Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • नगर- पावसाळा संपत नाही तोच नगरसह संगमनेर, पारनेर, राहाता, नेवासा, कर्जत व श्रीगोंदा या सात तालुक्यांत टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सरासरीपेक्षा या तालुक्यांत कमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील इतर सात तालुक्यांवर मात्र वरुणराजाची कृपादृष्टी मागील वर्षीप्रमाणेच राहिली.2010 मध्ये मान्सूनने सुरुवातीला हुलकावणी दिली. परिणामी रब्बी हंगामातील गहू व हरभ-याच्या पेरण्या रखडल्या होत्या. या वर्षीही जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या पावसावर शेतक-यांनी...
  October 30, 07:42 AM
 • नगर- महापौरपदी विराजमान झाल्यानंतर महापौर शीला शिंदे यांनी स्वच्छ व सुंदर नगरची घोषणा केली होती, पण शहर तर सोडाच, त्यांच्या स्वत:च्या वॉर्डातच (क्रमांक 48) नागरी सुविधांचा अभाव आहे. संजयनगर, माणिकनगर, कोके पाटील चाळ, जुना आणि नवीन टिळक रस्ता हा परिसर महापौरांच्या वॉर्डात येतो. रस्ते, पथदिवे, सार्वजनिक स्वच्छता, उद्यान, सार्वजनिक शौचालये या सर्वच बाबतीत तेथील रहिवासी त्रासले आहेत. या भागात कचराकुंड्या नाहीत. त्यामुळे घाण इतस्तत: पसरलेली असते. माणिकनगर या उच्चभ्रू वसाहतीत काही विकासकामे झाली....
  October 30, 07:38 AM
 • अकोले- विश्रामगृहाचा वीजपुरवठा वर्षभरापासून तोडलाभंडारदरा येथील वन विभागाच्या सुंदरबन विश्रामगृहचा वीजपुरवठा वर्षभरापासून तोडण्यात आला आहे. यंदाच्या दिवाळीतही तेथे दिवा पेटला नाही.कळसूबाई, भंडारदरा या 32 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या अभयारण्याच्या देखभालीची जबाबदारी वन्यजीव शाखेच्या नाशिक कार्यालयाकडे आहे. सुमारे 41 लाख रुपये खर्च करून धरणाच्या भिंतीजवळ अम्ब्रेला फॉलच्या पूर्वेला वन खात्याचे विश्रामगृह बांधण्यात आले आहे. दोन सूट, स्वयंपाकगृह व रखवालदाराची खोली अशी या...
  October 30, 07:32 AM
 • श्रीगोंदा- काही दिवसांपासून श्रीगोंद्याच्या राजकीय आखाड्यात नागवडे-जगताप-नाहटा या त्रिकुटाने पालकमंत्री बबनराव पाचपुते यांची दमछाक चालवली असतानाच आता विखे-थोरात या काँग्रेसच्या जिल्ह्यातील दोन टोकांची एकी झाल्याने पाचपुतेंची डोकेदुखी वाढणार आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर होणा-या काँग्रेसच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गेल्या तीस वर्षांपासून श्रीगोंद्याच्या राजकारणावर पाचपुते यांचे अधिराज्य आहे. केवळ माजी आमदार शिवाजीराव नागवडे हेच पाचपुते यांचे...
  October 30, 07:29 AM
 • नगर- पावसाने झोडपले अन् राजाने मारले तर दाद मागायची कुणाकडे, अशी अवस्था दोन वर्षांपूर्वी संत किसनगिरीनगरमधील नागरिकांची झाली होती. महापालिका प्रशासन व पदाधिका-यांकडे वेळोवेळी मागणी करूनही या भागातील नागरिकांना पाणी मिळाले नाही. अखेर त्यांनी अडीच लाख रुपयांच्या लोकवर्गणीतून पाणीपुरवठा योजना पूर्ण केली. नवीनच विकसित झालेल्या संत किसनगिरीनगरमधील नागरिकांचे घराचे स्वप्न साकार झाले, परंतु त्यानंतर त्यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला तो पिण्याच्या पाण्याचा. येथील...
  October 30, 07:24 AM
 • नगर- नगरचा हरहुन्नरी नाट्य-चित्र अभिनेता मिलिंद शिंदे याने दिग्दर्शित केलेला नाच तुझंच लगीन हाय हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शनासाठी सज्ज झालेला असेल.या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे कथा, पटकथा, संवाद, गाणी याबरोबरच अभिनयाची मुख्य जबाबदारी मिलिंदनेच सांभाळली आहे. पुण्यातील दादा कोंडके स्टुडिओमध्ये सलग 14 दिवसांत या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले. थोडी कामे राहिली असून 12 नोव्हेंबरपर्यंत हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असेल. ती फुलराणी या नाटकात आणि अलीकडेच गाजलेल्या नटरंग...
  October 30, 07:20 AM
 • पाथर्डी- तालुक्यातील तोंडाळी शिवारातील सेवानगर तांड्यावरील सुमारे 200 रहिवाशांना चिकुनगुन्यासदृश रोगाची लागण झाली आहे.बाधित रुग्णांना उपचारासाठी कोरडगाव व पाथर्डी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भराट वस्तीवरील अनेकांनाही याच आजाराची लागण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सेवानगर तांड्यावर उपकेंद्र सुरू केले आहे. मात्र, या उपकेंद्रात केवळ एक पारिचारिका आहे. तेथे पुरेसा औषधसाठा नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. सेवा तांड्यावरील पाच...
  October 30, 07:18 AM
 • नगर- जकात वसुलीसाठी सहकार ग्लोबलला पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. स्थायी समितीच्या सभापती अनिता राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या स्थायीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला.सोलापूर कन्स्ट्रक्शनच्या नकारामुळे महापालिका प्रशासनाला जकात ठेक्यासाठी फेरनिविदा काढावी लागली. या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने सहकारला पुन्हा मुदतवाढ की मनपा कर्मचा-यांमार्फत जकात वसुली याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी प्रशासनाने स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठवला होता. सहकारची मुदत 31...
  October 30, 07:16 AM
 • नगर - घरांच्या बाहेर उभ्या केलेल्या मोटारी व मोटारसायकली शुक्रवारी मध्यरात्री पेटवण्याचा प्रकार भिंगारमध्ये घडला. वर्षभरात दुस-यांदा घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली. काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये असे प्रकार घडले होते. त्याचे लोण आता नगरला आले आहे. काही दुकानांवरही दगडफेक करण्यात आली.ब्राह्मणगल्ली, सरपणगल्ली, पाटीलगल्ली, शिवाजी चौक, नेहरू चौक व बेरड गल्ली घराच्या बाहेर लावलेल्या नऊ मोटारसायकली व दोन मोटारी रॉकेल टाकून पेटवण्यात आल्या. मोटारींना कव्हर असल्याने त्यांचे फारसे...
  October 30, 04:29 AM
 • शिर्डी - तथाकथित व्हीआयपींच्या वाढत्या गर्दीमुळे शनिवारी साईबाबा संस्थानला सशुल्क पास बंद करण्याची वेळ आली. वेगवेगळ्या मार्गाने नामांकित व्यक्तींचे शिफारसपत्र घेऊन दर्शनाचा पास मिळवण्याचा खटाटोप करणा-यांची गर्दी शनिवारी अचानक वाढल्याने संस्थानला हा निर्णय घ्यावा लागला. व्हीआयपींची विशिष्ट व्याख्या नसल्याने संस्थानच्या जनसंपर्क विभागापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.शिर्डीत दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत आहे. सण, उत्सव व सुट्यांच्या दिवशी लाखो भाविक शिर्डीत येतात....
  October 30, 03:45 AM
 • अहमदनगर - शहरामध्ये शुक्रवारी रात्री समाजकंटकांनी २३ वाहनांना आग लावली. या आगीत वाहनांचा कोळसा झाला आहे. शहराच्या भिंगार परिसरात ही जाळपोळ झाली आहे. नाशिक, पुणे पाठोपाठ आता नगरमध्येही समाजकंटकांकडून वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. या घटनेने भिंगार परिसरात खळबळ उडाली. दिवाळीच्या दिवसांत जाळपोळ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दारासमोरील वाहने जाळली गेल्यामुळे वाहने लावायची कुठे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकरणी भिंगार कँप पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात...
  October 29, 05:04 PM
 • वैजापूर: तालुक्यातील स्वस्त धान्य दुकान चालक व किरकोळ रॉकेल विक्रेते शिधापत्रिकाधारकांना चढ्या भावाने धान्य विक्री करत असल्याने गरिबांची आर्थिक लूट होत आहे.महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक पैसे आकारून शिधापत्रिकाधारकांकडून जादा पैसे घेऊन धान्य विक्री केल्या जात आहे. सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेतअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा माफक दरात पुरवठा स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना करण्यात येतो. दुकानदार...
  October 29, 09:47 AM
 • नगर: तब्बल 65 कोटी रुपयांचे कर्ज असलेला व चालविण्यासाठी अत्यंत अडचणीचा ठरलेला नगर तालुका सहकारी साखर कारखाना अवसायनात (लिक्विडेशन) काढण्यासाठी संचालकच पुढे सरसावले आहेत. कारखान्याचे संस्थापक दादापाटील शेळके यांच्या माघारी 22 पैकी 17 संचालकांनी हा कारखाना अवसायनात काढण्यासाठी साकडे घातले आहे. त्यामध्ये आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह दिग्गजांचा समावेश आहे. नगर तालुक्यातील ऊसउत्पादकांच्या सोयीसाठी दादापाटील शेळके यांच्या पुढाकारातून तालुक्यातील वाळकी येथे सुमारे 45 कोटी रुपये खर्च...
  October 29, 09:37 AM
 • शिर्डी: दिवाळीनिमित्त असलेल्या सुट्यांना जोडूनच शनिवार व रविवार आल्याने शुक्रवारीही शिर्डी साईनामाच्या जयजयकाराने दुमदुमून गेला. साई संस्थानच्या योग्य नियोजनामुळे लाखो भक्तांनी साईचे दर्शन घेता आले. सलग आलेल्या सुट्यांमुळे अनेक नागरिकांचे लोंढे साईच्या दर्शनासाठी आले होते. त्यामुळे सकाळपासूनच शिर्डी गर्दीने फुलून गेली होती. खासगी वाहतूकदारांनी शिर्डी ते शिंगणापूर यासाठी सुमारे पाचशे रुपये आकारून साईभक्तांना लुटण्याचा प्रकार केला. याबाबत अनेक साईभक्तांनी नाराजी व्यक्त केली....
  October 29, 09:26 AM
 • नगर: खंडणीसाठी नेवासे येथील व्यापा-यावर गोळीबार करणा-या सचिन पांडुरंग घोरतळे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तूल व तीन काडतुसे हस्तगत करण्यात आली.नेवासे येथील श्रीरामपूर रस्त्यावरील गणपती चौकातील जगताप कॉम्प्लेक्समधील फर्निचर व्यापारी कमलेश जगताप यांना घोरतळे याने 25 हजारांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्याने घोरतळे याने सोमवारी (24 आॅक्टोबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास जगताप यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला होता....
  October 29, 09:22 AM
 • नगर: पोलिस ठाणे आणि न्यायालयाप्रमाणेच सरकारी रुग्णालयाची पायरी चढणे लोक आता टाळत आहेत. अगदीच नाइलाज झाला तरच रुग्ण तेथे जातात. याला कारण सुविधांअभावी तेथे होणारी ससेहोलपट. सरकारी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच रुग्णालय प्रशासनाची अनास्था दिसू लागते. चौकशी कक्षात अभावानेच कर्मचारी असतात. केसपेपर काढण्यासाठीच्या चार खिडक्यांपैकी तीन बंद दिसतात. बराच वेळ ताटकळल्यानंतर केसपेपर रुग्णांच्या हातात पडतो.मुख्य डॉक्टर कामात मग्न असल्यास शिकाऊ डॉक्टर तपासणी करून प्रिस्क्रिप्शन...
  October 29, 09:17 AM
 • नगर: अमरधामध्ये विद्युतदाहिनीची सुविधा असली तरी पारंपरिक पद्धतीनेच अंत्यविधी करण्याकडेच नागरिकांचा कल आहे. सरणासाठी महिन्याला सुमारे 20 टन लाकूड लागते. ही गरज भागवण्यासाठी अनेक वृक्षांचा हकनाक बळी जातो. बोरा ट्रस्टच्या माध्यमातून सन 2006 मध्ये विद्युतदाहिनी उभारण्यात आली. त्यासाठी ट्रस्टने सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले. मात्र, विद्युतदाहिनीचा वापर करण्याविषयी बहुसंख्य नागरिकांची मानसिकता नाही. लाकडाच्या चितेवरच ते अंत्यविधी करतात. सरासरी रोज असे चार-पाच अंत्यविधी होतात. त्यासाठी...
  October 29, 09:12 AM
 • नगर: कुटुंबाचा आधारस्तंभ असणा-या शेतक-यांना अपघातानंतर कोणतीही ठोस मदत मिळत नसल्याने अनेक कुटुंबे निराधार होत आहेत. याचा विचार करून 2004 पासून राज्यातील सर्व शेतक-यांना सरकारने शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत विमा कवच प्रदान केले. चालू वर्षीही ही विमा योजना चालू ठेवण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असून, त्यापोटी येणारा 1 कोटी 37 लाख शेतक-यांचा 19 कोटी 18 लाख रुपयांचा विमा हफ्ता करार केलेल्या तीन कंपन्यांकडेही वर्ग करण्यात आला आहे.7/12 वर नोंद असलेला व 10 ते 75 वयोगटांतील शेतकरी जनता विमा...
  October 29, 09:08 AM
 • नगर: जिल्ह्याच्या विक्रीकराच्या महसुलात दरवर्षी तब्बल शंभर कोटींची वाढ होत आहे. मात्र, दुसरीकडे विक्रीकर बुडवणा-यांची संख्याही मोठी आहे.राज्याच्या एकूण महसुलात विक्रीकराचा वाटा सुमारे 65 टक्के आहे. विक्रीकराच्या रूपाने जमा होणाया महसुलातून विकासाची व लोककल्याणाची कामे होतात. ई-प्रणालीच्या वापरामुळे आता घरबसल्या विवरणपत्रे दाखल करणे शक्य झाले आहे. ज्या व्यापा-यांची आर्थिक वर्षातील उलाढाल 5 लाखांपेक्षा जास्त होते, त्यांनी मूल्यवर्धित कर कायदा 2002 नुसार नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक...
  October 29, 09:03 AM
 • पारनेर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शुक्रवारी दुपारी तब्बल एक तास आपल्या नातेवाइकांच्या गराड्यात रमले. निमित्त होते भाऊबिजेचे. तब्बल दहा वर्षांनी हा योगायोग जुळून आला. नगरजवळचे भिंगार हे हजारे यांचे गाव. त्यांच्या बहिणींपैकी सुलोचना देशमुख नगरला असतात. कनिष्ठ बंधू पांडुरंग हजारे हेही नगरला एका सहकारी बँकेत नोकरी करतात. घाटकोपर (मुंबई) येथे ताराबाई नरवडे व निमगाव जाळी (ता. संगमनेर) येथे हजारे यांच्या भगिनी आहेत. दरवर्षी पाडव्याचा मुहूर्त साधून त्यापैकी काही जण हजारे यांच्या भेटीला...
  October 29, 03:52 AM
 
जाहिरात

RECOMMENDED