जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra

Western Maharashtra

 • पंढरपूर- विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या २७० कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधास शासनाने गुरुवारी मंजुरी दिली. त्यामुळे सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसरातील देवतांचे व्यवस्थापन मंदिर समितीमार्फत केले जाते. या देवदेवतांची पूजाअर्चा, रोजचे नित्योपचार, नैमित्तिक उपचार, यात्रा व उत्सव, भाविकांना भक्तनिवास, अन्नछत्र, प्रसादाची सुविधा उपलब्ध करून देण्यासह दर्शनरांगांचे,...
  January 5, 07:49 AM
 • अहमदनगर- नगरमधील भिंगार येथे लष्कराच्या हद्दीत घुसखोरी करण्याऱ्या 3 संशयीतांना पोलिसांनी अटक केले. पकडण्यात आलेल्या आरोपीमध्ये दोघे उत्तरप्रदेशातील मिर्झापूरचे तर एकजण नगर जिह्य्तील पारनेरमधला आहे. विशेष म्हणजे या तिघांपैकी एकाने लष्करी वेश परिधान केला होता. पोलिसांनी तिघांविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे. गुरूवारी रात्री भिंगार येथील लष्करी कॅम्प भागात हे आरोपी संशयतीररित्या फिरत होते, आणि त्यापैकी एकाने लष्करी वेश परिधान केला होता त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले...
  January 4, 02:10 PM
 • नगर- केडगाव येथे एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव येथील पंधरा वर्षांची मुलगी क्लासला जात असताना तिची शुभम नावाच्या मुलाशी ओळख झाली. त्यानंतर त्या मुलाने विश्वास संपादन करत तिला चास येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम दिघे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक उपनिरीक्षक सुभाष चव्हाण करीत आहेत.
  January 4, 12:19 PM
 • नगर- महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून नवीन महापौर व उपमहापौरांच्या निवडीही झाल्या आहेत. तथापि, निवडणुकीचे कवित्व अजूनही संपता संपलेले नाही. भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांना पक्षाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दुसरीकडे प्रभाग ७ मध्ये इतर प्रभागातील सुमारे ४५० मतदार बीएलओंना हाताशी धरून समाविष्ट केले असल्याचा आरोप शिवसेनेचे पराभूत उमेदवार आकाश कातोरे यांनी केला आहे. याप्रकरणी या प्रभागातील २६ उमेदवारांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत....
  January 4, 12:16 PM
 • नगर- कर्जत येथील दावल मलिक ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणाऱ्या तौसिफ शेख याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी अहमदनगर संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मन्सूर शेख, उबेद शेख, अंजर खान, अजीम शेख, आजीम राजे, हनिफ जरीवाला, अत्तार शेख, अफसर शेख, साहेबान जहागीरदार, सर्फराज जहागीरदार, नईम सरदार, अमीर सय्यद, अल्तमश जरीवाला, रियाज...
  January 4, 12:14 PM
 • सोलापूर- ग्रामपातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या बळकट करण्यासाठी सहकार खात्याने अटल अर्थसाह्य योजना जाहीर केली. यातून सोसायट्यांनी शेतीपूरक उद्योग करून गावे स्वयंपूर्ण करणे अभिप्रेत आहे. एकूण प्रकल्प किंमत ४० लाख रुपये ठरले. त्याच्या ७५ टक्के (कमाल ३० लाख रुपये) अनुदान मिळेल. या पैशातून सोसायट्यांनी धान्य, फळे, भाजीपाला प्रतवारी स्वच्छता यंत्र, गोदाम, वाहतुकीसाठी वाहने, सहकारी ग्राहक भांडार, जलशुद्धीकरण प्रकल्प, वॉटर एटीएम, शेतमाल पॅकेजिंग, कापडी किंवा ज्यूट...
  January 4, 11:46 AM
 • पारनेर- सर्वोच्च न्यायालयाने लोकपाल, लोकायुक्त कायदा करण्यासंदर्भात सरकारला सूचना करूनही तो अमलात येत नसेल, लोकसभा, राज्यसभेने बहुमताने कायदा संमत करूनही सरकार त्याची अंमलबजावणी करत नसेल, राष्ट्रपतींनी आपल्या सहीने संमत केलेल्या कायद्याचे पालन होत नसेल, तर सरकार लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालले आहे असे वाटायला लागले आहे, असा टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी पाठवलेल्या पत्रात लगावला आहे. आठवडाभरापूर्वी अण्णा हजारेंना फडणवीस...
  January 4, 10:18 AM
 • कडा- सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्याने शाळेतील वर्ग खोलीबाहेर रांगोळी काढणाऱ्या तीन विद्यार्थिनींच्या अंगावर पडवीचे पत्रे पडून जखमी झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील टाकळी (अमिया) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवारी सकाळी दहा वाजता घडली. तीनही मुलींना उपचारासाठी कडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविता मिरड (५ वी), गायत्री चौधरी (७ वी), सानिका चौधरी (५ वी) अशी जखमी मुलींची नावे आहेत. टाकळी अमिया येथे बीड जिल्हा परिषदेची सातवी पर्यंत शाळा असून शाळेमध्ये गुरुवारी...
  January 4, 07:39 AM
 • कोल्हापूर-ड्रेस कोड धुडकावून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतल्याने भाविकांनी त्यांना मारहाण केली. भाविकांच्या तावडीतून सोडवून त्यांना बाहेर आणताना पोलिसांची तारांबळ उडाली. रात्री त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. तृप्ती यांनी साडी घालून दर्शन घ्यावे, अशी स्थानिकांची मागणी होती. मात्र, त्यांनी पंजाबी ड्रेस घालून देवीचे दर्शन घेतले. दरम्यान, मला ठार मारण्याचा...
  January 3, 07:21 PM
 • लोहारा- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत महाजनको व मेडाच्या पुढाकारातून लोहारा महावितरणच्या उपविभागीय कार्यालय परिसरात एक ते दोन मेगावॅटचे सोलार प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, मागील सहा महिन्यापासून या कामाला ब्रेक लागल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील विजेची उपलब्धता व मागणीत मोठी तफावत आहे. त्यामुळे अतिरिक्त भारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे, ग्रामीण भागात होणारे भारनियमन आदी समस्यांना ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे....
  January 3, 12:17 PM
 • सोलापूर- केंद्र शासनाने घोषित केलेल्या उज्ज्वला गॅस जोडणी योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ५३४ कुटुंबांना गॅस कनेक्शन वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील ९२ टक्के कुटुंबाकडे गॅस कनेक्शन उपलब्ध आहे, अशी माहिती भारत गॅसचे वरिष्ठ व्यवस्थापक राजीवकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये भारत पेट्रोलियमकडून ६६ हजार ६४१ हिंदुस्तान पेट्रोलियमकडून ३४ हजार ८८८ आणि इंडियन ऑइलकडून १० हजार ५ कनेक्शन देण्यात आले आहे. भारत सरकारच्या पेट्रोेलियम व नैसर्गिक...
  January 3, 12:14 PM
 • सोलापूर- जोडभावी पेठेतील पिठाच्या गिरणीच्या बोळात एका पंचविशीतील तरुणाचा दगड, विटा आणि फरशीने खून करण्यात आला आहे. खून कोणी केला आणि त्याचे कारण काय हे अद्याप पुढे आले नाही. ही घटना बुधवारी सकाळी उघड झाली. सागर प्रकाश सरवदे, वय २५, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. खुनाची ही घटना १ जानेवारी रोजी रात्री ११.३० ते २ जानेवारी रोजी सकाळी ७ या दरम्यान घडली. याबाबत आई निर्मला प्रकाश सरवदे (वय ५२) यांनी जोडभावी पेठ पोलिसात अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले...
  January 3, 12:12 PM
 • नगर- नगर तालुक्यातील चांबुर्डी येथील प्रगतीशील शेतकरी बबनराव दिघे यांनी कमी पाण्यात भरघोस कांदा उत्पादनाचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. हवामान बदलत आहे. दुष्काळ असतानाही उपलब्ध पाण्याचा ताळेबंद करून त्यांनी साडेतीन एकरात भरघोस व दर्जेदार कांद्याचे उत्पादन काढले आहे. बबनराव दिघे यांनी पाच एकरपैकी साडेतीन एकरमध्ये कांदा लागवड केली. दुष्काळी परिस्थिती असतानाही अतिशय कमी पाण्यात पाण्याचा ताळेबंद करून कांद्याचे भरघोस उत्पादन त्यांनी घेतले. दुष्काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता...
