Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • आश्वी- आजचे युग हे तंत्रज्ञानाचे अाहे. संगमनेर पंचायत समितीने तंत्रज्ञानाचा अवलंब करत जिल्हा परिषदेकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती गावपातळीवरील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र अॅप तयार करावा, असे आश्वी जिल्हा परिषद गटाच्या सदस्य अॅड. रोहिणी निघुते यांनी सांगितले. आश्वी खुर्द येथे आयोजित प्रभाग समिती सभेच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती निशा कोकणे, उपसभापती नवनाथ अरगडे, पंचायत समिती सदस्य निवृत्ती सांगळे,...
  05:41 AM
 • पाथर्डी- लोकनेते बाळासाहेब विखे यांनी जिल्ह्यातील सर्वच पक्षांवर दबाव ठेवत सत्ताकेंद्र स्वतः भोवती फिरते ठेवले. निष्ठावंतांना कायमस्वरुपी व्यासपीठ मिळावे, म्हणून तीस वर्षांपूर्वी त्यांनी जिल्हा विकास आघाडीची स्थापना केली. त्यांचे नातू डॉ. सुजय विखे यांनी विकास आघाडीचे पुनरज्जीवन करत जनसेवा फाउंडेशनच्या बॅनरखाली जिल्ह्यात राजकीय जाळे विणण्यास प्रारंभ केला आहे. कोरडगाव येथे विखे फाउंडेशनच्या माध्यमातून पहिले आरोग्य शिबिर आयोजित करत दिवसभर त्यांनी तालुका पिंजून काढला. आमदार...
  05:36 AM
 • सोनई- आम आदमी पक्षाच्या २० आमदारांचे पद रद्द करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे झाल्याचे मला पक्षाकडून काहीही कळवण्यात आले नाही. मला ते फक्त प्रसारमाध्यमांतून कळले. राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वीच मला आमच्या व्हॉट्सअप ग्रूपमधून वगळण्यात आले, असे आपचे नेते व कवी कुमार विश्वास यांनी पत्रकारांना सांगितले. कुमार विश्वास यांनी शनिवारी शनिशिंगणापूरला भेट दिली. उदासी महाराज मठात अभिषेक केल्यानंतर त्यांनी चौथऱ्यावर जाऊन शनिदर्शन घेतले. देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात माजी आमदार शंकरराव...
  05:29 AM
 • शिर्डी- साईबाबा कोणत्या जातीचे, पंथाचे, वंशाचे हे कोणालाही माहीत नसताना व साईबाबांच्या साई चरित्रात कोठेही उल्लेख नसताना पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थळ असून या गावाचा विकास आराखडा राष्ट्रपतींच्या शिफारशीवरून सरकार बनवत असल्याच्या प्रकरणावरून शिर्डी ग्रामस्थांमध्ये असंतोष उफाळला अाहे. या असंतोषाला संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांना सामोरे जावे लागले. शिर्डी ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन हावरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत साई चरित्रात दिलेली...
  04:31 AM
 • नाशिक- सोनई हत्याकांडातील आरोपी असलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांसह त्यांचा एक साथीदार अशा सहा आरोपींना नाशिकच्या सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. हा गुन्हा दोन कुटुंबांतील वादातून नाही, तर जातीय मानसिकतेतून झालेला दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने तुम्हाला जिवंत सोडणे, हे समाजाच्या दृष्टीने धोकादायक असल्याने, तीन निष्पाप तरुणांची निर्घृण, निर्दय आणि क्रूर हत्या केल्याबद्दल तुम्हाला मरेपर्यंत फाशी, सात वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड...
  03:48 AM
 • अहमदनगर-केडगाव येथे बाह्यवळण महामार्गावर तवेरा गाडीला झालेल्या भीषण अपघातात 3 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाले आहेत. आकाश उद्धव गुंड, सुमीत शांताराम खामकर, निलेश रघुनाथ खेडे अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही बारावीचे विद्यार्थी होते. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास हा अपघात झाला. पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या तवेरा गाडीचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुभाजक ओलांडून ही गाडी एका दुचाकीला धडकली. त्या धडकेत...
  January 20, 04:49 PM
 • सात्रळ (जि. नगर) - साखरेचे भाव कोसळत असताना उसाला एफआरपीनुसार भाव कसा मिळणार? नगदी पिकाची ही दैना असेल तर इतर पिकांचे काय? आम्ही सत्तेत असताना कापसाला पाच ते सहा हजार रुपये क्विंटल भाव मिळत होता. सध्या तो ३८०० रुपयांवर आला आहे. या देशात सध्या खाणाऱ्यांचा विचार सुरू झाला आहे, पिकवणाऱ्यांचा विचार केला जात नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. पी. बी. कडू पाटील यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांना समाजक्रांती पुरस्कार...
  January 20, 09:08 AM
 • नगर - छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेर्तंगत नगर जिल्ह्यातील १ कोटी ८३ हजार ८९४ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शुक्रवारी (१९ जानेवारी) अखेरपर्यंत ५२३ कोटी ३ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे व जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी शुक्रवारी दिली. कर्जमाफी योजने अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५२३ कोटी ३ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे.मात्र राज्य सरकारच्या महाऑनलाईन पोर्टलमार्फत...
  January 20, 09:08 AM
 • पारनेर- नगर-पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण येथील वेताळवस्तीलगत वॅगनर दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. दोघेजण गंभीर जखमी झाले. गुरूवारी सकाळी ८.३० वाजता पुण्याहून नगरच्या दिशेने येणारी मारूती वॅगनर (एमएच - १४, जी एच ४८२१) भरधाव वेगात असताना वळणाचा अंदाज न आल्याने दुभाजकाला धडकली. मागील डाव्या बाजूचा टायर फुटून दोन-तीन पलट्या घेऊन गाडी नाल्यामध्ये गेली. राजेंद्र शेळके यांच्यासह ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नर्मदा पंढरीनाथ थोरवे (४३,...
  January 19, 07:59 AM
 • नगर- विख्यात चित्रकार अनुराधा ठाकूर यांचे कलर्स - द अॅप्लिक ऑफ ऱ्हिदम हे प्रदर्शन हैदराबाद येथील पार्क हयात येथे भरले आहे. आदिवासींच्या जीवनावरील वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील या प्रदर्शनाला हैदराबादकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. हे प्रदर्शन ३० जानेवारीपर्यंत खुले असेल. हे प्रदर्शन म्हणजे अंगभूत भारतीय संस्कृती व परंपरांचे दर्शन घडवणाऱ्या चित्रांचा आगळावेगळा संग्रह आहे. रानफुलांइतकीच निरागसता त्यांच्या जीवनात पहायला मिळते. मातीत रुजलेली नैतिकता, प्रामाणिकपणा, निष्पापपण ठाकूर...
  January 19, 07:56 AM
 • नगर- दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी अकोले येथे गायीच्या दुधाला ६५ रुपये, तर म्हशीच्या दुधाला ८५ रुपये प्रतिलिटर दर मिळण्याची शिफारस केल्याचे सांगितले. पण, ही शिफारस अवास्तव व सर्व दूध उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. कारण गेल्या जून महिन्यात सरकारने गायीच्या दुधासाठी जाहीर केलेला २७ रुपये दर तरी जानकरांनी दूध उत्पादकांना आधी मिळवून द्यावा, अशी मागणी दूध धंद्यातील जाणकारांनी केली आहे. सरकारने मोठा गाजावाजा करून जून २०१७ मध्ये गायीच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये (३.५ अंश...
  January 19, 07:54 AM
 • श्रीगोंदे - वडील दगडू सोनबा दरेकर (६५ वर्षे) यांनी घरातून निघून जावे, म्हणून त्यांचा मुलगा बापू व त्याच्या पत्नीने त्यांना बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे दगडू यांचा हात तुटला. जखमी अवस्थेत त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या फिर्यादीवरुन मुलगा आणि सुनेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील हिरडगावमध्ये ही घटना घडली. वयोवृद्ध वडलांनी घरातून निघून जावे आणि त्यांच्याकडे असलेले पैसे मिळावेत, यासाठी त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांना वारंवार मारहाण करायचा....
  January 18, 08:57 AM
 • नगर - विडी विक्रीवर लादण्यात आलेला २८ टक्के जीएसटी कर रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन व नगर विडी कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली. विडी विक्री होत नसल्याने कारखानदारांनी कामगारांच्या कामात २० ते ५० टक्क्यांनी कपात केली आहे. यामुळे विडी कामगारांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास विडी उद्योगातील लहान विडी कारखानदार...
  January 18, 08:54 AM
 • शेवगाव - स्वमालकीच्या शेतजमिनीत जाण्यासाठी रस्ता खुला व्हावा, या मागणीसाठी तालुक्यातील ढोरसडे येथील धरणग्रस्त शेतकरी शेतात उपोषणास बसले होते. मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी थेट जायकवाडीच्या पाण्यात उपोषण सुरू केले. रात्री उशिरापर्यंत ते पाण्यात होते. धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या गट क्रमांक ५५/२, ५६/२, ५४ पैकी ४९ ठिकाणी शेतजमिनी आहेत. शेतात जाण्यासाठी रस्ता खुला करून मिळावा, अशी त्यांची अनेक वर्षांची मागणी आहे. रस्ता देता येत नसेल, तर आमच्या शेतजमिनी संपादित करून घ्याव्यात, असेही...
  January 17, 08:35 AM
 • नगर - पथदिवे गैरव्यवहारप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत अनियमितता, तसेच मनपाची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या कामांची बजेट रजिस्टरलाही नोंद नाही. याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच निलंबित अधिकाऱ्यांसह दोन उपायुक्त, दोन प्रभाग अधिकारी, लेखाधिकारी, एक लिपिक या अधिकाऱ्यांची शासनाच्या पॅनेलवरील निवृत्त वर्ग एक अधिकाऱ्यामार्फत खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे, असे आयुक्त घनशाम मंगळे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पथदिव्यांची कामे न करता परस्पर ४०...
  January 17, 08:31 AM
 • श्रीगोंदे- कोरेगाव-भीमा दंगलीच्या चौकशीतून निश्चितपणे मोठे षडयंत्र उघड होण्याची शक्यता, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सांगितले. श्रीगोंदे तहसीलसमोर दलित समाजातर्फे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या धरणे अांदोलनात ते बोलत होते. श्रीगोंदे तहसील कार्यालयसमोर सेामवारी भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी आणि श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव येथील दलित मुलांना चौकशी न करता त्यांच्यावर गुन्हा...
  January 16, 06:59 AM
 • नगर- रणगाड्यांच्या वाटचालीवरच युद्धाचे यश अवलंबून असते, असे जर्मन सेनानी जनरल गुडेरियन याने दुसऱ्या जागतिक युद्धाच्यावेळी म्हटले होते. त्याचा प्रभावी प्रत्यय सोमवारी खारे कर्जुने येथील युद्ध सराव मैदानावर (के. के. रेंजेस) उपस्थितांना आला. निमित्त होते. नगरच्या आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल (एसीसीएस) व मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमआआरसी) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या वार्षिक युद्ध सराव प्रात्यक्षिकांचे. या दोन्ही दलांच्या युद्धातील मारक क्षमतेचा अनुभव उपस्थितांना आला....
  January 16, 06:59 AM
 • राहुरी शहर- महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण ओरबाडून नेणाऱ्या अशोकनगरच्या दोघा भामट्यांना राहुरीच्या पोलिसांनी सोमवारी पहाटे गजाआड केले. या दोघांच्या शोधार्थ राहुरी पोलिसांनी मकरसंक्रांतीची रात्र जागून काढली. मकरसंक्रांतीच्या दिवशी शहरातील मंदिरात पूजेचा कार्यक्रम आटोपून सायंकाळी घरी जात असलेल्या सुरेखा खळेकर यांच्या गळ्यातील ५ तोळे सोन्याचे गंठण पळवून नेण्याची घटना नगर-मनमाड राज्यमार्गावरील त्रिदेव वसाहतीजवळ घडली होती. घटनेची खबर मिळताच पोलिस...
  January 16, 06:57 AM
 • पारनेर- विधानसभा निवडणुकीला अद्याप १८ ते २० महिन्यांचा अवधी असताना पारनेर तालुक्यात मात्र राजकीय वातावरण तापू लागले आहे. घराणेशाहीचा बीमोड करण्यासाठी भाजपच्या उच्च पदाधिकाऱ्यांकडून तालुका राजकारणात हस्तक्षेप सुरू झाला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत पारनेरचा भावी आमदार कोण? यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत. तालुक्यात निवडणुकीच्या रणधुमाळीने आतापासूनच वेग घेतला आहे. पारनेर तालुक्यात विजय औटी यांची आमदारकीची सलग तिसरी टर्म अाहे. तालुक्यात सर्वच गावांमध्ये छोट्या-मोठ्या...
  January 16, 06:43 AM
 • संगमनेर- स्वच्छ सर्वेक्षण अभियानामुळे संगमनेर शहराचे सध्या चित्र बदलत आहे. दररोज अभियानाची रँकिंग शासनाच्या संकेतस्थळावर बदलत असल्याने पहिल्या टॉप टेन शहरामध्ये येण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेने पावले टाकली आहेत. सुरुवातीला ३७४ व्या क्रमांकावर असलेले संगमनेर रविवारी या अभियानात ४०४१ शहरांमध्ये १६ व्या स्थानावर होते. शहरात वेगाने अभियानाला गती मिळाली आहे. नगराध्यक्ष दुर्गा तांबे, मुख्याधिकारी सचिन बांगर यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेचे प्रशासन मध्यरात्री उशिरापर्यंत आणि...
  January 16, 06:30 AM
 
जाहिरात

RECOMMENDED