Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • कोपरगाव- धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा या व अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी शहरातील खंडोबा मंदिरापासून पारंपरिक वेशात जागरण गोंधळ करत मेंढ्यांसह मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदार किशोर कदम यांना मागण्यांचे निवेदन मोर्चेकरांनी दिले. निवेदनात म्हटले आहे, चार वर्षांपूर्वी फडणवीस सरकारने धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या सवलतींची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजमितीस त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव...
  August 25, 10:50 AM
 • संगमनेर- आशियाई स्पर्धेत संगमनेरच्या दत्तू भोकनळ याने रोईंग क्रीडा प्रकारात देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. पाण्यात कधीच न गेलेला आणि पोहायला घाबरणाऱ्या दत्तुला रणवीरसिंग या लष्करी अधिकाऱ्याने रोईंग खेळात आणले. परिस्थितीवर मात करत त्याने मिळवलेले यश मराठी तरुणांना प्रेरणादायी ठरणार आहे. दोन दिवसांपूर्वीच फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याने आधीच्या दोन राऊंडमध्ये अनुक्रमे दुसरा आणि पहिला आलेला असताना व्यक्तिगत स्पर्धेत हातातोंडाशी आलेले दत्तूचे पदक थोडक्यात हुकले. मात्र, त्यातून...
  August 25, 10:42 AM
 • नगर- महापालिकेच्या आरोग्य अधिकारी पदासाठी २०१६ मधील पॅटर्ननुसार आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याकडे नाही, तसेच जुन्या पात्रतेनुसार या पदासाठी डीपीएच पात्रता बंधनकारक असून दोन वर्षांची पदविका आवश्यक आहे. पण डॉ. बोरगे यांनी केवळ अकरा महिन्यांत ही पदवी प्राप्त केल्याने त्यांची पदवीच संशयास्पद आहे, असा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी िजल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांना दिलेल्या निवेदनात...
  August 24, 01:20 PM
 • नगर- शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेचा उदासीन कारभार गुरुवारी चव्हाट्यावर आला. अनधिकृत कत्तलखान्यातील जैव कचरा व मृत प्राण्यांचे अवशेष भरून बुरुडगाव येथील कचरा डेपोच्या दिशेने निघालेला ट्रॅक्टर संतप्त ग्रामस्थांनी अडवून रात्री आठच्या सुमारास महापालिकेत आणून ओतला. ट्रॉलीभर कचरा मनपात फेकल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली. बेकायदेशीर कत्तलखाने शहरात राजरोसपणे सुरू असून ड्रेनेजलाइन प्राण्यांच्या अवशेषांमुळे तुंबत असल्याचा विषय काही...
  August 24, 01:12 PM
 • नगर- श्रीरामपूर येथील गोरख मुंडलिक या सराफ व्यवसायिकाच्या मृत्यूप्रकरणी एका पोलिस उपनिरीक्षकासह तीन पोलिस कर्मचाऱ्यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. पोलिसांच्या छळाला कंटाळून सराफ व्यावसायिकाने विष पिऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी संबंधित दोषी पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी सराफ व्यावसायिकांनी केली होती. कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सराफ व्यवसायिकांनी आंदोलन मागे घेतले होते. दरम्यान, चौकशीचा अहवाल आल्यानंतर पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी चार जणांच्या...
  August 24, 01:09 PM
 • नगर - महामार्गांवरील काही एसटी बसथांब्यांवर दिव्य मराठीच्या प्रतिनिधींनी भेट दिली असता धक्कादायक बाबी समाेर आल्या आहेत. अधिकृत बसथांबा नसूनही काही अनधिकृत ढाब्यांवर व हॉटेलांवर एसटी महामंडळाच्या बसेस अर्धा-अर्धा तास नाष्ट्यासाठी थांबत असल्याचे चित्र दिसले. अनधिकृत थांबा असूनही येथेच का थांबता, याबाबत जाफ्राबाद आगाराच्या एका बसचालकांकडे चौकशी केली असता, हॉटेल अनधिकृत आहे हे आम्हालाही माहित आहे. येथे पावती मिळत नसली म्हणून काय झाले. जेवण तर चांगले मिळते, असा खुलासा एेकायला मिळाला....
  August 23, 05:05 AM
 • नगर - जिल्ह्यात अडीच महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने भाजीपाल्याचे उत्पादन निम्म्याने घटले असून, बाजारात आवकही मंदावली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव काहीसे कडाडले आहेत. भाजीपाला मात्र स्वस्त दराने विकला जात आहे. सध्या कोंथबिर, मेथी, शेपू, पालक हा भाजीपाला सर्वसामान्य नागरिकांच्या अवाक्यात आहेत. नगर जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन दिवस पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. जून महिन्यात झालेल्या तुरळक पावसामुळे खरिपाच्या अवघ्या २५ टक्केच पेरण्या...
  August 23, 05:03 AM
 • श्रीरामपूर - व्हॉट्स ॲप, फेसबूक आणि इन्स्टाग्राम ही माध्यमे मानली तर टाईमपास आणि चांगला उपयोग केला तर लाखमोलाची. याचीच प्रचिती श्रीरामपूर एज्यूकेशन सोसायटीत शिकणाऱ्या माजी विद्यार्थी व शिक्षकांना आली. १९९६ मध्ये दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा देण्यासाठी स्नेहमेळावा ठरवला. सोशल मीडियाचा वापर करून सवंगड्यांना सांगावा पाठवला. त्यास प्रतिसाद देत सर्वांनी शाळेत धाव घेतली अन् तब्बल २२ वर्षांनंतर रंगली बालपणाच्या भावविश्वातील दिल दोस्ती दुनियादारी... श्रीरामपूर...
  August 23, 05:01 AM
 • नगर - संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल ८७ बलात्कार व ३८१ विनयभंगाच्या घटना घडल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत विनयभंगाच्या गुन्ह्यात दुपटीने वाढ झाली आहे. पोलिसांनी या सर्व गुन्ह्यांचा तपास लावला असला, तरी गुन्हेगारीचे हे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. देशभर गाजलेल्या कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेनंतरही जिल्ह्यात बलात्काराचे प्रकार सुरूच आहेत. वर्षभरात (जुलै २०१७ ते जुलै २०१८) जिल्ह्यात बलात्काराच्या ८७ घटना घडल्या. सरासरी आठवड्यात...
  August 23, 04:59 AM
 • नगर - नगर शहर भाजपमधील खासदार दिलीप गांधी व माजी शहराध्यक्ष अभय आगरकर यांच्यातील गटबाजीला पक्षश्रेष्ठींही वैतागले आहेत. मुंबईत या दोन्ही नेत्यांशी पक्षश्रेष्ठींनी चर्चा करुन आपसातील गटबाजी संपवा असे सांगितले असले, तरी दोन्ही नेत्यांकडून मात्र गटबाजी संपल्याचे जाहीर न झाल्यामुळे संभ्रम वाढला आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नेहमीच अशी सूचना वरिष्ठांकडून केली जाते, परंतु तिला केराची टोपली दाखवली जाते, असा अनुभव आहे. वाद मिटवण्याची जबाबदारी श्रेष्ठींनी स्वत: न घेता त्यांच्यातील वाद...
  August 23, 04:59 AM
 • कोपरगाव- कोळपेवाडी येथील श्रीलक्ष्मी ज्वेलर्स संगमनेरकर या दुकानावर दरोडा पडण्याआधी तीन ते चार दिवस रेकी केली गेल्याचा संशय स्थानिक रहिवासी व पोलिसांना अाहे. रेकी करणारी महिला व इतर दोन संशयितांची रेखाचित्रे तयार केली असल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली. दरम्यान घटना घडून तीन दिवस उलटले, तरीही पोलिसांना कुठलेही धागेदोरे मिळालेले नाहीत. पोलिस पथके विविध राज्यांत रवाना करण्यात आली आहेत. या दरोड्यात २७ लाखांचे दागिने लुटल्याचे निष्पन्न झाले असून १४ ते २०...
  August 22, 12:30 PM
 • नगर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कर्जत तालुक्यातील ज्येष्ठ नेते राजेंद्र फाळके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच कार्याध्यक्षपदी संदीप वर्पे यांची निवड झाली आहे. दिव्य मराठीने दोन दिवसांपूर्वीच पॉलिट्रिक्स सदरात नवीन जिल्हाध्यक्ष निवडीबाबतचे भाकीत केले होते. आगामीन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने अनुभवी नेत्यांची फौज उभा करून मोर्चेबांधणीची रणनिती आखली आहे. माजी आमदार...
  August 22, 12:24 PM
 • अकोले- दिल्लीत जंतरमंतरवर संविधानाच्या प्रती जाळल्या जातात. त्याचा व्हिडीओही व्हायरल केला जातो ही गंभीर बाब आहे, पण शासनकर्ते त्याकडे डोळेझाक करत आहेत. मंत्र्यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यास आम्ही मज्जाव केला, म्हणून आम्हाला देशद्रोही ठरवणारे हे सरकार, संविधान जाळणाऱ्यांना देशद्रोही का ठरवत नाही? त्यांच्यावर तसा गुन्हा का दाखल केला जात नाही? खरेतर या लोकांना संविधान का नको आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. आपल्या संविधानात भारतीयत्व दिसत नाही, असे विधान करणारे राष्ट्रीय...
  August 22, 12:16 PM
 • नगर- मागील काही दिवसांपासून बरसत असलेल्या जलधारांनी नगरचं रूपच बदलून टाकलं आहे. झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची... अशी गाणी ओठांवर खेळवणाऱ्या श्रावणसरींनी शहरवासीयांबरोबर शेतकऱ्यांनाही सुखावले आहे. अधूनमधून होणारे सूर्यदर्शन, आकाशात उमटणारी इंद्रधनुष्याची कमान, वातावरणातील आल्हाददायक गारवा, सगळीकडे पसरलेली हिरवळ असा सुरेख आणि सुरेल माहोल सध्या नगरकर अनुभवत आहेत. पंचमीचे घुंगरू वाजल्याशिवाय पाऊस येत नाही आणि आला की भरभरून दान देतो, अशी जामखेड परिसरातील शेतकऱ्यांची श्रद्धा आहे....
  August 22, 12:16 PM
 • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून नगर जिल्ह्यात शरद पवारांना मनोभावे साथ देणाऱ्या निष्ठावान पक्ष कार्यकर्त्यांची, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून होत असलेली घनघोर उपेक्षा नवीन जिल्हाध्यक्ष निवडीनंतर आता संपल्यात जमा आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी कर्जतचे ज्येष्ठ नेते राजेंद्र तात्या फाळके यांची निवड झाल्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच आता नगर जिल्ह्याची कमान पुन्हा एकदा हाती घेतल्याचे स्पष्ट झाले. नगर जिल्ह्यामध्ये पहिल्यापासूनच फक्त आणि फक्त...
  August 22, 12:16 PM
 • नाशिक/नगर- संगमनेर तालुक्यातील घारगावसह परिसरात मंगळवारी (दि. २१) भूकंपाचे धक्के बसले. सकाळी ८.३३ वाजता भूकंपाचे सलग सहा सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल नाशिकच्या मेरी येथील भूकंप मापन केंद्रात नोंदवले गेल्याचे संस्थेचे भूवैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी सांगितले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पठार भागातील घारगाव, बोरबन, कुरकुंडी आणि आंबी खालसा या गावांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे घरातील भांडी...
  August 22, 08:36 AM
 • अहमदनगर- गेल्या काही दिवसापासून केरळमध्ये पावसाने हाहाकार उडाला आहे. पूरग्रस्त परिस्थितीत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देशातील अनेक जण सरसावले आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील देहविक्री करणार्या महिलांचाही समावेश आहे. या महिलांनी पूरग्रस्ताना 21 हजार रुपयांची मदत दिली आहे. एवढेच नाही तर महिन्याच्या शेवटी या महिला एक लाख रुपये पूरग्रस्तांसाठी पाठवणार आहेत. एनजीओ स्नेहालयचे दीपक बुराम यांनी सांगितले की, देहविक्री करणार्या महिलांच्या एका...
  August 21, 06:45 PM
 • नगर- कुणी आले, कुणी गेले तरी काँग्रेस पक्षाला फरक पडणार नाही. पक्षाने अनेक चढउतार पाहिले आहेत. पक्षाचे सुप्तपणे काम सुरुच आहे. ते राज्याच्या पातळीवर काम करत आहेत. मी ही काम करत आहे. आम्ही एकत्रच आहोत. एकत्र नसतो तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आमच्याकडे आले असते का ? असा सवाल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी करत यापुढे आम्ही एकत्र फिरु, विखे यांचे नाव न घेता त्यांनी सोमवारी सांगितले. सहकार सभागृहात वाजपेयी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी थोरात नगरमध्ये आले होते. त्यावेळी जिल्हा बँकेत...
  August 21, 12:07 PM
 • कर्जत- मराठा आरक्षण वगळता इतर न्यायिक मागण्या मान्य केल्यामुळे कर्जत सकल मराठा समाजातर्फे गेल्या २२ दिवसांपासून कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. मराठा आरक्षण न्यायप्रविष्ठ भाग आहे. ते वगळता मराठा समाजाच्या इतर न्यायिक मागण्या सरकार आणि जिल्हा प्रशासनाने मान्य केल्याने आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याची माहिती समन्वयक नानासाहेब धांडे यांनी दिली. प्रांतधिकारी अर्चना नष्टे यांनी जिल्हाधिकारी यांचे पत्र आंदोलकांना दिले. मराठा समाजास...
  August 21, 12:02 PM
 • राहुरी शहर- नगर जिल्ह्यातील वळण (ता.राहुरी) येथील एका तरुणाची धारदार शस्त्राने २२ वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून रविवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ही घटना झाल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी सोमवारी पहाटे ६ जणांना ताब्यात घेतले, तर दोघे फरार झाले आहेत. मंगेश अण्णासाहेब खिलारी (२२) असे मृताचे नाव आहे. गावात कीर्तनाला चाललो, असे सांगून मंगेश घराबाहेर पडला होता. मात्र उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाइकांनी शोध घेतला असता मंगेशचा मृतदेह...
  August 21, 09:16 AM
 
जाहिरात

RECOMMENDED