जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • नगर - गणेशोत्सवात तसेच संस्था, संघटनांच्या कार्यक्रमांबरोबरच अनामप्रेमचा अंधजनांचा ऑर्केस्ट्रा आता लग्नसमारंभांची शोभा वाढवणार आहे.स्नेहालय संचलित अनामप्रेम संस्थेतील 15 युवक-युवतींनी सन 2005 मध्ये आपल्या कलागुणांचा वापर करून आर्केस्ट्राची निर्मिती केली. स्नेहालयाच्या विविध कार्यक्रमांत हे कलाकार गाणी सादर करीत. त्यांची सुरेल गाणी व उत्तम संगीत ऐकून बाहेरच्या कार्यक्रमांसाठी त्यांना बोलावणी येऊ लागली. रावसाहेब पटवर्धन स्मारक, तसेच यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात अनामप्रेमने...
  November 23, 11:19 AM
 • नगर - वॉर्ड क्रमांक 33 मध्ये मंगलगेट येथे भरणा-या आठवडे बाजारात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने या भागातील नागरिक वैतागले आहेत. अपु-या जागेमुळे विक्रेत्यांना चक्क उघड्या गटारांवरच दुकान थाटावे लागत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्यावर पाण्याचे डबके साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते. ख्वाजा शरीफ हवेली, वंजार गल्ली, जुना दाणेडबरा, मंगलगेट, मटन मार्केट, रामचंद्र खुंट, दाळमंडई, आडतेबाजार, राज चेंबर, तापकीर गल्ली, मंगलगेट पोलिस चौकी, तापीदास गल्ली या भागाचा या वॉर्डात समावेश आहे....
  November 23, 11:18 AM
 • शिर्डी- गोव्याचे मुख्यमंत्री दिंगबर कामत यांनी शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरास सहकुटुंब भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळेस संस्थानचे ट्रस्टी सुरेश वाबळे आणि अशोक खांबेकर उपस्थित होते. संस्थांनातर्फे दिंगबर कामत आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.
  November 22, 04:43 PM
 • शेवगाव/कर्जत - आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने गटातटाला थारा देऊ नका. नवीन चेह-यांना संधी देऊन जिल्हा राष्ट्रवादीमय करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवगाव व कर्जत येथील शेतकरी मेळाव्यात केले.शेवगाव तालुका प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन पवार यांच्या झाले. यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, पैठणचे आमदार संजय वाकचौरे, आमदार...
  November 22, 10:11 AM
 • नगर - महापालिकेच्या कर वसुली मोहिमेच्या पहिल्या दिवशी वीस लाखांची वसुली झाली. थकबाकीदारांचे सहकार्य मिळाल्याने पहिल्या दिवशी जप्तीच्या कारवाईची वेळ आली नाही.उपायुक्त स्मिता झगडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून धडक वसुली मोहिमेस सुरुवात झाली. त्यांनी दिवाळीपूर्वीच वसुली मोहिमेची तयारी करून थकबाकीदारांना पैसे भरण्यासाठी आवाहन केले होते. नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. सोमवारी प्रभाग क्रमांक 2 मधून मोहिमेला सुरुवात झाली. वसुली पथकाने पहिल्या दिवशी तीन थकबाकीदारांकडे धडक मारली....
  November 22, 10:10 AM
 • नगर - खादी जशी पुढा-यांना प्रिय आहे, तशीच ती आता तरुणाईचीही क्रेझ बनू लागली आहे. सध्या सुरू असलेल्या सवलत योजनेमुळे खादीची मागणी नगरमध्ये वाढली आहे.महात्मा गांधी जयंती अर्थात 2 ऑक्टोबरपासून खादीच्या खरेदीवर विशेष सवलत देण्यात येते. कॉटन खादी व टेरिकोट खादीवर 20 टक्के, वुलन खादीवर 25 टक्के, तर खादीच्या रेडिमेड कपड्यांवर 15 टक्के सवलत आहे. नगरच्या नवीपेठेत असलेले महाराष्ट्र खादी भांडार हे जिल्ह्यातील सर्वांत जुने दुकान राजकीय नेते व कार्यकर्त्यांचे आवडते आहे. नेता मग तो कितीही मोठा असो, वा छोटा...
  November 22, 10:03 AM
 • पाथर्डी - नगरपालिकेची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवायची की आघाडी करून हा वाद प्रलंबित असतानाच भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून सोमवारी अर्ज दाखल केले. भाजप ही निवडणूक आघाडीच्या माध्यमातून लढवणार असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले.आघाडीला गांधी गटाने विरोध केल्याने आघाडी की कमळ यावर जिल्हाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत बैठकही झाली. मात्र, यावेळी दोन्ही गट आपल्या मुद्यावर ठाम राहिल्याने...
  November 22, 09:53 AM
 • शेवगाव - राज्य सरकारने कापसाला हमी भाव जाहीर करावा, या मागणीसाठी सोमवारी शेतक-यांनी शेवगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चानंतर कापूस उत्पादक शेतक-यांनी तहसील कार्यालयासमोर कापूस पेटवून राज्य सरकारचा निषेध केला.जनशक्ती मंच मोर्चाचे संस्थापक शिवाजीराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली कापूस उत्पादक शेतक-यांच्या कापसाला प्रतिक्ंिलटल 6 हजार रुपये हमीभाव जाहीर करावा, तालुक्यातील शेतीसाठी उच्च दाबाने वीज द्यावी, तसेच ग्रामीण भागात शेतीसाठी दहा तास वीजपुरवठा करावा यासह प्रमुख...
  November 22, 09:50 AM
 • नगर - देशप्रेमापोटी अनेकांनी प्राणांची पर्वा न करता स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून दिले. इंग्रजांच्या जुलूमी राजवटीला विरोध करण्यासाठी काही क्रांतिकारकांनी बलिदान केले. नाशिक येथे जनतेवर अन्याय करणा-या जॅक्सन या इंग्रज अधिका-याला गोळ्या घालून ठार मारणा-या अनंत कान्हेरे या क्रांतिकारकाचा जीवनपट नगरकरांनी अनुभवला. निमित्त होते राज्य नाट्य स्पर्धेतील ह्यशके 1831ह्ण या नाटकाचे.जय बजरंग युवा सांस्कृतिक क्रीडा मंडळ निर्मित ह्यशके 1831ह्ण हे नाटक यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात रविवारी...
  November 22, 09:48 AM
 • नगर - नावातच 'डीएसपी' असूनही डीएसपी चौक वाहतूक पोलिसांसाठी धोकादायक बनला आहे. वाहतूक नियंत्रण करणा-या पोलिसांसाठी तयार केलेल्या एक फूट उंचीच्या कट्ट्यावर बेधुंद ट्रकचालकांनी गाड्या घातल्याने चौकात कोठे उभे राहावे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.नगर-औरंगाबाद रस्त्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ हा चौक असल्याने ह्यडीएसपी चौकह्ण असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. मनमाड रस्त्याने तारकपूरमार्गे येणारी-जाणारी वाहने याच चौकातून जातात. एक रस्ता भिंगारकडे जातो. त्यामुळे या चौकातून...
  November 22, 09:47 AM
 • नगर - नगर तालुका सहकारी साखर कारखाना अवसायनात काढण्यापूर्वी किंवा त्याची विक्री करण्यापूर्वी सभासदांनी विश्वासाने जमा केलेली शेअर्सची रक्कम द्यावी. तसेच कोणताही निर्णय घेताना सभासदांसह कारखाना उभारण्यासाठी मदत केलेल्या सर्वांची बैठक बोलवावी, अशी मागणी कारखान्याचे संचालक सुधीर भद्रे यांनी केली.अध्यक्ष दादा पाटील शेळके व सर्व संचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सभासदांच्या हिताकडे लक्ष देतानाच कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 2001 मध्ये कारखाना सुरू...
  November 22, 09:45 AM
 • नगर- खरिपातील गावरान कांद्याची आवक वाढल्याने बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात 300 ते 400 रुपये प्रतिक्विंटल घसरण झाली. पुढील महिन्यात आवक वाढल्यास भावात आणखी घट होण्याची शक्यता व्यापा-यांनी व्यक्त केली. सोमवारी नगर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला 1000, तर गावरान कांद्याला 800 रुपये सरासरी भाव मिळाल्याची माहिती सचिव अभय भिसे यांनी दिली.रविवारी दुपारपासूनच कांद्याची आवक सुरू झाली. सोमवारी सायंकाळपर्यंत सुमारे 27 हजार कांदा गोण्यांची आवक झाली. लाल कांद्याला 300 ते 1250 व गावरान कांद्याला 200 ते 1,125...
  November 22, 09:30 AM
 • नगर- यापुढे कायम विनाअनुदानित शाळांना सरकारी अनुदान देण्यापूर्वी शाळांची 100 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत किमान 75 टक्क्यांसह उत्तीर्ण झालेल्या शाळाच अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मात्र यातून वगळण्यात आल्याने या शाळांच्या संस्थाचालकांना सरकारी मदतीसाठी अजून जोर लावावा लागणार आहे.राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळता सरकारने 2001 नंतर प्रत्येकी 2...
  November 22, 09:25 AM
 • नगर- बागडे मळ्यातील संभाजीमहाराज व्यापारी संकुलाची दुरवस्था झाली आहे. मुख्य ड्रेनेजलाइन गेल्या तीन वर्षांपासून उघडी पडल्याने हे संकुल म्हणजे मृत्यूचा सापळा बनले आहे. चार दिवसांपूर्वीच एक विद्यार्थिनी या ड्रेनेजमध्ये पडून मरता-मरता वाचली. वॉर्ड क्रमांक 29चे नगरसेवक संजय शेंडगे मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गाळेधारकांनी या संदर्भात मनपा प्रशासनाकडे दाद मागितली, परंतु त्यांच्याकडूनही टोलवाटोलवीच करण्यात आली. या वॉर्डातील दिल्ली दरबार हॉटेलसमोरील वाहतूक कोंडीची समस्याही गंभीर...
  November 22, 09:20 AM
 • नगर- कोतकर बंधूंसह वाहनचालक अजय गायकवाड सोमवारी पहिल्याच हजेरीला गैरहजर राहिले. दरम्यान, त्यांना पोलिस कोठडी देण्याच्या मागणीसाठी पोलिस प्रशासनाकडून न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला आहे.केडगाव येथील बापूसाहेब सातपुते यांना शस्त्राचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी माजी महापौर संदीप कोतकर, त्याचे भाऊ अमोल व सचिन यांना जामीन मंजूर करताना महिनाभर एक दिवसाआड दुपारी 2 ते 4 या वेळेत कोतवाली पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचा आदेश न्यायाधीश अनिल फटाले यांनी दिला आहे. कोतकर बंधूंच्या हजेरीचा...
  November 22, 09:11 AM
 • श्रीगोंदा- आगामी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी बोलवलेल्या काँग्रेसच्या बैठकीत अचानक आलेल्या तिस-या आघाडीच्या नेत्यांनी उपस्थितांना महाआघाडीत येण्याचे निमंत्रण देत काँग्रेसला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. आघाडीनेच पक्षात सामील व्हावे, असे उलटपक्षी आवाहन काँग्रेस नेत्यांनी केले. कार्यकर्त्यांनी मात्र नेत्यांना चिमटे, कोपरखळ्यांनी सावध करत आमदारकीचे नंतर बघा, आधी जिल्हा परिषदेचे ठरवा असे खडे बोल सुनावले.कुंडलिकराव जगताप, राजेंद्र नागवडे, राहुल जगताप, बाळासाहेब...
  November 22, 09:08 AM
 • नगर- जिल्ह्यातील मोजणीची सर्व प्रकरणे डिसेंबरअखेर निकाली काढण्याचा विडा भूमी अभिलेख विभागाने उचलला आहे. भूमी अभिलेख अधीक्षक धनाजीराव धायगुडे यांनी त्यासाठी अतिरिक्त 20 कर्मचा-यांची नेमणूक केली आहे.क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठ्या असलेल्या नगर जिल्ह्यात केवळ 43 भूकर मापक आहे. दरमहा सुमारे साडेचारशे प्रकरणे नव्याने दाखल होतात. जमिनीच्या वादांमुळे मोजणी करताना अनेक अडथळे निर्माण होतात. परिणामी विलंब होऊन प्रकरणे प्रलंबित राहतात. मे 2011 पर्यंत प्रलंबित असलेली प्रकरणे...
  November 22, 08:57 AM
 • नगर - प्रश्नपत्रिकांच्या छपाईस उशीर झाल्याने पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेचे नियोजन रविवारी कोलमडले. त्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचा-यांची चांगलीच धावपळ झाली.पोलिस शिपाईपदाच्या 409 जागांसाठी वाडिया पार्क क्रीडा संकुलात घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेस 5 हजार 535 उमेदवारांनी हजेरी लावली. 357 उमेदवार गैरहजर राहिले. सकाळी 7 पासून परीक्षेची तयारी सुरू झाली. क्रीडा संकुलातील प्रेक्षक गॅलरीत उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. 304 मुलींची व्यवस्था मैदानात करण्यात आली होती. एकूण आठ सेक्टर...
  November 21, 10:42 AM
 • नगर - भिंगार येथील इराणी रोडवरील बंगला रविवारी सायंकाळी आगीत भस्मसात झाला. सहा अग्निशमन बंबांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण समजू शकले नाही.बंगल्याच्या पुढील बाजूस चायनीज सेंटर आणि मागील बाजूस सुशील झंवर यांच्या गोदामात थंडपेयांच्या बाटल्या होत्या. पावणेचारच्या सुमारास आग लागली. जुन्या लाकडांमुळे आगीने लगेच रौद्ररूप धारण केले. लष्कराच्या तीन व नंतर आलेल्या महापालिकेच्या दोन बंबांनी 2 तासांत आग नियंत्रणात आणली. परंतु तोपर्यंत बंगला आगीच्या...
  November 21, 10:39 AM
 • श्रीगोंदा - राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणा-या श्रीगोंदा सेवा संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. संस्थेवर कब्जा करताना 13 पैकी 11 जागा जिंकताना सत्ताधारी पालकमंत्री बबनराव पाचपुते गटाचा त्यांनी धुव्वा उडवला.तालुक्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होऊन लगेच मतमोजणी झाली. कर्जदार मतदारसंघात 1280 पैकी 1222, तर बिगर कर्जदार मतदार संघात 2243 पैकी 1169 सभासदांनी मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी महेश गायकवाड यांनी...
  November 21, 10:38 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात