Home >> Maharashtra >> Western Maharashtra

Western Maharashtra

 • मंगळवेढा- दुष्काळ असतानाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतीपंपांची वीज तोडल्यास त्यांना त्यांना कार्यालयात कोंडू, असा इशारा प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अतुल खुपसे यांनी दिला. बोराळे वीज उपकेंद्राला कायमस्वरूपी अधिकारी मिळावा, या मागणीसाठी खुपसे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेने मंगळवेढा वीज वितरण कार्यालयावर हलगी मोर्चा काढला. या वेळी ते बोलत होते. तालुकाध्यक्ष राजू स्वामी यांनी कायस्वरुपी अधिकारी मिळावा, या मागणीचे निवेदन दिले होते. त्याकडे दुर्लक्ष...
  December 13, 09:02 AM
 • सोलापूर- भाजपच्या खोट्या आश्वासनाला जनता ओळखू लागली आहे. तसेच जात आणि धर्माच्या नावाने जास्त काळ राजकारण करता येत नाही, हे पाच राज्यांतील निकालावरून दिसत आहे. आजचा काँग्रेसचा विजय हा लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली. लोकांचा कौल मान्य असून आत्मचिंतन करण्यात येईल, अशी भावना भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. विजयकुमार देशमुख, पालकमंत्री : पाच राज्यांत जनतेने कौल दिला तो मान्य केला पाहिजे. राजस्थान व मध्य प्रदेशातील निकाल पाहता जनतेने नाकारले...
  December 12, 10:15 AM
 • सोलापूर- जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळा डिजिटल झाल्या असल्याचा गाजावाजा प्राथमिक शिक्षण विभागाकडून केला जातो. परंतु काही शाळांमध्ये वीज जोडणी नसल्याचे आढळून आले. डिजिटल क्लास रूम, ई-लर्निंग साहित्य काही शाळांमध्ये धूळखात पडलेले आहे. जिल्ह्यातील १७६ शाळांमध्ये वीज जोडणी झालेली नाही. तर ३५२ शाळांमध्ये वीज आहे. परंतु बंद स्थितीमध्ये आहे. मग सर्व शाळा डिजिटल कशा झाल्या? शाळा डिजिटल करण्याच्या योजनेत जिल्हा परिषदेच्या २८०५ तर मनपा ५९ शाळा डिजिटल झाल्या आहेत. मात्र काही डिजिटल शाळा...
  December 12, 09:39 AM
 • नगर- महापालिकेच्या निवडणुकीत शहरातील एकूण १७ प्रभागांमध्ये तब्बल २० हजार ४५ नागरिकांनी कुठल्याच उमेदवारांना मतदान करण्याऐवजी नोटाचा (यापैकी नाही) पर्याय स्वीकारला. एवढ्या लोकांनी त्यांच्या प्रभागातील उमेदवारांना नापसंती दर्शवली. प्रभाग पाचमध्ये सर्वाधिक १ हजार ८६२ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. प्रभाग सातमध्ये सर्वात कमी म्हणजे ६६५ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल दहापट अधिक आहे. एखाद्या प्रभागात विविध पक्षांच्या उमेदवारांना...
  December 11, 11:11 AM
 • नगर- अहमदनगर महापालिका निवडणुकीत त्रिशंकू निकाल लागले. एकूण ६८ पैकी २४ जागा मिळवत शिवसेना माेठा पक्ष ठरला. त्याखालाेखाल राष्ट्रवादीने १८, भाजपने १४, काँग्रेसने ५, तर इतर पक्षांनी ७ जागा मिळवल्या. शिवसेना व भाजपने गतवेळपेक्षा प्रत्येकी ५ जागा अधिक मिळवल्या. तर काँग्रेसच्या ११ जागा कमी झाल्या. राष्ट्रवादीने पूर्वीचाच आकडा कायम राखला. सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक ३५ जागांचा आकडा काेणालाही गाठता आला नाही. या त्रिशंकू अवस्थेत स्वबळावर लढलेले शिवसेना-भाजप हे पुन्हा एकत्र येऊन सत्ता...
  December 11, 10:43 AM
 • सोलापूर -विजापूर वेस येथील कुरेशी गल्लीत जनावरांची कत्तल प्रकरणाची बातमी दाखवली, बातमीत मुलाखत दिली या कारणावरून स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारासह दोघांवर शनिवारी प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. बिलाल बाबू कुरेशी (वय २७), जाफर लालू कुरेशी (वय १९) या दोघांना पोलिस कोठडी मिळाली आहे. कत्तलखान्यामुळे दुर्गंधी पसरते, याबाबत स्थानिक वाहिनीमध्ये शेख यांनी मुलाखत दिली. पोलिस आयुक्त व...
  December 11, 10:34 AM
 • अक्कलकोट- हालचिंचोळी येथील एका वृद्धाचा धारदार शस्त्राने वार करून खून झाला. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास प्रशांत शहा यांच्या शेतातील ज्वारीत ही घटना उघडकीस आली. दत्तात्रय पांडुरंग धायगोडे (वय ५९) असे त्याचे नाव आहे. उत्तर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दत्तात्रय यांचा भाऊ सुदाम पांडुरंग धायगोडे यांनी फिर्याद दिली. शनिवारी रात्री दत्तात्रय हा घरात मोबाइल ठेवून काही न सांगता बाहेर गेला होता. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास फिर्यादी सुदाम...
  December 11, 10:28 AM
 • सोलापूर- क्रिकेट खेळण्यावरून मुलाचे एका तरुणासोबत भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून तरुणाने मुलाच्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. त्याप्रकरणी सिद्धेश्वर सुरेश शेटे (वय ३०, पासलेवाडी, मोहोळ) यास सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मैनाबाई दिलीप शेटे (वय ४०, रा. पासलेवाडी, मोहोळ) असे मृताचे नाव आहे. ही घटना दोन फेब्रुवारी २०१७ रोजी गावात घडली होती. याबाबत माहिती अशी की, मैनाबाई यांचा मुलगा विशाल व आरोपी सिद्धेश्वर शेटे...
  December 11, 10:20 AM
 • अहमदनगर / धुळे - सर्वांचे लक्ष लागून असलेल्याधुळे आणि अहमदनगर मनपाचा निकाल समोर आला आहे. धुळ्यात भाजपने 49 जागी विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर अहमदनगरमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. अहमदनगरमध्ये शिवसेनेने सर्वाधिक 22 जागा पटकावल्या आहेत. तर भाजपला 14 आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 22 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, नगरमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे समोर आले आहे. प्राथमिक मतमोजणीच्या अंदाजात अहमदनगर महापालिकेत भारतीय जनता...
  December 10, 08:37 PM
 • कोल्हापूर- शहरातील एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिकार्याची सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे. एवढेच नाही तर या पोलिस अधिकार्यावर कौतुकाचा वर्षावही होताना दिसत आहे सुरज गुरव असे या वरीष्ठ पोलिस अधिकार्याचे नाव असून त्याने मंत्री मंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत. एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जायची तयारी आहे. पण भीती घालू नका, आम्ही कर्तव्य जबावतो. साहेब, आम्ही राजकारण करत नाही आणि करायचेही नाही. कोणाच्या वर्दीवर येण्याची गरज नाही, आपण घरी जावे, अशा शब्दात उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी)...
  December 10, 04:55 PM
 • नगर- शिवरायांविषयी अपशब्द वापरणार श्रीपाद छिंदम नगर महापालिका निवडणुकीत विजयी झाला आहे. प्रभाग- 9 मधून छिंदम याने अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. छिंदम 2000 मतांनी निवडून आला आहे. छिंदमाच्या भावाने केली होती ईव्हीएमची पूजा दरम्यान, नगर महानगरपालिकेसाठी काल (रविवार) मतदान झाले. या निवडणुकीत श्रीपाद छिंदम हा वॉर्ड क्रमांक 9 मधून अपक्ष उमेदवार आहे. मतदानावेळी श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदम याने मतदानकेंद्रात जाऊन ईव्हीएमची पूजा केली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी श्रीकांत...
  December 10, 03:26 PM
 • सोलापूर - पोलिस ठाण्यात आल्यानंतर नागरिकांना कशी मदत मिळते. त्यांच्या कामाचा लवकर निपटारा होतो का? कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस निरीक्षक अथवा उपअधीक्षक कसे काम करतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, चोरीचा तपास, गुन्हेगारांना अटक या विविध मुद्द्यांवर पोलिस ठाण्याचा कसा कारभार चालतो आणि मुख्य म्हणजे नागरिकांप्रती कसे पोलिसिंग होते या आधारे पोलिस ठाण्याचे रँकिंग ठरणार आहे. तीन महिन्यातून एकदा संबंधित पोलिस ठाण्याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस...
  December 10, 10:48 AM
 • अकलूज - अकलूज येथील जुम्मा मशिदीत रोज ४ हजार वॅट विजेची निर्मिती होत आहे. या मशिदीतील विजेची दैनंदिन गरज भागवून उरलेली वीज मंडळास विकली जात आहे. सौर ऊर्जेवर वीज निर्मितीचा प्रकल्प राबवणारी ही राज्यातील पहिलीच मशीद आहे. अकलूजच्या भाजी मंडईलगत सुमारे ६०० नागरिकांच्या क्षमतेची जुम्मा मशीद आहे. मशिदीमध्ये ३० पंखे, ४० एलईडी बल्ब, पाणीपुरवठा करणारी विद्युत मोटार या कामांसाठी विजेचा वापर होतो. त्याशिवाय जानेवारी महिन्यात येथे सहा एसी संच बसवण्यात येणार आहेत. या सर्व बाबींवर मशिदीला...
  December 10, 10:40 AM
 • सोलापूर - कोंतम चौक ते सिव्हिल चौक या मार्गावरून रिक्षातून प्रवास करताना मीनाक्षी कर्णेकर (रा. समृद्धी गार्डन जवळ, विजापूर रोड, सोलापूर) यांच्याजवळील सोन्याचे दागिने पळविले. ही घटना ६ डिसेंबर रोजी घडली असून जेल रोड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. अनोळखी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. श्रीमती कर्णेकर या रिक्षातून प्रवास करताना अगोदरच रिक्षामध्ये बसलेल्या दोन महिलांनी प्रवासादरम्यान त्यांच्या पर्समधील एक तोळ्याचे दागिने काढून घेतले. सिव्हिल चौकात आल्यानंतर ही बाब लक्षात आली....
  December 10, 10:32 AM
 • मंगळवेढा - साेलापूर जिल्ह्यातील सलगर बु. (ता. मंगळवेढा) येथील ऑनर किलिंग प्रकरणास अाता नवे वळण लागले अाहे. या प्रकरणातील मृत डॉ. अनुराधा बिराजदार हिच्या अंत्यविधीच्या जागेपासून २० फुटांवर तिचा प्रियकर पती डॉ. श्रीशैल बिरादारचा मृतदेह रविवारी आढळून आला आहे. त्यामुळे डाॅ. शैलेश यांची हत्या झाली की त्यांनी अात्महत्या केली याविषयी तर्क-वितर्कांना उधाण अाले असून, हे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. गुरुवारी सकाळी कर्नाटक पोलिस डाॅ. श्रीशैलला घेऊन अनुराधाच्या अंत्यविधीच्या ठिकाणी व...
  December 10, 10:04 AM
 • नगर- महापालिका निवडणूकीसाठी पोलिस प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला. मात्र, याच जास्तीच्या व कडेकोट बंदोबस्तामुळे मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र नगर शहरात रविवारी पहायला मिळाले. पोलिसांकडून सुरू असलेल्या धरपकडीची अनेकांनी धास्ती घेतली. त्यात केडगाव दुहेरी हत्याकांडाचे पडसाद निवडणुकीत उमटण्याच्या भीतीपोटी अनेक नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडले नाहीत. महिनाभरापासून सुरू असलेली महापालिका निवडणुकीची धामधूम अखेर रविवारी संपली. निवडणूकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न...
  December 10, 09:56 AM
 • नगर-भारतीय संस्कृती ही कुटुंब वत्सल संस्कृती आहे. एकत्र कुटुंब पद्धत आल्याकडे आहे. मात्र, सध्या कुटुंबांमध्ये वाद वाढत आहेत. किरकोळ किरकोळ कारणांवरून परिवार, पती-पत्नी विभक्त होतात. त्यामुळे न्यायालयात खटले दाखल होतात. अशा परिस्थितीत कौटुंबिक न्यायालयाच्या लोक अदालतीत वर्षानुवर्षे प्रलंबित अनेक खटले समोपचाराने मिटत आहेत. त्यामुळे विभक्त झालेले कुटुंब पुन्हा एकत्र होत आहेत, असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी केले. जुन्या न्यायालयात कौटुंबिक...
  December 10, 09:52 AM
 • नगर - कमी पावसामुळे यंदाही नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंगावत असून, जिल्ह्याच्या दक्षिण भागात पाणी टंचाईबरोबरच काही प्रमाणात चारा टंचाईही भासू लागली आहे. जिल्ह्यातील १६ लाख ६० हजार पशुधनासाठी कोट्यवधी टन चारा लागणार आहे. चाऱ्यासाठी प्रशासनाने चारा पिकांचे नियोजनही हाती घेतले असून, जानेवारीनंतर जिल्ह्यात चारा छावण्या सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन दिवस पाऊस झाला. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाला. जुलै, ऑगस्ट,...
  December 9, 10:15 AM
 • शिर्डी- राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या दीक्षांत समारंभात घातलेल्या कॉन्व्होकेशन गाऊनमुळे आपल्याला गुदमरल्यासारखे झाले. त्यामुळेच भोवळ आली. आपली डॉक्टरांनी तपासणी केली. ब्लड शुगर व ब्लडप्रेशर सर्व ठीक आहे. आपण साईबाबांचे दर्शन घेऊन पुढील नियोजित कार्यक्रमासाठी नागपूरला जात असल्याची माहिती स्वत: केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांनी शिर्डीत पत्रकारांना दिली. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी केंद्रीयमंत्री नितीन...
  December 8, 02:53 PM
 • नगर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात ८ डिसेंबर ते १० डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण दिवस दारुबंदी (ड्राय डे) जाहीर करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी हा अादेश काढला आहे. शहरात प्रभागनिहाय १७ भरारी पथके तैनात केली असून मद्याची अवैध वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. तसेच मतदारांना प्रलोभनं दाखवणाऱ्या आर्थिक घडामोडींवरही लक्ष असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. पोलिस दल, आचारसंहिता कक्ष व भरारी पथकांनी...
  December 8, 09:53 AM
 
जाहिरात

RECOMMENDED