता अवघे तीन दिवस उरले असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी वाढणार आहे. २० नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे...
  November 17, 08:28 AM
 • सोलापूर- शेतातून जाणार्या पाटाच्या पाण्यावरून दोन गटात भांडण जुंपले. यात पोलिस फौजदाराच्या भाच्याने चक्क तलवार उपसली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाण्यावरून एक तरुण हातात नंगी तलवार घेऊन काही लोकांना धमकावताना दिसत आहे. पाटाचे पाणी त्याच्या परवानगीशिवाय कोणीही घेऊ शकत नाही, अशी दहशत त्याने पसरवली आहे. फौजदाराच्या भाच्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मिळालेली माहिती अशी की, व्हिडिओ बुधवारी (ता.14) शूट करण्यात आला आहे. अमित पांढरे असे हातात तलवार असलेल्या...
  November 16, 08:00 PM
 • शिर्डी- साईबाबांच्या पालखी सोहळ्यात महिला भाविकाचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मंदिराचे अधिकारी राजेंद्र जगताप यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजेंद्र जगतापसध्या फरार आहे. आरोपीला तत्काळ निलंबित करण्याची मागणीही तक्रारदार महिलेने केली आहे. काय आहे हे प्रकरण? गुरुवारी रात्री साडेआठ वाजता साईबाबांचा पालखी सोहळा पार पडला. यावेळी महिला मंदिरात उभी होती. यावेळी मंदिराचे अधिकारी...
  November 16, 06:24 PM
 • अहमदनगर-महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे ४३० गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी १२० गुंडांना प्रांत कायार्यालयाने नोटिसा बजावल्या असून त्यांची शुक्रवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. सर्वाधिक प्रस्ताव कोतवाली पोलिस ठाण्यातून सादर करण्यात आले आहेत. तडीपारीच्या यादीत काही आजी-माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. एकिकडे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे, तर दुसरीकडे...
  November 16, 12:51 PM
 • नगर- राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनी बुधवारी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत मुलाखतीला हजेरी लावली. सकाळी साडेअकरापासून सायंकाळी उशिरापर्यंत मुलाखती सुरू होत्या. सर्व प्रभागांतून मिळून १५१ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. प्रभाग ३ मधून सर्वाधिक इच्छुक आहेत. उमेदवारांची यादी व त्यांची माहिती प्रदेश समितीकडे पाठवली जाणार असून त्यानंतरच ती जाहीर करण्यात येणार आहे. भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीच्या बुधवारी मुलाखती झाल्या. सर्वच प्रभागांतून मुलाखतीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती....
  November 15, 12:19 PM
 • इंटरनेट व मोबाइलच्या स्मार्टफोन संचावर अॅपद्वारे ज्या काही नवनवीन तांत्रिक सुविधा उपलब्ध होत आहेत, बँकांची एटीएम यंत्रणा यांचा गैरवापर करून होणारे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे कमालीच्या वाढत्या प्रमाणावर होत आहेत. या गुन्ह्यांमध्ये सर्वच स्तरांतील लोक लुटले जातात. तांत्रिक सुविधांच्या आधारे होणाऱ्या गुन्ह्यांव्यतिरिक्त अन्यही प्रकाराने पैशांची फसवणूक होते. सोलापुरात महाराष्ट्र बँकेमध्ये नुकताच १२ लाखांची फसवणूक झाली. मारुती मोटार्सची एजन्सी असलेल्या चव्हाण ऑॅटोमोबाइल्स...
  November 15, 06:43 AM
 • एकुरके - सोलापूरच्या मोहोळमधील स्वाती अजित ढवन यांनी केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सी.एस.सी) च्या स्त्री स्वाभिमान उपक्रमांतर्गत सॅनिटरी नॅपकिन प्रकल्प उभा केला आहे. सॅनिटरी पॅड निर्मितीचा हा तालुक्यातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी पॅड निर्मिती, निर्जंतुकीकरण, कटिंग व इतर प्रोसेससाठी सुमारे 3 लाख रुपयांची उपकरणे खरेदी केली आहेत. पॅड निर्मितीसाठी शासनाच्या कर्मचाऱ्यांनी महिलांना प्रशिक्षण दिले. महिनाभरापूर्वी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. यात स्वाती ढवण आणि इतर...
  November 14, 06:02 PM
 • उस्मानाबाद- अरे, इतने छोटे काे काम पर कैसे रख रहे हो, इने कुछ सिखाओ, पढाओ। हम इतने छोटे काे काम पर नहीं रख सखते। बालकामगारांना कामावर ठेवण्याऐवजी कामगारांच्या पालकांना सकारात्मक विचार देणारे हे उद्गार आहेत बेकरी मालकाचे. किराणा दुकानदार, हॉटेल व्यावसायिक किंवा गॅरेज चालकही बालकामगारांना कामावर ठेवण्याच्या विरोधात आहेत. बाल दिनाच्या पार्श्वभूमीवर दिव्य मराठीटीमने मंगळवारी(दि.१३) उस्मानाबाद शहरातील व्यावसायिकांची बालकामगारांबद्दल मानसिकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा...
  November 14, 10:54 AM
 • सांगोला- महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (वय ९२ वर्षे) हे राजकीय संन्यास घेणार असल्याच्या वावड्या मंगळवारी उठल्या. मात्र, स्वत: गणपतराव देशमुख यांनी या बातम्यांचे खंडन केले. एका इंग्रजी वृत्तपत्रात त्या आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे या चर्चेला ऊत अाला. यासंदर्भात दैनिक दिव्य मराठीने देशमुखांशी संपर्क साधला असता, त्यांनी हसून या बातम्या चुकीच्या अाहेत, अशी प्रतिक्रिया दिली. तब्बल अकरा वेळा विधानसभेवर निवडून गेलेले, ५२ वर्षे आमदार म्हणून लोकसेवा करत...
  November 14, 08:57 AM
 
जाहिरात

RECOMMENDED