Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • नगर- बंदी असतानाही शहरात राजरोसपणे प्रवेश करणाऱ्या अवजड वाहतुकीने गुरुवारी सकाळी महाविद्यालयीन तरुणीसह एका वृध्दाचा बळी घेतला. नगर-पुणे महामार्गावरील केडगाव येथे गुरुवारी सकाळी ही घटना घडली. अवजड वाहतुकीने वर्षभरात २४ जणांचा बळी घेतला आहे. वाहतूक पोलिसांकडून अभय मिळत असल्यामुळेच ही अवजड वाहने राजरोसपणे शहरातून प्रवेश करत आहेत. केडगाव येथे एकापाठोपाठ घडलेल्या दोन अपघातांमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे ५ च्या सुमारास केडगाव येथील कल्याण विठोबा अनभुले (६१) यांना केडगाव...
  October 12, 11:59 AM
 • बोधेगाव- कॉ. आबासाहेब काकडे यांनी आयुष्यभर वैचारिक तत्त्वे, निष्ठा याची कास धरत समाजविधायक कामांचा पाठपुरावा केला. लढा देऊनही परिसरासाठीच्या शाश्वत पाण्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असला, तरी शिक्षणाची गंगा आणल्याने एक नवी सुशिक्षित पिढी उभी राहिली आहे. दरम्यान, चाळीस वर्षांपूर्वीपासून जैसे थेच असलेल्या ताजनापूर व कोपरे धरण या जिव्हाव्याच्या भविष्याच्या लढ्याने आता जोर धरावा, अशी अपेक्षा व्याख्याते तथा कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानगुडे यांनी व्यक्त केली. कॉ....
  October 12, 11:47 AM
 • शेवगाव- तालुक्यातील शहर टाकळी येथील ऊस उत्पादक शेतकरी सीताराम किसान पुंडकर यांनी स्वतःच्या व शेतकऱ्यांच्या ऊस पिकाच्या फरकाच्या पेमेंटसाठी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झालेल्या फसवणुकीविरोधात हनुमान मारुती मंदिरात उपोषण सुरू केले. पुंडकर हे ज्ञानेश्वर कारखाना भेंडा कारखान्याचे सभासद असूनही त्यांना देऊ केलेले पेमेंट २१०० व त्यावरील फरकाची रक्कम ४०० असे एकूण २५०० नुसार ठरल्यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम देण्याची कबुली ज्ञानेश्वर कारखाना भेंडा यांनी प्रसिद्ध पत्रकात केली...
  October 12, 08:14 AM
 • पाथर्डी- नवरात्राेत्सवानिमित्त मोहटा देवस्थानमध्ये वेदमंत्रोचारांसह देवीच्या जयघोषात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. हजारो भाविक रात्रभर अनवाणी पायाने चालत गडावर पोहोचले. दिवसभर शेकडो मशाली देवीसमोर पेटवून राज्यभर मार्गस्थ झाल्या. देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोक भिल्लारे व अस्मिता भिल्लारे यांच्या हस्ते व सर्व विश्वस्तांच्या उपस्थितीत महापूजा, अभिषेक करण्यात आला. नारायण देव बाबा देव, राजू देव, भूषण देव यांनी पौराेहित्य केले. सुमारे दोन हजार महिला...
  October 11, 12:03 PM
 • जामखेड- शहरातील खर्डा चौक ते तपनेश्वर रोड स्मशानभूमी या रस्त्यावरील २६, बाजारतळावरील २४ अनधिकृत टपऱ्यांवर बुधवारी अतिक्रमण विरोधी पथकाने हटवली. विशेष म्हणजे ४० वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात असलेले हुतात्मा स्मारक व ध्वजस्तंभ मोकळे झाले. अतिक्रमण काढत असताना भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोजमाप करताना दुजाभाव केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, असे असताना प्रथमच शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. अमरधाम रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यासाठी...
  October 11, 11:59 AM
 • नेवासे- नेवासा पोलिस स्टेशनचे न्यायालयीन कोठडीचे कारागृहाची भिंत फोडून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना नेवासे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. निवारे यांनी दोन वर्षांची कैदेची शिक्षा दिली आहे. राजीव गांधी झोपडपट्टी कर्जत येथील देविदास दिव्या भोसले वय वर्षे साठ व त्याची मुले नुरा देविदास भोसले वय वर्षे २७ आणि नवनाथ ऊर्फ अंड्या देविदास भोसले वय वर्षे २५ या तिघांना नेवासे पोलिसांनी विवेकानंद नगर कॉलनीमधील सोनवणे हत्या कांडप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेतले होते....
  October 10, 11:18 AM
 • नगर- आमदार शिवाजी कर्डिले मंत्री व्हावेत, त्यांच्या नावाला माझा विरोध असण्याचे काहीच कारण नाही, उलट त्यांच्या मंत्रिपदासाठी माझेही प्रयत्न राहतील, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. दानवे यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, अक्षय कर्डिले, शिवाजी चव्हाण, नंदकुमार लोखंडे, खळेकर महाराज, काशिनाथ खुळे, प्रभाकर...
  October 10, 11:12 AM
 • अाैरंगाबाद- शिर्डीतील श्री साईबाबा देवस्थानचे विश्वस्त मंडळ नियुक्त करताना राज्य सरकारला गुन्हा दाखल नसलेला एकही विश्वस्त देशभरात सापडला नाही का? असा परखड सवाल सर्वाेच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला विचारला. तसेच यापूर्वी अाैरंगाबाद खंडपीठाने ठरवून दिलेल्या निकषानुसारच अाता सहा अाठवड्यांत विश्वस्त मंडळ नियुक्तीचा फेरविचार करावा, असे अादेशही सरन्यायाधीश रंजन गाेगाेई, न्यायमूर्ती एस. के. कौल व न्या के. एल. जोसेफ यांच्या पीठाने राज्य सरकारला दिले अाहेत. शिर्डी संस्थानवरील...
  October 10, 10:04 AM
 • जाफराबाद- घरकुलचे सर्वेक्षण होणार असल्यामुळे पुणे येथून दुचाकीवरून येताना नगर जिल्ह्यातील नेवासा फाट्याजवळ क्रूझर गाडीने दिलेल्या धडकेत जाफराबाद तालुक्यातील टाकळी गावातील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. राजू रखमाजी बागल (२३), विकास रखमाजी बागल (२०) अशी मृतांची नावे आहेत. जाफराबाद तालुक्यातील टाकळी येथील राजू बागल, विकास बागल हे दोघेही भाऊ पुणे येथे कंपनीत नोकरीस होते. यामुळे हे दोघेही भाऊ पुणे येथे राहत होते. दोघांचेही लग्न झालेले असून त्यांच्या...
  October 10, 10:04 AM
 • राहाता - शरीरसुखाची मागणी पूर्ण केली नाही, म्हणून चुलत सासऱ्याने सुनेवर धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. नंतर स्वत: विहिरीत उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना राहाता तालुक्यातील केलवड येथे सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. यातील महिला गंभीर जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. दोघांवरही लोणी येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी आरोपी...
  October 9, 11:19 AM
 • नगर - निवडणुकांना अजून सहा महिन्यांचा अवधी आहे. फक्त दोन महिने थांबा. राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांना गळती लागणार आहे, असे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. समविचारी पक्षांबरोबर निवडणुका लढवण्याची आमची तयारी आहे; परंतु त्यांची तशी तयारी नसेल तर आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत, असेही त्यांनी शिवसेनेचा नामोल्लेख न करता स्पष्ट केले. दानवेंनी सोमवारी दिव्य मराठीच्या नगर कार्यालयाला भेट दिली. या वेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी उपस्थित...
  October 9, 10:35 AM
 • पाथर्डी- बुधवारपासून (१० ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोउत्सवाची मोहटा देवस्थानकडून तयारी पूर्ण झाली आहे. यंदा पाण्याची तीव्र टंचाई जाणवत अाहे. प्रशासनाने यात्रा कालावधीत टँकरने पाणीपुरवठा करावा, असे प्रयत्न सुरू आहेत. परिसरात पाण्याचे उद्भव कुठेही नाहीत. सुमारे पाच लाख लिटर दैनंदिन पाण्याची गरज अाहे. ही गरज भागली, तरच भाविकांची तहान भागेल. यंदाचा नवरात्र उत्सव पाणीटंचाईच्या िवळख्यात सापडल्याने मोहटा देवस्थान समितीपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, यंदा हेल्पलाइन...
  October 8, 11:33 AM
 • नाशिक/ शिर्डी- शिर्डीच्या श्री साईबाबांच्या चरणी जगभरातील भाविक रोज अडीच टन फुले-हार अर्पण करतात. याची विल्हेवाट कशी लावायची ही समस्या हाेती. मात्र, अाज याच फुलांचा सुगंध घरोघर दरवळत अाहे. या निर्माल्यापासून साई द्वारकामाई या नावाने रोज ४० हजार अगरबत्त्यांची निर्मिती होत असून ४०० महिलांना राेजगार व संस्थानला उत्पन्न मिळत अाहे. देशातील हा पहिला प्रयोग अादर्श ठरणारा अाहे. साईंना अर्पण हाेणाऱ्या फुलांमध्ये प्रामुख्याने झेंडू अाणि गुुलाबाचा समावेश असताे. साई समाधीवर वाहिलेल्या या...
  October 8, 11:27 AM
 • नगर- जिल्ह्यातील ८६९८ शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टीम-एचव्हीडीएस) वीजजोड देण्याचे आदेश संबंधित ठेकेदारांना देण्यात आले आहेत. यासाठी १२८ कोटी ४२ लाख खर्च येणार आहे. मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून जोडणी प्रलंबित असलेल्या कृषिपंपाना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे जोडणी देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील ११६७५ शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरणने राबवलेल्या निविदा प्रक्रियेत १२८ कोटी ४२...
  October 8, 11:27 AM
 • यावल- लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पत्नीच्या नावावर शेती लावण्यासाठी अर्जदाराकडून १५ हजार रुपयांची लाच मागितल्याने, यावल तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनास शुक्रवारी सायंकाळी एसीबीने जेरबंद केले. विजय पुंडलिक पाटील असे संशयित अव्वल कारकुनाचे नाव आहे. गुरुवारी फैजपूर प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदारांवर एसीबीची कारवाई झाली होती. दुसऱ्या दिवशी कारवाई झाल्याने खळबळ उडाली. तालुक्यातील टेंभी शिवारात यावल शहरातील तक्रारदाराची शेती आहे. गट क्रमांक ५३/२ मधील २.२३ हे.आर.क्षेत्र लक्ष्मी...
  October 6, 10:22 AM
 • पाथर्डी- शाळाबाह्य मुलाने पैज जिंकण्यासाठी वर्गात जाऊन एका विद्यार्थिनीचे चुंबन घेतले. हा प्रकार नगर जिल्ह्यातील भालगाव (ता. पाथर्डी) येथे गुरुवारी सायंकाळी घडला. शुक्रवारी पालकांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर मुख्याध्यापक तुकाराम म्हस्के यांनी पाेलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले. गुरुवारी गावातील अाेट्यावर मुलांचे टाेळके बसले हाेते. त्यांच्यात वर्गात जाऊन मुलीचे चुंबन घेण्याची पैज लागली. यापैकी एका उनाड मुलाने वर्गात जात मुलामुलींसमोर एका मुलीचे जबरदस्तीने...
  October 6, 07:15 AM
 • अंबाजोगाई- परळी येथील संत जगमित्र सूतगिरणी प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या संपत्ती जप्तीबाबत ५ सप्टेंबरला दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीस अंबाजोगाई न्यायालयाने स्थगिती दिली आहे. अंबाजोगाई येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी अर्जात नमूद केलेली सूतगिरणी व संचालकांची मालमत्ता विक्री करता येणार नाही, गहाण खत करता येणार नाही किंवा त्यावर बोजाही चढवता येणार नाही असा निकाल दिला होता. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथील याच कोर्टात...
  October 5, 10:49 AM
 • शिर्डी- शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या साेयीसाठी संस्थानकडून ११० काेटींचा दर्शनरांगेचा प्रकल्प उभारण्यात येणार अाहे. येत्या वर्षभरात पूर्ण हाेईल. त्यामुळे एक तासात दर्शनाची साेय हाेणार अाहे. विमानतळाच्या धर्तीवर सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या दुमजली दर्शनरांगेसाठी निविदा काढण्यात अाल्या असून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते भूमिपूजन हाेणार अाहे. तब्बल २० हजार चाैरस मीटरवर हा प्रकल्प साकारला जाईल. यात दाेन्ही मजल्यांवर मिळून एका वेळेस २४ हजार भाविक...
  October 5, 07:26 AM
 • संगमनेर- स्वच्छ भारत अभियानाचे आवाहन आपल्यासाठी नसून देशातील सामान्य जनतेसाठी असल्याचा साक्षात्कार सरकारी साहेबांना झाला आहे. सरकारी अधिकारीच या अभियानाप्रती उदासीन असल्याचे दिसून आले. महावितरणचे संगमनेरातील कार्यालयदेखील याला अपवाद नसल्याचे दिव्यमराठीच्या पाहणीत आढळले. कार्यालयाच्या परिसरातच भंगार सामान अस्ताव्यस्त टाकण्यात आले असून अनेक ठिकाणी वाढलेल्या गवत, झुडपात हे भंगार हरवून गेले असून यातुन आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पंतप्रधान...
  October 4, 11:21 AM
 • नगर- काँग्रेसच्या सत्ताकाळात क्रूड ऑईलची किंमत आतापेक्षा अधिक असतानाही पेट्रोलचे दर कमी होते. कर कपात करून पेट्रोलचे दर किमान २५ रुपये प्रतिलिटरने कमी करता येतील. मात्र, सरकार याचा विचार करत नाही. सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा गळा घोटण्याचे काम हे सरकार करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्याचबरोबर आपल्या विचारांच्या माणसांना शंभर खून माफ अशीच भूमिका या सरकारची अाहे, अशी टीकाही त्यांनी केली. युवा संवाद यात्रेच्या निमित्त जिल्हा दौऱ्यावर असताना...
  October 4, 11:16 AM
 
जाहिरात

RECOMMENDED