जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • पारनेर -नगर जिल्ह्यातील निघोज येथील कथित ऑनर किलिंगचे जळीतकांड रोज नवनवे वळण घेत आहे. वडील, काका आणि मामा यांनीच आम्हाला पेटवून दिले, असा जबाब देण्यासाठी मंगेशने रुग्ण्वाहिकेत जखमी अवस्थेत असलेल्या रुक्मिणीला दमदाटी केल्याचे समोर आले आहे. घटनेच्या ४-५ दिवसांपूर्वीच मंगेशने तिला मारहाण केली होती. शिवाय जळीतकांडात मंगेशला मदत करणारे आणखी काही जण असल्याचा निष्कर्ष पोलिसांना काढला असून पथके त्यांच्या मागावर आहेत. दरम्यान, गुरुवारी या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आणि मृत रुक्मिणीचा ६...
  May 10, 09:40 AM
 • शिर्डी -राज्यभरातून हजारोंच्या संख्येने आलेल्या वऱ्हाडी मंडळींसाठी मिष्टान्नांचे जेवण, वधू-वरांची रथांतून निघालेली भव्य वरात, जोडप्यांना लागणाऱ्या सर्व संसारोपयोगी वस्तूंची भेट तसेच संत-महंतांच्या उपस्थितीत शिर्डीत साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित १८ वा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. या साेहळ्यात यंदा ५५ जोडपी विवाहबद्ध झाली. मात्र, १८ वर्षांत १८५० जोडप्यांचे सामुदायिक लग्न लावून या उपक्रमाने जागतिक विक्रम नोंदवला. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड...
  May 9, 09:55 AM
 • निघोज - पारनेर तालुक्यातील निघोज येथील जळीतकांडातील युवतीचा पती मंगेश रणसिंगभोवतीचा फास आवळत चालला अाहे. त्याच्याविरोधात भक्कम पुरावे मिळवण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. बुधवारी दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षक इशू सिंधू, उपअधीक्षक सागर पाटील व मनीष कलवानिया यांनी घर व परिसराची पाहणी केली. मृत रुक्मिणीचे भाऊ, घटनेनंतर दरवाजा तोडणारी व्यक्ती आणि पेटलेल्या मंगेश व रुक्मिणीला मदत करणाऱ्या व्यक्तीचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत. दरम्यान, मंगेशला पेट्रोल आणताना पाहणाऱ्या सलमानचाही जबाब...
  May 9, 09:19 AM
 • पारनेर -पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडलेल्या ऑनर किलिंग प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता अाहे. पोलिस चौकशीत सकृतदर्शनी पती मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुक्मिणीला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे समोर येत आहे. पेटलेल्या रुक्मिणीने मंगेशला मिठी मारल्याने तोही ४० टक्के भाजला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक मनीष कलवानिया, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी घटनास्थळाला भेट देऊन घराचा दरवाजा तोडणाऱ्या व्यक्तींकडे, रुक्मिणीच्या लहान...
  May 8, 08:45 AM
 • अहमदनगर- जिल्ह्यातील निघोज गावात सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती घडली आहे. मुलीने दुसऱ्या जातीतल्या मुलाशी लग्न केल्यामुळे कुटुंबीयांनी मुलगी आणि जावयाला पेटवून दिले. या घटनेनंतर जखमी पती-पत्नीवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. दुर्दैवी गोष्ट म्हणजे, ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती होती. सहा महिन्यांपूर्वी मंगेश रणसिंह आणि रुक्मिणीचे लग्न झाले होते. लग्नाला मुलीचे वडील, काका आणि मामाचा विरोध होता. लग्नाच्या 6 महिन्यानंतर पती-पत्नीचे...
  May 6, 11:53 AM
 • संगमनेर -काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारची सभा संपल्यानंतर संगमनेरमध्ये मुक्काम करत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पाहुणचार घेतला. शनिवारी सकाळी सव्वादहा वाजता गांधी हेलिकॉप्टरने नाशिकला गेले. आमदार बाळासाहेब थोरात त्यांच्यासोबत होते. तेथून विमानाने ते दिल्लीला रवाना झाले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणावरून गांधी यांचा संगमनेरातील मुक्काम गोपनीय ठेवला गेला. शिर्डी लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे...
  April 28, 10:54 AM
 • शिंगणापूर -मुलीने इच्छेविरुद्ध आंतरजातीय विवाह केल्याने आई-वडिलांनीच मुलीचा खून केल्याची घटना नेवासे तालुक्यातील कौठा या गावी उघडकीस आली. प्रतिभा कोठावले (२४) असे या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. काही दिवसांपूर्वी संगमनेर येथील देवेंद्र कोठावले या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची प्रतिभाशी ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. त्यांचे काही दिवसांपूर्वी लग्नही झाले होते. मुलगा परजातीचा असल्याने मुलीच्या घरच्यांचा लग्नाला...
  April 28, 09:33 AM
 • शिर्डी - नगरची जागा काँग्रेसला सुटल्यास पक्षाचा एक खासदार वाढेल म्हणून मी जिवाचे रान करीत हाेताे. त्याच वेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधी मात्र सुजयने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याचा सल्ला देत होते. राष्ट्रवादीकडून आम्ही निवडणूक लढवली असती तर ती राजकीय आत्महत्याच ठरली असती, अशा शब्दांत माजी विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षावर नाराजीचे कारण शनिवारी जाहीरपणे सांगितले. विधानसभेच्या विराेधी पक्षनेतेपदाचा महिनाभरापूर्वीच राजीनामा पक्षाकडे दिला असल्याचेही...
  April 28, 09:17 AM
 • अहमदनगर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी एका सभेला संबोधित करताना अचानक व्यासपीठ सोडून बाजूला बसले. प्रचार सभेत उन्हाच्या तडाख्याने त्यांना भोवळ आली. शिर्डीत भाजपच्या प्रचार सभेला संबोधित करताना ते डाएस्कवरून बोलत होते. त्याचवेळी बोलता-बोलता त्यांनी आपले भाषण थांबवले आणि डोळे वर केले. तरीही स्वतःला सांभाळून त्यांनी माइक सोडला आणि खुर्चीवर येऊन बसले. यानंतर त्यांना पाणी आणि औषध देऊन उपचार आणि विश्रांतीसाठी नेण्यात आले. गडकरींना स्टेजवर चक्कर येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी...
  April 27, 05:17 PM
 • अहमदनगर - काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर आपल्या नाराजीचे कारण जाहीर केले. त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला घरचा आहेर दिला. त्यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला. तसेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. परंतु, काँग्रेस पक्ष सोडण्यावर त्यांनी कुठलेही स्पष्ट विधान केले नाही. काँग्रेसला अहमदनगरची जागा सोडण्यात यावी असा आपला आग्रह होता. असे म्हणताना त्यांनी आपल्या नाराजीसाठी थेट काँग्रेस अध्यक्ष...
  April 27, 04:47 PM
 • शिर्डी -नगरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडली नसल्याने नाराज असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दोन महिन्यांपूर्वीच पक्षाध्यक्ष राहुल गांधींकडे सोपवला होता. पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विखे पाटील यांनी दिलेला विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षाने स्वीकारला असला तरी त्यांनी पक्ष सोडलेला नाही, ते पक्षातच आहेत. बंडखोरीबाबतचा प्रश्न एका जिल्ह्यापुरता मर्यादित असल्याने शिर्डीतल्या जागेबाबत विखे पाटलांनी लक्ष...
  April 26, 09:26 AM
 • अहमदनगर- काँग्रेसला अहमदनगर जिल्ह्यात ऐननिवडणुकीच्या तोंडावर मोठे ग्रहण लागले आहे. पक्षाचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिलाय, तर नगरचे जिल्हाध्यक्ष करण ससाने यांनीही पदाचा राजीनामा दिला. दोघांचाही राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची उद्या शिर्डी मतदारसंघासाठी संगमनेरमध्ये सभा आहे, त्यापूर्वीच काँग्रेसला हे दोन मोठे धक्के बसले आहेत....
  April 25, 07:14 PM
 • अहमदनगर- विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आज शिर्डीमध्य आपली पुढील राजकीय भुमिका स्पष्ट करणार आहेत. पण त्याआधीपासूनच ते येथील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. शिर्डीमध्ये बुधवारी जयंत ससाणे यांच्या समर्थकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी शुक्रवारी त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. आपण निर्णायक वळणावर आलो असून, जो काही निर्णय होईल त्यात आपण सर्वजण बरोबर रहावे, असे अवाहन विखे पाटील यांनी...
  April 25, 12:52 PM
 • पारनेर -नगर-कल्याण महामार्गावर टाकळी ढोकेश्वर येथील गायकवाड वस्ती वळणाजवळ क्रेनला दुचाकीस्वार आडवा आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नांत दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. मंगळवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत तिन्ही वाहनांतील ५ जण जखमी झाले. यात औरंगाबादच्या दोघांचा समावेश आहे. औरंगाबाद येथील अरुण विठ्ठल वानखडे (२६) व रोशन शिंदे (शिवाजीनगर) हे मुंबईकडे जात होते. परंतु, दुचाकीला वाचवण्याच्या नादात क्रेनने थेट त्यांच्या कारलाच समोरून धडक दिली. यात दुचाकीस्वार दोघे,...
  April 24, 10:35 AM
 • संगमनेर - पाच वर्षे सरकारशी थोडेफार संघर्ष झाले असले तरी आम्ही भाजपशी रोखठोक आणि जाहीरपणे युती केली आहे. ही युती देव, देश आणि धर्मासाठी केली. ती केवळ खुर्चीसाठी केलेली नाही. आम्हाला नेहमी पाकिस्तानची भीती दाखवली जाते. मात्र आमच्याकडील अण्वस्त्रे ही दिवाळीसाठी नाहीत, असे पाकिस्तानला ठणकावून सांगणारा पंतप्रधान आम्हाला मिळाला. महायुतीला बहुमत मिळणार असून पंतप्रधानपदी मोदीच आरूढ होतील, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील...
  April 23, 09:58 AM
 • अहमदनगर -लोकसभेच्या तिकिटासाठी काँग्रेसमधून भाजपत आलेले डॉ. सुजय विखे की, राष्ट्रवादी काँग्रेसमधून बडतर्फ होता होता वाचलेले आणि अचानक पक्षाकडून लोकसभेचे तिकीट मिळालेले अामदार संग्राम जगताप..! अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार नेमके कोण? या एकाच प्रश्नाभोवती गेले काही दिवस गुंफत गेलेल्या चर्चेच्या फेऱ्या आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. राज्यातील विरोधी पक्षनेत्याच्या मुलालाच भाजपने तिकीट दिल्यामुळे देशपातळीवर चर्चेत आलेला हा मतदारसंघ प्रत्यक्ष प्रचाराच्या युद्धात...
  April 22, 10:10 AM
 • नाशिक -कोरेगाव भीमा हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चार महिन्यांसाठी नेमलेल्या आयोगाने गेेल्या चौदा महिन्यांत फक्त चार साक्षी पूर्ण केल्या आहेत. आयोगास आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही ५०२ साक्षी बाकी आहेत. ८ मे पर्यंत आयोगाचे कामकाज कसे पूर्ण होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हिंसाचाराची कारणमीमांसा, जबाबदारी निश्चिती आणि भविष्यात अशी घडना घडू नये यासाठीची उपाययोजना सुचवण्यासाठी या आयोगाची नियुक्ती केली होती. आयोगापुढे सध्या इतिहासाची चौकशी...
  April 21, 09:44 AM
 • शिर्डी - सध्या प्रदर्शनापूर्वीच वादात सापडलेल्या पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचा हीरो विवेक ओबेरॉय याने शनिवारी श्री साईसमाधीचे दर्शन घेतले. प्रचारकाळात हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. त्यासाठी साईचरणी आशीर्वाद मागायला आलो असल्याचे विवेकने माध्यमांशी बोलताना सांगितले. या वेळी दिग्दर्शक संदीप सिंग, मनीष आचार्य आदी उपस्थित होते. विवेक ओबेरॉय म्हणतो... विरोधकांनीही हा चित्रपट पहावा. मी राज ठाकरेंनाही यासाठी...
  April 21, 09:27 AM
 • श्रीगोंदे -देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यातच प्रचार आणि अन्य बाबींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. तर, दुसरीकडे कर्जबाजारीपणा आणि दुष्काळाच्या जीवघेण्या संकटामुळे बळीराजाला आपल्या मुला-मुलीचे लग्न करणे अवघड झाले आहे. चक्क जनावरांच्या चारा छावणीत लग्न लावण्याची वेळ एका पित्यावर आली. श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण येथील जनावरांच्या चारा छावणीत गुरुवारी दुपारी रखरखत्या उन्हात हा विवाह झाला. अनेक अडचणी असूनही वऱ्हाडींसह यास लग्नाला उपस्थित झालेल्या...
  April 20, 10:59 AM
 • शिर्डी -शिर्डी लोकसभा निवडणुकीत शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवत असल्याने तसेच पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी केली होती. गोंदकर यांच्या मागणीची तातडीने दखल घेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वाकचौरे यांची पक्षातून हकालपट्टी केली. रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या...
  April 18, 09:51 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात