जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra

Western Maharashtra

 • सोलापूर- जोडभावी पेठेतील पिठाच्या गिरणीच्या बोळात एका पंचविशीतील तरुणाचा दगड, विटा आणि फरशीने खून करण्यात आला आहे. खून कोणी केला आणि त्याचे कारण काय हे अद्याप पुढे आले नाही. ही घटना बुधवारी सकाळी उघड झाली. सागर प्रकाश सरवदे, वय २५, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. खुनाची ही घटना १ जानेवारी रोजी रात्री ११.३० ते २ जानेवारी रोजी सकाळी ७ या दरम्यान घडली. याबाबत आई निर्मला प्रकाश सरवदे (वय ५२) यांनी जोडभावी पेठ पोलिसात अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले...
  January 3, 12:12 PM
 • नगर- नगर तालुक्यातील चांबुर्डी येथील प्रगतीशील शेतकरी बबनराव दिघे यांनी कमी पाण्यात भरघोस कांदा उत्पादनाचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. हवामान बदलत आहे. दुष्काळ असतानाही उपलब्ध पाण्याचा ताळेबंद करून त्यांनी साडेतीन एकरात भरघोस व दर्जेदार कांद्याचे उत्पादन काढले आहे. बबनराव दिघे यांनी पाच एकरपैकी साडेतीन एकरमध्ये कांदा लागवड केली. दुष्काळी परिस्थिती असतानाही अतिशय कमी पाण्यात पाण्याचा ताळेबंद करून कांद्याचे भरघोस उत्पादन त्यांनी घेतले. दुष्काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता...
  January 3, 12:02 PM
 • नगर- जिल्ह्यातील विविध नॉन बँकिंग कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या सर्व ठेवीदार, ग्राहक व प्रतिनिधी यांची रक्कम व्याजासह परत मिळावी, या मागणीसाठी सुमारे तीन ते साडेतीन हजार ठेवीदारांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तेथे ठिय्या आंदोलन करुन ठेवीदारांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. प्रशासनाला लेखी निवेदन देऊन पुन्हा एकदा या विषयाकडे लक्ष वेधण्यात आले. आपल्याला न्याय मिळाला नाही, तर आगामी निवडणुकांमध्ये हे कोणालाही मतदान न करता नोटाचा पर्याय स्वीकारला...
  January 3, 12:00 PM
 • सोलापूर- सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वेमार्गाला नीती आयोगाने बुधवारी मंजुरी दिली. यासाठी आधी जाहीर १२८२ कोटी रुपयांच्या निधीत २८८ कोटी रुपयांची कपात करून आता ९९४ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती रेल्वे बोर्डातील सूत्रांनी दिली. दिल्लीत बुधवारी यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जानेवारीला विविध विकासकामांच्या उद््घाटनासाठी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे....
  January 3, 07:49 AM
 • पाथर्डी- थर्टी फर्स्ट साजरा करताना दोन युवकांची मारामारी होऊन एकजण जखमी झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री शहरातील शेवगाव रस्त्यावर घडली. जखमीला नगर येथे हलवण्यात आले आहे. या प्रकरणात गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना समजल्याने मंगळवारी सायंकाळी उशिरा पोलिसांचे एक पथक नगरला रवाना झाले. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी कोणत्याही गुन्ह्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नव्हती. एकमेकांचे मित्र असलेले दोन तरुण थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी सोमवारी रात्री भेटले. या...
  January 2, 11:38 AM
 • संगमनेर- वीज तोडल्याने महावितरणच्या सहायक अभियंत्यास सोमवारी सकाळी मारहाण करण्यात आली. आरोपीच्या अटकेसाठी सुरुवातीला पोलिस ठाण्यात ठिय्या देणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत महावितरणचे कामकाज बंद केले. केशव शेषराव जायभाये असे मारहाण झालेल्या सहायक अभियंत्याचे नाव असून महावितरणच्या कार्यालयात ते काम करत असताना इंदिरानगरमधील मिनाक्षी शांताराम घोडके, तनुजा शांताराम घोडके यांच्यासह आणखी एकजण आला. वीज का तोडली, याचा जाब त्यांनी जायभाये यांना...
  January 1, 11:19 AM
 • सोलापूर- शेतातील गवत घेण्यास विरोध केल्यामुळे शोभा हरिदास ऊर्फ सिद्राम तोडकरी (वय ५०, रा. बाळे) आणि हरिदास ऊर्फ सिद्राम तोडकरी या दोघांना मारहाण करण्यात आली, अशी फिर्याद शोभा तोडकरी यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दिली. तोडकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मल्लू सदाशिव तोडकरी, नीलावती मल्लू तोडकरी, किरण मल्लू तोडकरी, अनिल मल्लू तोडकरी (रा. सर्व बाळे) यांच्याविरुध्द फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. अज्ञात कारणावरून मारहाण नई जिंदगी, लोकमान्य नगर...
  January 1, 10:40 AM
 • पापरी - पापरी-कोन्हेरी रस्त्यावर टमटम उलटून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या दोन झाली आहे. रविवारी एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता, तर तीन जखमींपैकी पृथ्वीराज शहाजी रोकडे (१५) याचा रात्री उशिरा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
  January 1, 10:38 AM
 • माढा (सोलापूर)- सरकार आघाडीचे असो की युतीचे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे कोणालाच जमलेले नाही. अच्छे दिन म्हणत सत्तेवर आलेल्या या सरकारच्या काळात तर आत्महत्येचे लोण कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर असह्य झाल्याने सोलापुरच्या माढा तालुक्यातील मानेगाव (थो) येथील दतात्रय हनुमंत बारबोले या 38 वर्षीय शेतकऱ्याने कांद्यावर फवारणी करण्याचे तणनाशक पिऊन आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान त्यांना उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात दाखल करण्यात आले...
  December 31, 12:35 PM
 • कोपरगाव-तीन सख्ख्या बहिणींसह सात बायकांचा दादला असलेल्या पपड्याचा सर्वाधिक जीव आपल्या छबी नावाच्या प्रेयसीवर जडला. आपल्या छातीवर त्याने छबीचं नावही गोंदवलं... पण छबीवर असलेल्या याच प्रेमामुळे तो पुन्हा गजाआड झाला. पारधी समाजातील सर्वाधिक क्रूर प्रवृत्तीचा गुन्हेगार म्हणून पपड्या देशभर कुप्रसिद्ध आहे. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला हाच पपड्या हवा होता...त्यासाठी गुन्हे शाखेचे पोलिस महिनाभरापासून जंग जंग पछाडत होते. पण पपड्या आता पूर्वीसारखा दिसत नव्हता. त्याला ओळखणार कसं? हा मोठा...
  December 31, 11:50 AM
 • शेवगाव- शिवीगाळ केली म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना तालुक्यातील वडुले बुद्रूक येथे घडली. संदीप दत्तात्रेय जर्गे (३०, वडुले बुद्रूक) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर चंद्रकांत काळे यास अटक केली आहे. त्याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व आरोपी हे एकमेकांचे आतेभाऊ लागतात. मृताचा भाऊ अमोल जर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ७ ऑगस्ट रोजी आरोपी ज्ञानेश्वरने दारुच्या नशेत त्याचा भाऊ धनंजय व वडील...
  December 31, 11:46 AM
 • शिर्डी- शिर्डीतील एका हाॅटेलमध्ये लग्नसमारंभातून ४४ तोळे सोन्याचे दागिने आणि हिऱ्याचा हार असलेली बॅग अज्ञाताने लंपास केल्याची घटना रविवारी दुपारी दाेन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. शुक्रवारी औरंगाबादेतही अशाच पद्धतीने एका लग्नसमारंभातून ४२ ताेळे साेने व सव्वा लाखाची राेकड चाेरीस गेली हाेती. मालेगावातील पटणी व नाशकातील शहा परिवाराचा विवाह साेहळा शिर्डीतील हॉटेलमध्ये हाेता. लग्न दुपारी २ वाजता लागले. त्यानंतर नातेवाइकांनी वधू-वराला लग्नात भेट देण्यासाठी आणलेले दागिने एका...
  December 31, 07:55 AM
 • नगर- अहमदनगर महापालिकेत अवघ्या १४ जागा घेऊन तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपला पाठबळ देत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालिकेची सत्ता दिली. याची पक्षाने गंभीर दखल घेतली असल्याचे सांगून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या नगरसेवकांवर कारवाईचे संकेत रविवारी येथे दिले. नगर महापालिकेतील या समीकरणाचा राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर परिणाम होणार नाही, अशी हमी पवार यांनी दिली. पवार म्हणाले, भाजपबरोबर जाऊ नका, असे मी स्पष्ट सांगितले होते. पक्षाध्यक्षांनी सूचना देऊनही हा निर्णय घेतला...
  December 31, 07:26 AM
 • अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचे अहमदनगर येथे आपातकालीन लॅन्डिंग करावे लागले. उड्डान भरत असताना हेलिकॉप्टरचे एक सीट बेल्ट बाहेरच राहिल्याने गोंधळ उडाला आणि एमरजेंसी लॅन्डिंग करावे लागले. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. हेलिकॉप्टरची चूक दुरुस्त केल्यानंतर पवार आणि त्यांचे सहकारी पुन्हा आपल्या दिशेने रवाना झाले. नगरमध्ये भाजपाला पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई अहमदनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना पवारांनी पक्षाचे आदेश धुडकावून...
  December 30, 06:23 PM
 • अहमदनगर- मालकाच्या जाचाला कंटाळून वाहलचालकाने आत्महत्या केल्याची घटना पारनेर तालुक्यातील दैठणागुंजाळ गावात घडली आहे. या प्रकरणी पोपट रखमादी होळकर(रा. नेप्ती, ता. नगर) याच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त् करण्याचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी मयत दादासाहेब भाऊसाहेब गुंजाळ(30)(रा. दैठणेगुंजाळ ता. पारनेर) यांची पत्नी संगीता गुंजाळ यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यात त्यांनी सांगितले की, दादासाहेब गुंजाळ हे पोपट होळकर यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम...
  December 30, 12:03 AM
 • नगर- अत्यंत अटीतटीच्या ठरलेल्या नगर महापालिकेच्या निवडणुकीनंतर शुक्रवारी झालेली महापौरपदाची निवड नाट्यमय घडामोडींनी गाजली. ६८ सदस्यांच्या सभागृहात २४ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपने महापौर, उपमहापौरपद मिळवले. महापौरपदी बाबासाहेब वाकळे, तर उपमहापौरपदी मालन ढोणे यांची बहुमताने निवड झाली. त्रिशंकू महापालिकेतील भाजप-राष्ट्रवादीची ही सलगी म्हणजे नवे सत्ता समीकरण ठरले. शिवाय, महापालिका स्थापनेपासून प्रथमच...
  December 29, 11:12 AM
 • परंडा- तालुक्यातील लोहारा येथे शेतातील ऊस पेटवून देऊन याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्यास शिविगाळ व मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहारा येथील शिवारातील गौतम दबडे यांच्या ऊसाच्या शेतातून धुर निघत असल्याने ते पाहण्यासाठी गौतम दबडे गेले होते. यावेळी गावातील रणजित बागल व संभाजी बागल यांनी सदरील ऊस पेटवला होता. यात गौतम यांचे पाच ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. ऊस का पेटवला म्हणून गौतम यांनी विचारणा केली असता दोघांनी शिविगाळ व मारहाण करुन जिवे मारण्याची...
  December 29, 11:02 AM
 • बार्शी- बँकेच्या मुंबई येथील ग्राहक सेवा केंद्रातून (कस्टमर केअर) बोलतोय, असे सांगून महिलेच्या बँक खात्याची माहिती घेत त्यातून दोन लाख ४६ हजार ९६६ रुपये काढून घेण्यात आले. महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा नानाभाऊ धेंडुळे (वय २९, रा. उपळाई रोड, गोंदिल प्लॉट, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. आशा व त्यांचे पती नोकरी करतात. आशा यांचे आयसीआयसीआय बँकेत लातूर येथील औसा रोड शाखेत खाते आहे. शुक्रवारी सकाळी त्या बार्शीत घरी असताना त्यांना ९९३९०१७०७३,...
  December 29, 10:59 AM
 • परंडा- ऐन दुष्काळात तालुक्यातील कुंभेजा येथील शेतकरी किरण कोकाटे यांच्या शेतातील तीन एकर ऊस विद्युत तारेच्या घर्षणाने ठिणग्या पडून जळाला असून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी घडली. सदर घटनेचा महसूलच्या वतीने पंचनामा करण्यात आला. तालुक्यातील कुंभेजा शिवारातील किरण कोकाटे यांच्या मालकीच्या गट नं.१७५/२ मधील अंदाजे तीन एकर क्षेत्रातील ऊस व ठिबक सिंचन संच शेतातातून गेलेल्या विद्युत तारेच्या घर्षणाने ठिणग्या पडून जळून खाक झाला. त्यामुळे २ लाख ५० हजार रुपयाचे...
  December 28, 11:56 AM
 • संगमनेर- काँग्रेस सोडण्याचे संकेत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्या विधानाचा अर्थ सोयीने काढल्याचे डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट केले. दक्षिण लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडूनच उमेदवारी करण्याचे निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. नगरची जागा जर काँग्रेसला मिळाली नाही, तर वेगळा राजकीय निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. शिबलापूर येथे निळवंडे कालव्यांच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले, मी काँग्रेस सोडण्याबाबत किंवा अन्य पक्षात जाण्याबाबत कोणतेही...
  December 28, 11:24 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात