Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • श्रीगोंदे- राज्य साखर संघाचे अध्यक्ष, श्रीगोंदे तालुक्याचे माजी आमदार, सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे (वय-85) यांचे बुधवारी सायंकाळी 4.30 वाजता दीर्घ आजारामुळे निधन झाले. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी दुपारी 12.30 वाजता वांगदरी (ता. श्रीगोंदे) या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्यामागे पत्नी, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, दीपक नागवडे ही दोन मुले व तीन मुली असा परिवार आहे. शिवाजीराव नागवडे हे...
  08:09 PM
 • श्रीगोंदे- हनुमंत थोरात (खुटबाब, ता. दौंड, जि. पुणे) हे मारुती क्रॉस कारसह बेपत्ता असल्याची तक्रार ५ सप्टेंबरला यवत पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. थोरात यांच्या जेसीबीवर चालक असलेला श्रीगोंदे तालुक्यातील सूरज ऊर्फ पप्पू सुभाष ओहोळ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पेडगाव (ता. श्रीगोंदे) येथील रावसाहेब फुलमाळी आणि बापू भोईटे यांनी मिळून थोरात यांचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी राशीन येथून ओहोळ याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तोंड उघडले. मी,...
  11:41 AM
 • संगमनेर- नगर शहरात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेने जिल्हाही हादरला आहे. सोमवारी नगरमध्ये झालेल्या मूकमोर्चापाठोपाठ मंगळवारी संगमनेरमध्ये मूकमाेर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. मोर्चात जनसामान्यांचा आक्रोश दिसून आला. अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, या मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. शहराच्या िवविध भागातून निघालेल्या या मोर्चात सर्वधर्मीयांचा समावेश होता. सर्वधर्मीयांनी एकत्रित येत काढलेल्या या मोर्चामुळे...
  11:34 AM
 • अहमदनगर- केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी ५ महिन्यांनंतर ११९ आरोपींवर पाेलिसांनी साेमवारी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. यात शिवाजी कर्डिले, अरुण जगताप या अामदारांसह ११ आजी-माजी नगरसेवकांचा समावेश आहे. या गुन्ह्यात १२६ आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी १०६ जण अटकेत आहेत. तर चौघांची नावे वगळली. १० फरार आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची ७ एप्रिलला केडगावात गोळ्या झाडून हत्या झाली. या प्रकरणी चाैकशीसाठी पाेलिसांनी...
  07:40 AM
 • श्रीरामपूर- मूल होत नसल्याने सुरूवातीला नांदवण्यास तयार नसलेल्या पतीने चक्क पत्नीचेच अपहरण केले. ही घटना रविवारी भोकर येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलिसांनी पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पाच जणांना अटक करण्यात आली. भोकर येथील सोन्याबापू रामचंद्र दुधाळे (वय ६४) यांनी तालुका पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पती अंकुश रामराव दळे, भाया चंद्रकांत रामराव दळे, आजे सासरे पांडुरंग सदाशिव दाते, जगन्नाथ महादेव दाते, विजय रामदास शेलार (तेलकुडगाव, ता. नेवासे) अशी अटक केलेल्या आरोपींची...
  September 18, 12:46 PM
 • नाशिक - वाळू उत्खननास प्रतिबंध करणारे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा-पारनेरचे उपविभागीय अधिकारी गो. पा. दाणेज यांच्यावर वाळूमाफियांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. महसुली अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी राजपत्रित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. नगरमधील सिना नदीपात्रात अनधिकृत वाळू उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनावर मौजे बनपिंप्री (ता....
  September 18, 11:17 AM
 • नगर - जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत संतप्त झालेल्या सदस्यांनी अधिकारी आमचे ऐकत नाहीत, सांगितलेली कामे करत नाहीत, अशा तक्रारी केल्या होत्या. तक्रारीची गंभीर दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनी घेऊन लोकप्रतिनिधींची कामे प्राधान्याने करावे, अशी सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. जिल्हा परिषदेत चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष शालिनी विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत बहुतांशी सदस्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...
  September 16, 09:01 AM
 • नगर - तडीपार करूनही शहरात वावरणाऱ्या समाजकंटकांची धरपकड सुरू झाली आहे. शनिवारी सकाळपासूनच अनेक समाजकंटकांच्या घरावर छापे टाकण्यात आले. तडीपार नगरसेवक अरिफ शेख यांच्यासह १० जणांना अटक करण्यात आली. पोलिसांचे अनेक समाजकंटक फरार झाले. मोहरम व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाच हजार समाजकंटकांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. काहींवर जिल्हाबंदी, अनेकांवर शहरबंदी करण्यात आली. चारशे जणांच्या विरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल...
  September 16, 08:55 AM
 • पारनेर (जि. नगर)- जनलाेकपालसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २ अाॅक्टाेबर राेजी दिल्लीत अांदाेलनाचा इशारा दिला अाहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी राळेगणसिद्धीला येऊन त्यांची भेट घेतली अाणि अांदाेलनापासून अण्णांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारची ही शिष्टाई यशस्वी झाली नाही. सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलनाच्या निर्णयावर ठाम असल्याचे अण्णांनी त्यांना सांगितले. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, तसेच...
  September 15, 08:04 AM
 • श्रीरामपूर- युवक काँग्रेसच्या राज्य पातळीपासून तालुका स्तरावरील ४८ पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीस पुण्यापाठोपाठ श्रीरामपुरात गालबोट लागले. गुरुवारी जिल्हा पातळीवरील निकाल जाहीर झाले. नगर येथील कुलदीप भिंगारदिवे हे ५२०० मते मिळवत जिल्हाध्यक्षपदी निवडून आले. ते विखे गटाचे अाहेत. जिल्हा सचिवपदावर अकोले येथील विकास वाकचौरे हे ३०८४ मते घेऊन विराजमान झाले. श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी सर्वाधिक ३०५ मते मिळविणारे सिद्धार्थ फंड हे निवडून आले. शुक्रवारी नागपूर...
  September 14, 11:49 AM
 • राहुरी शहर- अज्ञात वाहनाची धडक बसून राहुरी फॅक्टरी येथील दोन अविवाहित तरुण जागीच ठार झाले. नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी महाविद्यालयापुढे असलेल्या हाॅटेल जगदंबाजवळ बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. योगेश आबासाहेब गवांदे (वय २८, कराळेवाडी, राहुरी फॅक्टरी) व पांडुरंग भागवत तुपे (वय २७, अंबिकानगर, राहुरी फॅक्टरी) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे तरुण स्प्लेंडर मोटरसायकलीवर (एमएच १७ एपी ९४०२) राहुरी फॅक्टरीच्या दिशेने जात होते. पाठीमागून वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाची त्यांना जोराची धडक...
  September 14, 11:39 AM
 • नगर- शहरात यंदा प्रथमच डीजे न लावता पारंपरिक पद्धतीने गणरायाचे स्वागत करण्यात आले. गुरुवारी सकाळपासून विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुका काढून श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. पोलिस व महापालिका प्रशासनाने यंदा नियमांची कठोर अंमलबजावणी केल्याने ध्वनिप्रदूषण आटोक्यात ठेवण्यात काही प्रमाणात यश आले. महापालिकेने परवानगीसाठी आलेल्या ३६० गणेश मंडळांच्या अर्जांची छाननी करून ३५० मंडळांना परवानगी दिली. यापूर्वी नोटिसा बजावलेल्या १० मंडळांना यंदा परवानगी नाकारण्यात आली....
  September 14, 11:29 AM
 • नगर- प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी मंगळवारी दुपारी बुलेटवर स्वार होत वाळूसाठ्यावर छापा टाकला. नगरजवळील नांदगाव शिंगवे, केके रंेज परिसरात सुमारे ५० ब्रासचा वाळूचा साठा आढळून आला. हा साठा महसूल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत कारवाई सुरू केली. प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईची चर्चा सुरू आहे. जिल्ह्यात वाळूतस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अधिकाऱ्यांवर नजर ठेवत व नजराणा देत तस्करी करत होते. लिलावात भाग न घेता वाळूतस्कर चोरीच्या वाळूला पसंती देत मालामाल होत...
  September 13, 12:10 PM
 • श्रीरामपूर- युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीत बोगस मतदानावरून दिवंगत माजी आमदार जयंत ससाणे व आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या गटात चांगलाच वाद झाला. या वादाचे पर्यावसान नंतर मारामारीत झाले. व्यापारी मंगल कार्यालयात ससाणे व कांबळे गटात ही निवडणूक झाली. तालुक्यात ११५० मतदान होते. त्यापैकी ७६३ सदस्यांनी मतदान केले. उपनगराध्यक्ष करण ससाणे हे प्रदेश युवकच्या महासचिवपदासाठी उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात खासदार रजनी पाटील यांच्या चिरंजीवांसह २४...
  September 13, 12:06 PM
 • राहुरी शहर- वाळूचा अमर्याद उपसा, पान्हाड गवताचे उदंड पीक, प्लास्टिक, तसेच इतर कचऱ्यामुळे अशुद्ध झालेल्या मुळा नदीपात्रातील पाण्यात यंदा गणेशमूर्तींचे विसर्जन करणार नाही, असा पवित्रा मंडळांच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. पर्यायी व्यवस्थेबाबत नगरपरिषद प्रशासन कुठला निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. उत्सवाचे पावित्र्य गणेश विसर्जनातदेखील रहावे, या दृष्टिकोनातून मुळा नदीकाठी स्वच्छ पाण्याचा हौद बांधण्याची मागणी पुढे आली आहे. ही जबाबदारी नगर परिषदेची असताना गेल्या...
  September 13, 12:03 PM
 • संगमनेर- हैदराबादेत झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी आराेपींना तेथील न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावल्याचे वृत्त बुधवारी संगमनेर येथे आले. दोघांना झालेली फाशी आणि एकाला झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेमुळे अकरा वर्षांपूर्वी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर निर्माण झालेला थरार आणि अंगावर शहारे आणणाऱ्या त्या सातजणांच्या आठवणींने संगमनेरकर पुन्हा एकदा गहिवरले. येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असणाऱ्या त्या सर्व प्राण गमावलेल्या निरपराध विद्यार्थ्यांचे चलचित्रच...
  September 13, 12:00 PM
 • नगर- शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार होता. पण आता मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत आठवले यांनी तसे स्पष्ट केले. पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदार संघातून आठवले यांनी २००९ मध्ये निवडणूक लढवली होती, पण त्यांचा भाऊसाहेब वाकचौरे यांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये वाकचौरे पराभूत होऊन शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विद्यमान खासदार आहेत. आगामी निवडणुकीत आठवले...
  September 12, 12:05 PM
 • नगर- मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा अाहे. आरक्षण देण्यासाठी मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा कायदा करावा लागणार आहे. पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाले पाहिजेत. राज्य व केंद्र सरकारने कर कमी केले, तर दरही कमी होतील, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आठवले म्हणाले, मराठा आरक्षणाला आमचा पूर्वीपासूनच पाठिंबा आहे. आरक्षण मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी कायदा करावा लागेल. मराठा व दलित वितुष्ट हे समाजाच्या हिताचे नाही. लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना...
  September 12, 11:53 AM
 • श्रीरामपूर- चोरीचे सोने विकत घेणारा सचिन प्रकाश महाले या सराफास शहर पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले. अशोक इराबत्ती यांच्या घरातून चोरीस गेलेले सोने त्याने विकत घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. महालेचे मुख्य रस्त्यावर पोपट भगीरथ महाले नावाचे दुकान आहे. इराबत्ती यांच्या घरातून चोरी झाल्यानंतर आठ दिवसांत पोलिसांनी सलिम आयूब शेख, नितीन आवारे, अक्षय ऊर्फ भांग्या बाळू जाधव या आरोपींना पकडले. इराबत्ती यांच्या घरातून...
  September 11, 12:00 PM
 • नगर- प्रदेश पातळीवर निर्णय होऊनसुद्धा भाजपतील पक्षांतर्गत मतभेद मिटण्याची कुठलीही शक्यता न उरल्याने महापालिकेच्या आगामी निवडणुकीत जुने, निष्ठावान कार्यकर्ते नरेंद्र मोदी विचार मंचची पताका आपल्या खांद्यावर घेण्याच्या तयारीत असून हा नवा मंच शिवसेनेबरोबर युती करण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीतील वातावरण चांगलेच तापणार आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये धुमसत असलेला असंतोष मिटवण्यासाठी गांधी आणि आगरकर गटात समेट घडवून यावा, म्हणून प्रदेश भाजपने मुंबईत बैठक...
  September 11, 11:53 AM
 
जाहिरात

RECOMMENDED