  January 3, 12:02 PM
 • नगर- जिल्ह्यातील विविध नॉन बँकिंग कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या सर्व ठेवीदार, ग्राहक व प्रतिनिधी यांची रक्कम व्याजासह परत मिळावी, या मागणीसाठी सुमारे तीन ते साडेतीन हजार ठेवीदारांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तेथे ठिय्या आंदोलन करुन ठेवीदारांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. प्रशासनाला लेखी निवेदन देऊन पुन्हा एकदा या विषयाकडे लक्ष वेधण्यात आले. आपल्याला न्याय मिळाला नाही, तर आगामी निवडणुकांमध्ये हे कोणालाही मतदान न करता नोटाचा पर्याय स्वीकारला...
  January 3, 12:00 PM
 • सोलापूर- सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वेमार्गाला नीती आयोगाने बुधवारी मंजुरी दिली. यासाठी आधी जाहीर १२८२ कोटी रुपयांच्या निधीत २८८ कोटी रुपयांची कपात करून आता ९९४ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती रेल्वे बोर्डातील सूत्रांनी दिली. दिल्लीत बुधवारी यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जानेवारीला विविध विकासकामांच्या उद््घाटनासाठी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे....
  January 3, 07:49 AM
 • पाथर्डी- थर्टी फर्स्ट साजरा करताना दोन युवकांची मारामारी होऊन एकजण जखमी झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री शहरातील शेवगाव रस्त्यावर घडली. जखमीला नगर येथे हलवण्यात आले आहे. या प्रकरणात गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना समजल्याने मंगळवारी सायंकाळी उशिरा पोलिसांचे एक पथक नगरला रवाना झाले. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी कोणत्याही गुन्ह्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नव्हती. एकमेकांचे मित्र असलेले दोन तरुण थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी सोमवारी रात्री भेटले. या...
  January 2, 11:38 AM
 • संगमनेर- वीज तोडल्याने महावितरणच्या सहायक अभियंत्यास सोमवारी सकाळी मारहाण करण्यात आली. आरोपीच्या अटकेसाठी सुरुवातीला पोलिस ठाण्यात ठिय्या देणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत महावितरणचे कामकाज बंद केले. केशव शेषराव जायभाये असे मारहाण झालेल्या सहायक अभियंत्याचे नाव असून महावितरणच्या कार्यालयात ते काम करत असताना इंदिरानगरमधील मिनाक्षी शांताराम घोडके, तनुजा शांताराम घोडके यांच्यासह आणखी एकजण आला. वीज का तोडली, याचा जाब त्यांनी जायभाये यांना...
  January 1, 11:19 AM
 • सोलापूर- शेतातील गवत घेण्यास विरोध केल्यामुळे शोभा हरिदास ऊर्फ सिद्राम तोडकरी (वय ५०, रा. बाळे) आणि हरिदास ऊर्फ सिद्राम तोडकरी या दोघांना मारहाण करण्यात आली, अशी फिर्याद शोभा तोडकरी यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दिली. तोडकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मल्लू सदाशिव तोडकरी, नीलावती मल्लू तोडकरी, किरण मल्लू तोडकरी, अनिल मल्लू तोडकरी (रा. सर्व बाळे) यांच्याविरुध्द फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. अज्ञात कारणावरून मारहाण नई जिंदगी, लोकमान्य नगर...
  January 1, 10:40 AM
 • पापरी - पापरी-कोन्हेरी रस्त्यावर टमटम उलटून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या दोन झाली आहे. रविवारी एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता, तर तीन जखमींपैकी पृथ्वीराज शहाजी रोकडे (१५) याचा रात्री उशिरा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
  January 1, 10:38 AM
 • माढा (सोलापूर)- सरकार आघाडीचे असो की युतीचे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे कोणालाच जमलेले नाही. अच्छे दिन म्हणत सत्तेवर आलेल्या या सरकारच्या काळात तर आत्महत्येचे लोण कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर असह्य झाल्याने सोलापुरच्या माढा तालुक्यातील मानेगाव (थो) येथील दतात्रय हनुमंत बारबोले या 38 वर्षीय शेतकऱ्याने कांद्यावर फवारणी करण्याचे तणनाशक पिऊन आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान त्यांना उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात दाखल करण्यात आले...
  December 31, 12:35 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात