Home >> Maharashtra >> Western Maharashtra

Western Maharashtra

 • पारनेर- सरकारने अनेक मागण्यांवर सकारात्मक पावले टाकली आहेत. काही अंशी मागण्या मान्य झाल्या आहेत. मात्र, काही आश्वासने कागदावरच आहेत. सरकार आपल्या देशाचे आहे. ते काही इंग्रज नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारपासून सुरू होणारे उपोषण स्थगित केले. मात्र, राहिलेल्या मागण्या मान्य न झाल्यास महात्मा गांधी पुण्यतिथीपासून (३० जानेवारी) पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला. काय म्हणाले गिरीश महाजन.....
  October 3, 07:49 AM
 • शिर्डी- श्री साई समाधी शताब्दी सांगता सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ ऑक्टोबर रोजी शिर्डीच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्यासह राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती असेल. यानिमित्ताने शिर्डीतील साईच्या दर्शनाची रांग, शैक्षणिक संकुल, साई सृष्टी व दहा मेगावॅटच्या सोलार प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हाेणार अाहे.
  October 3, 07:43 AM
 • स्वातंत्र्य आणि स्वराज्य यातील नेमके अंतर बापू जाणून होते. स्वातंत्र्यानंतर स्वराज्याची लढाई लागेल, ती आपल्याच माणसांबरोबर याचीही त्यांना परिपूर्ण कल्पना होती. त्यामुळेच गांधींनी स्वराज्याचा पुरस्कार केलेला आहे. स्वराज्य याचा अर्थ स्वत:च्या मनावर राज्य. स्वत: बदलणे, परिवर्तन घडवून आणणे आणि या निसर्गाच्या कुशीत राहून विकास घडवून आणणे, ही गांधींच्या स्वराज्याची कल्पना आहे. बालकांमध्ये असलेली निरागसता महात्मा गांधीजींच्या वर्तनामध्ये होती. मनातील भाव व्यक्त करणे, झालेल्या चुका...
  October 2, 12:01 PM
 • सोलापूर - लोकमंगलच्या दूध संस्था अस्तित्वात नसताना त्याच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प सादर करून अनुदान लाटण्याचा प्रकार उघड झाला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख अध्यक्ष असलेल्या लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने हा प्रकल्प सादर केला. २४ कोटी २१ लाखांच्या या प्रकल्पाला १२ कोटींचे अनुदान मंजूर झाले. पैकी पहिल्या टप्प्यात २ कोटी व दुसऱ्या टप्प्यात ३ कोटी असे एकूण ५ कोटी रुपयांचे अनुदानही घेतले. दरम्यान, संस्थाच अस्तित्वात नसल्याची तक्रार पुढे आली आणि...
  October 2, 11:43 AM
 • नगर -उद्योजकांना कर्ज दिल्याने देशभरातील बँका अार्थिक संकटात सापडल्या, बँकांची ही हानी भरून काढण्यासाठीच भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या नावाने ८१ हजार कोटींचे कर्ज माफ केले. असे असतानाही या बँका शेतकऱ्यांकडे ढुंकूनही पहायला तयार नाहीत, त्यांच्याकडून केवळ उद्योजकांनाच कर्ज मिळते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला. मोदी सरकारला मन की बात कळते, परंतु जन की बात मात्र अद्याप कळली नसल्याचा टोलाही पवार यांनी लगावला. बीड येथील मेळावा आटोपून एका कार्यक्रमानिमित्त पवार...
  October 2, 11:39 AM
 • पाथर्डी -मंत्री किंवा खासदारांपेक्षाही आपण तोडणी कामगारांचे नेतृत्व महत्त्वाचे मानतो. येत्या दोन दिवसांत तोडणी कामगाराच्या दरवाढीसह अन्य मागण्यांबाबत साखरसंघ मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक अाहे. संप टळावा, असा प्रयत्न राहील. मात्र, संप झालाच, तर शब्दाची धार कोयत्याला येऊन राज्य हादरून जाईल, असा इशारा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला. तालुक्यातील खरवंडी कासार येथे आयोजित तोडणी कामगार व मुकादमाच्या मेळाव्यात पुढे त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मोनिका राजळे या होत्या, तर प्रमुख...
  October 2, 11:38 AM
 • नगर - लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती, शेतकऱ्यांच्या समस्या अादी मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे मंगळवारी (२ ऑक्टोबर) महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून राळेगणसिद्धीतील उपोषणास बसणार अाहेत. दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे तिसऱ्यांदा हजारे यांची मनधरणी करण्यासाठी राळेगणमध्ये सोमवारी सायंकाळी येणार होते, परंतु त्यांच्या विमानाचे जळगाव येथून उड्डाण होऊ न शकल्याने त्यांच्या दौरा बारगळला. अाता मंगळवारी सकाळी आठ वाजता ते हजारे यांच्या भेटीसाठी येत अाहेत. २३ ते...
  October 2, 08:48 AM
 • काेल्हापूर - पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने काेल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरासह त्यांच्या अखत्यारीतील सर्वच मंदिरांमध्ये ताेकड्या कपड्यांमध्ये असलेल्या महिला, मुलींना तसेच पुरुषांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला अाहे. अागामी शारदीय नवरात्राेत्सवापासून म्हणजे १० अाॅक्टाेबरपासून महालक्ष्मी मंदिरात या निर्णयाची अंमलबजावणी हाेणार अाहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देवस्थान समितीच्या इतर मंदिरांतही हा नियम लागू हाेईल, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव...
  October 1, 09:23 PM
 • राहाता- देशातील खासदार आणि आमदार तुमचे-आमचे दुश्मन आहेत, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांचा नंबर एकचा शत्रू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना धोरण ठरवणारे खासदर आणि आमदार हेच जबाबदार आहेत. यांच्या विरोधात रान उठवण्याची वेळ आता आली अाहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी राहाता येथे रविवारी आयोजित शेतकरी परिषदेत पाटील बोलत होते. ज्येष्ठ नेते लक्षमणराव वडले, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, शिवाजीराव नांदखिले,...
  October 1, 12:00 PM
 • नगर- आपल्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या असतात. त्या ठराविक वेळी जेवायला मिळालं नाही, तर लगेचच त्याचे परिणामही दिसतातच. कोणाला चक्कर येते, डोकं दुखायला लागतं, अॅसिडिटी वाढते. आपण अस्वस्थ होऊन जातो आणि त्याच वेळेला सगळे सल्ले द्यायला लागतात, जेवणाची वेळ चुकवू नको रे बाबा.., पण राळेगणसिद्धीचे संत, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, वयाच्या ८१ व्या वर्षात सुद्धा अनिश्चित काळासाठी उपोषण करण्याची तयारी दर्शवतात; तेंव्हा नक्कीच आश्चर्य वाटायला लागतं.. आताही लोकपाल नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा,...
  October 1, 11:51 AM
 • सोलापूर- सोलापूर रेल्वे स्थानकावरील सरकता जिना चुकीच्या जागी बसवल्याची दखल अखेर रेल्वे बोर्डाकडून घेण्यात आली. रेल्वे बोर्डाने सरकता जिन्याबद्दलची डीआरएम सोलापूर यांच्याकडे विचारणा केली. डीआरएम यांनी रेल्वे बोर्डाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, जर ही दिशा स्थानकाच्या दर्शनी भागात लावली तर अन्य लोकांकडून याचा वापर होईल. अति वापरामुळे याचे वीज बिल वाढेल. हे टाळण्यासाठी जिना उलट दिशेने बसवला. या वरून हे स्पष्ट होते की, रेल्वे प्रशासनाला काळजी ही वीज बिलाची आहे. मात्र तिकीट काढून...
  October 1, 11:51 AM
 • सोलापूर- पूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर रुग्णवाहिकेची सुविधा पुरवली जायची. आता मात्र चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून रुग्णवाहिकेची सुविधा पुरवायचा आदेश शासनाने काढला आहे. त्यामुळे होणाऱ्या अपघातामधील जखमींना तातडीची मदत मिळणार आहे. ही मदत मिळविण्याकरीता १०३३ हा हेल्पलाइन क्रमांक दिला आहे. एखाद्या अपघाती प्रसंगात अनेकदा त्वरित उपचार न मिळाल्याने अपघातग्रस्तांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे जनतेचे हित ध्यानात घेऊन शासनाने अपघातस्थळी पोहोचून त्याच...
  October 1, 11:44 AM
 • दक्षिण सोलापूर- एफआरपीनुसार थकीत ऊसबिल न दिल्याने संतप्त सभासदांनी अध्यक्ष धर्मराज काडादी यांना प्रास्ताविक करताना रोखले. आधी बिल कधी देता सांगा, पुढे बोला असे ठणकावल्याने सभेत गोंधळ उडाला. संचालक व सभासदांत जोरदार खडाजंगी झाली. अखेर काडादी यांनी १५ जानेवारी ते मार्च अखेरच्या उसाचे एफआरपीनुसार १२०० रुपये दिले आहेत. उर्वरित एक हजार रुपये महिनाभरात व्याजासह देण्याची ग्वाही दिली. त्यानंतरच सभा सुरू झाली. रविवारी (दि. ३०) सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची कर्मयोगी अप्पासाहेब काडादी...
  October 1, 11:39 AM
 • शिर्डी- सरकारतर्फे राज्यातील आदिवासी समाजाला डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत वनजमीनपट्टे देण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिर्डीत अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमातर्फे आयोजित अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, आदिवासी क्षेत्रात विविध विकासकामांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला सक्षम बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पेसा कायदा लागू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले असून त्यानुसार ५ टक्के निधी थेट...
  October 1, 07:50 AM
 • अकोले- जयसिंगपूर येथे २७ ऑक्टोबरला होणाऱ्या शेतकरी परिषदेत गळिताला येणाऱ्या उसाचा भाव निश्चित करण्यात येईल. जोपर्यंत आम्ही भाव निश्चित करत नाही, तोपर्यंत शेतकरी आपल्या उसाचे एक कांडेही साखर कारखान्याला जाऊ देणार नाहीत, असा ठराव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी ऊस व दूध परिषदेत मांडला. उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावत त्याला संमती देत ठरावाची अंमलबजावणी नगर जिल्ह्यातही करण्याचा निर्णय घेतला. साखरसम्राटांना ऊस उत्पादक शेतकरी हादरवून सोडतील, असा...
  September 29, 11:45 AM
 • औरंगाबाद- प्रवरा धरणातून पाणीपुरवठा योजना कोपरगाव नगर परिषदेसाठी असताना निळवंडेतून नवीन योजनेचा अट्टाहास कशासाठी? त्यांच्यासाठी या धरणातील पाणी राखीव असताना त्याचा निम्मादेखील वापर केला जात नाही. त्यामुळे निळवंडेतील योजना मंजूर करू नये अशा आषयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. मनीष पितळे यांनी प्रतिवादी राज्याच्या जलसंपदा आणि विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, राज्याचे मुख्य सचिव,...
  September 29, 11:42 AM
 • नगर- ऑनलाइन औषध विक्री व ई-पोर्टलच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यातील औषध विक्रेत्यांनी बंद पाळला. यात जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी सहभाग घेतला. ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ नगर जिल्हा, नगर तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून तेथे निषेध सभा घेतली. निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन दिले. दरम्यान, प्रशासनाने पूर्वकाळजी घेत नियोजन केल्यामुळे औषधावाचून रुग्णांचे हाल झाले नाहीत. केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष...
  September 29, 11:34 AM
 • नगर- फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून नावे असलेल्या शहर सहकारी बँकेच्या संचालकांना तूर्तास अटक होणार नसल्याचे संकेत पोलिसांकडून मिळाले आहेत. तपासादरम्यान चौकशीसाठी आवश्यक असलेले कागदपत्र सादर करण्यासाठी बोलावू तेव्हा हजर होण्याच्या नोटिसा संचालकांना बजावण्यात आल्या आहेत. त्यास संचालकांनी होकार दिला असल्याने त्यांच्यावरील अटकेची कारवाई तूर्तास टळली आहे. एम्स हॉस्पिटलचा प्रवर्तक डॉ. नीलेश शेळके याच्यासह नगर शहर बँकेच्या संचालकांवर सुमारे १७ कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा...
  September 29, 11:26 AM
 • श्रीगोंदे- बापू हे अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. १९७८ मध्ये अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करूनदेखील बापूंनी काँग्रेस सोडली नाही. बापूंच्या निधनाने जिद्दी, कष्टाळू आणि समाजाशी बांधिलकी असलेला नेता हरपल्याची भावना माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांचा दशक्रिया विधी शुक्रवारी वांगदरी येथे घोडनदी तीरावर पार पडला. बापूंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या...
  September 29, 11:11 AM
 • सोलापूर- सोलापूर स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर बसविलेला सरकता जिना चुकीच्या दिशेने बसविला असल्याने सोलापूरकरांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. अनेकांनी मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांसह रेल्वेमंत्री व पंतप्रधान कार्यालयांपर्यंत ट्विट करून रेल्वेच्या या बेजबाबदार कृत्याबद्दल संताप व्यक्त केला. काहींनी या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. सोलापूरकरांची गैरसोय टाळण्यासाठी तत्काळ या जिन्याची दिशा बदलावी, असे अनेकांनी ट्विट करून म्हटले आहे. या प्रकरणी डीआरएम यांनी मौन...
  September 29, 11:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED