Home >> Maharashtra >> Western Maharashtra

Western Maharashtra

 • सोलापूर-शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) समाजातील दुर्बल घटकांसाठी असलेल्या २५ टक्के राखीव जागावरील प्रवेशासाठी सरकारकडून निधी देण्यापूर्वी स्वतंत्र पथकाकडून शाळांची तपासणी होणार आहे. त्याचा मेळ बसल्यानंतरच निधी दिला जाणार आहे. यामुळे बोगस विद्यार्थी किंवा सरल प्रणालीत दाखल विद्यार्थी वर्गात आहे की नाही याची पडताळणी होणे शक्य होणार आहे. २५ टक्के राखीव जागांच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती दर निश्चितीसाठी, तसेच त्यातील सुधारणाबाबत शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव...
  November 6, 11:39 AM
 • नगर- मुख्यमंत्री धडाडीचे आहेत. असे प्रमाणपत्र शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेनेचे आमदार विजय आैटी यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याने शिवसेनेबरोबरच भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे मुंबईहून एकाच हॅलिकॉप्टरमध्ये आलेल्या मुख्यमंत्र्यांनीही आपल्या भाषणात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे तीन वेळा नाव घेऊन विदेशी गुंतवणूकदारांना उद्योगमंत्रालयाचे सहकार्य मिळेल, असे आश्वासन दिले. त्यामुळे फडणवीस-देसाई...
  November 4, 11:53 AM
 • कोल्हापूर- गुरु-शिष्यच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने पाचवीत शिकणार्या मुलीचा विनयभंग केला आहे. कागल तालुक्यातील बोळावी येथे ही घडली आहे. सुनील कांबळे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. संतप्त गावकर्यांनी आरोपीला बेदम चोप दिला आहे. मिळालेली माहिती अशी की, आरोपी सुनील कांबळे याने पाचवीतील मुलीचा विनयभंग केला. या घटनेमुळे गावकर्यांमध्ये संतापाची लाट पसरली. गावकर्यांनी शाळेत धाव घेवून आरोपी शिक्षकाला बेदम चोप दिला. यात आरोपी जखमी झाला असून पोलिसांनी त्याला अटक...
  November 3, 11:51 AM
 • नगर - महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाल्यापासून राजकीय रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यमान नगरसेवकांसह नवोदित इच्छुक विविध पक्षात प्रवेश करत आहेत. शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका अनिता राठोड, माजी नगरसेवक राजेंद्र राठोड यांच्यासह नगरसेविका सुनीता मुदगल, दत्तात्रय मुदगल यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानिमित्ताने शिवसेनेला जोरदार धक्का देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे. शिवसेनेकडून सर्वच प्रभागांत दमदार...
  November 3, 09:43 AM
 • सोलापूर - यंदापासून दहावीच्या विज्ञान आणि गणितीचा १०० टक्के अभ्यासक्रम पूर्ण शिकवला जाणार असला तरी प्रत्यक्षात परीक्षेत त्यापैकी केवळ ८० टक्के प्रश्न विचारले जाणार आहेत. उरलेले २० टक्के प्रश्न नववीतील अभ्यासक्रमाचे असणार आहेत. कोणत्या धड्यावर प्रश्न विचारणार याबाबत कोणताच उलगडा केलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दहावीबरोबर नववीचाही अभ्यासाचा अतिरिक्त ताण सहन करावाच लागणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा अजब फंडा असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे. दहावीच्या...
  November 2, 12:06 PM
 • नगर - चीन व अमेरिकेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकार सुपा औद्योगिक वसाहतीत एक हजार कोटीची गुंतवणूक करून दोन प्रकल्प उभारणार आहेत. या दोन प्रकल्पांचे भूमिपूजन शनिवारी (३ नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहे. नगर जिल्ह्यातील उद्योगांना मरगळ आली असताना सुपे, पांढरीपूल या सारख्या आैद्योगिक वसाहतीत अनेक नवे उद्योग दाखल होत आहेत. पठारी भाग म्हणून आेळख असलेल्या सुप्याची आेळख आता इंडस्ट्रीअल हब म्हणून होणार आहे....
  November 2, 12:01 PM
 • नगर - नगरकरांचे लक्ष लागून असलेल्या आगामी महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. महापालिकेत नव्याने कारभारी निवडणूक देण्यासाठी ९ डिसेंबरला मतदान होणार आहे. दुसऱ्याच दिवशी १० डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी (२ नोव्हेंबर) होणारी सर्वसाधारण सभाही स्थगित करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती, त्यानुसार या निवडणुकीत १७ प्रभागात ६८ नगरसेवक असणार आहेत....
  November 2, 11:59 AM
 • शिर्डी - साईबाबा समाधी शताब्दी वर्षात भक्तांसाठी शिर्डीत उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून विश्वस्तांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० कोटी रुपये निधी मंजूर केल्याची नाराजी उफाळून आली. काँग्रेसचे कार्यकर्ते याचा जाब विचारण्यासाठी अध्यक्ष हावरे व विश्वस्तांकडे जात असताना पोलिस व साई संस्थान प्रशासनाने त्यांना बाहेरच अडवले. त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या पार्किंगमध्ये उभी असलेल्या मर्सिडीझ कारच्या काचा...
  November 2, 09:25 AM
 • सोलापूर - माथेरान असो की दार्जिलिंगच्या डोंगरातून वाट काढत झुकझुक धावणारी टॉयट्रेन ही पर्यटकांच्या पसंतीला उतरलेलीच आहे. दार्जिलिंगच्या टॉयट्रेनला जागतिक हेरिटेजचा दर्जा मिळाला. आता सोलापूर रेल्वे प्रशासन कुर्डुवाडी येथे तयार झालेला टॉयट्रेनचा एक डबा हेरिटेज म्हणून जतन करणार आहे. १९६४ मध्ये तयार झालेला हा डबा लवकरच सोलापूर डीआरएम कार्यालयाची शान वाढवणार आहे. संपूर्ण मध्य रेल्वेत डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर डबा असलेले सोलापूर हे पहिले ठरणार आहे. कुर्डुवाडीच्या रेल्वे...
  November 2, 08:31 AM
 • मुंबई- धुळे व अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ डिसेंबर रोजी मतदान होईल; तर १० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. या दोन्ही मनपांच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी गुरुवारी दिली. सहारिया यांनी सांगितले की, धुळे मनपातील १९ प्रभागांतील ७४ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३७ जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ६, अनुसूचित जमातीसाठी ५, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २० जागा राखीव आहेत....
  November 1, 06:33 PM
 • सोलापूर -दिवाळीच्या सुटीच्या हंगामात रेल्वे, एसटी गाड्या प्रवाशांची खचाखच भरून जातात. परिणामी प्रवाशांना खासगी टुर्स, ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रवास करावा लागतो. याचाच फायदा घेऊन काही ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकिटाच्या दरात वाढ करून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. सरकारने दर निश्चितीसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. मात्र दर निश्चित करणारी एकही यंत्रणा नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानी कारभारला आळा बसवणार तर कोण? हा प्रश्न उपस्थित होतो. ट्रॅव्हल्सचालकांकडून...
  November 1, 11:44 AM
 • श्रीरामपूर- फुले, शाहू व आंबेडकरांचे विचार घेऊन गोरगरिबांचे काम करताना कोण कोणत्या पक्षाचा आहे, हे आपण कधीही पाहिले नाही. मनुवादाला जिवंत करण्याचे काम काही लोक आज करत असून राजकीय छुप्या पाठिंब्यामुळे त्यांची ही हिंमत होत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी केला. दिल्लीत संविधान जाळणाऱ्यांना अटक कधी होणार, असा सवालही त्यांनी केला. काँग्रेसचे माजी आमदार जयंत ससाणे यांच्या कुटुंबीयांचे भुजबळ यांनी सांत्वन केले. राजश्री ससाणे व करण ससाणे यांची भेट घेतल्यानंतर...
  November 1, 11:39 AM
 • सोलापूर- वरिष्ठ महाविद्यालयांत वर्ग प्रतिनिधी तसेच विद्यापीठ प्रतिनिधीच्या निवडणुका होण्याचा मार्ग निश्चित झाला आहे. याबाबत उच्च शिक्षण विभागाने आदेश जारी केला आहे. मात्र, या निवडणुका पुढील शैक्षणिक वर्षात होणार असून, त्यानिमित्ताने महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुकांची धामधूम असणार आहे. सरकारने परिनियम २६ ऑक्टोबरला जाहीर केला आहे. त्यानुसार ३१ जुलैपर्यंत कुलगुरू निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील. ३० सप्टेंबरच्या आत निवडणूक प्रक्रिया संपवायची आहे. त्यामुळे या...
  November 1, 10:33 AM
 • सोलापूर -साेलापूर महापालिकेचे माजी सभागृह नेते व नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर विषप्रयोग झाला असून याप्रकरणाची चौकशी करून आरोपी तत्काळ अटक करावी. विषप्रयोग करणारे मोठे व्यक्ती असू शकतात. पोलिसांवर दबाव येण्याची शक्यता आहे या मागणीसाठी सुरेश पाटील मित्र परिवार व सर्व पक्षीयांच्या वतीने बुधवारी साेलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात सुमारे चार ते पाच हजार नागरिकांचा सहभाग होता. या वेळी सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. नगरसेवक सुरेश पाटील...
  November 1, 08:22 AM
 • महाराष्ट्रातल्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमधला अडसर दूर झाला असून, त्यासंदर्भातील अध्यादेश सरकारने नुकताच काढला. सप्टेंबर अखेरपर्यंत विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुका पूर्ण कराव्यात, असे अध्यादेशात म्हटले आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षांत नाही, पण पुढील शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या सत्रात निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावरील निवडणूक या पूर्वी खूप वाजत-गाजत व्हायच्या. १९८० च्या दशकात त्यामध्ये बरेच गैरप्रकार सुरू झाले....
  November 1, 06:36 AM
 • बार्शी- गाडीस कट लागलेल्या कारणावरून झालेल्या वादातून 11 ते 12 जणांनी तलवार, कोयत्यासह केलेल्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला. अंकुल उर्फ गोल्या श्रीधर चव्हाण (वय-25, रा.नाईकवाडी प्लॉट,बार्शी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सोमवारी रात्री 8 च्या सुमारास उपळाई रोडवरील जनता बँकसमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी आकाश श्रीधर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंद माने, सुरज उर्फ सोन्या माने, रमेश माने सर्व रा.अलिपूर रोड बार्शी अमोल वायकुळे, अर्जून नागणे, (दोघे रा.पाटील प्लॉट शिवाजीनगर...
  October 31, 07:10 PM
 • पारनेर-देशातील भ्रष्टाचार राेखण्याच्या उद्देशाने देश सीबीआयकडे सकारात्मक दृष्टीने बघत आहे. परंतु सध्या सीबीआय अधिकाऱ्यांतील वादविवादाच्या बातम्या येत आहेत. लोकशाहीसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे. दिवसेंदिवस भ्रष्टाचार वाढत आहे. भ्रष्टाचार हा देशाचा महारोग बनला आहे. परंतु सत्ताधारी याबाबत अजिबात गंभीर नाहीत. तसे असते तर सीबायआयसारख्या संस्थेत तू तू-मैं मैं झालीच नसती. त्यामुळे अशा एजन्सी लोकपालच्या कक्षेत असायला हव्यात, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी...
  October 30, 08:15 AM
 • नगर- आगामी महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जोरदार तयारी सुरू असली तरी वरिष्ठ पातळीवर अद्याप सामसूमच आहे. मनसेकडून गेल्या वेळच्या निवडणुकीत झालेल्या चुका टाळून आता नव्या चेहऱ्यांना उमेदवार म्हणून संधी देण्यात येणार आहे. याबाबत दीड महिन्यापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत आढावा बैठक घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात नगरमध्ये मेळावा घेण्याचा शब्दही त्यांनी दिला होता. तत्पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख अमित ठाकरे हेही नगरमध्ये...
  October 29, 10:32 AM
 • कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टनकोडोली या गावी रविवारी विठ्ठल बिरदेव मंदिरात ढोल-ताशांच्या गजरात भाविकांनी सुमारे ५० टन हळदीची उधळण केली. कोजागरी पौर्णिमेनंतर पाचव्या दिवशी पट्टनकोडोलीत जत्रा भरते. यंदा जत्रेत ७ लाखांपेक्षा जास्त भाविक आले होते. मंदिरी समितीचे सदस्य प्रकाश निहरे यांनी सांगितले की, येथे सुमारे १२०० वर्षांपासून सुरू असलेली भविष्यवाणीची परंपरा आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. ही भविष्यवाणी येथील पुजारी खेलोबा ऊर्फ फरांडेबाबा महाराज करतात. फरांडेबाबा...
  October 29, 07:47 AM
 • आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये नितीशकुमारांच्या जदयुबरोबर भाजपने युती करून जागावाटपात फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला अंमलात आणल्यानंतर महाराष्ट्रातही शिवसेना-भाजप युतीची चर्चा पुन्हा एकदा जोमाने सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे तसे संकेतही देऊन टाकले आहेत. राज्यातील ही संभाव्य युती बिहारप्रमाणे होणार की, पुन्हा जागावाटपावरून त्यांच्यात त्रांगडे होणार, याची उत्सुकता दाटून आलेली असतानाच नगर जिल्ह्यामध्येही संभाव्य युतीच्या...
  October 28, 10:45 AM
 
जाहिरात

RECOMMENDED