Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • नगर - राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत 2010-11 मध्ये केळी लागवड केलेल्या 584 लाभार्थींना एक कोटी 27 हजार रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत मागील वर्षी जिल्ह्यात 379.36 हेक्टरवर केळीची लागवड करण्यात आली. नेवासे तालुक्यात सर्वाधिक 164 शेतक-यांनी 103.83 हेक्टरवर उतिसंवर्धन केलेल्या केळीची लागवड केली, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल घावटे यांनी दिली.* कृषी विभागाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामध्ये 2005-06 ते 2010-11 या सहा वर्षांत 1 हजार 60 हेक्टर क्षेत्रावर केळीचा विस्तार...
  November 2, 09:52 AM
 • नगर - जिल्ह्यातील श्रीरामपूर, श्रीगोंदा व कोपरगावच्या नागरी पाणी पुरवठा योजनांना 15 लाख 40 हजार रुपयांचे अनुदान राज्य सरकारने वितरित केले आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून हे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे.या शहरांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मिळालेले हे अनुदान अगदीच तुटपुंजे आहे. श्रीगोंदा शहराला वेळू तलावातून पाण्याचा पुरवठा होतो. 1976 मध्ये ग्रामपंचायतीने ही योजना राबवली होती. वेळू तलावात घोड धरणातून कालव्याव्दारे पाणी सोडले जाते....
  November 2, 09:50 AM
 • नगर - शनैश्वराच्या दर्शनासाठी शनिशिंगणापूरला आलेल्या मुंबईतील भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलला कुकाणे ते घोडेगाव रस्त्यावर फत्तेपूर परिसरात लुटण्यात आले. तीन मोटारसायकलींवरून आलेल्या दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून मुद्देमाल लांबवला. ही घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली.टेम्पो ट्रॅव्हलमधून (एमएच 04 जी 6001) आलेल्या भाविकांनी पैठण येथील उद्यान बघून सायंकाळी शनिशिंगणापूरच्या दिशेने प्रवास सुरू केला. एकाच कुटुंंबातील दोन पुरुष, महिला व मुले मिळून 8 ते 9 जण या गाडीत होते....
  November 2, 09:48 AM
 • श्रीगोंदा - आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील गटबाजी उफाळून आली आहे. दुस-या फळीतील काही असंतुष्ट नेते दुसरा मार्ग शोधत असतानाच आता काही काँग्रेस व समविचारी कार्यक र्ते एकत्र येऊन तिसरी आघाडी करता येईल का, याची चाचपणी करीत आहेत. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्राकडून समजली.विधानसभा निवडणूक वारंवार जिंकण्याचा करिश्मा करणा-या पालकमंत्री बबनराव पाचपुते यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र कायमच संघर्ष करावा लागला. यंदाही...
  November 2, 09:47 AM
 • श्रीगोंदा - गावपातळीवर ग्रामसुरक्षा दलानंतर आता शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी वॉर्ड सुरक्षा दल स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. श्रीगोंद्यात या योजनेला अंतिम स्वरूप येत असून त्यासाठी पोलिस आणि नगरसेवकांनी एकत्रित आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील शहरांसाठी बहुदा हा पहिलाच प्रयोग असावा.श्रीगोंद्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. तालुक्यात ग्रामसुरक्षा दलांची स्थापना सर्व गावांमध्ये करण्यात आली आहे. दोन महिन्यांपासून येथील पोलिस निरीक्षक अजय...
  November 2, 09:43 AM
 • नगर - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सध्याच्या जुन्या इमारतीच्या जागेवर नवी इमारत उभारण्यास दोन वर्षांपूर्वी प्रशासकीय मंजुरी मिळाली. तथापि, मुंबई येथील राज्य सरकारच्या संकल्पचित्र मंडल कार्यालयाकडून या इमारतीचे आरसीसी डिझाईन अद्याप तयार न झाल्यामुळे इमारतीचे बांधकाम सुरू होऊ शकलेले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाची सध्याची इमारत ब्रिटिशकालीन म्हणजे 1865-66 मध्ये बांधलेली आहे. प्रारंभीच्या काळात सोलापूर व नाशिक जिल्ह्यांचा बराचसा भाग नगरला जोडलेला होता. काळानुरूप इमारतीत बदल झाले....
  November 2, 09:42 AM
 • नगर - आंतरराष्ट्रीय कीर्तिचा नेमबाज अभिनव बिंद्रा याच्याशी भारत संचार निगमने (बीएसएनएल) केलेल्या ब्रँड अॅम्बेसिडर कराराची मुदत संपली आहे. तथापि, खर्च वाचवण्यासाठी बीएसएनएल बिंद्रा याचा चेहरा झाकून जुनेच फलक वापरत आहे. मार्केटिंग प्रभावीरीत्या व्हावे यासाठी विविध कंपन्या प्रसिद्ध अभिनेते, खेळाडू यांना आपला ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवडतात. त्यासाठी संबंधित व्यक्तीशी ठरावीक वर्षांचा करार केला जातो. बिंद्रा याच्याशी बीएसएनएलने केलेला करार मार्च 2011 मध्ये संपला. करार संपल्याने बिंद्रा...
  November 2, 09:40 AM
 • नगर - आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती, तसेच जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री राधाकृष्ण विखे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या काँग्रेस नेत्यांचा 30 व 31 ऑक्टोबरचा संयुक्त जिल्हा दौरा होऊ न शकल्याने त्यांच्या मनोमिलनाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यात विखे व थोरात हे काँग्रेस अंतर्गत प्रमुख दोन गट आहेत. गेली पाच वर्षे या दोन्ही नेत्यांमधील वितुष्ट वाढत गेले. त्याचा परिणाम जिल्ह्यातील पक्षवाढीवर झाला. त्याची दखल श्रेष्ठींनी...
  November 1, 10:11 AM
 • राहाता - दिवाळीच्या सुटीमुळे शिर्डीत साईभक्तांची मोठी गर्दी होत आहे. त्याचा गैरफायदा घेत प्रवासी वाहतूक करणा-या एजंटांचा तेथे सुळसुळाट झाला आहे. नडलेल्या प्रवाशांकडून नेहमीपेक्षा 25 ते 40 टक्क्यापर्यंत जास्त भाडे आकारण्यात येत आहे. त्यामुळे साईभक्तांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.इंदुर, नागपूर, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, हैदराबाद आदी ठिकाणांहून खासगी ट्रॅव्हल्सद्वारे शिर्डीला येणा-यांचे प्रमाण मोठे आहे. शिर्डीत 300 पेक्षा अधिक प्रवासी कंपन्यांनी आपले बुकिंग कार्यालये थाटली आहे....
  November 1, 10:09 AM
 • राहुरी - नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण येणार असून कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुरी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिली .कराड येथील निवासस्थानी रविवारी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेतली. राहुरी नगर परिषदेत 20 पैकी 9 नगरसेवक बरोबर असल्याने सत्तेच्या जवळ आहेत. या भेटीत आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री...
  November 1, 10:05 AM
 • नगर - दिल्ली दरवाजा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत दिव्य मराठीच्या सोमवारच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या फोटोची दखल घेत विविध संघटना व नागरिकांनी थेट महापालिकेला जाब विचारला.अतिशय वर्दळीचा रस्ता असलेल्या दिल्ली दरवाजा भागातील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम कित्येक महिन्यांपासून रखडले आहे. या रस्त्यावरील खडी उखडली असून दिवसभर सगळीकडे धळू उडत असते. वाहनचालकांना व पादचा-यांना या रस्त्यावरून जाणे म्हणजे नरकयातना भोगण्यासारखे आहे. या रस्त्याची दुरवस्था व उडणा-या धुळीचे धुके नव्हे धूळ हे...
  November 1, 10:03 AM
 • नगर - भिंगारमधील वाहने जाळणा-या समाजकंटकांना तीन दिवसांनंतरही अटक न झाल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने सोमवारी भिंगार नाल्यावर रास्तारोको आंदोलन केले. आमदार अनिल राठोड यांनी कॅम्प पोलिस ठाण्यात जाऊन तपासात होत असलेल्या दिरंगाईचा जाब विचारला. सहा दिवसांत आरोपींना अटक न केल्यास पोलिस ठाण्यास कुलूप ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला.आमदार राठोड, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, सुनील लाळबोंद्रे, महिला आघाडीप्रमुख कुसुम कळमकर आदींसह शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. वाहने जाळणा-या...
  November 1, 10:02 AM
 • नगर - लोककल्याणाचे धोरण यशस्वी होण्यासाठी पंचायत राज सक्षम करण्याची गरज आहे. त्याच अनुषंगाने वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या जिल्हानिहाय बैठकांतून यासाठी कार्यअहवाल बनवला जाणार असल्याची माहिती राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी दिली.कार्य अहवाल बनवण्यासाठी डांगे सध्या जिल्हानिहाय बैठकांतून पंचायत राज संस्थांची माहिती गोळा करीत आहेत. तीन दिवसांच्या नगर जिल्हा दौ-यात त्यांनी रविवारी महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयांत अधिका-यांशी चर्चा...
  November 1, 10:00 AM
 • कर्जत- कर्जत तालुक्यासाठी हक्काचे एसटी आगार नसल्याने ग्रामीण भागातील मुलींची शिक्षणासाठी मोठी हेळसांड होत आहे. शिक्षणाच्या वाटेवर दळणवळणाअभावी निर्माण झालेल्या अंधारामुळे शाळेमध्ये दाखल होऊनही मुलींची उच्चशिक्षित होण्याची आस मनामध्ये अपूर्णच राहत आहे.महिलांना पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात समान हक्क व अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, कर्जत तालुक्यातील मुलींना केवळ वाहतुकीच्या सुविधेअभावी शिक्षणाच्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. स्वातंत्र्याच्या...
  November 1, 09:59 AM
 • अकोले - जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष राष्ट्रवादीचेच राहणार आहेत. यासाठी आगामी जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याचे प्रतिपादन पालक मंत्री बबनराव पाचपुते यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत तालुक्यातील ढोक्री येथे तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभप्रसंगी पाचपुते बोलत होते. या वेळी वैभव पिचड, कचरू शेटे, जिल्हा...
  November 1, 09:57 AM
 • नगर - पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा वणवण भटकण्याची वेळ केडगावकरांवर आली आहे. ऐन दिवाळीतही रहिवाशांना टंचाईला सामोरे जावे लागले.केडगाव पाणी पुरवठा योजनेच्या पुढील टप्प्याचे काम रेंगाळले आहे. मध्यंतरी तीन-चार महिने वेळेवर पाणीपुरवठा होत होता. मात्र, आता सहा-सात दिवसांनी पाणी मिळते. कूपनलिका व विहिरींचे पाणी पिण्यास योग्य नसल्याने पाण्यासाठी व्हॉल्व्ह शोधत वणवण भटकण्याची वेळ महिलांवर आली आहे. दिवाळीसाठी आलेले पाहुणे या पाणीटंचाईमुळे चांगलेच वैतागले आहेत. सोनेवाडी तलावातून केडगावला...
  November 1, 09:56 AM
 • नगर - उघड्या ड्रेनेज, डासांचे घोंगावणारे थवे, नाक मुठीत धरावे लागेल अशी दुर्गंधी...हे चित्र आहे स्थायी समितीच्या सभापती अनिता राठोड यांच्या वॉर्ड क्रमांक 35 मधील. ड्रेनेजलाइन उघड्या असल्याने डासांचे प्रमाण वाढले असून नागरिक डेंग्यू, मलेरियाच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. या भागातील कचरा विल्हेवाट व पार्किंगची समस्याही ऐरणीवर आली आहे. जुने सिव्हिल हॉस्पिटल, काटे हॉस्पिटल, नाला मशीद रस्ता, चितळे रस्त्याची उत्तरेकडील बाजू, बागडपट्टी, ठाकूर गल्ली, मोचीवाडा, कुंभार गल्ली, नेता सुभाष चौक, छाया...
  November 1, 09:55 AM
 • श्रीगोंदा - दहा दिवसांपूर्वी तालुक्यातील कामठी येथे पडलेल्या दरोड्यातील आरोपींचे धागेदोरे मिळाले आहेत. यातील जखमी महिला इंदूबाई यांच्याकडून बाजरी काढताना महिलांमध्ये झालेल्या चर्चेवरून या दरोड्याची योजना त्या परिसरातीलच आरोपींनीच आखल्याचे पोलिस तपासात पुढे येत असून आरोपीही निष्पन्न झाले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.कामठी येथील कोल्हेवाडीत पडलेल्या दरोड्यात बाळू आरडे या बावीस वर्षीय तरुणाला ठार मारतानाच त्याची आई इंदूबाईला जबर मारहाण करून आरोपींनी घरातील ऐवज...
  November 1, 09:51 AM
 • नगर - ऑक्टोबरसाठी मंजूर एकूण आवंटनापैकी 4 हजार 169 टन खत जिल्ह्यात आलेले नाही. त्यामुळे शेतक-यांना खतांसाठी वणवण करीत फिरावे लागत आहे. रब्बी हंगामासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने 2 लाख 77 हजार 442 टन खताची मागणी राज्य सरकारकडे नोंदवली होती. मागील वर्षीच्या मंजूर आवंटनाचा विचार करून 10 टक्के वाढीने जिल्ह्याला 2 लाख 49 हजार 200 टन खत मंजूर झाले होते. ऑक्टोबरअखेर मंजूर 27, 316 पैकी 23 हजार 47 टन खत उपलब्ध झाले.पुरेसा पाऊस न झाल्याने ज्वारीच्या पेरण्या रखडल्या आहेत. गहू व हरभ-याच्या पेरणीची पूर्वतयारी...
  November 1, 09:50 AM
 • नगर - महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातून बाळ चोरणा-या आरोपींपैकी शमीम रफीक शेख हिने दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने सोमवारी फेटाळला. मला यात गोवण्यात आले असून या गुन्ह्याशी माझा काहीही संबंध नसल्याने माझी सुटका करावी, अशी मागणी शमीमने केली होती. न्यायालयाने याबाबत पोलिस व सरकारी वकिलांना म्हणणे मांडण्याचा निर्देश दिला होता. सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनिल फटाले यांच्यासमोर शमीमच्या अर्जावर सुनावणी झाली. सरकारी वकील विकास बडे म्हणाले, या गुन्ह्याचे स्वरूप...
  November 1, 09:49 AM
 
जाहिरात

RECOMMENDED