Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • नाशिक/नगर- संगमनेर तालुक्यातील घारगावसह परिसरात मंगळवारी (दि. २१) भूकंपाचे धक्के बसले. सकाळी ८.३३ वाजता भूकंपाचे सलग सहा सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल नाशिकच्या मेरी येथील भूकंप मापन केंद्रात नोंदवले गेल्याचे संस्थेचे भूवैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी सांगितले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पठार भागातील घारगाव, बोरबन, कुरकुंडी आणि आंबी खालसा या गावांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे घरातील भांडी...
  August 22, 08:36 AM
 • अहमदनगर- गेल्या काही दिवसापासून केरळमध्ये पावसाने हाहाकार उडाला आहे. पूरग्रस्त परिस्थितीत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देशातील अनेक जण सरसावले आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील देहविक्री करणार्या महिलांचाही समावेश आहे. या महिलांनी पूरग्रस्ताना 21 हजार रुपयांची मदत दिली आहे. एवढेच नाही तर महिन्याच्या शेवटी या महिला एक लाख रुपये पूरग्रस्तांसाठी पाठवणार आहेत. एनजीओ स्नेहालयचे दीपक बुराम यांनी सांगितले की, देहविक्री करणार्या महिलांच्या एका...
  August 21, 06:45 PM
 • नगर- कुणी आले, कुणी गेले तरी काँग्रेस पक्षाला फरक पडणार नाही. पक्षाने अनेक चढउतार पाहिले आहेत. पक्षाचे सुप्तपणे काम सुरुच आहे. ते राज्याच्या पातळीवर काम करत आहेत. मी ही काम करत आहे. आम्ही एकत्रच आहोत. एकत्र नसतो तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आमच्याकडे आले असते का ? असा सवाल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी करत यापुढे आम्ही एकत्र फिरु, विखे यांचे नाव न घेता त्यांनी सोमवारी सांगितले. सहकार सभागृहात वाजपेयी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी थोरात नगरमध्ये आले होते. त्यावेळी जिल्हा बँकेत...
  August 21, 12:07 PM
 • कर्जत- मराठा आरक्षण वगळता इतर न्यायिक मागण्या मान्य केल्यामुळे कर्जत सकल मराठा समाजातर्फे गेल्या २२ दिवसांपासून कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. मराठा आरक्षण न्यायप्रविष्ठ भाग आहे. ते वगळता मराठा समाजाच्या इतर न्यायिक मागण्या सरकार आणि जिल्हा प्रशासनाने मान्य केल्याने आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याची माहिती समन्वयक नानासाहेब धांडे यांनी दिली. प्रांतधिकारी अर्चना नष्टे यांनी जिल्हाधिकारी यांचे पत्र आंदोलकांना दिले. मराठा समाजास...
  August 21, 12:02 PM
 • राहुरी शहर- नगर जिल्ह्यातील वळण (ता.राहुरी) येथील एका तरुणाची धारदार शस्त्राने २२ वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून रविवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ही घटना झाल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी सोमवारी पहाटे ६ जणांना ताब्यात घेतले, तर दोघे फरार झाले आहेत. मंगेश अण्णासाहेब खिलारी (२२) असे मृताचे नाव आहे. गावात कीर्तनाला चाललो, असे सांगून मंगेश घराबाहेर पडला होता. मात्र उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाइकांनी शोध घेतला असता मंगेशचा मृतदेह...
  August 21, 09:16 AM
 • शिर्डी- शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीवर सोमवारी दुपारी एक विमान घसरल्याचे वृत्त झळकले. विमान धावपट्टीवरुन घसरुन थेट संरक्षण कुंपनाला अडकले, त्यामुळे मोठी हानी टळली, असेही वृत्तात म्हटले होते. विशेष म्हणजे वृत्तासोबत कुंपनावर अडकलेल्या विमानाचे छायाचित्रही देण्यात आले होते. मात्र, हे वृत्त फेक निघाले. या वृत्ताबाबत दिव्य मराठी डॉट कॉमने प्रतिनिधीशी संवाद साधला असता अशी कोणतीही घटना शिर्डी विमानतळावर घडलेली नसल्याचे समोर आले. वाचकांची शिर्डीत विमान घसरल्याच्या वृत्तावर विश्वास...
  August 20, 05:29 PM
 • नगर- लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर समाजासाठी आपण काही तरी देणं लागतो, या भावनेतून नगरमधील सहा निवृत्त सैनिकांनी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनची स्थापना केली. दर महिन्याला येणाऱ्या निवृत्ती वेतनातून ठरावीक रक्कम काढून ती या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून या निवृत्त सैनिकांनी नगर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात सामाजिक उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली...
  August 20, 11:53 AM
 • देवळाली प्रवरा- राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ठाकरवाडी (पुनोबाचीवाडी) प्राथमिक शाळेत नव्याने बदली झालेल्या शिक्षक द्वयींनी अतिदुर्गम भागातील या शाळेचे रुप पालटून टाकले आहे. लवकरच ही शाळा डिजिटल करण्याचा संकल्प शिक्षक व पालकांनी केला आहे. ठाकरवाडीला बदली म्हटले की, शिक्षकांच्या अंगावर काटा येत असे. तथापि, या अतिदुर्गम भागातसुद्धा चांगले काम करता येते, असा विश्वास दत्तात्रय डोईफोडे व वैशाली खरमाळे या शिक्षकांनी निर्माण केला आहे. पन्नास वर्षांच्या इतिहासात या शाळेवर प्रथमच...
  August 20, 11:36 AM
 • कोपरगाव- अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यातील कोळपेवाडी येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावर रविवारी रात्री आठ वाजता दरोडा टाकण्यात आला. या वेळी सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक श्याम सुभाष घाडगे (३६) हे ठार झाले, तर गणेश सुभाष घाडगे (४२) हे जखमी झाले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली. जखमी गणेश घाडगे यांच्यावर कोपरगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २००६ मध्ये कोपरगाव शहरातील बाजारतळ भागात काल्या नांगऱ्याच्या...
  August 20, 07:51 AM
 • नगर - राज्यात विदर्भ मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस लागवड होते. गेल्या वर्षी कपाशीवर सर्वत्र मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. शेकडो एकर शेतीमधील कपाशीचे पीक गुलाबी बोंड अळीने नष्ट केले. बोंड अळीचे संकट रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी बीटी कपाशी स्वीकारली. त्याचा सुरुवातीला चांगला परिणाम दिसला. मात्र, बीटी बीजी टू बियाण्यांवरही बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने परिस्थिती बिकट झाली. यंदाही जिल्ह्यातील कपाशीचे बहुतांश क्षेत्र बोंड अळीच्या घशात जात...
  August 19, 12:08 PM
 • नेवासे - सध्याच्या राजकीय वातावरणात भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सारखा साम्यवादी विचारांचा सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या नेत्याची भारताला गरज आहे, असे विचार व्यक्त करीत सर्व पक्षीयांच्या उपस्थितीत स्व. वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पंचायत समिती सभागृहांत सर्वपक्षीय श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्व. वाजपेयी...
  August 19, 12:08 PM
 • नगर - इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) घोटाळ्याबाबत जिल्हा प्रशासनाला आलेल्या बनावट आदेश प्रकरणात पोलिसांना अद्याप धागेदोरे मिळालेले नाहीत. इव्हीएमच्या गैरवापरामुळे आपले राष्ट्र व लोकशाही धोक्यात आली अाहे. या घोटाळ्याबाबतचा परिणामकारक अहवाल ३० दिवसांत सादर करा, असे या बनावट आदेशात म्हटले आहे. प्रशासनाला तीन महिन्यांपूर्वी हा बनावट आदेश प्राप्त झाला होता. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने प्राधिकृत केलेले नायब तहसीलदार संजय परदेशी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी फसवणूक व...
  August 19, 12:06 PM
 • नगर - केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेली दगडफेक व पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी ७१ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांत न्यायालयाने जामीन मंजूर केला असला, तरी आता या आरोपींना प्रतिबंधात्मक कारवाईनुसार पोलिस अधीक्षक कार्यालयात सुनावणीसाठी हजेरी लावावी लागत आहे. उर्वरित आरोपींच्या विरोधातही लवकरच ही कारवाई करण्यात येणार आहे. केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेली दगडफेक व पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफाेडप्रकरणी सुमारे ९००...
  August 19, 12:04 PM
 • नगर- कोपरगाव तालुक्यातील वारी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण, शासकीय वाहनाचे नुकसान करणाऱ्या किरण हजारे व त्याच्या १२ साथीदारांविरोधात नाशिक येथील विशेष मोक्का न्यायालयात मोक्काच्या वाढीव कलमासह दोषाारोपपत्र दाखल करण्यात आले. शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे अवैध वाळूविरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी हे पोलिस रेकाॅर्डवरील संशयित किरण हजारे याचे गाव असलेल्या वारी (ता. कोपरगाव) या गावात अवैध वाळू वाहतूक...
  August 18, 12:35 PM
 • नगर- शहर बससेवेसाठी दीपाली ट्रान्स्पोर्ट संस्थेची निविदा मंजूर करताना २०१८ मधील नवीन बसगाड्या असतील, तरच नुकसान भरपाईचे अनुदान देण्याचा निर्णय स्थायी समिती सभेत शनिवारी (४ ऑगस्ट) घेण्यात आला होता. बारा दिवस उलटूनही पुढील कार्यवाहीसाठी हा ठराव अजूनही प्रशासकीय यंत्रणेसह आयुक्तांपर्यंत पोहोचलेला नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळे शहर बससेवा सुरू होण्यास आणखी किती दिवस वाट पहावी लागणार असा प्रश्न नगरकरांना पडला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीची सभा ४ ऑगस्टला सभापती बाबासाहेब वाकळे...
  August 18, 12:31 PM
 • अकोले- राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ नगरसेवक अपात्र ठरवले गेल्यास अकोले नगरपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांसाठी ही मोठी नामुष्कीची बाब ठरेल. विद्यमान उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांचे पद वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. प्रभाग ९ मधून ते निवडून आले आहेत. याच प्रभागातील महालक्ष्मी मंदिर परिसरात सर्व्हे नंबर ७३ वर त्यांचे वडील काशिनाथ महादू वडजे यांच्या नावे तीन मजली इमारतीचे बांधकाम विनापरवाना केले, म्हणून...
  August 18, 12:24 PM
 • नगर - २४ एप्रिल १९८६. अहमदनगर शहराच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा असा दिवस. तत्कालीन नगर परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बाळासाहेब देशपांडे रक्तपेढीचे उद्घाटन त्यादिवशी होतं. शंकरराव घुले नगराध्यक्ष होते आणि दिलीप गांधी उपनगराध्यक्ष. उद्घाटनाच्या निमित्ताने रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराचे उद्घाटन वाजपेयींच्या हस्ते होतं. कार्यक्रमाची वेळ जवळ येत चालली.नगरपालिकेच्या गाडीतून अटलजी यांचं कार्यक्रमस्थळी आगमनही झालं. गाडीतून उतरल्यानंतर...
  August 17, 12:00 PM
 • नगर - अरणगाव ते वाळकी रस्त्यावरील बाबुर्डी घुमट शिवारात भरधाव वेगात येणाऱ्या स्कार्पिओने दुचाकीस्वारास उडवले. त्यात दुचाकीस्वार सोमनाथ धर्माजी परभाने (४१, रा. बाबुर्डी घुमट) हे जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. दरम्यान, अपघातानंतर परिसरातील संतप्त जमावाने स्कार्पिओ पेटवून दिली. नगर- दौंड रस्त्यावरील अरणगाव ते वाळकी रस्त्यावरील बाबुर्डी घुमट शिवारात झालेल्या या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. भरधाव वेगात आलेल्या...
  August 17, 11:58 AM
 • नगर - प्रदीर्घ विश्रांतीनंतर नगर शहर व जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ४४ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसामुळ दडी मारली होती. पावसाअभावी पिके जळण्याच्या मार्गावर होती. जून, जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे साडे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या. मात्र, पाऊस नसल्यामुळे पिकांची वाढ देखील खुंटली होती. ऑगस्ट महिन्यात पावसाची अपेक्षा होती. आॅगस्ट...
  August 17, 11:54 AM
 • नगर- तालुक्यातील सर्व धनगर समाजबांधव तहसील कार्यालयासमोर एसटी आरक्षणासाठी धरणे आंदोलन करीत आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने शेड्युल्ड ट्राईब महाराष्ट्र राज्यासाठी सूची २ प्रमाणे एसटी आरक्षणामध्ये ४७ जातींचा समावेश केला. त्यामधील ३६ क्रमांकावर ओरान धनगड असा धनगर जातीचा उल्लेख आहे. इंग्रजी, हिंदी उच्चाराप्रमाणे त्या ठिकाणी धनगरऐवजी धनगड असे झालेले आहे. सदर ठिकाणी र ऐवजी ड असा उच्चार केलेला असून तोच आमच्या समाजाच्या अंगलट आला अाहे. गेल्या ४० वर्षांपासून मागणी करूनही...
  August 15, 11:46 AM
 
जाहिरात

RECOMMENDED