जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra

Western Maharashtra

 • श्रीगोंदा - तालुक्यातील हिरडगाव साखर कारखाना मार्गावरील घोडेगाव येथे रस्त्याच्या साइडपट्ट्यांच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट होत असून कामात खडीऐवजी विहिरीचे खरपड वापरले आहे. त्यामुळे त्यावर टाकलेले डांबर निघाल्याने लाखो रुपयांचा निधी लाटला गेल्याची भीती व्यक्त होत आहे.पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या हिरडगाव येथील साईकृपा कारखान्यास या रस्त्यावरूनच ऊस वाहतूक होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या साइडपट्ट्यांच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली आहे. यातील...
  November 28, 10:41 AM
 • नगर- महिन्यापूर्वी कारवाई करण्यात आलेल्या सुमारे 100 वीटभट्टी मालकांनी रॉयल्टीची रक्कम भरण्यास प्रारंभ केला असल्याने भट्ट्या सुरू होण्यास प्रारंभ झाला आहे. माजी आमदार दादा कळमकर यांच्या नेतृत्वाखालील वीटभट्टी मालकांच्या शिष्टमंडळाने दहा दिवसांपूर्वी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांची भेट घेऊन वीटभट्ट्या पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगीची मागणी केली होती. लाखो रुपये खर्च करून आम्ही माती आणली आहे. उचल देऊन कामगार आणले आहेत. अशा स्थितीत भट्ट्या सुरू न झाल्यास नाहक आम्हाला भुर्दंड बसेल...
  November 28, 10:39 AM
 • नगर - संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्यांचा उतारा 10 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. जिल्ह्याचा सरासरी उतारा 8.81 टक्के असून मागील आठवड्याच्या तुलनेत त्यात 0.20 टक्के वाढ झाली आहे. मागील गाळपाच्या शेवटच्या महिन्यात उतारा 11 टक्क्यांपर्यंत गेला होता. सध्या चालू असलेल्या 18 कारखान्यांनी 13 लाख 1 हजार 150 टन उसाचे गाळप केले असून, 11 लाख 46 हजार 110 क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक एफ. ए. शेख यांनी...
  November 28, 10:38 AM
 • नगर - पर्यावरण संतुलित ग्राम योजनेचे तीन वर्षांसाठी ठरवून दिलेले निकष पहिल्याच वर्षी नगर जिल्ह्यातील 27 गावांनी पूर्ण केले आहेत. या 27 गावांना ग्रामसंतुलित पुरस्कार मिळणार आहे. नाशिक विभागात नगर जिल्ह्याने योजनेच्या विकारत्न पारितोषिकांत प्रथम क्रमांक पटकावला आहे. नाशिक जिल्ह्याने दुसरा क्रमांक मिळवला आहे. नाशिकमधील 24 गावे या योजनेंतर्गत विकासरत्न पुरस्कारासाठीचे निकष पूर्ण केले आहेत. तर इतर जिल्ह्यांना दुहेरी आकडाही मिळवता आलेला नाही. विकासरत्न पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम 2...
  November 28, 10:37 AM
 • नगर - वॉर्ड क्रमांक 59 मध्ये भरवस्तीत वीटभट्ट्यांनी वेढा घातला आहे, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच अन्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे.खैरे चाळ, इलाक्षी शो रूम, रविश सोसायटी, तावरे बंगला, मॉडर्न फौंड्री, एकता कॉलनी, कायनेटिक कंपनी, उदावंत मळा, पांजरापोळ, पाइप फॅक्टरी, प्रियंका कॉलनी, मल्हार चौक, लोखंडी पुलाजवळील स्मशानभूमी, फोर्ट शो रूम, दत्त मार्बल, विडी कंपनीचे गोडाऊन या भागांचा 59 च्या वॉर्डात समावेश आहे. वीटभट्ट्यामुळे नागरिकांना...
  November 28, 10:36 AM
 • राळेगणसिद्धी - गांधीवादाला नवसंजीवनी देणारे भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांचा पांढ-याशुभ्र वस्त्रातील ध्यानस्थ बसलेले छायाचित्र देश-विदेशात अनेकदा झळकले असेल. मात्र आता हे छायाचित्र थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त टाइमच्या मुख्यपृष्ठावर झळकणार आहे. यासाठी राळेगणसिद्धीत टाइमच्या छायाचित्रकारांची शनिवारपासून रेलचेल होती. पां-या बॅकग्राऊंडवर शुभ्र वस्त्रात बसलेल्या अण्णांचे दहा-वीस नव्हे, 2 हजार फोटो या छायाचित्रकारांनी काढले. यातील एक टाइमच्या...
  November 28, 06:09 AM
 • सांगली - देवा-धर्माच्या नावाखाली बुवाबाजी करणा-या रामदासजी शास्त्री या भोंदूबाबाला जळगाव येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथील पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना रविवारी घडली. दरम्यान, माझा आशीर्वाद घ्या, मी तुमचे भाग्य बदलू शकतो, अशा खोट्या जाहिराती प्रसिद्ध करून तो लोकांना फसवत होता. मानसिक तणाव, गृहदशेतून नैराश्य व्यसनमुक्ती, प्रेमविवाह, कोर्ट-कचेरी, घरात अशांती अशा गोष्टींवर हा बाबा उपाय सांगत होता. आर्थिक फसवणुकीच्या अनेक तक्रारी...
  November 28, 01:27 AM
 • श्रीगोंदा: तालुक्याच्या सत्तापालटावर 26 वर्षांपासून अधिराज्य गाजवणारे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्याविरोधात अण्णा हजारेंनी काढलेल्या उद्गाराच्या निषेधार्थ शुक्रवारी राळेगणसिद्धीत आत्मक्लेश आंदोलन केले. पाचपुते यांच्या र्शीगोंद्यातील जनताही अनेक मूलभूत समस्यांनी ग्रासली आहे. त्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी पाचपुते आणि राष्ट्रवादी कधी आत्मक्लेश करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या...
  November 27, 08:29 AM
 • नगर: पुनर्वसनासाठी अडून बसलेल्या गौतमनगरमधील विस्थापितांच्या जागेचा प्रश्न मिटल्याने अतिक्रमण हटाव मोहिमेचा मार्ग मोकळा झाला आहे. शनिवारी सकाळपासून मोहीम पुन्हा धडाक्यात सुरू करून बालिकार्शम शाळेच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन मजली इमारतीसह काही घरांचे अतिक्रमण हटवण्यात आले.बालिकार्शम रस्त्याच्या 50 फूट रुंदीकरणासाठी मनपाने गुरुवारपासून पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. पहिल्या दिवशी बालिकार्शमच्या संरक्षक भिंतीसह गौतमनगरमधील 29 घरांचे अतिक्रमण काढण्यात...
  November 27, 08:24 AM
 • शेवगाव: शेवगाव तालुक्यातील बोधेगावजवळील आधोडी फाट्यावर, तसेच शेवगाव-गेवराई मार्गावरील बालमटाकळी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी दुपारी छापा टाकून सुमारे 12 लाख रुपये किंमतीची विदेशी दारू जप्त केली.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप वाळुंजकर यांना खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आधोडी येथील अंबादास पोटभरे यांच्या किराणा दुकानावर छापा टाकण्यात आला. बनावट विदेशी दारूची 184 खोके तेथे सापडली. त्याची किंमत सुमारे 8 लाख रुपये आहे. नंतर या पथकाने...
  November 27, 07:41 AM
 • नगर: 26/11 च्या हल्ल्याच्या आठवणींनी आजही अंगावर शहारा येतो. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्यांच्या किंकाळ्या कानात घुमतात. आजही आपण सुरक्षित नाहीत अशी भावना मनात दाटते, असे अनेक नागरिकांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. शहरात ठिकठिकाणी 26/11 हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. पोलिस परेड ग्राउंडवरील रिक्रिएशन हॉलजवळील दवाखान्यात शनिवारी सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी शंभर पोलिसांनी रक्तदान केले.नागरिकांनी जागरूक असणे आवश्यक-दहशतवादी हल्ला झाल्यानंतर...
  November 27, 07:34 AM
 • नगर: चालकास रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून साडेअकरा लाख रुपये किमतीच्या लोखंडी सळयांनी भरलेला ट्रक (एमएच 12-एक्यू 1503) पळवून नेल्याची घटना नगर-पुणे रस्त्यावर कामरगाव शिवारात शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजता घडली.जालन्याहून निघालेली ही ट्रक पुण्याला निघाली होती. कामरगाव शिवारातील हॉटेल सुवर्णज्योत ढाब्याजवळ ट्रक आली असताना मागून आलेल्या जीपचालकाने ट्रकच्या पुढे येऊन गाडी आडवी लावली. जीपमधून उतरलेले चार जण ट्रकच्या केबीनमध्ये घुसले. चाकू व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांनी ट्रकचालकाचे हात...
  November 27, 07:26 AM
 • पाथर्डी: ग्रामपंचायत सदस्याने दिलेला राजीनामा सरपंचाने अथवा सरपंचाने दिलेल्या राजीनाम्यावर पंचायत समितीच्या सभापतीने एक महिन्याच्या आत निर्णय न घेतल्यास सरपंच व सभापतींना अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा नवा अध्यादेश राज्य शासनाने काढल्याने स्थानिक राजकारणाला लगाम बसणार आहे.ग्रामपंचायत सदस्याने राजीनामे देण्याचे प्रमाण ग्रामीण भागात तुरळक असून सरपंच पदाच्या राजीनाम्यावर मात्र नेहमीच गदारोळ होत असतो. सरपंच आपला राजीनामा पंचायत समिती सभापतीकडे सुपूर्द करतो. हा...
  November 27, 07:20 AM
 • नगर: सामान्य माणसाचा कोंडमारा होत असून त्यामुळे त्याला वैचारिक बधिरपणा आला आहे. त्यांच्या कोंडमार्यास मी माझ्या व्यंगचित्रातून वाट काढून देतो, असे प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी सांगितले.जामखेड येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ल. ना. होशिंग विद्यालयातील विवेकानंद सभागृहात तेंडुलकर यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षणाधिकारी दिनकर टेमकर होते. बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य अधिकारी मधुकर...
  November 27, 07:14 AM
 • अकोले: देशातील एक लाख लोकांकडे एकूण संपत्तीच्या निम्म्यापेक्षा अधिक संपत्ती आहे. देशातील 50 टक्के लोकांना दररोजचे 20 रुपयेसुद्धा उत्पन्न मिळत नाही. देश कोणाच्या ताब्यात द्यायचा, कोणाला मंत्री ठेवायचे, देश कसा चालवायचा याची सूत्रे धनदांडग्या एक लाख लोकांच्या हातात आहेत. भांडवलदार अर्थव्यवस्था ही गरिबांची शोषण करणारी आहे. जोपर्यंत विषमता दूर होणार नाही, तोपर्यंत जनलोकपालसारखी व्यवस्था आणून भ्रष्टाचार थांबविणे शक्य नाही, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जे....
  November 27, 07:07 AM
 • जेजुरी - जेजुरीच्या मल्हागडावर खंडेरायाची घटस्थापना उत्साहात करण्यात आली. सालबादप्रमाणे शनिवारपासून या उत्सवाला प्रारंभ झाला असून खांदेकरी मानकरी पुजारी सेवेकरी यांच्या हस्ते श्रीच्या उत्सवमूर्तीना जलाभिषेक व महाभिषेक (पाकाळणी) करण्यात आला. उत्सवमूर्तीसह भैरवनाथाच्या मूर्तीला नविन पोशाख परिधान करून सोन्याचांदीची विविध आभुषणे अलंकार परिधान करण्यात आले. यावेळी पुणे- मुंंबई येथील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मार्गशीर्ष शु. 1 प्रतिपदेपासून खंडोबाची घटस्थापना होते. शनिवारी...
  November 27, 01:33 AM
 • सोलापूर- पैसे देण्याघेण्याच्या वादावरून दोन गटात सुरू असलेली हाणामारी सोडविण्यास गेलेल्या एका युवकाचीच हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना सोलापूरात घडली आहे. या हाणामारीतील अन्य दोन जण जखमी झाले आहेत. सोलापूर येथील जोडभावी पेठेत दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घ्ाडली. मं.अल्ताफ मोदीनसाब शेख असे मृत युवकाचे नाव आहे.या घटनेतील जखमी सर्फराज मंगरूळे आणि त्याचा भाऊ शकील मंगरूळे यांनी व्यवसायासाठी 15 हजार रूपये उधारीने घेतले होते. दुपारी अल्ताफ आणि त्याचे दोन मित्र मंगरूळे बंधू हे चहा...
  November 26, 08:18 PM
 • नगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद शुक्रवारी शहरासह जिल्ह्यात उमटले. राष्ट्रवादीच्या वतीने रास्ता रोको, मोर्चा, पुतळा दहन करण्यात आले. तथापि, या आंदोलनाला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. अकोले, शिर्डी, जामखेड, राहाता, कर्जत, र्शीगोंदा येथे बंद, राहुरीत काळ्या फिती लावून तहसील कार्यालयावर मूकमोर्चा, तर शेवगावमध्ये अण्णा हजारेंच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी शहरातील आंदोलनानंतर राळेगणसिद्घी येथे जाऊन...
  November 26, 12:28 PM
 • नगर: स्टेशन रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी भूसंपादन करण्यात येणार्या जागांची पाहणी प्रांताधिकारी ए. एस. रंगनायक यांनी शुक्रवारी भूमापन अधिकार्यांसमवेत केली. याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर कलम 6 ची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर जागा ताब्यात घेण्यात येतील.हा पूल अक्षता गार्डनपासून सथ्था कॉलनीजवळ असलेल्या नेवासकर पेट्रोलपंपापर्यंत होणार आहे. या पुलाची लांबी 1.4 किलोमीटर असून त्यासाठी 13 कोटी 23 लाख रुपये खर्च अपेक्षित...
  November 26, 12:23 PM
 • नगर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील हल्ल्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी जिल्ह्यात उमटले. अनेक तालुक्यांत राष्ट्रवादीच्या वतीने रास्ता रोको, मोर्चा तसेच बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडल्याचे वृत नाही.अकोल्यात कडकडीत बंदअकोले । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी अकोले शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने...
  November 26, 12:20 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात