Home >> Maharashtra >> Western Maharashtra

Western Maharashtra

 • नगर - हम सारी जिंदगी सेहत गवाकर पैसा कमाते रहे, फिरभी उसी पैसे से आरोग्य वापस नही ला सकते । इसलिए अपने आरोग्य के साथ समाज और मानवता को भी समय दो । बदन बनाओ ... देश बचाओ/ उसका दुरूपयोग मत करो । आरोग्यशील बनते हुए पहलवान नही, समाजसेवक बनो । बदन बनाके किसीका गुलाम मत बनो, शारीरिक और मानसिक स्वातंत्र्य कायम रखो, असा सल्ला जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश देतात.नाशिक विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धेत नगरकरांना कृष्णप्रकाश यांच्या खिलाडूवृत्तीची झलक पहायला मिळाली. गुन्हेगारांना धडकी भरवणाया...
  October 21, 09:06 AM
 • नगर - दिवाळीत घर रंगवण्याचा लोकांचा उत्साह महागाईच्या दिवसांतही टिकून आहे. रंगांमध्ये उपलब्ध झालेल्या नव्या प्रकारांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.कच्चा माल, इंधन आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने रंगांच्या किंमती 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्यामुळे दिवाळीतील घराच्या रंगकामाचे गणित काहीसे कोलमडले आहे. रंगनिर्मितीमधील प्रमुख घटक असलेल्या टिटॅनियम डायॉक्साईडच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती भडकल्याने गेल्या वर्षभरात किमतीत जवळपास 20 टक्क्यांनी...
  October 21, 09:04 AM
 • अकोले - तालुक्यातील विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटनाच्या कामाचे श्रेय लाटण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना-भाजपच्या कार्यक्रमात चांगलीच जुंपली आहे.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार मधुकरराव पिचड यांच्या हस्ते 22 ऑक्टोबर रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन होणार होते. मात्र कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकावर सेना - भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी केली. कार्यक्रम रद्द न झाल्यास विकास कामांचे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणारे पिचड...
  October 21, 09:00 AM
 • नगर - महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुधवारी सकाळी इम्पिरिअल चौकात पुन्हा अतिक्रमणे काढण्याची कारवाई केली. कारवाईस विरोध करीत एका युवकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी या युवकास ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. अतिक्रमण विरोधी पथकाने बुरूडगाव रस्त्यावरील शेख सलीम हुसेनभाई यांच्या पिठाच्या गिरणीचे बांधकाम पाडण्याची कारवाई केली. यावेळी गिरणीचालक शेख अब्बास यांनी कारवाई थांबविण्यासाठी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून...
  October 20, 12:21 PM
 • नगर - खासगी मोबाइल कंपन्या व भारत संचारने एकमेकांचे इनकमिंग कॉल बंद केल्यामुळे महाराष्ट्र, हरियाणा व पंजाब या राज्यांतील एअरटेल, आयडिया व व्होडाफोनच्या 6 कोटी 14 लाख मोबाइलधारकांची गैरसोय झाली आहे. ही सेवा पूर्ववत करण्यासाठी ट्रायने भारत संचारला पत्र पाठवले असल्याचे सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियातर्फे सांगण्यात आले. इंटरकनेक्टिव्हिटी शुल्क न भरल्यामुळे भारत संचारने आयडिया, एअरटेल व व्होडाफोनच्या मोबाइलवरून लँडलाइनवर येणारे इनकमिंग कॉल बंद केले. ग्राहकांची गैरसोय लक्षात घेऊन...
  October 20, 12:11 PM
 • नगर - दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि सोन्याचे भावही 400 रुपयांनी घसरले आहेत. याचाच फायदा घेत ग्राहक उद्या गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदीच्या तयारीत आहेत. नगर शहरात उद्या किमान 10 कोटी रुपयांची उलाढाल होईल, अशी सराफ व्यावसायिकांना अपेक्षा आहे. दसरा आणि दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी होत असते. काही महिन्यांपूर्वी सोने दिवाळीत 30 हजार रुपयांपर्यंत जाईल असे बोलले जात होते. पण तसे चित्र सध्या दिसत नाही. उलट दर काहीसे कमीच होत आहेत.दिवाळीसाठी नगरचा...
  October 20, 11:45 AM
 • नगर - नव्या प्रकारचे अद्ययावत झाडू बाजारात उपलब्ध असले, तरी लक्ष्मीचे महत्त्व अजून कमी झालेले नाही. दिवाळी जवळ आल्यामुळे लक्ष्मीला मागणी वाढली आहे. मात्र, लक्ष्मी बनवणा-याची संख्या आता कमालीची घटली आहे. फ्लॅट संस्कृतीत जुन्या पद्धतीच्या केरसुणीला फारसे स्थान राहिलेले नाही. तथापि, दिवाळीतील लक्ष्मीपूजनासाठी नवी लक्ष्मी आवर्जून घरी आणली जाते. शिंदडीच्या झाडापासून लक्ष्मी अर्थात लक्ष्मी तयार केली जाते. प्रामुख्याने मातंग समाज या व्यवसायात आहे. माळीवाडा परिसरात हा पारंपरिक व्यवसाय...
  October 20, 11:11 AM
 • नगर: गुरुपुष्यामृत अर्थात गुरु पुष्य नक्षत्र आज आहे. सर्वार्थ, अमृतसिद्धीसोबतच गजकेसरी असा सुवर्णयोग जुळून आल्याने या दिवसाला आगळे महत्त्व आले आहे. यश, सफलता आणि सुख-समृद्धी देणारा हा योग आहे. सकाळी 6.35 वाजेपासून ते दुस-या दिवशी 6.30 वाजेपर्यंत हा योग राहील. म्हणजेच 24 तासांचे महामुहूर्त. या शुभदिवसानेच दिवाळीच्या खरेदीलाही सुरुवात होणार आहे. बाजार बहरले आहेत. सोने-चांदीसह इतर धातू आणि जमीन, घरांची खरेदी तसेच इतर शुभकार्ये या मुहूर्तावर केल्यास त्यास स्थैर्य मिळून मांगल्य प्राप्त होते, असे...
  October 20, 04:26 AM
 • नगर: राहुल गांधी यांना परत न भेटण्याचा व राळेगणसिद्धीत न बोलावण्याचा निर्णय सरपंच जयसिंग मापारी व त्यांच्या सहका-यांनी घेतल्याचे आपल्याला सांगितले. राळेगणच्या तरुणांना हा स्वाभिमान वाखाणण्याजोगा आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी व्यक्त केली. मापारी व त्यांच्या सहका-यांना राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत पाचारण करण्यात आले होते. काँग्रेसचे खासदार पी. टी. थॉमस यांच्या पुढाकाराने ही भेट आयोजित झाल्याचा दावा मापारी यांनी केला असून, थॉमस यांनी मात्र...
  October 20, 01:16 AM
 • नगर - जिल्हा रुग्णालयासह 25 ग्रामीण रुग्णालयांतील 37 डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने आरोग्य विभागाच्या डॉक्टरांवरील कामचा बोजा वाढला आहे. रुग्णांची सेवा करण्यापेक्षा कामाचा निपटारा करण्याच्या नादात सिव्हिलसह ग्रामीण रुग्णालयांत रुग्णांची हेळसांड होत आहे. जिल्हा रुग्णालयात 10 डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. सरकारी रुग्णालयांत तपासणीसाठी चांगली वैद्यकीय उपकरणे व औषधोपचार असतानाही सेवेला रुग्णांचा प्रतिसाद यथातथाच मिळतो. रुग्णालयांत डॉक्टर वेळेवर न मिळणे, नर्सेसचे किंचाळणे आदी...
  October 19, 07:54 AM
 • सातारा: नवरात्रीच्या तोंडावर भेसळयुक्त भगर प्रकरण उघड झाल्यानंतर आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त बेसन पीठ आणि रिफाइंड तेल बाजारात आणण्याचा प्रकार उजेडात आला आहे. वडूथ (ता. सातारा) येथील लक्ष्मी डाळ अॅण्ड बेसन मिलवर पोलिसांना छापा टाकला. त्यात भेसळयुक्त बेसन, तेलासह सडलेला हरभरा, डाळ, मका, सोयाबीन, तांदूळ, गहू आदी लाखो रुपयांचा धान्याचा साठा सोमवारी जप्त करण्यात आला. या कारखान्यातील बेसन पिठात तांदूळ, सोयाबीन आणि मका मिसळला जात होते.वडूथ येथे विजय नंदलाल झंवर यांची लक्ष्मी डाळ व...
  October 18, 12:50 AM
 • सातारा: मी कोणाच्या नादाला लागत नाही, उगाच माझ्याही नादी लागू नका, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना रविवारी भरला. आघाडी सरकार सामंजस्याने चालविण्याची जबाबदारी तुमचीही आहे, अशी जाणीवही पवार यांनी करून दिली. राज्यातील विजेच्या समस्येबाबत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळातच 8 मंत्र्यांची एक समिती नेमण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सध्या या समितीचे अध्यक्ष आहेत, कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना बहुधा...
  October 17, 06:56 AM
 • सांगली: शहरातील केनल क्लबने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय डॉग शोला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जगातील दुर्मिळ आणि प्रसिद्ध असणा-या श्वानांचा हा शो सांगलीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. भारतासह जपान, मलेशिया, थायलंड, अफगाणिस्तानमधील अनेक आकर्षक श्वान सांगलीकरांना पाहायला मिळाले. सांगलीतील नेमीनाथनगर क्रीडांगणावर रविवारी आंतरराष्ट्रीय डॉग शो झाला. मुंबई क्लब आणि सांगली केनल क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 500...
  October 17, 01:39 AM
 • सातारा- जावली तालुक्यातील मेढा गावात गुरुवारी रात्री आठच्या सुमारास एका शासकीय गोदामावर वीज पडून भडकलेल्या आगीत लाखो रुपयांचे धान्य व शेतीविषयक साहित्य खाक झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.मेढा परिसरात गुरुवारी रात्री विजेच्या गडगडासह जोरदार पाऊस सुरू असताना गोदामावर वीज कोसळली. काही क्षणातच या ठिकाणी आगीचा भडका उडाला व गोदामातील धान्य भक्ष्यस्थानी सापडले. घटनेची माहिती मिळताच गावकयांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले,...
  October 14, 11:34 PM
 • सातारा- सध्या राज्यावर आलेले विजेचे महासंकट कोयना प्रकल्पासाठीही अडचणीचे ठरणार आहे. कारण कोळशाअभावी औष्णिक वीजनिर्मितीवर परिणाम झाल्याने जलविद्युत प्रकल्पावर ताण वाढला आहे. कोयना प्रकल्पास वर्षभराच्या वीज निर्मितीसाठी ठरविण्यात आलेल्या पाण्याच्या कोट्यापैकी जवळपास निम्मा साठा चारच महिन्यांत खर्च करावा लागला. जर भविष्यात आवश्यक तेवढा कोळसा उपलब्ध झाला नाही तर पुढील दोन महिन्यांत येथील निर्धारित जलसाठा संपून त्याचा वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. 105 टीएमसी पाणीसाठा...
  October 14, 11:28 PM
 • सोलापूर: जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई खुर्दचे उपसरपंच गणेश कुलकर्णी यांची राजकीय वैमनस्यातून हत्या करण्यात आली. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह त्यांच्याच शेतात संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे.उत्कृष्ट शेती केल्याबद्दल गणेश कुलकर्णी यांना कृषिभूषण पुरस्कार मिळाला होता. ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गज राजकीय नेत्यांच्या समर्थकांना हरवून गावात सत्तेत आले होते. विशेष म्हणजे माढा जिल्हा...
  October 14, 07:54 PM
 • सातारा- शहरातील डॉ. प्रदीप पाटील यांच्या एक्सरे अॅन्ड अल्ट्रासाऊंड क्लिनिकमध्ये गर्भलिंग चाचणी सुरू असताना केंद्र शासनाच्या राष्टीय मूल्यमापन व तपास समितीने धाड टाकून मशीन सील केले. डॉ. पाटील हे बेकायदा गर्भलिंग चाचणी प्रकरणात दुस-यांदा अडकले आहेत.राज्यात मुलींची संख्या घटत असल्याने बेकायदा गर्भलिंग चाचणी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे, तसे करणा-यावर कायदेशीर कारवाईचीही कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. डॉ. पाटील यांच्यावर 2009 सालापासून गर्भलिंग चाचणी करत असल्याचा आरोप असून याबाबत एक...
  October 13, 12:28 AM
 • सातारा - वंशाला दिवा हवा, मुलगाच पाहिजे या अट्टाहासापोटी अनेक कळ्या उमलण्याआधीच खुडल्या जातात. तर जन्माला आलेल्या काही मुलींच्या कपाळी नकुशीचा (नकोशी) शिक्का पडतो. पुढे त्या याच नावाने ओळखल्या जातात. हा कलंक पुसून टाकण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला असून सातारा जिल्ह्यातील तब्बल 222 नकुशांचे 31 ऑक्टोबरला सामूहिक बारसे केले जाणार असून, त्यांचे ऐश्वर्या असे नामकरण केले जाणार आहे.मुलींबाबतची मानसिकता बदलण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी लेक वाचवा...
  October 12, 02:32 PM
 • हातकणंगले - विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून हातकणंगले येथे भररस्त्यावर फिल्मी स्टाईलने चाकूहल्ल्याची घटना घडली. हल्यातील जखमी उपचारासाठी दाखल झालेल्या ग्रामीण रुग्णालयावर सशस्त्र जमावाने हल्ला चढविला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे भयभीत झालेल्या डॉक्टर्स, नर्सेस आणि रुग्णांनीही पळ काढला. भरदुपारी अर्धा ते पाऊण तास हा धुमाकूळ सुरू होता. हल्लेखोरांनी रुग्णालयाचे दरवाजे, खिडक्यांसह, वैद्यकीय साहित्याची प्रचंड नासधूस केली. विशेष म्हणजे हा थरारक प्रकार दोघा...
  October 12, 02:29 PM
 • कोल्हापूर - येथील विभागीय जातपडताळणी कार्यालयातील दक्षता समितीचे पोलिस निरीक्षक विजय गोविंद कुलकर्णी यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. कुलकर्णी हे चिंचवड, पुणे येथील रहिवासी असून त्यांच्याविरुद्ध सांगलीतील एका महिलेने लाच मागितल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली. याबाबत पोलिस तपास करत आहेत.
  October 11, 01:04 PM
 
जाहिरात

RECOMMENDED