Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • शिर्डी- शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या साेयीसाठी संस्थानकडून ११० काेटींचा दर्शनरांगेचा प्रकल्प उभारण्यात येणार अाहे. येत्या वर्षभरात पूर्ण हाेईल. त्यामुळे एक तासात दर्शनाची साेय हाेणार अाहे. विमानतळाच्या धर्तीवर सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या दुमजली दर्शनरांगेसाठी निविदा काढण्यात अाल्या असून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते भूमिपूजन हाेणार अाहे. तब्बल २० हजार चाैरस मीटरवर हा प्रकल्प साकारला जाईल. यात दाेन्ही मजल्यांवर मिळून एका वेळेस २४ हजार भाविक...
  October 5, 07:26 AM
 • संगमनेर- स्वच्छ भारत अभियानाचे आवाहन आपल्यासाठी नसून देशातील सामान्य जनतेसाठी असल्याचा साक्षात्कार सरकारी साहेबांना झाला आहे. सरकारी अधिकारीच या अभियानाप्रती उदासीन असल्याचे दिसून आले. महावितरणचे संगमनेरातील कार्यालयदेखील याला अपवाद नसल्याचे दिव्यमराठीच्या पाहणीत आढळले. कार्यालयाच्या परिसरातच भंगार सामान अस्ताव्यस्त टाकण्यात आले असून अनेक ठिकाणी वाढलेल्या गवत, झुडपात हे भंगार हरवून गेले असून यातुन आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पंतप्रधान...
  October 4, 11:21 AM
 • नगर- काँग्रेसच्या सत्ताकाळात क्रूड ऑईलची किंमत आतापेक्षा अधिक असतानाही पेट्रोलचे दर कमी होते. कर कपात करून पेट्रोलचे दर किमान २५ रुपये प्रतिलिटरने कमी करता येतील. मात्र, सरकार याचा विचार करत नाही. सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा गळा घोटण्याचे काम हे सरकार करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्याचबरोबर आपल्या विचारांच्या माणसांना शंभर खून माफ अशीच भूमिका या सरकारची अाहे, अशी टीकाही त्यांनी केली. युवा संवाद यात्रेच्या निमित्त जिल्हा दौऱ्यावर असताना...
  October 4, 11:16 AM
 • श्रीगोंदे- चिखलठाणवाडी येथील रुपाली बिराजी टेंगले ही पतीच्या परस्पर न विचारता माहेरी जाऊन आईवडिलांना बरोबर घेऊन एका खासगी हॉस्पिटलमध्ये आठ महिन्यांचा गर्भपात केला. या विरोधात पती बिराजी संभाजी टेंगले (२७) यांनी आपली पत्नी रुपालीसह सासरकडील सात व्यक्तींविरोधात श्रीगोंदे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तालुक्यातील चिखलठाणवाडी येथील रुपाली गरोदर होती. घरात झालेल्या वादामुळे ती कोणालाही न सांगता माहेरी निघून गेली. पाहुणे मंडळी प्रतिष्ठित मंडळींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न...
  October 3, 11:00 AM
 • पारनेर- सरकारने अनेक मागण्यांवर सकारात्मक पावले टाकली आहेत. काही अंशी मागण्या मान्य झाल्या आहेत. मात्र, काही आश्वासने कागदावरच आहेत. सरकार आपल्या देशाचे आहे. ते काही इंग्रज नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारपासून सुरू होणारे उपोषण स्थगित केले. मात्र, राहिलेल्या मागण्या मान्य न झाल्यास महात्मा गांधी पुण्यतिथीपासून (३० जानेवारी) पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला. काय म्हणाले गिरीश महाजन.....
  October 3, 07:49 AM
 • शिर्डी- श्री साई समाधी शताब्दी सांगता सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ ऑक्टोबर रोजी शिर्डीच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्यासह राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती असेल. यानिमित्ताने शिर्डीतील साईच्या दर्शनाची रांग, शैक्षणिक संकुल, साई सृष्टी व दहा मेगावॅटच्या सोलार प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हाेणार अाहे.
  October 3, 07:43 AM
 • नगर -उद्योजकांना कर्ज दिल्याने देशभरातील बँका अार्थिक संकटात सापडल्या, बँकांची ही हानी भरून काढण्यासाठीच भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या नावाने ८१ हजार कोटींचे कर्ज माफ केले. असे असतानाही या बँका शेतकऱ्यांकडे ढुंकूनही पहायला तयार नाहीत, त्यांच्याकडून केवळ उद्योजकांनाच कर्ज मिळते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला. मोदी सरकारला मन की बात कळते, परंतु जन की बात मात्र अद्याप कळली नसल्याचा टोलाही पवार यांनी लगावला. बीड येथील मेळावा आटोपून एका कार्यक्रमानिमित्त पवार...
  October 2, 11:39 AM
 • पाथर्डी -मंत्री किंवा खासदारांपेक्षाही आपण तोडणी कामगारांचे नेतृत्व महत्त्वाचे मानतो. येत्या दोन दिवसांत तोडणी कामगाराच्या दरवाढीसह अन्य मागण्यांबाबत साखरसंघ मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक अाहे. संप टळावा, असा प्रयत्न राहील. मात्र, संप झालाच, तर शब्दाची धार कोयत्याला येऊन राज्य हादरून जाईल, असा इशारा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला. तालुक्यातील खरवंडी कासार येथे आयोजित तोडणी कामगार व मुकादमाच्या मेळाव्यात पुढे त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मोनिका राजळे या होत्या, तर प्रमुख...
  October 2, 11:38 AM
 • नगर - लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती, शेतकऱ्यांच्या समस्या अादी मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे मंगळवारी (२ ऑक्टोबर) महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून राळेगणसिद्धीतील उपोषणास बसणार अाहेत. दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे तिसऱ्यांदा हजारे यांची मनधरणी करण्यासाठी राळेगणमध्ये सोमवारी सायंकाळी येणार होते, परंतु त्यांच्या विमानाचे जळगाव येथून उड्डाण होऊ न शकल्याने त्यांच्या दौरा बारगळला. अाता मंगळवारी सकाळी आठ वाजता ते हजारे यांच्या भेटीसाठी येत अाहेत. २३ ते...
  October 2, 08:48 AM
 • राहाता- देशातील खासदार आणि आमदार तुमचे-आमचे दुश्मन आहेत, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांचा नंबर एकचा शत्रू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना धोरण ठरवणारे खासदर आणि आमदार हेच जबाबदार आहेत. यांच्या विरोधात रान उठवण्याची वेळ आता आली अाहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी राहाता येथे रविवारी आयोजित शेतकरी परिषदेत पाटील बोलत होते. ज्येष्ठ नेते लक्षमणराव वडले, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, शिवाजीराव नांदखिले,...
  October 1, 12:00 PM
 • नगर- आपल्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या असतात. त्या ठराविक वेळी जेवायला मिळालं नाही, तर लगेचच त्याचे परिणामही दिसतातच. कोणाला चक्कर येते, डोकं दुखायला लागतं, अॅसिडिटी वाढते. आपण अस्वस्थ होऊन जातो आणि त्याच वेळेला सगळे सल्ले द्यायला लागतात, जेवणाची वेळ चुकवू नको रे बाबा.., पण राळेगणसिद्धीचे संत, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, वयाच्या ८१ व्या वर्षात सुद्धा अनिश्चित काळासाठी उपोषण करण्याची तयारी दर्शवतात; तेंव्हा नक्कीच आश्चर्य वाटायला लागतं.. आताही लोकपाल नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा,...
  October 1, 11:51 AM
 • शिर्डी- सरकारतर्फे राज्यातील आदिवासी समाजाला डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत वनजमीनपट्टे देण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिर्डीत अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमातर्फे आयोजित अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, आदिवासी क्षेत्रात विविध विकासकामांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला सक्षम बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पेसा कायदा लागू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले असून त्यानुसार ५ टक्के निधी थेट...
  October 1, 07:50 AM
 • अकोले- जयसिंगपूर येथे २७ ऑक्टोबरला होणाऱ्या शेतकरी परिषदेत गळिताला येणाऱ्या उसाचा भाव निश्चित करण्यात येईल. जोपर्यंत आम्ही भाव निश्चित करत नाही, तोपर्यंत शेतकरी आपल्या उसाचे एक कांडेही साखर कारखान्याला जाऊ देणार नाहीत, असा ठराव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी ऊस व दूध परिषदेत मांडला. उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावत त्याला संमती देत ठरावाची अंमलबजावणी नगर जिल्ह्यातही करण्याचा निर्णय घेतला. साखरसम्राटांना ऊस उत्पादक शेतकरी हादरवून सोडतील, असा...
  September 29, 11:45 AM
 • औरंगाबाद- प्रवरा धरणातून पाणीपुरवठा योजना कोपरगाव नगर परिषदेसाठी असताना निळवंडेतून नवीन योजनेचा अट्टाहास कशासाठी? त्यांच्यासाठी या धरणातील पाणी राखीव असताना त्याचा निम्मादेखील वापर केला जात नाही. त्यामुळे निळवंडेतील योजना मंजूर करू नये अशा आषयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. मनीष पितळे यांनी प्रतिवादी राज्याच्या जलसंपदा आणि विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, राज्याचे मुख्य सचिव,...
  September 29, 11:42 AM
 • नगर- ऑनलाइन औषध विक्री व ई-पोर्टलच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यातील औषध विक्रेत्यांनी बंद पाळला. यात जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी सहभाग घेतला. ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ नगर जिल्हा, नगर तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून तेथे निषेध सभा घेतली. निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन दिले. दरम्यान, प्रशासनाने पूर्वकाळजी घेत नियोजन केल्यामुळे औषधावाचून रुग्णांचे हाल झाले नाहीत. केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष...
  September 29, 11:34 AM
 • नगर- फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून नावे असलेल्या शहर सहकारी बँकेच्या संचालकांना तूर्तास अटक होणार नसल्याचे संकेत पोलिसांकडून मिळाले आहेत. तपासादरम्यान चौकशीसाठी आवश्यक असलेले कागदपत्र सादर करण्यासाठी बोलावू तेव्हा हजर होण्याच्या नोटिसा संचालकांना बजावण्यात आल्या आहेत. त्यास संचालकांनी होकार दिला असल्याने त्यांच्यावरील अटकेची कारवाई तूर्तास टळली आहे. एम्स हॉस्पिटलचा प्रवर्तक डॉ. नीलेश शेळके याच्यासह नगर शहर बँकेच्या संचालकांवर सुमारे १७ कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा...
  September 29, 11:26 AM
 • श्रीगोंदे- बापू हे अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. १९७८ मध्ये अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करूनदेखील बापूंनी काँग्रेस सोडली नाही. बापूंच्या निधनाने जिद्दी, कष्टाळू आणि समाजाशी बांधिलकी असलेला नेता हरपल्याची भावना माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांचा दशक्रिया विधी शुक्रवारी वांगदरी येथे घोडनदी तीरावर पार पडला. बापूंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या...
  September 29, 11:11 AM
 • राहाता- घराचा दरवाजा वाजवून महिलेचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी राहाता पोलिसांनी विवाहितेच्या फिर्यादीवरून गोरक्षनाथ सारंगधर वाघे (रा. केलवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (२६ सप्टंेबर) मध्यरात्रीनंतर केलवड गावात घडली. केलवड येथील विवाहिता व तिचे दोन मुले असे तिघे राहतात. या महिलेचा पती गेल्या तीन ते चार वर्षांपासून डोक्यावर परिणाम झाल्याने निघून गेलेला आहे. आरोपी वाघे (रा. केलवड) याने बुधवारी रात्री या महिलेच्या घराच्या दरवाजावर थाप मारली....
  September 28, 11:33 AM
 • नगर- महापालिकेच्या कारभारातून शहराला ओरबाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, शहरातील मनपाच्या जागा कोणताही लिलाव न करता तसेच जाहिरात न देता १८ व्यक्तींना देण्याचा निर्णय तत्कालीन स्थायी समितीने घेतला होता. नियमबाह्य ठराव असतानाही प्रशासनाने अर्थपूर्ण चुप्पी साधली. पण न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर राज्य सरकारला जाग आली आहे. शासनाने हे सर्व ठराव निलंबित केल्याने १८ जणांच्या घशात मनपाच्या जागा घालण्याचा प्रयत्न समितीसह प्रशासनाकडून फसला आहे....
  September 28, 11:12 AM
 • नाशिक- गेल्या चार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या ३० पत्रांचे समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने २ ऑक्टोबर राेजी उपोषणाचा विचार करावा लागल्याचे अाणखी एक पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र शेखावत यांना पाठवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोन वेळा...
  September 28, 08:48 AM
 
जाहिरात

RECOMMENDED