Home >> Maharashtra >> Western Maharashtra

Western Maharashtra

 • सोलापूर- परितेवाडीतील जिल्हा परिषद शाळा आणि त्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षण पद्धती महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर नावाजली आहे. एकेकाळी गोठ्यात भरत असलेली ही शाळा आज राज्यातील शिक्षकांच्या आकषर्णाचे केंद्र बनली आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे पाठ्यपुस्तकातील घटक जगाच्या पाठीवर जिथे कुठे अस्तित्वात असतील त्याठिकाणी व्हर्च्युअली जाऊन तेथील स्थानिक नागरिक, अभ्यासक यांच्याकडून त्याविषयी माहिती घेऊन प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शिकण्याला मुले प्राधान्य देतात. त्यामुळे मुलांमध्ये...
  September 5, 11:21 AM
 • सोलापूर- तांड्यावरच्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा नसतात. परंतु तिथे जाणीवपूर्वक काम करून इतक्या सुविधा निर्माण केल्या, की शहरातील प्रगत खासगी शाळांमध्येदेखील नसतील. अध्ययन आणि अध्यापनात संगणक आणि इंटरनेटचा कल्पक वापर सुरू केला. तांड्यावरची मुले संगणक सहजरीत्या हाताळू शकतात. त्यामुळेच शाळा सिद्धी गुणांकनात अ प्रगतश्रेणी मिळाली. गावपातळीवर प्रामुख्याने तांड्यावरील शाळा कशा असाव्यात, याची पाहणी करण्यासाठी अहमदाबादच्या एका अभ्यास गटाने या शाळेस भेट दिली. शाळेचे उपक्रम पाहून...
  September 5, 11:17 AM
 • सोलापूर- बेटी बचाव, बेटी पढाव हा सरकारचा नुसताच नारा आहे. राज्यात प्रत्यक्षात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. अशातच सत्ताधारी पक्षाचे आमदार राम कदम यांनी महिलांविषयी अनुद््गार काढून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांचे वक्तव्य लोकप्रतिनिधीला न शोभणारे असून, विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर कारवाई करावी. भाजपने राज्यातील संपूर्ण महिलांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या,...
  September 5, 11:05 AM
 • शिर्डी- २० सप्टेंबरपासून शिर्डीहून दिल्लीसाठी व एक १ आॅक्टोबरपासून बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होत असल्याची माहिती विमानतळाचे संचालक धीरेन भोसले यांनी दिली. अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करत गेल्या वर्षी १ आॅक्टोबर राेजी विजयादशमीला राष्ट्रपतींच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे उद््घाटन झाले. त्यानंतर येथून हैदराबादसाठी नियमित सेवा सुरू झाली. शिर्डीहून दिल्लीसाठीही विमानसेवा सुरू व्हावी अशी साईभक्तांची मागणी हाेती. ती अाता पूर्ण हाेत अाहे. स्पाइसजेट एअरलाइन्सचे बोइंग ७३७-८०० हे...
  September 5, 06:18 AM
 • पारनेर- पारनेर तालुक्यातील राजकारण आता वेगळ्या वळणावर आले आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय औटी आणि शिवसेनेतून गच्छंती झालेले नीलेश लंके यांच्यातील संघर्षामुळे तालुक्यातील राजकारण पुढील काळात बदललेले दिसेल. पारनेर तालुका हा एकेकाळी कम्युनिस्ट विचारसरणीचा होता. कम्युनिस्टांचा हा बालेकिल्लाच. शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय औटी यांचे वडील १० वर्षे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार होते. बाबासाहेब ठुबे या कम्युनिस्ट नेत्यानेही पाच वर्षे आमदारकी भूषवली. पुढे त्यांचे चिरंजीव आझाद ठुबे...
  September 4, 11:40 AM
 • नगर- नेता सुभाष तरुण मंडळाने चितळे रस्त्यावर विनापरवाना उभारलेला मंडप महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साहाय्याने सोमवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात काढला. दरम्यान, शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी या कारवाईबाबत जाब विचारताच, परीविक्षाधीन अधिकारी प्रजित नायर यांनी, मी कायदा घेऊन फिरत नाही. तुम्ही जाऊन वाचा असे खडेबोल सुनावले. या कारवाईनंतर उपनेते राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत उपोषणास सुरुवात केली. सार्वजनिक गणेशोत्सव...
  September 4, 11:37 AM
 • अकलूज- हजारो सुवासिनींच्या महाआरतीने अकलूज येथील शिवपार्वती मंदिरात भक्तीचे जणू भरतेच आले होते. श्रावन मासातील शेवटच्या सोमवारनिमित्त आयोजित केलेल्या या महाआरतीने मंदिर व परिसरातील आसमंत उजळून निघाला होता. शंकरनगर (अकलूज) येथील शिवपार्वती मंदिरात श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्त दिवसभर भरगच्च धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सायंकाळी सात वाजता झालेली महाआरती शिवभक्तीची चेतना जागृत करून गेली. पुणे येथील विख्यात गायिका आरती दीक्षित यांच्या मधुर आवाजात गायल्या गेलेल्या...
  September 4, 11:32 AM
 • सोलापूर- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त सरव्यवस्थापक ए. जे. भोसले (वय ७५) यांचे अल्प आजाराने सोमवारी सायंकाळी ७ वाजता निधन झाले. गेल्या महिनाभरापासून पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री ८ वाजता त्यांच्या मूळ गावी खवणी (ता. मोहोळ) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी विजया भोसले, धनंजय व अभय असे दोन मुले, मुलगी जयश्री काटुळे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ए. जे. (अज्ञानराव जालिंदर) भोसले यांनी ३४...
  September 4, 11:14 AM
 • मोहोळ- मोहोळ येथील मेहबूबनगर परिसरात जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पोलिस पथकाने छापा टाकला. जुगारासाठी जागा दिल्याने नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह २७ जणांवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत संशयितांकडून बारा मोटारसायकली, २९ मोबाइल व रोख रक्कम असा एकूण पाच लाख २४ हजार ३८१ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. याबाबत मोहोळ पोलिसांनी...
  September 4, 10:59 AM
 • सोलापूर- धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील हत्याकांडात मरण पावलेल्या कुटुंबियांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालीच नाही. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. मयतांच्या कुटुंबियांना १० लाख रूपयांची मदत मिळाली पण उदरनिर्वाह व पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही दुर्लक्षित राहिला आहे. याबाबत मृताच्या कुटुंबातील सदस्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी केली. राईनपाडा येथे भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या...
  September 4, 09:33 AM
 • श्रीगोंदे- कापसेवस्ती बंधारा, पठाणबाबा दर्गा येथे राहणारे अनिल कृष्णाजी गाडेकर (५२) यांनी सोमवारी सायंकाळी घराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून गाडेकर यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. गाडेकर यांच्यावर सोसायटीचे तीन लाखांचे कर्ज होते. कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी गाडेकर यांनी सावकाराकडून दोन लाख रुपये कर्ज काढून सोसायटीचे कर्ज भरले. परंतु त्यांना सरकारच्या कर्जमाफीचा लाभ िमळाला नाही. खासगी...
  September 4, 07:07 AM
 • सातारा - दहीहंडी उत्सवाचे निमित्त साधून काँग्रेसच्या नेत्यांनी साेमवारी सातारा जिल्ह्यातील कराड येथे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारभाराची प्रतीकात्मक दहीहंडी फाेडून अनाेखा निषेध नाेंदवला. भाजप सरकारच्या पापाचा घडा आता भरला असून २०१९ च्या निवडणुकीत जनताच भाजपच्या पापाची हंडी फोडून सत्तेवरून खाली खेचेल, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशाेक चव्हाण यांनी केली. चाैथ्या दिवशी काँग्रेसची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा कराडमध्ये पाेहाेचली. दिवंगत माजी मुख्यमंत्री...
  September 3, 09:47 PM
 • सोलापूर- वाराणसीहून मैसूरला जाणाऱ्या एक्सप्रेसवर केम स्थानकावर दरोडा पडला. अज्ञात चोरट्यांनी प्रवाशांकडून सुमारे एक लाख रुपयांचे सोने लुटले. ही घटना रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. वाराणसी-मैसूर एक्सप्रेस क्रॉसिंगसाठी थांबली होती. अज्ञात 10 ते 15 दरोडेखोरांनी एस 7 व एस 8 ह्या डब्यावर हल्ला चढविला. प्रवाशांकडून सुमारे 1 लाख रुपये किमतीचे सोने व मोबाईल लुटण्यात आले. प्रवाशानी गाडीतील तिकिट पर्यवेक्षक ब्रिजभूषण यांच्याकडे तक्रार दिली. वाडी लोहमार्ग पोलिस यांच्याकडे या...
  September 3, 05:36 PM
 • नगर- पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगादेवी मंदिरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल ४ लाख ९० हजारांचा ऐवज लांबवणारी टोळी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गजाआड केली. चोरट्यांकडून सोने घेणाऱ्या सराफालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. स्थानिक गुन्हे शाखा व पारनेर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केल्याची माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. सखाराम नंदू गावडे (१९, वडगाव मावळ, जि. पुणे), रमेश ऊर्फ राहुल बाळू पडवळ (२२, निमगाव दाभाडे, ता. खेड, जि. पुणे),...
  September 3, 11:15 AM
 • राहुरी शहर- सह्याद्रीतील घाटमाथ्यावर यंदा पाऊस लवकर थांबल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणाऱ्या मुळा धरणातील पाणीसाठ्याला उतरती कळा लागली आहे. शनिवारी सायंकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा १९ हजार ९६२ घनफूट होता. मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा धरणात पाण्याची आवक मोठी असल्याने धरणाच्या पाणीसाठ्याची २२ हजार ५४३ दशलक्ष घनफूट नोंद झाली होती. मागील वर्षीचा तुलनेत आजचा मुळा धरणातील पाणीसाठा तब्बल अडीच हजार दशलक्ष घनफुटाने कमी भरला आहे. लाभक्षेत्राबरोबरच मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाने एकाचवेळी...
  September 3, 11:09 AM
 • श्रीरामपूर- इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून केंद्र सरकारमार्फत बँकेच्या सर्व सेवा-सुविधा नागरिकांना घरपोहोच मिळतील. लवकरच पासपोर्ट कार्यालय सुरू करून लोकांची गैरसोय दूर करण्यात येईल, असे खासदार सदाशिव लोखंडे यांनी रविवारी सांगितले. येथील भारतीय डाक कार्यालयात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या उद्््घाटनप्रसंगी खासदार लोखंडे बोलत होते. यावेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, पोस्टाचे प्रबंधक यू. एस. जनावडे, बँक व्यवस्थापक वेंकटराव डारला, सहव्यवस्थापक स्नेहल...
  September 3, 11:05 AM
 • पारनेर- लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी २ अॉक्टोबरला महात्मा गांधी जयंतीपासून आंदोलन करण्यावर आपण ठाम अाहोत. हे आंदोलन दिल्लीत न करता राळेगणसिद्धी येथे करत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. मे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने देशातील जनतेला आम्ही सत्तेत आल्यानंतर लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करू, स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करू, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी जनतेला माहिती नव्हते की, हे...
  September 3, 11:02 AM
 • सोलापूर- २०१८-१९ या वर्षातील जलयुक्त शिवार योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत कामांची मंजुरी अडकू नये, यासाठी त्यापूर्वीच सर्व कामांना प्रशासकीय मंजुरी घेण्याचे आदेश रोहयो उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांनी दिले. २०१७-१८ या वर्षातील जी कामे अपूर्ण आहेत, ती नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही श्री. पवार यांनी दिले. जिल्हा परिषदेकडून होत असलेल्या कामांबाबत नाराजी व्यक्त करीत मुदतीत कामे पूर्ण करावी अन्यथा संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना...
  September 3, 10:34 AM
 • कुर्डुवाडी- जिल्हाप्रमुख पदावरून धनंजय डिकोळे यांना बाजूला काढले असले तरी लवकरच त्यांना नवीन पद मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या भावना शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांच्याकडे काळवण्यात येतील. शिवाय त्यांच्याबरोबर पक्ष प्रमुखांकडे येण्याची तयारी असल्याचेही सोलापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी सांगितले. कुर्डुवाडी नगराध्यक्षांच्या कॅबीनमध्ये महेश कोठे, मुंबईचे बाबूराव गोमे यांनी धनंजय डिकोळे यांची भेट घेतली. त्यांची बंद खोलीमध्ये एक तास चर्चा झाली. या वेळी शिवसेना गट...
  September 3, 10:23 AM
 • सोलापूर- दादर-चेन्नई एक्स्प्रेसच्या प्रथम श्रेणी वातानुकूलित दर्जाच्या डब्यातून प्रवाशाचे सुमारे एक किलो वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार देण्यात आली. त्यांची किंमत सुमारे चाळीस लाख रुपये अाहे. ही घटना ३१ जुलै रोजी रात्री साडेतीनच्या सुमारास कुर्डुवाडी ते सोलापूर दरम्यान घडली आहे. विपुल कुमार (रा. नेल्लोरे, आंध प्रदेश) हे आपल्या पत्नीसमवेत मुंबईहून दादर-चेन्नई रेल्वेने निघाले होते. ते एच ए १ या डब्यातून प्रवास करत होते. मध्यरात्री साडेतीन ते चारच्या सुमारास पत्नीजवळ...
  September 3, 10:23 AM
 
जाहिरात

RECOMMENDED